क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"पण उपजत प्रतिभा, चूका सुधारून स्वत:ला सिद्ध करणयाची जिद्द व मुख्य म्हणजे गवसलेला दिर्घकालीन फाॅर्म , हे घटक आंकडेवारीला मात्र माहित नसतात" - प्रतिभेबद्दल वाद नाहीये. प्रतिभा असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकं यश मिळतही नाही. पण उरलेले दोन घटक आकडेवारीला दिसतात.

"तिसरं, नेतृत्व गुण व खेळाची जाण याबाबतीत कर्णधार म्हणून फाॅरमॅटमुळे फारसा फरक पडतो असं मला तरी वाटत नाहीं." -नेतृत्वा, डावपेच ह्यात फॉर्मॅटमुळे फरक पडतो ह्याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे धोनी. जो धोनी लिमिटेड ओव्हर क्रिकेट मधे कल्पक नेतृत्व करायचा तोच धोनी टेस्ट मधे क्लू-लेस असायचा आणी काहीतरी घडायची वाट पहायचा. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. अफ्रिका, वेस्ट-इंडीज, बांगलादेश वगैरे संघांनी तीन वेगळ्या फॉर्मॅटसाठी तीन वेगळे कप्तान आणी तीन वेगळे संघ बांधले ह्या मागे सुद्धा हीच भुमिका होती. (द. अफ्रिकेने सद्ध्या अपवादात्मक परिस्थितीत परत एकच कप्तान नेमलाय).

गावस्करला त्याचे पैसे थोडीच मिळतात Happy मुलाखतीचे मिळतात.. >>>
गावसकरला मुलाखत एनीवे सहज मिळत असेल. त्यात त्याला हे सांगायची गरज नाही. त्याने परवा एका लेखातही शॉ बद्दल लिहीले आहे. हे असले सल्ले कोच ने आवर्जून विचारल्याशिवाय कोणी देणार नाही कितीही दिग्गज असला तरी. इतर क्षेत्रात सुद्धा ज्याच्याकडे सध्या जबाबदारी आहे त्याने विचारल्याशिवाय कोण सल्ले देतात? आता गावसकर व शास्त्री रात्री एखाद्या बार मधे बियर वगैरे बरोबर गप्पा मारत असते तर गोष्ट वेगळी.

झाली त्याची कामगिरी शाॅसारखी तर जाईलही तो पडद्याआड
>> नाही जाणार... व्हाईट बॉल फॉर्म अन क्लासच्या जोरावर चान्सेस मिळत रहाणार...

तुमच्याशी थोडा वाद घालून इतरांना माझी दखल घ्यायला लावण्याचा माझा हेतू सफल झाला
>> एक सणसणीत व्यंगचित्र टाकून द्यायचं ना भाऊ... वाद कशाला... Wink

आसामी अन फेफ, कान्ट अ‍ॅग्री मोअर...

व्हाईट बॉल फॉर्मॅट मधे 'नो'हिट शर्मा टू 'हिटमॅन' हा त्याचा प्रवास स्वप्नवत आहे
पण अवे टेस्टमधे तो फेल जातो हे मान्य करण्यात काय तोटा आहे?

फार पूर्वी नाही, गेल्या (२०१८ -१९) ऑस्ट्रेलिया टूर मधे ही जेंव्हा ओपनर चा लोचा झाला होता तेंव्हा आपण टीम मधे असलेल्या रोहितला डावलून विहारीला ओपन करायला पाठवलं होतं. मधल्या काळात त्यानी देशातल्या पाटा पिचेसवर ओपन करत खोर्‍यानी धावा काढल्या (त्या तशा देवांग गांधीनी पण काढल्या होत्या पण ऑस्ट्रेलियात काय झालं त्याच?).
रोहित द सूपरमॅन ही ऑस्ट्रेलिअन मीडियाची माईंडगेम स्ट्रॅटेजी आहे (फार ग्रेट ट्रॅक रेकॉर्ड नसताना हवा करा - अपेक्षा वाढवून प्रेशर टाका, टीममधल्या बाकी प्लेअर्सना अनुल्लेखानी मारा - अन खच्चि करा) अन आपण त्याला उपकर्णधार करून खतपाणी घालतोय.

