Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समस्त हिंदी चित्रपट बघणाऱ्या
समस्त हिंदी चित्रपट बघणाऱ्या जनतेला पंजाबी भाषा येतेच असा समज गितकरांनी का करून घेतला असेल बरे? आजकाल तर बरीच गाणी पंजाबी मध्ये असतात. काही शब्दांचे हिंदीशी साधर्म्य असते ते समजतात पण बाकीचे डोक्यावरून जातात.
तू लादे मेनू गोल्डन झुमके
मै पन्ना विच पावा चुमके
बंजावे तू मेनू शॉपिंग करादे
मांजवे रोमँटिक पिचर दिखादे
इक विस्टा पैया वे
चिट्टिया कलैया वे
>> आजकाल तर बरीच गाणी पंजाबी
>> आजकाल तर बरीच गाणी पंजाबी मध्ये असतात.
अगदी हेच मी याआधी इथे लिहिले कि लिहिता लिहिता थांबलो माहित नाही पण हे खूपच खरे आहे. आजकाल सगळ्याच हिंदी गाण्यांत एनदि, लेनदि, पेंदी, विच दा, तेने, मेनू, जांवा असले शब्द विपुल प्रमाणात आढळतात. पंजाबी ड्रेस, पंजाबी खाणे, पंजाबी गाणे असे आहे आजकाल

>> सागर
>> सागर
>> पाद
>> केकम सेकम
All three Lol Lol

देव आनंदच्या टक्सी ड्रायव्हर मधे एक गाणं आहे ' जीने दो और जियो' त्यात लहानपणी पुढचा शब्द नेहमी 'खट्टी जवानी के दिन है' असा ऐकायला यायचा. आता जवानी मधे खट्टी काय व्हायचं ते कळलं नव्हतं
चुलतभावाने तो शब्द 'चढती जवानी' आहे असं सांगितलं. पण आता यात जवानी कुठे वर चढायला निघाली आहे असा त्याच्याबरोबर वाद झाला. तो तेव्हा पाचवीत असल्याने त्याच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं 
थोडे अवांतर - या चित्रपटातील सर्व गाणी लताने गायलेली आहेत, अपवाद हे गाणं जे आशाने गायलं. कारण लताचा म्हणे 'चढती जवानी' या शब्दावर आक्षेप होता
तो कितपत खरा ते माहिती नाही कारण पुढे कारवा मधलं 'चढती जवानी मेरी चाल मस्तानी' हे गाणं लतानेच गायलं आहे 
पंजाबी गाणी डोक्यात जायला
पंजाबी गाणी डोक्यात जायला लागली.
'गालो का है रंग गुलाबी, तू कहां की मै पंजाबी' हे तर हाईट आहे . "गुलाबी गाल का, वा वा म्हणजे तू तर पंजाबचीच हां" हे कतरीना बाबत खरं आहे पण गाणं गाणार्या पंजाबी अक्षय चे काय ?
पंजाबी नाही पण एका जुन्या
पंजाबी नाही पण एका जुन्या गाण्यात गुलाबी आंखे पण आहेत त्यामुळे फार मनावर नका घेऊ
ते गाणं तर अजून हाईट आहे
ते गाणं तर अजून हाईट आहे.गुलाबी आखे म्हटलं की डोळ्यासमोर ती रामसे पटातली भुतं येतात.
गुलाबी आखे म्हटलं की
गुलाबी आखे म्हटलं की डोळ्यासमोर ती रामसे पटातली भुतं येतात. >>>
ही अशी का?
ही फँटासारखी आहेत रमड
ही फँटासारखी आहेत रमड
थोडा कम करो जी...
ही फँटासारखी आहेत रमड >>>
ही फँटासारखी आहेत रमड >>> इतने पैसे में इतनाहीच मिलेगा
कृष्णधवल चित्रपट असायचे
कृष्णधवल चित्रपट असायचे त्यामुळे कशाचा रंग कसला आहे ते शब्दातून सांगितले असावे
इन आंखोंका रंग हो गया गुलाबी
मला वाटतं ते खरं "शराबी आंखे
मला वाटतं ते खरं "शराबी आंखे जो तरी देखी गुलाबी ये दिल हो गया" असं असेल पण गायकाने घोळ घालून शब्दांची उलटापालट केली.
'गुलाबी आँखे' म्हणजे डोळे
'गुलाबी आँखे' म्हणजे डोळे आलेली मुलगी वाटते. त्यातून तो राजेश खन्नाचा भयंकर डान्स, समोर नंदा - एकंदरीतच सगळं भयाण प्रकरण आहे.
"आज फिर तुम पे प्यार आया है"
"आज फिर तुम पे प्यार आया है" हे गाणं सुरवातीला अनेक वर्षे "आखिर तुम पे प्यार आया है" असे ऐकत होतो.
आखिर तुम पे प्यार आया है, बेहद और बेहिसाब आया है
(अखेर तुझ्यावर प्रेम आलं बुवा एकदाचं, आणि जोरजोरात आलंय)
काल यूट्यूबवर 'मधुमती' बघताना
काल यूट्यूबवर 'मधुमती' बघताना सबटायटल्स ऑन केली होती. 'दिल तडप तडप के' या गाण्यात वैजयंतीमालाच्या तोंडी ' दिल धडक धडक के दे रहा है ये सदा ' असे शब्द आहेत. सदा म्हणजे साद. पण सबटायटल्स ज्याने लिहिली असतील त्याला चक्क 'सजा' असा शब्द वाटल्यामुळे punishment असं भाषांतर आलं होतं! ते फारच विनोदी वाटत होतं.
आता ह्याचे भाषांतर करा
आता ह्याचे भाषांतर करा
https://youtu.be/YQCGiJo1UKw
या दारही है, तेरी या दारही है
या दारही है, तेरी या दारही है (?)
(या दारातच आहे. तुझी या दारातच आहे. लहानपणीचे हिंदी आणि कल्पनाशक्ती भलतीच असते. ती गाणी आता कानावर पडली कि ते आठवते)
Blackcat, त्या गाण्याचं
Blackcat, त्या गाण्याचं सुरुवातीचं संगीत हे 'उठे सब के कदम तररंपंपम' वरून ढापल्यासारखं वाटतंय.
हरफन मौला मधल्या इधर भी शीशी
हरफन मौला मधल्या इधर भी शीशी है, उधर भी शीशी है, कहीभी खुल जाये, हवामे घुल जाये वर आमच्याकडे मेजर प्रमाणात हॅहॅ करून झालं(अर्थात त्यांनी शीशी ऐवजी जाम वापरला असता तरी त्यावरून ट्राफिक जाम चे पीजे आम्ही केलेच असते.संधी सोडायची नै.)
केकमसेकम punishment
केकमसेकम

