मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंख होते तो उड आती रे
रसीया ओ जालिमा
तुझे दिल का दाग दीखलाती रे

नेमका अर्थ काय आहे ?

पंख असते तर उडत आले असते रसिया नावाच्या डॉक्टर जालिमा. हृदयाचं ऑपरेशन केलास आणि त्यावर डाग तसाच ठेवलास तो तुला दाखवला असता.

मला याचे लिरिक्स कळलेच नव्हते.
ओ बड्डी बिचबँड दी पुरा लंडन तू मूकदा असे काही.
बिचबंद नावाच्या बिडीला (अशी बिडी होती पूर्वी) पूर्ण लंडन मुकतोय असे काहीतरी.

त्याच्या पुढे आहे जड्डी/बड्डी, बीच / विच, पॅंंड/बँड असं काही.

-------------

हे सापडलं नेटवर:
तू घंटी बिग बेन दी, पूरा लन्दन ठुमकदा
ओ जद्दो नच्चे पेहन दी, पूरा लन्दन ठुमकदा

https://www.latesthindisong.in/2016/12/poora-london-thumakda-lyrics-in-h...

जुन्या लव आज कल (सैफ अली चा) चित्रपटात ट्वीस्ट म्हणून एक गाणे आहे. त्या गाण्याची सुरूवात "रोन दे च्या, रोन दे च्या" अशी काहीतरी होते. मला ती कोल्हापुरमधली फेमस शिवी "रां***च्या" असे ऐकू यायचे. कुठे तरी ह्या गाण्याचे बोल वाचले व नंतर कळले की ते "रंग दे चक" असे आहे...

आता रिक्षा वाटेल पण वर्ष-दोन वर्षापूर्वी मी 'पूरा लंडन ठुमकदा' नावाची गोष्ट टाकली होती मायबोलीवर. तेव्हा विचारायचं ना असं नाव का दिलं Wink बिग बेनच्या ठोक्याच्या तालावर लंडन नाचतं...

पंख होते तो उड आती रे
रसीया ओ जालिमा
तुझे दिल का दाग दीखलाती रे

>>>

तिचा प्रियकर रशियाला असेल म्हणून ती म्हणत असेल की मला पंख असते तर मी तिकडे उडून आले असते आणि हृदयाला कशा जखमांचे डाग आहेत ते दाखवले असते

असं मला वाटत होतं आत्तापर्यंत.

>> तुझे दिल का दाग दीखलाती रे

तील का दाग असेल. तीळाचा डाग दाखवून ओळख पटवून देणे. प्रियकर कदाचित पासपोर्ट ऑफिसमध्ये कामाला असेल.
या धाग्याच्या संदर्भात विचार केला तर आपल्याला हे चुकीचे ऎकू येत असावे असे वाटते.

बनों तेरा स्वेटर लागे सेक्सी... Lol
अगदी अगदी. रेशम का रुमाल असतो किंवा जाली का कुडता. तसंच काही स्वेटर बद्दल असेल असं वाटायचं

Proud
सजाना पुकारे तेरा नाम
बिंदिया ये तेरी बिंदिया देखु
मैं सुबहो-शाम
तेरे बिन मेरे दिन
नकटे नकटे मेरी रैना

नकटी हिरोईन जिचे नाव रैना आहे तिला हाका मारतोयं असं वाटायचं

मला पण ते स्वेटरच वाटायचं
मुळात कोणीतरी करेक्ट केल्यावरच स्वॅगर किंवा स्वॅग हा शब्द डिक्शनरीत आहे हे कळलं.

खरच आहे. Swag शब्द सुद्धा पहिल्यांदाच माहित झाला. "यार क्या Swag है" वगैरे ऐकू यायला लागलं. जरा कुठे कानाला Swag ची सवय झाली तोच कोरोनाची लाट आली. "Swab test करावी लागते" म्हणायचे. आम्हाला सुरवातीला ऐकायला आले "Swag test"
सगळा घोळच.

>>>>>> आम्हाला सुरवातीला ऐकायला आले "Swag test">>>>> हाहाहा. होना हे स्वॅग स्वॅग नवीनच प्रकरण आहे, मलाही माहीत नव्ह्ते मग ते गाणे ऐकले - स्वॅग से करेंगे सबका स्वागत.

आजा आजा राजा
मेरे सागर वाले राजा
'तेरी याद सताये
दुल्हे राजा अब तो आजा

इथे पण सागर च्या ऐवजी स्वॅगर आहे हे खूप नंतर कळलं Lol

बाहोमे चले आओ ..हमसे सनम क्या परदा ...या गाण्यात एक ओळ आहे ... ए ... कम से कम ..आज तो खुलं के मिलो जरा हमसे .... मला ती आधी "एकम सेकम " असं जोडून ऐकू यायचं ... ते एकम शतम दहम ... ह्यातलं काहीतरी आहे आणि ह्याचा काय संबध ते कळायचंच नाही. किंवा काहीतरी शेकण्याबद्दल आहे असं वाटायचं .

>> सागर
>> पाद
>> केकम सेकम

All three Lol Lol

Pages