Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी टीम: ते "'तेरी अदाओं
माझी टीम: ते "'तेरी अदाओं का " च आहे.
लिरिक्स लिहिणारेही बऱ्याच चुका करतात.
तुम गगन के चन्द्रमा हो या गाण्याचे लिरिक्स मध्ये पुढे "तुम प्रलय के देवता हो" असं लिहिलंय बघा इथं, प्रणय ऐवजी.
ऑनलाइन लिरिक्सचा भरोसा नसतो आणि पूर्वीच्या छापील पुस्तकाचाही नसायचा. लहानपणी कुणाच्यातरी घरी लिरिक्सचे पुस्तक होते त्यात "छज्जे उप्पर लडकी नाचे" ऐवजी "लडके उपर लडकी नाचे" असं छापलं होतं.
लडके उपर लडकी नाचे" असं छापलं
लडके उपर लडकी नाचे" असं छापलं होतं>>>>>> मला लहानपणी असंच ऐकू यायचं पण. आणि तेव्हा आपण काय बोलतोय, हे.समजण्याचं वयही नव्हतं....
खूप वर्षांनी खऱ्या लिरीक्सचा शोध घेतला मग.
>> लडके उपर लडकी नाचे
>> लडके उपर लडकी नाचे

मी छत के उपर असे ऐकायचो आणि तिरक्या कौलांवर नाचणारी मुलगी (कारण आमच्या गावात सगळी कौलारू घरेच होती) कल्पना करायचो
छत के ऊपर >> मलापण हेच ऐकू
छत के ऊपर >> मलापण हेच ऐकू यायचे
हिमेश रेशमियाची गाणी एवढी लक्ष देऊन कधी ऐकलीच नव्हती.
विवाह मधलं आहे एक छोटंसं ,
विवाह मधलं आहे एक छोटंसं , समय पल की बेला (?) आयी रे आयी सजनी..ते समर्पण आहे हे फार नंतर कळालं.
हिमेश रेशमियाची गाणी एवढी लक्ष देऊन कधी ऐकलीच नव्हती>>> त्याच्या गाण्यांमध्ये चुकीचे एकले जाण्याचेच पोटेन्शियल आहे ... झलक दिखला जा ऐका .. सगळेच शब्द वेगवेगळे ऐकते मी नेहमी
पण 2005 साल हिमेश रेशमियाने
पण 2005 साल हिमेश रेशमियाने गाजवलं होतं. लाऊडस्पीकर ला सगळीकडे त्याचीच गाणी वाजायची. आजही त्याची गाणी ऐकली की त्या दिवसांच्या आठवणी ताज्या होतात.
आले भुतांचे स्नेही, 'त्या '
आले भुतांचे स्नेही, 'त्या ' गाण्याचा उल्लेख केल्याबरोबर.. .
,...भागोsss
मला खूप आवडतात हिमेश ची गाणी.
मला खूप आवडतात हिमेश ची गाणी. जरा गाडीत झोप आली की एकदम उत्साह संचारतो.
स्पेशली हेराफेरी२ चे कितणे अरमाण माण माण
आणी झलक दिखलॉ जॉ
आले भुतांचे स्नेही, 'त्या '
आले भुतांचे स्नेही, 'त्या ' गाण्याचा उल्लेख केल्याबरोबर.. . Lol ,...भागोsss>>> आम्ही कंपनी सुटायच्या दहा पंधरा मिनिटे आधी भागोsss भागोsss बोलायचो त्याची आठवण आली.
बादवे त्याकाळी हिमेशला टक्कल होतं त्यामुळे तो टोपी घालायचा. नन्तर त्याने एक रुपयात एक केस पेरा ट्रीटमेंट घेतली आणि त्याला केस आले.
हो तेव्हाचा गड्डू आणि आताचा
हो तेव्हाचा गड्डू आणि आताचा बारीक आणि केसवाला हिमेश बराच फरक आहे.
जरा गाडीत झोप आली की एकदम उत्साह संचारतो >>> हो तेव्हा आवडायचीच त्याची गाणी. आणि तेव्हा लहान होते त्यामुळे मला तो आणि इमरान हाश्मी एकच वाटायचे आधी . सारखेच दिसायचे जरा.
तो आणि इमरान हाश्मी एकच
तो आणि इमरान हाश्मी एकच वाटायचे आधी >>>
हो, खरं आहे. नावं सुद्धा
हो, खरं आहे. नावं सुद्धा हिमेश रेशमी आणि इमरान हाश्मी. दिसायला पण सारखे.
माझे असे कन्फ्यूजन ट्विनकल खन्ना आणि रविना टंडन मध्ये व्हायचं.
