मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“मामाची बायको चोरटी“
असेच आहे ते ना. कारण चोरून शिकरण खायची. असे सुद्धा आहे ना?

जुना काळ आहे... मामा एक आणि मावश्या अनेक... म्हणजेच भाचे कंपनी अनेक... हि कुठली पोरटी आहेत असे ती कन्फयुज होऊ शकते तेंव्हा आपण इंट्रोडक्शन देऊया - भाच्यांची (स्वतःची)नावे सांगूया - असे आहे ते....

मी पलटी.
आता मला श्रद्धा म्हणतात ते पटले एकदम. भाज्यांची नावेच आहे ते. Proud

श्र Lol

इतकी सुगरण असलेली मामी रोज रोज फक्त पोळी शिकरण करत असेल तर भाज्यांची नावं सांगणं अत्यावश्यक आहे तिला. >>> श्र Lol

साला मैं तो साब बन गया
ये सूट मेरा देखो ये बूट मेरा देखो जैसे 'घोडा' कोई लंडन का !

मला घोडाच वाटायचे हल्लीच कळले कि ते गोरा होते.

आला गू आला गू आला गू आला गू >>>>
किती विचित्र आहे हे , निःशब्द Lol
मी बराच प्रयत्न केला ,दुसरे काही ऐकू येतंय का बघण्याचा ,'आय लव्ह यू' वगैरे पण नाही ते 'तेच' आहे...

मी पण "भाच्यांची नावे सांगू या" म्हणते. >> मग ते बरोबरच आहे असं ठरलंय ना?

आला गू >> हे गाणं ऐकून मी बाष्पगद्गदित झालो.

पण "भाच्यांची नावे सांगू या" म्हणते. >> मग ते बरोबरच आहे असं ठरलंय ना?>> हो काय? ता काय कळलाच नाय हसण्याच्या नादात .
आला गू आला गू आला गू आला गू (?)>>>>>>>>> हो ह्यानेच मेले मी काल

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत...
चिं त्र्यं खानोलकर (आरती प्रभु) यांच्या या प्रसिद्ध गाण्यातली हि ओळ आहे

नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परि नको अधरांचा मोडू सुमडाव

हे "परि नको अधरांचा मोडू तुम डाव" असे ऐकायला येते. सुमडाव चा नक्की अर्थ माहित नाही. पण बहुतेक "घडी" अशा अर्थाने असावा?

"मामाची बायको घोरटी, म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया"

नेटवर मिळालेले शब्द.
२ - ३ साईटवर हेच शब्द मिळाले.

घो रटी. रटणे असे हिंदीतून क्रियापद उधार घेतले असेल.

मामाची बायको जी सदा न कदा नवऱ्याच्या जप करत असते, ती (आता) म्हणेल कुठली ही पोरटी?

मामाची बायको गोरटी
म्हणजे गोरी.
गोरी साठी गोरटी, गोरट्याली असे प्रतिशब्द आहेत खेडेगावात

ते नक्की काय असावं असा कुणाला खरंच प्रश्न पडला असेल यावर माझा विश्वास नाही, सगळे टिपी करत आहेत. (बालपणी भाज्य़ांची नावे, चोरटी वाटलं असेल कदाचित काहींना)
तरी वावे, च्रप्स आणि अतुल यांनी गंभीर व बरोबर प्रतिसाद दिले आहेत.
हरचंद फुल्ल टिपी करत आहेत.

टिपी करता करता पीएचडी झाली त्या गाण्यावर सर्वांची. तिथे नक्की काय शब्द असावेत यावर इतका काथ्याकूट खुद्द गदिमांनी सुद्धा केला नसेल Rofl

Pages