पुजाराची अशी काय चूक होती की केवळ एका ( जिंकलेल्या) सामन्या नंतर त्याच्याकडून उपकप्तानपद काढून घेतलं
अन रोहितची (पुजारा समोर) अशी काय कामगिरी आहे की त्याला टीम मधे १३ मिहिन्यांनंतर कमबॅक करताक्षणी उपकर्णधारपद ही मिळालं??

(रोहितच्या वयाचाच नाही तर त्याच्या बायको आणि साल्याच्या सेलेब्रेटी मॅनेजमेंट कंपनी अन क्लायंटेल चा मुद्दा ही मी घेत नाही Wink )

आपल्याकडे फास्ट गोलंदाज नव्हते तरी त्याऐवजी फिरकी नवीन बाॅलसारखी वापरण्याचे यशस्वी प्रयोग आपण केलेच ना. मग ऑस्ट्रेलियात खेळायला आपल्याकडे खात्रीचे ओपनर नाहींतच म्हणून निवडसमिती दोन कसोटीपुरता एक प्रयोग करून पहात असेल, तर त्याकडे सकारात्मक दृष्टीने कां पाहूं नये. आणि तसं पहायचं नसेलच, तर तो प्रयोग कसा फसणार आहे हें न गिरवतां, अधिक खात्रीचा पर्याय समर्थनासह देणं क्रमप्राप्त आहे.
मर्यादित षटकांच्या प्रकारात असामान्य कामगिरी केल्यानंतर कसोटीमधे स्वत:ला सिद्ध करण्याची आत्यंतिक जिद्द रोहित उराशी बाळगून असणार व त्या दिशेने प्रयत्नही करत असणार , हें निश्चित. ही ' motivation level ' व तत्सम घटक हे आंकडेवारीच्या आकलनापलिकडले आहेत.

*पण अवे टेस्टमधे तो फेल जातो हे मान्य करण्यात काय तोटा आहे?* - 'फेल गेला' हें मान्य आहे, पण 'फेल जाणारच' हें अजिबात नाहीं ! स्विंग व बाउनस उत्तम खेळणं ज्याच्याकडून अपेक्षित आहे , त्या स्मिथचा घरच्या खेळपट्यांवर गेल्या चार डावात स्कोअर काय आहे ? त्याच्या बाबतीत कौतुकाने आपण ' now he is due for big innings ' म्हणतो व त्यात तथ्यही आहे; मग, ' आता कसोटीतही रोहितकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे ' म्हणणं पाप कां ठरावं !

स्मिथ ची बॅटिंग पोझिशन कन्सिस्टंट आहे. मेकशिफ्ट बदल नाही.
स्मिथ चा कसोटी मधला सक्सेस रेट हा त्याच्या बाजूनी आहे (हेच जर वनडे / टी २० मधे असतं तर रोहित सर्टन आणि स्मिथ अन्सर्टन झाला असता)
एक वर्षाच्या गॅपनंतरही स्मिथ अव्वल क्रिकेट खेळला आहे.
त्यामुळे टेस्ट मधे स्मिथ चं कौतुक (वन डे / टी २० मधे रोहितचं)

ऱोहितचा अवे टेस्ट मधला पूर्वीचा परफॉर्मन्स तो सक्सेसफुल होईलच ही खात्री देत नाही (तो सक्सेसफुल झाला तर आनंदच आहे).

पण अशी खात्री नसताना त्याच्या डोक्यावर उपकर्णधारपदाचं ओझं देणं, अन ते देताना गेल्या खेपेला ज्याच्या जिवावर सिरीज जिंकली त्याच्याकडून ते विनाकारण हिसकाऊन घेणं हे मान्य नाही...