punishment
नवर्याचे मराठी अजुनही दिव्यच
नवर्याचे मराठी अजुनही दिव्यच आहे( मराठी नसल्याने आणि मराठीत गाणी एकलीच नाहीत विशेष),
तर झालं असं की, मी रोज शास्त्रीय गीतं एकते रात्रीची. तर कुमार गंधर्व ह्यांची गाणी लावलेली. खरं, त्यांची माफी खरच मागून लिहिते, त्यांचे काही उच्चार बरेच सदोष आहेत व समेवर शब्द गिळतात असे मला वाटते पण आवाजात एक डेप्थ असल्याने मला आवडतात..
गाणं होतं,
ॠणानुबंधाच्या जिथुन पडल्या...
त्यातली एक ओळ आहे,
कधी जवळ सुखाने बसलो, कधी दुखा:त सुखाने हसलो...
नवरा रूममध्ये आला व म्हणाला, ये. मराठी मे 'डबल सुखाने" क्या मतलब है?
त्याने एकले ते असे,
कधी "डबल सुखाने" बसलो...
मग मी ही , रूमच्या बाहेर जावून ओळ एकली ती, ते डबल सुखाने असेच एकु येत होते.
हो ते 'जवळ' मला हमखास 'धवल'
हो ते 'जवळ' मला हमखास 'धवल' वाटायचं. आणि 'धुसफुसलो' ला हसू यायचं लहानपणी. माझ्या आजीला हे गाणं खूप आवडायचं.
मला ते जवल वाटले जवळ ऐवजी. ळ
मला ते जवल वाटले जवळ ऐवजी. ळ चा उच्चार ल असावा डबल नक्किच नाही.
>> ते 'जवळ' मला हमखास 'धवल'
>> ते 'जवळ' मला हमखास 'धवल' वाटायचं.
+१ मी आत्ताही तेच नेटवर शोधून पाहिले
कुमार गंधर्वांना काही तरी
कुमार गंधर्वांना काही तरी फुफ्फुस्साचा आजार होता व त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती म्हणून त्यांच्या गायनात शब्द उच्चार स्पष्ट येत नाहीत असे मी कुठेतरी वाचले होते. पण ऋणानुबंधांच्या या गाण्यातील त्यांचे उच्चार मात्र खुप स्पष्ट आहेत असे मला वाटते. बाकी धागाच मला चुकीची ऐकू आलेली गाणी असल्यामुळे तो प्रश्नच निकाली निघतो.
'धुसफुसलो' ला हसू यायचं
'धुसफुसलो' ला हसू यायचं लहानपणी. >>>>> हो, मला जाम हसू यायचे. माझे बाबा मग रेडीओवर हे गाणे लागले की मला नी आईला हाक मारुन सांगायचे.
वाणी जयरामनी तुष्टता' चा
वाणी जयरामनी भेटीत चा उच्चार काय केलाय एका.
पूर्वी दर बुधवारी आपली आवड
पूर्वी दर बुधवारी आपली आवड मध्ये हमखास लागायचं.
आधी तर मला भेटीत दुष्टता मोठी असं ऐकू यायचं, मग तुष्टता .
Lyrics वाचूनच तृष्टता कळाली. कर्णदोष
आताच रुही चित्रपटातील जान्हवी
आताच रुही चित्रपटातील जान्हवी कपूरवर चित्रित झालेलं गाणं "नदियों पार" ऐकलं. मला तर "हो ना कर मान रुपये वाला बड बड बेहन्दा आगे" असच ऐकू येतं.
"हो ना कर मान रुपये वाला बन बन बेहन्दा आगे"
हो ना कर मान रुपये वाला बन बन
हो ना कर मान रुपये वाला बन बन बेहन्दा आगे >> हे नक्की बरोबर आहे ना? मला काही अर्थच नाही कळला.
"हो ना कर मान रुपये वाला बन
"हो ना कर मान रुपये वाला बन बन बेहन्दा आगे" - रुपयासारखा मान करू नकोस पुढे जाऊन तुला भोगावे लागेल.
- आंतरजालावरून साभार
Pages