मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जे गाणं म्हणताय ते आम्ही पण नॉन स्टॉप ऍक्शन ऍक्शन बेडूक बेडूक .. असं म्हणायचो. >> ओ यस यस, नॉन स्टॉप ऍक्शन असंच म्हणायचो ते

ते पाप माझ्या माथी नको. तूनळीवर don't stop wiggle wiggle असलं काहीतरी टाकून बघा आपापल्या जबाबदारीवर. कं. ज. ना.

"दिल का भंवर करे पुकार" गाण्यातली एक ओळ अशी ऐकू यायची
"इस हसीन नार पे, हम ना बैठे हार के"
प्रत्यक्षात असे आहे
इस हसीन उतार पे हम न बैठे हार के

सोनू निगमच्या दीवाना अल्बम मधलं गाणं---- ' दीवाना तेरा, तुझेही बुलाये' हे मी बुलायेऐवजी 'भुलाये' असं ऐकत होते, इतकी वर्षं.
काल एफ. एम. वर ऐकलं, तेव्हा समजलं.
कदाचित पुढची ओळ, ' ये मर्जी तेरी ' असल्याने मला ते तसंच असेल, असं वाटत होतं.

दीवाना तेरा, तुझेही बुलाये' हे मी बुलायेऐवजी 'भुलाये' असं ऐकत होते, इतकी वर्षं. Lol Lol

आणि त्यापुढे.. ये मर्जी तेरी तू आये नहाये...

'तुम मुझे यूं बुला ना पाओगे'
एक ग्रुप महाबळेश्वर का कुठे गेला होता. जेवण करताना रस्सा ढवळायला त्यांनी तिथल्याच एका झाडाची फांदी वापरली. दुर्दैवाने ते कसलेतरी विषारी झाड होते. रस्सा प्यायल्यावर सगळ्यांचा घसा बंद झाला. कुणाच्या तोंडातून आवाजच येईना.
हा किस्सा आठवला. 'तुम मुझे यूं बूला ना पाओगे' Lol

मला लहानपणी " हम भूलभुले है इसकी, ये गुलसीता हमारा" असे वाटायचे. म्हणजे एवढा छान आपला देश त्याची आपल्याला भूल (भूरळ) पडलीय अशा अर्थी.
तेव्हा गुलसीता वगैरे काही माहीत नव्हते, आणि आपण बुलबुल आहोत असं काही थोडंच असणार असे वाटायचे.

हम बुलबुले है इसकी ऐकलं की ते रस अंगुरी पदार्थातले छोटे छोटे रसगुल्ले आठवतात. हम गुलगुले है इसकी वो पनीर है हमारा-हमारा , असं कैच्याकै डोक्यात येतं.

माझ्यासाठी सगळे बुला ना - भुला ना च होते. Happy आता रिप्लेस मेमरी करणे शक्य नाही , आता असचं गावं लागणार , खूप उशीर झाला आता.

मला लहानपणी " हम भूलभुले है इसकी, ये गुलसीता हमारा" असे वाटायचे. म्हणजे एवढा छान आपला देश त्याची आपल्याला भूल (भूरळ) पडलीय अशा अर्थी.>> Happy

त्यातली ती एक ओळ आम्ही वो संत्री हमारा, वो मोसंबी हमारा अशी म्हणायचो!! देशाला संत्रं का म्हटलं असेल ते तेव्हा अजिबात कळायचं नाही. : )

चीकू Lol
अस्मिता Lol

जिहाले मस्ती मुकुंद बरंजीश
बहाले हिजडा बेचारा दिल है

- लहानपणा पासून हे गाणं असच ऐकत आलो आहे आणि असच ऐकत राहणार.

जिहाले मस्ती मुकुंद बरंजीश
बहाले हिजडा बेचारा दिल है>>> अगदी,अगदी, डिटो्टो

मला आठवतं, पहिल्या स्मार्ट फोन मध्ये गुगल सर्च वापरायला लागल्यावर , ह्या गाण्याचे lyrics शोधले होते

ते असे आहेत
(ज़े-हाल-ए-मिस्कीं, मकुन-ब-रन्जिश,
बहाल-ए-हिज्र बेचारा दिल है)

>>>>>एक ग्रुप महाबळेश्वर का कुठे गेला होता. जेवण करताना रस्सा ढवळायला त्यांनी तिथल्याच एका झाडाची फांदी वापरली. दुर्दैवाने ते कसलेतरी विषारी झाड होते. रस्सा प्यायल्यावर सगळ्यांचा घसा बंद झाला. कुणाच्या तोंडातून आवाजच येईना.>>>>> आम्ही ऐकलेले हेच महाबळेश्वरचेच व्हर्शन असे होते की त्या फांदीमुळे सर्वांचे दात पडले.

"तेरे कदमोंको चुमूंगा" हे नाझिया हसन आणि तिच्या भावाचे मस्त गाणे. मी लहान असताना घरी कॅसेट होती नाझिया हसनची आणि हे गाणे कित्येकदा वाजायचे. त्यातली एक ओळ 'ये बंधन तोड लेने दे, मुझे तू पास आने दे' ही मी 'देवांना तो लेने दे, मुझे तू पासाने दे' अशी ऐकत असे Proud तेव्हा हा प्रश्न कित्येकदा पडलेला आठवतोय की देवांना घेऊन नक्की कुठे जायचंय त्याला Lol

गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा

हे मी अगदी आत्ता आत्ता पर्यंत असे ऐकत होतो
गुण-सुमनें मी वेचियली या भावें ।प्रीतीने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार वेश्येचा

मेरे ख्वाबों में तू है समाया
मेरा जिवंत है तेरा साया
इती आमचे कनिष्ठ बंधू
(टीप : आमच्याकडे साळ्याला साया म्हणतात )

गीत : जीने कि तमन्ना हो
फिल्म : बलमा

जीने कि तमन्ना हो, तुम मेरी जरुरत हो
मेरे खयाल से कोंबडी खुबसुरत हो

Pages