मला नाही वाटत की कुणी रोहित च्या टॅलेंट वर शंका घेतंय किंवा त्याच्या यशाविषयी साशंक आहे. किंबहूना त्याच्या यशाबद्दल सगळे शुभेच्छाच देतायत. त्याच्याकडून भरीव कामगिरी (टेस्ट मधे) त्याच्या डेब्यूपासून अपेक्षित आहेच. पण त्याचा गेल्या १२-१३ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पहाता cautiously optimistic असणं नक्कीच चुकीचं नसावं. रोहित शर्मा ला ऑस्ट्रेलियामधे टेस्ट ओपनर म्हणून खेळवणं हा एक प्रयोग असेल तर त्यासाठी पुजारा चं उपकप्तानपद काढून त्याला द्यायची गरज नव्हती. तेव्हा हा प्रयोग नसून, सद्ध्या तरी ती स्ट्रॅटेजी (शॉर्ट टर्म / लाँग टर्म) वाटते. ती यशस्वी ठरली तर भारताला ४-५ वर्षं चांगला ओपनर मिळेल. वैय्यक्तिकरित्या मला हे प्रयोग नवीन, उदयोन्मुख खेळाडूंच्या बाबतीत पहायला आवडतात, कारण त्यांना नीट ग्रूम केलं तर ते लाँग टर्म प्रॉस्पेक्ट्स ठरतात. पण हा ही प्रयोग यशस्वी ठरो ही सदिच्छा!

वैय्यक्तिकरित्या मला हे प्रयोग नवीन, उदयोन्मुख खेळाडूंच्या बाबतीत पहायला आवडतात, कारण त्यांना नीट ग्रूम केलं तर ते लाँग टर्म प्रॉस्पेक्ट्स ठरतात. पण हा ही प्रयोग यशस्वी ठरो ही सदिच्छा! >> अनुमोदन !

"पण अशी खात्री नसताना त्याच्या डोक्यावर उपकर्णधारपदाचं ओझं देणं, अन ते देताना गेल्या खेपेला ज्याच्या जिवावर सिरीज जिंकली त्याच्याकडून ते विनाकारण हिसकाऊन घेणं हे मान्य नाही..." ह्याबद्दल नि स्मिथ बद्दल अ अँकीला अनुमोदन. स्मिथ नि रोहित ची तुलनाच गंडलेली आहे भाऊ , फार फार हवे असेल तर वेड नि रोहित म्हणू शकाल (गुणवत्तेबाबत नाही) - जिथे दोघेही जातीचे ओपनर नसताना बळेच ओपनर झाले आहेत तिथे जागा ओपन असल्यामूळे पण वेड ला उपकर्णधार नाही केलय बळच.

मर्यादित षटकांच्या प्रकारात असामान्य कामगिरी केल्यानंतर कसोटीमधे स्वत:ला सिद्ध करण्याची आत्यंतिक जिद्द रोहित उराशी बाळगून असणार व त्या दिशेने प्रयत्नही करत असणार , हें निश्चित. >> ह्यातल्या पहिल्या मुद्द्याला अनुमोदन. त्याच्या बर्‍याच मुलाखती मधे त्याने कसोटी मधे स्थान मिळत नसल्यामूळे खंट व्यक्त केली आहे नि संघाला हवे असेल तर ओपन करायची तयारी आहे असे सांगून विंडीज दौर्‍या आधी ओपन करायला सुरूवात केली. पण त्याच बरोबर वयाच्या ह्या टप्प्प्यावर कसोटी सामन्यात स्थान मिळण्याबाबत विचार करणे सोडून दिलेय, झाले तर झाले हेही त्याने त्याच मुलाखती मधे म्हटले आहे. बहुधा आयपील मधे फायनल खेळण्यामागे हाच विचार असावा, ज्यामूळे तो ह्या दौर्‍याचे पहिले दोन सामने खेळू शकला नाहीये.

