क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२१

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2021 - 14:57

आयपीएल संपली आणि वर्ल्डकप आला वर्ल्डकप.. चला माहौल बनवूया
दुनिया हिलाs देंगे हम, व्हिसलपोडू आणि कोरबो लोरबो जितबो रे.. सारे एक होऊया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाय, 'The captain is as good as the team he leads' यातही तथ्य आहेच. >> हे 'लेकी बोले सुने लागे' असे असावे अशी अपेक्षा Happy

The captain is as good as the team he leads' यातही तथ्य आहेच
बिलकुल,
किंबहुना मी तर असे म्हणेन की टीम जितकी सरस तितके तिच्या कर्णधाराचे मूल्यमापन करणे अवघड होते.
जसे एकेकाळची ऑस्ट्रेलियाची जी चॅमिप्यन टीम होती तिचे कर्णधारपद अकरातल्या कोणीही भुषवले असते तरी चालले असते. अर्थात त्यातही स्टीव्ह वॉ आणि पाँटींग हे चांगलेच पर्याय होते. वा त्याच संघात न झालेला पण कर्णधार मटेरीअल असलेला शेन वॉर्नही होता. त्यामुळे आधीच वर्ल्डक्लास असलेल्या टीमच्या कर्णधारपदाचे मूल्यमापन करणे खरेच अवघड आहे.
याऊलट एखाद्या धोनीने ईंटरनॅशनल असो वा आयपीएल, दरवेळी आपल्याकडचे उपलब्ध रिसोर्सेस कश्या उत्तम प्रकारे हाताळले यामुळे त्याचे वेगळेपण मात्र चटकन अधोरेखित होते.

आता विराट कोहलीबद्दलच सांगायचे झाल्यास एक कर्णधार म्हणून टॅक्टीकली तो धोनीच्या काही प्रकाशवर्षे मागे आहे. पण तेच सध्या आपला संघ ईतरांच्या तुलनेत जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल संघ झाला असल्याने कोहलीचा विनिंग रेशिओ ईतका छान दिसतो की ते त्याच्या कर्णधारपदाचे फसवे मूल्यमापन करते.

याऊलट एखाद्या धोनीने ईंटरनॅशनल असो वा आयपीएल, दरवेळी आपल्याकडचे उपलब्ध रिसोर्सेस कश्या उत्तम प्रकारे हाताळले यामुळे त्याचे वेगळेपण मात्र चटकन अधोरेखित होते. >>> अरेच्च्या , पण आयपील फिक्स्ड असते असे तिथे म्हणत होतास ना ? मग त्यात काय होते ते सगळेच फिक्स्ङ ना ? कि फिक्स्ड करायला कसे उपलब्ध रिसोर्सेस कश्या उत्तम प्रकारे हाताळले असे म्हणतोयस ? Happy

सगळंच फिक्स वा स्क्रिप्टेड नसते असेही मी म्हणतो हे विसरलात Happy

उलट धोनीने अचानक ६ बॉल १८ मारले वा त्याला मारायला दिले आणि त्याही आधी तशी सिच्युएशन क्रिएट केली आणि एवढी धावगती हवी असताना आपला सध्याचा फॉर्म आणि फिटनेस माहीत असूनही धोनी फलंदाजीला जडेजा ब्राव्हो यांच्या आधी आला हे त्याला हिरो बनवायला स्क्रिप्ट केले होते हा संशय आहेच की मला Happy लाडक्यांचे जास्त कौतुक असते पण आपण फेव्हरीजम पार्शलिटी नाही करत..

बाकी जे धोनीबद्दल जग जाणते, सारे क्रिकेट एक्सपर्ट बोलतात ते मला सिद्ध करायची गरज ती काय..