माझे असे कन्फ्यूजन ट्विनकल
माझे असे कन्फ्यूजन ट्विनकल खन्ना आणि रविना टंडन मध्ये व्हायचं. --- same
असे कन्फ्यूजन ट्विनकल खन्ना
असे कन्फ्यूजन ट्विनकल खन्ना आणि रविना टंडन मध्ये > हो माझंही. इतकंच काय, अक्षय कुमारचंही कन्फ्यूजन झालं होतं.
कन्फ्यूजन ट्विनकल खन्ना आणि
कन्फ्यूजन ट्विनकल खन्ना आणि रविना टंडन मध्ये >>>सेम ,अजूनही होतं
हरचद , तुम्हाला रविना ,
हरचद , तुम्हाला रविना , ट्विनकल खन्ना आणि अक्षय कुमार सेम वाटलेले?

हा हा हा. हो ना, जिस्म एक जान
हा हा हा. हो ना, जिस्म तीन जान एक!
आताच शंकानिरसन करुन घेतलं
आताच शंकानिरसन करुन घेतलं
ओम्या आणि स्वीटूच्या
ओम्या आणि स्वीटूच्या मालिकेच्या टायटल सॉंग मध्ये शकूच्या तोंडी एक ओळ आहे "यशोदा हवी गं गोकुळाला" ते मला नेहमी "यशोदा हवी गं बोकडाला" असं ऐकू येतं
नमस्ते लंडन मध्ये ते आनन फानन
नमस्ते लंडन मध्ये ते आनन फानन गाणं मला 'लालन सारंग हुवा कैसे क्या' असं ऐकू येतं.
इथे क्लिक करून दहा सेकंद ऐका
इथे क्लिक करून ऐका:
https://youtu.be/t01xy30jZ7A?t=242
जमी आसमाँ से वो पूछती नहीं है
लहरे भी साहिल से पूछते नहीं है
असे ऐकायला येते कि नाहीं? प्रत्यक्षात त्या ओळी अशा आहेत:
ज़मीं आसमां से तो कुछ कह रही है
लहरें भी साहिल से कुछ कह रही है
बरोब्बर उलट अर्थ ऐकायला येतोय
युवा सिनेमाचं जे टायटल सॉंग
युवा सिनेमाचं जे टायटल सॉंग आहे, ते नक्की काय आहे? मला ते असं ऐकू येतं:
धक्का लागे भुका
खाये का मनुका?
बन जा रे बंदा रशमें रम (आमरसात रम? ईई)
ओ युवा यूवा ओ यू वा आ आ
धक्का लागे भुका
धक्का लागे भुका
खाये का मनुका?
बन जा रे बंदा रशमें रम (आमरसात रम? ईई) >>>
ते दिलसे मधलं 'उन्नी वन्नी
ते दिलसे मधलं 'उन्नी वन्नी कन्नीक्यो उत्तड उंदड कन्नीक्यो उंडड वंड कन्नीक्या' रे इथे हवं, कैच्याकैसाठी फार वाव आहे त्यात
झालेय त्यावर बरेच याच
झालेय त्यावर बरेच याच धाग्यावर पूर्वी.
उंदरावरची सुंदरी असे काहीसे छान(!) विडंबन आहे पहा.
याला 'चुकीचं ऐकू आलेलं गाणं'
याला 'चुकीचं ऐकू आलेलं गाणं' म्हणता येणार नाही, पण तरी लिहितेच.
'जिस गली में तेरा घर' गाण्यात एक ओळ आहे
'जिस चमन में तेरे पग में काँटे चुभे उस चमन में हमें पाँव रखना नहीं '
या ओळीचा अर्थ मी लहानपणी असा घ्यायचे की आपल्याही पायात काटे रुततील म्हणून त्या बागेत पाय ठेवायचा नाही.
आत्ता बघितलं तेव्हा लक्षात
आत्ता बघितलं तेव्हा लक्षात आलं की ते 'उस चमन से हमें फूल चुनना नही' आहे. पाँव रखना नहीं वाली ओळ वेगळी आहे. पण एकूण एकच. त्या बागेत जायचं नाही
>> चमन में हमें पाँव रखना
>> चमन में हमें पाँव रखना नहीं
मलासुद्धा ही ओळ अशीच असेलसे वाटले होते.
बालमा चा चमन टेस्टिंग साठी वापर
चमन टेस्टिंग
चमन टेस्टिंग
येथे गली, डगर, चमन टेस्ट करून मिळेल!
सद्ध्या स्वीटु ओम ची सिरीयल
सद्ध्या स्वीटु ओम ची सिरीयल चालू आहे त्यातल्या टायटल साॅन्ग मधे " यशोदा हवी का बोकडाला" असं ऐकू येतं. ते असंच ऐकू येतं ना हे मी रोज एकदा ऐकून चेक करत असते. रो-ज ते तस्संच वाटतं.
Pages