मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला व्हिलनची नागीण वाटलं होतं आधी.

<"बिलनशी नागिन" कोळीगीत आहे. माझ्या माहितीप्रमाणे अर्थ बिळातून नागीण निघाली.> यात अर्थ लागतोय.

"बिलनशी नागिन" कोळीगीत आहे. माझ्या माहितीप्रमाणे अर्थ बिळातून नागीण निघाली. >> माझी चूक काढणाऱ्यांनी मला हेच सांगितलं होतं. आता हे ही चूक असेल तर सांगा, लगेच जाऊन त्यांना हसून येतो.

हिना गाण्यातच एक शब्द आहे
खानाबदोश

मला ते खानापरोस वाटायचे , म्हणजे चांगला स्वयंपाक करणारी असेल असे

मग परवा नीट ऐकून गुगल केले.

खानाबदोश म्हणजे एक जागी ठावठिकाणा नसलेली, भटकी, आवारा इ

स्विटुच्या सिरीअलच्या टा. साॅ. मधे "यशोदा हवी का बोकडाला असं ऐकू येतं...हे काव्यही चुकीचं नाहीये खरं तर पण असं नसतं ना.

मला हिना गाण्यात खानाबदोश च ऐकू येत असे पण त्याचा हा अर्थ असेल माहीत नव्हते. "सारा जग मेरा वतन" त्यामुळे मला वाटायचं "जहागीरदार, वतनदार, सरदार" इत्यादी अर्थ असेल.

'मामाची बायको गोरटी
म्हणेल कसली चोरटी
भाज्यांची नावे सांगूया'

असं ऐकू आल्यामुळे लहानपणी 'गोरी मामी संध्याकाळी परवचा म्हणून झाल्यावर गावांची नावं सांग, मुख्य दिशा कुठल्या, भाज्यांची नावं सांग - असा अभ्यास घेते आहे' असं चित्र डोळ्यासमोर यायचं.

अय्या, भाच्यांची आहे का ते?
मी ही आजवर भाज्यांची ऐकत आलेय! असेल बॉ मामाच्या परसदारात विविध भाज्या लावलेल्या ... अस वाटलं होतं Lol

नक्की कुणाच्या भाच्यांची नावे सांगायची हे नीट कळत नाही. मामीचे भाचे म्हणजे आपणच की! आपलीच नावं तिला का बरं सांगायची? की आपले भाचे?

जर कुणाच्या भाज्यांची नावे सांगायची असा प्रश्न पडला नसेल, तर कुणाच्या भाच्यांची हा प्रश्न सुद्धा पडू नये.

>> म्हणेल कसली चोरटी

हो, ह्या ओळी नीट ऐकू येत नव्हत्या. आमच्यात एक मेम्बर होता 'नळीनं फुकणी फोडती' म्हणायचा

Lol
मी लावलेला अर्थ असा आहे की मामाकडे पोचल्यावर मामी म्हणते, ही कुठली पोरटी आली? मग आपली, म्हणजे भाच्यांची नावे सांगूया.

'तेरी झलक बर्फी
श्रीवल्ली
नैना मदत करती '
नवीन रत्न

नळीनं फुकणी फोडती  Lol
आपल्याच भाच्यांची नावे माहिती नसलेली अशी कशी मामी ?

काल बीती ना बिताई रैना.. लागलं होतं.. त्याच्या एका कडव्यात...

'बीती हुई बतिया, कोई तो हुराये'... असे मी कित्येक वर्षे ऐकतोय.. हुराये.. हा शब्द कधीच ऐकला नाही... काल अचानक अर्थ लागला..
'बीती हुई बतियां, कोई दोहराये...' असे आहे ते..पहिल्यांदा कळलं... Happy

>>>>>मामाची बायको गोरटी
म्हणेल कसली चोरटी
भाज्यांची नावे सांगूया'>>>अगदी हेच समजत होते आत्ता या क्षणापर्यंत Happy

भाज्यांची नावे सांगूया'<<<< इतकी सुगरण असलेली मामी रोज रोज फक्त पोळी शिकरण करत असेल तर भाज्यांची नावं सांगणं अत्यावश्यक आहे तिला. Lol
कदाचित मूळ कवितेत -
'मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
भाज्यांची नावे सांगूया..' असं कडवं असेल. Proud

श्रद्धा Lol Lol
मग काय्ये भाच्यांची नावे सांगू या आहे का?

Pages