Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अच्छा! धन्यवाद.
अच्छा! धन्यवाद.
हाय रामा ये क्या हुआ, तुम ऐसे
हाय रामा ये क्या हुआ, तुम ऐसे हमे सताने लागे
तुम कितनी प्यारी हो सामने, *हमका बूम* कैसे रहे.
हे ऐकताना मला वाटायचे की भोजपुरी मधला हमका म्हणजे मला आणि बूम म्हणजे होश वैगरे असेल.
हो ना कर मान रुपये वाला बड बड
हो ना कर मान रुपये वाला बड बड बेहन्दा आगे >>>
हे बरंच बरं ऐकू आलंय तुम्हाला. मी तर हे ओरिजिनल गाण्यापासून "माकड पापड पहियेवाला बढ बढ के ना बढिये" असं ऐकतेय. 
मुळात नदीच्या पलिकडे सजणाचे
मुळात नदीच्या पलिकडे सजणाचे ठाणे, नंतर 'मान नको ककरु, नंतर उऊ..आ...लेट द म्युझिक प्ले' या ओळींचा परस्पर संबंध कळलेलाच नाहीये
ऊ..आ...लेट द म्युझिक प्ले >>
ऊ..आ...लेट द म्युझिक प्ले >> अच्छा! हे ते गाणं होय!! मी आधीच्या ओळी कधीच नीट न ऐक्ल्यामुळे कुठलं गाणं ते कळलंच नव्हतं. 'हो ना तडपाना बैये वाडा बडबड कर ना भैये' - असं मी आत्त्तापर्यंत ऐकत आलो आहे.
लहानपणी दूरदर्शनवर अजित
लहानपणी दूरदर्शनवर अजित कडकड्यांचं 'नाम तुझे बरवे गा शंकरा' हे गाणं लागायचं. शंकराचं आडनाव 'बर्वे' आहे असा माझा समज झाला होता.
*हमका बूम* कैसे रहे >>>
*हमका बूम* कैसे रहे >>>
कालच ठाना मे बैठे ऑन ड्यूटी
कालच ठाना मे बैठे ऑन ड्यूटी बजावे हाय पांडेजी सिटी ऐकलं.
'करते नही है हमरे गुलर ड्युटी' असं ऐकलं. हमरे कोण कुठली ड्युटी करत नाही असं वाटलं .
मग काल डोक्यात प्रकाश पडला. रेगुलर असेल
कुत्ती मोहबत ने ली अंगडाई
कुत्ती मोहबत ने ली अंगडाई
हां कुत्ती मुहोब्बत ने
हां कुत्ती मुहोब्बत ने...
अय्यो,मला खरंच असंच ऐकू येत
अय्यो,मला खरंच असंच ऐकू येत होतं आणि मी म्हटलं शी आजकाल काहीही लीरीक्स असतात गाण्यांचे...
(No subject)
हे एकदम बरोबर,
हे एकदम बरोबर,
म्हणजे कितीही वेळा कान देवून एकले तरी,
कुत्ती मोहोब्बत ...
असेच वाटतेय. पहिल्यांदा एकले, दुसर्यांदा एकले तरी तेच. मग वाटले, कंबख्त इश्क असतं , हलकट जवानी तसच असेल हे..
पण तो सिंगर जबरदस्त आहे, मला नेहा कक्करचे ड्रामे आवडत नाहीत पण , जुबिन साठी बघितले येता जाता.
नसरत फतेही तरी नीट उच्चार आहेत. पण गाणं मात्र, आताच पॉप्युलर झाले.
कुत्ती मोहोब्बत ... >>> मी पण
कुत्ती मोहोब्बत ... >>> मी पण काल हे गाणे ऐकताच बंद केले. काय फालतूगिरी आहे म्हणुन..
आं ख उठी मोहोब्बत .. असे आहे म्हणे ते..
अय्यो मी याच कुत्ती बद्दल
अय्यो मी याच कुत्ती बद्दल लिहायला आले तर बर्याच जणांनी तेच ऐकलंय बघून टडोपा च झालं. काय पण लिरिक्स
नवीन नवीन २०१०-२०१२ मध्ये
नवीन नवीन २०१०-२०१२ मध्ये हिमेशची गाणी इथें तिथं खुप वाजायची.
त्यातलं एक गाणं.. 'आपकी कशिश यु सरफरोश हैं ' या गाण्यातील एक ओळ
" 'तेरी अदाओ का जादू जो चल गया.. दिवाना मे हुआ "
तर आज हेडफोन वर gaana वर ऐकत असताना लैरिक्स पहिले..

"बैरिया छाव का जादू जो चल गया" असं वाचला
बैरिया छाव का म्हणजे सावलीचा वैरागी ना मराठी मध्ये ...

बाबो!! मी तर कायच्या काय म्हणायचे
तेरी अदाओ का जादू जो चल गया..
तेरी अदाओ का जादू जो चल गया..>>>>>असंच आहे ना ते?
नई ना
नई ना
म्हणजे मी पण तुमच्याच
म्हणजे मी पण तुमच्याच टीममध्ये..।।।
मी पण
मी पण
जाऊंदे आपण असंच म्हणू.. सूट
जाऊंदे आपण असंच म्हणू.. सूट होतंय
मी पण same tean
मी पण same tean
मला पण घ्या तुमच्या टीम मध्ये
मला पण घ्या तुमच्या टीम मध्ये
तेरी अदाओं काच सूट होतंय.
तेरी अदाओं काच सूट होतंय. बैरिया छाव का म्हणजे काय? इन दि शॅडोज् ऑफ बेरीज्? स्ट्रॉबेरीच्या सावलीची जादू?
बेरीच्या खाली भेटलेली सावळी
बेरीच्या खाली भेटलेली सावळी मुलगी( मी कैच्याकै लावलेला अर्थ)
म्हणजे मी पण तुमच्याच
म्हणजे मी पण तुमच्याच टीममध्ये..।।। Biggrin>>>>>>मी पण मी पण
तेरे अडाओ
मूळ गाण्यात तेरे अदाओ का हेच असेल. तो नाकात गायचा तेव्हा दोन चार शब्द इकडे तिकडे झाले असतील.
आम्ही पण तेरी अदाओं का वाले
आम्ही पण तेरी अदाओं का वाले
बैरिया म्हणजे असे वैऱ्या.
बैरिया म्हणजे असे वैऱ्या. बैरी म्हणजे वैरी.
. 'आपकी कशिश यु सरफरोश हैं >
. 'आपकी कशिश यु सरफरोश हैं >>>>>>>>> हि ओळ मी प्रत्येकवेळा ऐकते तेव्हा हिमेश कोणा कशिश नावाच्या मुलीची तक्रार तिच्या आईवडिलान्कडे करतोय ( तुमची मुलगी ही अशी टाईप तक्रार) अस वाटत.
Pages