मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'चुकीचं ऐकू आलेलं गाणं' ऐवजी 'चुकीचं दिसलेलं गाणं' लिहीलं तर चालेल का? Happy

'बिवी ओ बिवी' मधल्या या गाण्याची सुरुवात सारसबागेतल्या गणपती मंदीरात होते. रणधीर कपूर तळ्यातल्या गणपती मंदीरात जातो आणी मंदीरातच गाणं म्हणतो. मात्र मंदीरात गणपती बाप्पांऐवजी अचानक राधा-कृष्णाची मूर्ती दिसल्यावर पुलंचा पानवालाच आठवला: "अहो उघड्या अंगाचे महात्मा गांधी कुठेही दिसतात. पण नेहरू शर्ट घालून वर गांधी टोपी घातलेले गांधी आमच्या पुराणप्रिय पानवाल्याकडेच दिसू शकतात" Happy

सद्ध्या स्वीटु ओम ची सिरीयल चालू आहे त्यातल्या टायटल साॅन्ग मधे " यशोदा हवी का बोकडाला" असं ऐकू येतं. ते असंच ऐकू येतं ना हे मी रोज एकदा ऐकून चेक करत असते. रो-ज ते तस्संच वाटतं. >>> सेम. मला पण तसच ऐकू येत नेहमी Rofl Rofl Rofl

साॅन्ग मधे " यशोदा हवी का बोकडाला" असं ऐकू येतं. <<<<<
Lol मीही ऐकून पाहिलं. तसंच ऐकू येतं.
ते 'यशोदा हवी गं 'गोकुळा'ला' आहे बहुधा!

ओ मारिया ओ मारिया... या गाण्यात नेहमी 'जाने जब बोला था तुझसे शादी करेगी मुझसे' असे ऐकू यायचे.

सद्ध्या स्वीटु ओम ची सिरीयल चालू आहे त्यातल्या टायटल साॅन्ग मधे " यशोदा हवी का बोकडाला" असं ऐकू येतं. ते असंच ऐकू येतं ना हे मी रोज एकदा ऐकून चेक करत असते. रो-ज ते तस्संच वाटतं.>>>> Biggrin

सद्ध्या स्वीटु ओम ची सिरीयल चालू आहे त्यातल्या टायटल साॅन्ग मधे " यशोदा हवी का बोकडाला" असं ऐकू येतं. ते असंच ऐकू येतं ना हे मी रोज एकदा ऐकून चेक करत असते. रो-ज ते तस्संच वाटतं.>>>>मलाही तसंच ऐकू आलं

यशोदा हवी का बोकडाला >> तसंच आहे ते. आत्ता ऐकून बघितलं मी. ज्यांना गोकुळाला वगैरे ऐकू येतंय त्यांना चुकीचं ऐकू येतंय.

'रुक जा ओ जानेवाली रुक जा' या गाण्यात ' आदमी बुरा नहीं मैं दिल का' याऐवजी मला (लहानपणी) 'आदमी पुराना हूं मैं दिल का' असं ऐकू यायचं Lol

सध्याचं ऐकलेलं लेटेस्ट...

आसमानो पे जो खुदा है, उससे मेरी यही दुआ है
चाँद यह हर रोज़ मैं देखु, तेरे साथ में

हा .. कुत्ती मोहब्बत ने अंगड़ाई ली,दिल का सौदा हुआ चाँदनी रात में
तेरी नज़रों ने कुछ ऐसा जादू किया,लूट गये हम दोपहरी मुलाक़ात में

अर्थ (मला लागलेला) : मुहोब्बत खुप कुत्ती चीज आहे आणि तिने आता कुस पालटली आहे....तर आपल्या दिलाचा सौदा चांदण्या रात्रीमधे झाला...
पण तुझ्या डोळ्यात जी काही जादु होती त्यामुळे आपल्या दुपारी झालेल्या भेटीत तू मला लुटलेस...सौदा चुकला..ई ई ई

गड्डी ते हस बोल वे (?) न जिंद सदी रोना वे ..

यशोदा हवी का बोकडाला >> तसंच आहे ते. आत्ता ऐकून बघितलं मी. ज्यांना गोकुळाला वगैरे ऐकू येतंय त्यांना चुकीचं ऐकू येतंय. >>>> अय्यो Rofl ते खरंच तसंच ऐकू येतंय , बोकडाला Lol

कुत्ति गाण्याची खासियत हिच आहे की, एकुणात सगळ्यांना अगदी तेच एकू येते.
माझ्या सर्व ओळ्खीच्यांत पण अगदी, कुत्ती मोहब्बत असेच म्हणण्यावरून भांडणं झालीत कस्काय वर.
गूगल केले तरी, बर्याच लिरिक्स साईटव वर पण, कुत्ती मोहब्बत आहे.

ते नवीन आलेलं गाणं मै पानी पानी हो गई मधे
नजर थी फैनी
हुई बेचैनी

फैनी का अजून काय दुसरा शब्द आहे> काय अर्थ देव जाणे.

Pages