Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धूम मचे धूम, आज की रैना
धूम मचे धूम, आज की रैना
बोअर हुए तक नाचे जवानी
भोर (पहाट)
बोकडाचं गाणं कोणतं? असेल तर
बोकडाचं गाणं कोणतं? असेल तर लिंक द्या की.
वर अतुल यांनी दिलीय, ही
वर अतुल यांनी दिलीय, ही:
https://youtu.be/pdg8JUlQd7c?t=29
मी काल बायकोला चक्क 'आता तरी
मी काल बायकोला चक्क 'आता तरी देवा मला पावशील का तूप ज्याला म्हणतात ते दावशील का' असं गाताना ऐकलं. सुरवातीला वाटलं असंच चेष्टेत बोलते नन्तर समजलं खरोखरच बोलते. तिला बोललो आता समजलं प्रत्येक डिमार्ट खेपेला तुपाची अर्धा किलो बरणी घरी का येते.
तुपातच सूख असेल ...
तुपातच सूख असेल ...
ते खरंतर "म्हसोबा हवी गं
ते खरंतर "म्हसोबा हवी गं बोकडाला" असे हवे होते.
रूही चित्रपटातील या गाण्याचे
रूही चित्रपटातील या गाण्याचे बोल कोणाला समजले असल्यास सान्गा.
नदियों पार सजन दा ठाना

कित्ते खोल ज़रूरी जाना ?
दिल लालिया बेपरवाह दे नाल
नाकर मा रुपय्याला
बड बड केन्दा आगे.
https://youtu.be/DKj5m9cSMZs
लिरिक्स लिहून येताहेत की
लिरिक्स लिहून येताहेत की व्हिडिओ मध्ये.
गुगल केले आता हे मिळाले:-
गुगल केले असता हे मिळाले
'Ho Nadiyon Par Sajan Da Thana
Kite Kaul Zaruri Jana
Dil La Leya Beparwah De Nal
Dil La Leya Beparwah De Nal"
>>>>>>>>>>
The police station of my beloved is across the river.
I made a promise, so there’s a need to go.
I’ve lost my heart to the heedless one.
I’ve lost my heart to a careless person.
https://www.lyricsraag.com/nadiyon-paar-roohi/amp/
thanks मानव आणि स्वप्नील
thanks मानव आणि स्वप्नील
नदियों पार सजन दा ठाना>>>>
नदियों पार सजन दा ठाना>>>> नवरा बायको नदीच्या अलीकडे राहत असतात. पलीकडे नवऱ्याचं पोलीस ठाणे असतं. नवरा पोलीस स्टेशनला ड्युटीला गेला असताना बायको बोलते नदीच्या पार सजनदा पोलीस ठाणे.
कित्ते खोल ज़रूरी जाना ?>>>> बायकोला पोहता येत नाही आणि नदीवर पूल पण नाही. होडीवाला आज सुट्टीवर आहे. त्यामुळे बायकोकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे अंडरवॉटर चालत पलीकडे जाणे पण नदी खोल आहे त्यामुळे बायको स्वतःला विचारते किती खोल नदी आहे जाणं जरुरी आहे का?
दिल लालिया बेपरवाह दे नाल>>>>हृदय घाबरून लाल लाल होतंय. नाला असता तर कसलीच चिंता न करता पार केला असता.
नाकर मा रुपय्याला>>> इतक्यात एक नोकर येतो ती त्याला बोलते हे घे रुपये.
बड बड केन्दा आगे.>>> जा जा पोहत, पुढे चल , जोरात पोहत जा आणि डबा पोहचव.
बोकलत
बोकलत

(No subject)
कवडसा चांदाचा पडला
कवडसा चांदाचा पडला
पूर्वी रेडीओवर नेहमी लागत असे हे गाणे. जास्तीकरून आपली आवड मध्ये. पण हे शब्द नक्की काय आहेत हे तेंव्हा कधीच कळले नाही. कवडसा फक्त नीट ऐकू यायचे पण पुढे सांधा सापडला असेच ऐकायला यायचे.