खुद्द सचिन तेंडुलकर त्याला भारताचा सर्वश्रेष्ठ कप्तान बोलतो तिथे विषयच संपला नाही का Happy

खुद्द सचिन तेंडुलकर त्याला भारताचा सर्वश्रेष्ठ कप्तान बोलतो तिथे विषयच संपला नाही का >> अरेच्चा, मागे तू तेंडूलकर पण प्रसिद्धीसाठी काहीही बोलू शकतो असे म्हणालास होतास ना पुस्तक वाचायला सांगितले त्याचे तेंव्हा ? Happy

*सगळंच फिक्स्ड किंवा स्क्रिप्टेड नसतं* - माझ्या मतें इथल्या चर्चेतही कोणाचंही ( माझं तर नक्कीच) तसं नसावं, व फार कांटेकोरपणे तसं असण्याची गरजही नसावी. मीं तर बर्याच वेळां इथे ' wrong foot'वर पकडला गेलोय व दिलगिरी व्यक्त करून मोकळा झालोय. Wink

अरेच्चा, मागे तू तेंडूलकर पण प्रसिद्धीसाठी काहीही बोलू शकतो असे म्हणालास होतास ना पुस्तक वाचायला सांगितले त्याचे तेंव्हा?
>>>>
काही गल्लत होतेय का?
तेव्हा विषय बहुधा सचिनच्या १९४ डिक्लेअरचा होता. स्वतःच्या किस्स्याबाबत काय घडले हे यावर सचिन स्वतःच काय बोलतोय त्याला पुरावा समजायचे का?
आता प्रश्न सचिनच्या क्रिकेटविषयक एका मताचा आहे.
आता सांगा ते पटतेय की नाही? कि सचिनपेक्षा जास्त क्रिकेट ईथे कोणाला कळते असे आता मी म्हणू Happy
जोक्स द अपार्ट, सचिनच्या प्रत्येक मताशी तुम्ही सहमत व्हावेच असा हट्ट नाही. किंबहुना असे बिलकुल होऊ नये.

“सगळंच फिक्स्ड किंवा स्क्रिप्टेड नसतं“ - ही शुद्ध पळवाट आहे. Wink >>> जेव्हा अझर जडेजा तो आफ्रिकेचा क्रोनिये मॅच फिक्सिंग करायचा तेव्हा प्रत्येक सामना फिक्स करत असतील का? जेव्हा आयपीएल स्पॉट फिक्सिंग पकडली गेली तेव्हा ती दर सामन्यात दर ओवरला दर बॉलला होत असेल का?

Ipl मधेही fixing होत नसेल आस नाही. एखाद दुसरा प्लेअर आपल्या स्वतःच्या रिस्कवर करतही असेल पण रंजक वाढविण्यासाठी सामने शेवटच्या बॉल पर्यंत नेले जातात हा आरोप खरा समजायचा असेल तर हे एखाद दुसऱ्या खेळाडूचे काम नाही त्यासाठी टीम managment पासून राखीव खेळाडू पर्यंत सगळे त्यात सहभागी पाहिजे. अझर fixing मध्ये सापडला याचा अर्थ सगळी टीम इंडिया fixing करत होती असा नाही.

अझर fixing मध्ये सापडला याचा अर्थ सगळी टीम इंडिया fixing करत होती असा नाही. >> म्हणूनच सापडला Happy असो, हा विषय आता ईथे नको. आयपीलच्या धाग्यावरच बरा. वर्ल्डकप आपला फिक्सिंग मुक्त आहे

हे 4 संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत
1 भारत
2 पाकिस्तान
3 इंग्लंड
4 ऑस्ट्रेलिया

त्यातली ऑस्ट्रेलिया सेमीला बाद होईल
भारत फायनलला पोहोचेल
फायनलला मात्र भारतासमोर ईंग्लंड येईल की पाकिस्तान हे बघणे आता रोचक राहील.. Happy

कोहली कॅप्टन आहे त्यामुळे अवघड आहे. ग्रुप ए मध्ये जास्त चांगल्या टिम्स नाहीत त्यामुळे आपण सेमी पर्यंत जाऊ. पण सेमीला हारु. जर ग्रुप बी मध्ये असतो तर सेमी पण गाठता आली नसती. हेच जर रोहित शर्मा कॅप्टन असता तर मी बोललो असतो वर्ल्ड कप आपलाच आहे. त्यातल्या त्यात धोनीने मैदानाबाहेर राहून काय जादू केली तर होऊ शकतं काहीतरी.