*स्मिथ नि रोहित ची तुलनाच गंडलेली आहे भाऊ , * मी त्यांची तशी तूलना केलेलीच नाहीं. त्यांच्या
बाबतीत घेतल्या जाणार्या भूमिकांमधली तुलना आहे ती. जर स्मिथच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चार सतत डावातलया अपयशामुळे त्याच्या वरचा विश्वास ढळत नसेल , तर रोहितची मर्यादित षटकांमधील असामान्य कामगिरी, फाॅर्म इ.मुळे कसोटीतील मागील अपयश दुर्लक्षून त्याच्यावरही विश्वास कां ठेवूं नये, हा मुद्दा आहे.

त्यांच्या
बाबतीत घेतल्या जाणार्या भूमिकांमधली तुलना आहे ती. >> मी हि भूमिकेबद्दलची तुलना चुकीची आहे म्हणतोय. तुम्ही स्वतःच उत्तर दिले आहे खर तर वरती (त्यात थोडासा बदल करून) . - "स्मिथच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे कसोटी मधल्या " नि "रोहितची मर्यादित षटकांमधील". खर तर स्मिथ ची कामगिरी फक्त सातत्यापूर्ण नाही तर कसोटी साठी रोहीतच्या मर्यादित षटकांएव्हढहीच असामान्य आहे. फॉर्मॅट मधल्या बदलामूळे रोहित बद्दल साशंकता आहे .

असामीजी, ह्या सगळ्या चर्चेतून बहुतेक माझ्या वाटेला शेवटीं एवढंच येणार आहे - Wink

अहो, हल्लीच इतकं काय केलंय तुम्ही ! आत्ता फोन होता, तुमची स्पेशल नेमणूक केलीय मुंबै इंडीयनसच्या ' सपोर्टींग ' स्टाफवर !! 20190305_103121_8.jpg

भाऊ, मस्तच! Happy

रोहित आत मयांक बाहेर!
उमेश ऐवजी सैनी संघात! सैनीचे कसोटी पदार्पण!

वाॅरनरचं ऑसी संघात पुनरागमन हा मालीकेतला आतांपर्यंतचा मोठा बदल ठरूं शकतो. हा सामना 5 दिवस चालावा अशी प्रार्थना.

तुरळक पावसाचे फोरकास्ट आहे (पहिले दोन दिवस तरी). तसे झाले तर दोन्ही बाजूंची बॉलिंग स्ट्रेंग्थ बघता, पाच दिवस सामना चालणे कठीण आहे.

रोहित हा माझा अत्यंत आवडता खेळाडू असून तो उद्याच्या सामन्यात लाराचा 400 धावांचा विक्रम मोडणार हे नक्की आहे. रोहित या नावाभोवती वेगळीच जादू आहे. कोई मिल गया या चित्रपटात हृतिकनेसुद्धा रोहित हे नाव धारण करून बास्केटबॉल सामना एकतर्फी जिंकवला होता. उद्या पुन्हा जादू पाहायला मिळणार आहे.

पण अशी खात्री नसताना त्याच्या डोक्यावर उपकर्णधारपदाचं ओझं देणं, >> हा प्रकार मलाही अजिबात झेपलेला नाहीये. म्हणजे समजा असे समजूया कि रोहोत वर किती विश्वास आहे असे दाखवायला किंवा त्याच्या आयपील मधल्या कप्तान पदाच्या कामगिरीकडे बघून हे ठरवले आहे. तसे असेल तर
१. जर रोहित एव्हढा मह्त्वाच असेल टेस्ट साठी तर त्याला दुबई वरूनच थेट का नेले नाही ? असे काय न सी ए मधे आहे जे ऑस्ट्रेलियामधे चेक करता आले नसते ? शास्त्री- कोहली ला रोहोत नकोय हे इथेच वाचलेले होते वर ते आणखी वेगळे.
२. रोहित अजिंक्यच्या खालोखाल मह्त्वाचा आहे हे सांगताना, अश्व्नि, पुजारा तेव्हढे मह्त्वाचे नाहीत हे ह्यातून अधोरेखीत होते आहे.

