मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्फेक्ट वर्णन अमित. आता प्रभा function at() { [native code] }र्यांची ही चीझ 'कुठलं गाणं रिपीट मोडवर ऐकत आहात' धाग्यावर जाईल बहुतेक.

माधव, ऐजईयो सावरे >> +१. बेंगलोरला असताना प्रत्यक्ष (की प्रति'कर्ण'?) त्यांच्याकडून ऐकायला मिळालं होतं एका कॉन्सर्टीत.

ऐजइयो सावरे ला + कितीतरी.
प्र अ तसेच मुकुल शिवपुत्र दोन्ही आठवण आली की ऐकवीत अशी वाटतात.
हपा लकी आहात.

तन मन धन ऐकतो आता.

ओह्ह..कृष्ण रुक्मिणी चा संदर्भ माहिती नव्हता...
Happy
अजून एक..
तेरे वास्ते मेरा इष्क खुफियाना ....

माधव...तो जप बनून जातो हे कळले नाही..?

तो जप बनून जातो हे कळले नाही >>> सुरुवातीला "जमुना किनारे मेरो गाव, सावरे अयजय्यो" अशी चीज पुढे फक्त "सावरे अयजय्यो" अशीच उरते. प्रभाताई ते दोन शब्द इतक्या तन्मयतेने आणि विविधतेने आळवतात. त्याच्याशी तन्मय होता आले तर वेगळीच तंद्री लागते.

रच्याकने, भुवनेश कोमकलींच्या आवाजातली ही चीज पण नक्कीच ऐका (च). ते खूप सुंदर गायक आहेतच आणि या चिजेपुरते बाप से बेटा सवाई, आजोबा से नातू सवाई असे सगळे पण आहेत.

त्यावरून आठवलं, मला चुकीच्या ऐकू आलेल्या चिजा इथे टाकता येतील. भीमसेन जोशींनी गायलेली वृंदावनी मधली जाऊं मैं तोपे बलीहारी चीझ, त्यात शेवटी तुम तो गरीब नवाझ ऐवजी मला तुम तो गरिबांना वास असं काहीतरी ऐकू येतं.

सुरेख लिहिलं आहे, माधव आणि अमित !
मला गाण्यातलं काही कळत नाही पण कुस्त्य व अकुस्त्य यांतला फरक कळतो बहुतेक!
'कुस्ती' शब्दावर खेळलेली कुस्ती Proud

Proud
त्यांचं सावरे ऐजय्यो मी पण ऐकलंय प्रतेक्ष! सवाईत गायलेलं. एका दिवशी त्यांनी केलेला शांत शेवट आणि दुसर्‍या दिवशी मालिनी राजुरकरांचा सिग्नेचर भैरवीतला 'लालवाला जोबन' ब्रेथ टेकिंग टप्पा आणि मग 'तदानी तानी तोम तनतनत देरेना' हा नेहेमीचा तराणा. फार मजा आलेली.
फॉर अ चेंज हरचंद पालवांनी काही तरी प्रतेक्ष केलंय हो! Wink Proud

<<रच्याकने, भुवनेश कोमकलींच्या आवाजातली ही चीज पण नक्कीच ऐका (च). >>. ऐकली, आवडली.

छिन्नी हातोड्याचे घाव करी दगडाचा देव

मला हे हातोळ्याचा, दगळाचा असं ऐकू येतंय. तडाखे मधला ड ड आणि ळ च्या मधला काहीतरी उच्चार आहे.

हे गीत देवकीनंदन गोपाला या चित्रपटातलं आहे - संत गाडगेबाबा. त्यांची बोली दाखवण्यासाठी वेगळे उच्चार केले असतील का? गाण्याचे जे शब्द इथे लिहिलेले दिसतात, त्यापेक्षा बरेच वेगळे उच्चार सुधीर फडके यांनी केले आहेत.

माधव छान लिहिलस, पण सावरे आयजै यो आणि कुमारांचा उल्लेख नै, णिषेध Wink मला हे फक्त कुमारांचच ऐकू येतं Happy पण प्रभाताईंचही फार गोड आहेच हं Happy
हे कुमारांचं:
https://youtu.be/oI1XsKveQYk

मागे सांगायचं राहून गेलं. मी सावरे कोणाचं आधी ऐकलं आठवत नाही, पण तेव्हा 'सावरे अय्यय्यो' असं ऐकू आलं होतं.

बादशह सारखा अचाट गीत(?) लिहिणाराचे शब्द मला बर्‍याचदा कळत नाहीत.
मग जेव्हा गूगलून काढते तेव्हा कळतात,

बम तेरा गोते खाये
कमर पे तेरी butterfly ओ हा
body तेरी मखन जैसे
खाने में बस तू Butter खाये

ते ,” body तेरी मखन जैसे” मला सुरुवातीला काही वेगळच एकायला यायचे. “ पॉट्टी तेरी... “ असं काहीतरी.

मुझे निंद ना आये
निंद ना आये
मुझे चैन ना आये
चैन ना आये

मुझे निंद ना आये
मुझे चैन ना आये
कोई चाय जरा धुंडके लाये
न जाने कहा दिल खो गया
न जाने कहा दिल खो गया....

यावरून मला चुकीची ऐकू आलेली जाहिरात आठवली.
'ब्रूकबॉण्ड रेडलेबल चाय
सचमुच निंद उड जाय"

(ते 'सचमुच है बेजोड चाय' असे होते.
तेव्हा मला "बेजोड" असेच ऐकू आले असते तरी त्याचा अर्थ "न शोभणारा जोडा" असे काहीसे वाटुन ते विचित्रच वाटले असते.)

अरेच्चा चुकुन चुकीच्या गाण्यावर बरोबर गाणी लिहिली त्यामुळे धागासंभ्रम झाला. अवल छान लिहिलंय.

Pages