गणपतीची आरती .......दास
गणपतीची आरती .......दास रामाचा वाट पाहे सजना ... अशी ऐकू यायची खूप दिवस..लहानपणी!!
हेमंतकुमारने गायलेलं बहुधा
हेमंतकुमारने गायलेलं बहुधा शांताराम नांदगावकरांचं गीत आहे.
वाटा विराण्या झाल्या दिवाण्या
सोडूनिया गाव येथला
यातली पुढची ओळ मी
हाकारवा चालला (हाका मारण्याचा आवाज) अशीच समजत होतो.
हा कारवाँ .
तुझ्या पंखावरुनिया मला तू दूर नेशील का?
तुझ्या बेभान सुमनांचा मला तू गंध देशील का?
तुझ्या रे भावसुमनांचा
नाला असता तर कसलीच चिंता न
नाला असता तर कसलीच चिंता न करता पार केला असता.
>>> rofl
मी बरीच वर्षे आनेवाला पल हे
मी बरीच वर्षे आनेवाला पल हे गाणं असं म्हणायचो -
आनेवाला पल जानेवाला है
उसके फोकस में जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है
हपा
हपा
हपा
मराठी कुसुम सिरियल च टायटल song म्हणजे ( एक ओळच आहे ती , चार शब्द फक्त )काय आहे ?
अगणित गाते मी
मी कुसुम
अस मला ऐकू येत
हपा, ते "फोकस में इसके
हपा, ते "फोकस में इसके जिंदगी बिता दो" असं ऐकू येण्याची शक्यता आहे.
पहिलं लॉकडाऊन लागलं आणि कोव्हीड पसरू लागला तेव्हा हे गाणं लागलं तेव्हा मला ते "आने वाला पल जानलेवा है..." असं ऐकू आलं.
मानव मामा, मला ते 'हो सके'
मानव मामा, मला ते 'हो सके' च्या जागी 'इसके' (की 'उसके') आणि 'तो इस में' च्या जागी 'फो कस में' असं ऐकू यायचं.
कित्ती कित्ती वर्षांनी "मै हू
कित्ती कित्ती वर्षांनी "मै हू खुश रंग हिना..." चे हे प्रील्युड आठवले
मरहब्बा सय्यदी मक्की मदनी अल अरबी...
आत्ता जस्ट काही मिनिटांपूर्वी हे शब्द खरे काय आहेत हे माहित झाले. तेंव्हा काय वाट्टेल ते ऐकायला यायचे. "मुश्कील झाली" वगैरे...
>> दिल लालिया बेपरवाह दे नाल>
>> दिल लालिया बेपरवाह दे नाल>>>>हृदय घाबरून लाल लाल होतंय. नाला असता तर कसलीच चिंता न करता पार केला असता.
बोकलत
>> बड बड केन्दा आगे.>>> जा जा पोहत, पुढे चल , जोरात पोहत जा आणि डबा पोहचव.
बडबड करू नको (पाण्यात) केंदळ आहे पुढे
...असे असेल ते
'भिल्लांची नागिण निघाली' -
'भिल्लांची नागिण निघाली' - असं ऐकू यायचं मला.
भिल्लांची नागिण निघाली' - असं
भिल्लांची नागिण निघाली' - असं ऐकू यायचं मला >> हे चूकीचंय ?
बिलनशी असावं. म्हणजे बिळातून?
बिलनशी असावं. म्हणजे बिळातून?
>> भिल्लांची नागिण
>> भिल्लांची नागिण
हो हे शब्द नीट कळत नाहीत.
"बिलनशी नागिन" कोळीगीत आहे. माझ्या माहितीप्रमाणे अर्थ बिळातून नागीण निघाली. पुढे गारुडी चा उल्लेख आहे, त्याची तिच्यावर करडी नजर आहे इत्यादी.
विलये ची आहे ते. विलये हे १
विलये ची आहे ते. विलये हे १ कोकणातलं का मालवणातलं गाव आहे
Pages