सगळाच सावळा गोंधळ आहे नि (इथेच वाचल्याप्रमाणे ) रोहित ची बायको च्या एजन्सी चे कनेक्शन खरच असावे असे वाटू लागते Sad

ह्या सगळ्यामधे रोहित प्लेयर म्हणून किती मह्त्वाचा आहे हे बाजूलाच राहिले आहे.

*हया सगळ्यामधे रोहित प्लेयर म्हणून किती मह्त्वाचा आहे हे बाजूलाच राहिले आहे.* असं कसं ? तो ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्यात कसा फेल गेलाय व आतां जाणाराय, याबद्दल किती लिहीलं जातंय. आणखी काय सांगायचं तो प्लेयर म्हणून किती महत्वाचा आहे हे !!

तुम्हाला खरच पटलय त्याला पुजाराच्या जागी उपकर्णधार म्हणून निवडलेले ? अगदी तुमच्या आशावादाला धरून सुद्धा खरच असे म्हणू शकता कि तो सध्या संघात (कोहली नसलेल्या) दोन क्रमांकाचा प्लेयर आहे ?

* तुम्हाला खरच पटलय त्याला पुजाराच्या जागी उपकर्णधार म्हणून निवडलेले ? * - फलंदाज म्हणून त्याच्याबद्दल मीं आशावादी आहे हें नक्की. त्याला उपकर्णधार अन्यायपूर्वक केलंय कीं नाही, याने त्या आशावादाला यत्किंचितही बाधा येत नाहीं ! पण त्याबद्दलचं माझं मतही मीं माःडलं आहेच. रोहित व आपल्या संघाला शुभेच्छा.

आयुष्यभर स्वत:चं हित -अहित समजण्याबाबत सगळीच बोंब आणि कशाला आतां नाचताय 'रोहित ', 'रोहित' करत !!! 20190201_190648.jpg

कप्तान हा नेहमी एक क्रमांकाचा प्लेअर आणि ऊपकप्तान हा नेहमी दोन क्रमांकाचा प्लेअर हवा असे जरूरी नसावे.

तसेच एखाद्याचे कप्तानी दिमाग चांगले असेल पण संघातली जागा शाश्वत नसेल तरी तो जेव्हा संघात असेल तेव्हा त्याला उपकप्तान बनवून त्याच्या या कौशल्याचा वापर करू शकतोच. पुढे फलंदाजीत अपयशी ठरला तर त्याला बसवूही शकतो. उपकप्तानाला बसवायला चार सामन्यांची नोटीस द्यावी लागते असाही नियम नाही Happy

पुजाराची कप्तानी कुठे मी पाहिली नाही. कुठे होता का कप्तान?
आश्विन हा चतुर गोलंदाज आहे. त्याचे फलंदाजांना बाद करायचे डावपेच त्याला लिजंड बनवतात. हे मागे मीच या धाग्यात म्हटले आहे. पण कप्तान म्हणजे ईतकेच नाही. मी कधीच त्याला कुठल्या संघाचा कप्तान केले नसते. आयपीएलवाले अध्येमध्ये ही चूक करत राहतात..

रोहित है तो जीत है..
दोन मुंबईकर भिडू कप्तान उपकप्तान झालेत हे एक आगळेच समाधान आहे..
कधी एकदा पहाट होतेय आणि सामना सुरू होतोय आणि आपण जिंकतोय असे झालेय.. Happy

ऊपकप्तान हा नेहमी दोन क्रमांकाचा प्लेअर हवा >> नाही पण किमान त्याची संघातली जागा फिक्स असावी अशी माफक अपेक्षा आहे. ज्या खेळाडूला पहिल्या दोन सामन्यांसाठी नेण्याचीही गरज भासली नाही त्याच्याबद्दल बोलतोय आपण. रोहित थेट दुबई तून गेला असता तर दुसरा समना खेळू शकला असता हे तुला माहित नसेल हे उघड आहे.