स्कॉटलंड नामिबिया आपल्या ग्रूपमध्ये
श्रीलंका बांग्लादेश दुसऱ्या ग्रूपमध्ये. तो ग्रूप ऑफ डेथ झालाय.

काही गल्लत होतेय का?
तेव्हा विषय बहुधा सचिनच्या १९४ डिक्लेअरचा होता. स्वतःच्या किस्स्याबाबत काय घडले हे यावर सचिन स्वतःच काय बोलतोय त्याला पुरावा समजायचे का? >> हे वरचे वाक्य परत एकदा वाच बाबा नि तुला काय खटकते का ते बघ. प्रश्न सचिनच्या बोलण्याचा नाही तर तू तुझ्या मुद्द्यांना सोयीस्कर होईल तेंव्हा कसे प पुरावे वापरतोस हे बघ म्हणतोय. उदाहरणार्थ हे बघ "आयपीलच्या धाग्यावरच बरा. वर्ल्डकप आपला फिक्सिंग मुक्त आहे" आता तू ह्यावर अजून दहा पोस्ट्स लिहिशील हे ही मी सांगतो - सब फिक्स्ड है Happy

टी20 विश्वचषकाबद्दल नेमकीं भाकितं करायची मला तरी हिंमत नाहीं होत ! >> फिक्सिंग मुळे की अजून कशामूळे भाऊ ? सिरीयस प्रश्न आहे.

मौका मौका च्या जाहिराती आता बोर होताहेत... >> +१००

>>टी20 विश्वचषकाबद्दल नेमकीं भाकितं करायची मला तरी हिंमत नाहीं होत ! Wink

करुही नयेत आणि केली तर कुठे लिहू तरी नयेत Wink
कितीही नाही म्हंटले तरी मग आपल्या भाकितांच्या बाजूने बायस्ड होऊन आपण मॅच बघू लागतो आणि मग कधीकधी चांगल्या मॅचची मज्जा निघून जाते!!

*फिक्सिंग मुळे की अजून कशामूळे भाऊ ? सिरीयस प्रश्न आहे.*-
एकदांचं फिक्सिंग तज्ञांनी 'फिक्सिंग' कोणत्या दिशेने होणार हें सांगितलं, कीं उलट भाकीतं करणं एकदमच सोप्पं ! Wink
सिरियसली - जिथे कोणत्याही 2-3 षटकात कोणताही खेळाडू सामन्याचा निर्णय उलटापालटा करण्याची दाट शक्यता असते, तिथे भाकीतं करायला, तींही छातीठोकपणे करायला, हिंमत तर हवीच ना ! माझ्यात ती नाहीं हें प्रांजळपणे मीं कबूल केलंय, इतकंच !

कितीही नाही म्हंटले तरी मग आपल्या भाकितांच्या बाजूने बायस्ड होऊन आपण मॅच बघू लागतो
>>>>

+७८६
म्हणून भाकीते अशी करावीत जे संघ जिंकावेत असे वाटते Happy

केशव महाराज पण आहे आज. सुरवातीला महाराजांना पाठवावं ओपन करायला. महाराजांनी पण मालवणी स्टाईल मध्ये सगळ्यांना गोळा करून होय महाराजा बोलत सुरवात करावी.

आफ्रिका पॉवरप्ले मध्येच बॅकफूटवर गेले..
मिलर मार्करम मिळून गोलंदाजांना लढायला काही देऊ शकतील का?
तुर्तास अवघड वाटतेय..

' व्हsssय म्हाssराsssजा !!!'>>> हो तेच ते Happy
महाराज ने विकेट घेतली. महाराज गेम चेंजर ठरणार आज.

विण्डीज ९ ओवर ४२-६
बेजबाबदार फटकेबाजी

गंमत म्हणजे ६ विकेट जाऊनही रसेल पोलार्ड मैदानावर आहेत

Pages