तसेच एखाद्याचे कप्तानी दिमाग चांगले असेल पण संघातली जागा शाश्वत नसेल तरी तो जेव्हा संघात असेल तेव्हा त्याला उपकप्तान बनवून त्याच्या या कौशल्याचा वापर करू शकतोच. उपकप्तानाला बसवायला चार सामन्यांची नोटीस द्यावी लागते असाही नियम नाही >> आणि मग कप्तान उपकप्तान नसलेल्यांनी सल्ला देऊ नये असा नियम आहे कि काय ? काय आहे कप्तानी दिमाग नि कौशल्य ते तसेही वापरू शकला असताच ना रोहित उपक्प्तान न होताही ? उगाच वाट्टेल ती टायली कशाला करून राहिलात राव .

आणि मग कप्तान उपकप्तान नसलेल्यांनी सल्ला देऊ नये असा नियम आहे कि काय ?
>>>>>
मग बनवायचाच का कोणाला कप्तान उपकप्तान Happy

ज्या खेळाडूला पहिल्या दोन सामन्यांसाठी नेण्याचीही गरज भासली नाही त्याच्याबद्दल बोलतोय आपण. रोहित थेट दुबई तून गेला असता तर दुसरा समना खेळू शकला असता हे तुला माहित नसेल हे उघड आहे.
>>>>>>>>>

एक काळ होता मागच्या वर्षाच्या अखेरीला जेव्हा रोहीतचा गेम होतोय अशी चर्चा होती...
एक काळ आहे या नववर्षाच्या सुरुवातीला ज्यात त्याचा वशिला आहे अशी चर्चा होतेय...
खरे काय आणि खोटे काय पडद्याआड....
रोहीत हा आयपीएलचा आजवरचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे तसेच ईंटरनॅशनलमध्ये जेव्हा जेव्हा त्याला लिमिटेडमध्ये संधी मिळाली आहे त्याने आपले कर्णधारपदाचे नाणे खणखणीत वाजवले आहेच. हे मात्र फॅक्ट आहे.

याऊपर रोहीत नाही तर पर्याय काय यातही आश्विन वा पुजारा तितके आश्वासक वाटत नाहीयेच. जागा फिक्स आहे संघातली हा काही क्रायटेरीया नाही झाला. मग बुमराहची जास्त फिक्स आहे.

बाकी जो उपकर्णधार असतो त्याला कर्णधार व्हायची आस असते, ईथे या रांगेत तसेही कोहली, रहाणे पाठोपाठ शर्मा वा जो कोणी उपकर्णधार होणार होता तो तिसरा असणार होता. त्यामुळे हा निर्णय ईतका महत्वाचाही नव्हता की यावर फार चर्चा व्हावी. निवडसमितीने देखील आश्विन की पुजारा की आणखी कोणी असा संभाव्य ईगो प्रॉब्लेम टाळायच्या हिशोबानेही शर्माला उपकप्तान केले असावे जो आधीच लिमिटेडचा उपकप्तान आहे, जेणेकरून संघात आणखी त्या पदावरून फूट नको.. धिस इज अ‍ॅज सिंपल अ‍ॅज डिंपल. आपणच उगाच क्रिकेटचे निकष लावत किस पाडत बसलो असू .. थोडा खोक्याबाहेर डोके चालवूनही बघा Happy

निवडसमितीने देखील आश्विन की पुजारा की आणखी कोणी असा संभाव्य ईगो प्रॉब्लेम टाळायच्या हिशोबानेही शर्माला उपकप्तान केले असावे जो आधीच लिमिटेडचा उपकप्तान आहे, जेणेकरून संघात आणखी त्या पदावरून फूट नको.. धिस इज अ‍ॅज सिंपल अ‍ॅज डिंपल. >> पुजारा आधीच उप कप्तान होता. त्या बदलून रोहित ला बनवला. ह्या दोन गोष्टींमधला फरक एव्हढ्या मध्यरात्री कळणार नाही तुला. झोप जाऊन आता.

आयपील चा निकष लावायचा तर राहणे पण नसता झाला कप्तान.

Pages