Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल दुसरा सामना सुरू
काल दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी नाईट रायडर्स शेवटच्या पोझिशनवर होते.
आणि आज त्यांना आयपीएल जिंकण्याची संधी सुद्धा असू शकते...
ग्लोरिअस अन्सर्टन्टीज ऑफ सट्टा मार्केट...
जे संघ खाली रहातील असे
जे संघ खाली रहातील असे सुरूवातीच्या सामन्यांनंतर खाली रहातील असे वाटत होते तेच खाली राहिले. काहिही गडबड झाली नाही. मुंबई निर्विवादपणे पहिली आली. शंका घेणार्यांचा मुखभंग झाला.
आता हैदराबाद वर येइल का तेवढीच उत्सुकता आहे.
ऋतुराज मस्त खेळतो. शुभनम गीलला प्रत्येक १० रन नंतर पुनः स्तान्स घे अस कुणितरी सांगायला पाहिजे. मधेच आउट होतो. शास्त्रीबुवा काहितरी उपाय काढतीलच.
*स्पर्धा सुरु होताना वाटले
*स्पर्धा सुरु होताना वाटले नव्हते की स्पर्धा संपतासंपता मी मुंबईचा सपोर्टर होईन असे * - जीव खाली-वर होण्याइतपत आयपीएलच्या कोणत्याच टीमबद्दल वाटत नाहीं. पण मुंबैबद्दल सहाजिकच आपुलकी वाटते ( ' सचिनची टीम' हेंही अजून मनात रेंगाळत असावं ). यंदा दिल्ली व पंजाब कडेही थोडा कल आहे. एक मात्र नक्की, कांहीं खेळाडू, विशेषतः नवोदित,यंदा मन जिंकून गेले व त्याना भविष्यात बहरलेले पहाण्याची इच्छा मनात घर करून आहेच !
>>नवोदित,यंदा मन जिंकून गेले
>>नवोदित,यंदा मन जिंकून गेले
ती उत्सुकता दरवर्षी थोड्याफार प्रमाणात असतेच पण आपली अशी एक फेव्हरेट टीम असल्याशिवाय फार मजा येत नाही! (मला तरी
)
मुंबई टीम आवडती असली तरी
मुंबई टीम आवडती असली तरी (मराठी म्हणून नाही पण त्यातले ईंडिविजुअल प्लेअर्स आणि एकंदर टीम मधल्या वातावरणाचा येणारा अंदाज पाहून) मला नवीन चँपिअन टीम बघायला आवडेल... पंजाब, दिल्ली आणि आवडत नसली तरी बँगलोर सुद्धा जिंकलेली बघायला आवडेल.
चेन्नई, कोलकाता आणि मुंबई सोडून फॉरर् दॅट मॅटर राजस्थान किंवा हैद्राबाद जिंकली तरी चालेल.
"एक मात्र नक्की, कांहीं
"एक मात्र नक्की, कांहीं खेळाडू, विशेषतः नवोदित,यंदा मन जिंकून गेले व त्याना भविष्यात बहरलेले पहाण्याची इच्छा मनात घर करून आहेच !" - १००% सहमत. दर वर्षी आयपीएल मधे काही खेळाडूंना 'बघण्याची' इच्छा असते. त्यांच्याविषयी डोमेस्टीक, एज-ग्रूप क्रिकेटमधे, ए टीमच्या दौर्यात काहीतरी वाचलेलं, पाहिलेलं असतं आणी आयपीएल मधे त्यांचा खेळ बघायचा असतो. अशी कितीतरी नावं आहेत की ज्यांची लिस्ट मनात करून आयपीएल ला सुरूवात केलेली असते (शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, कार्तिक त्यागी, कमलेश नागरकोटी, यशस्वी जैस्वाल, रवी बिष्णोई, प्रियम गर्ग, विराट सिंग, वरूण चक्रवर्ती -ह्यातले काही चमकले, काही चमकतील).
"पण आपली अशी एक फेव्हरेट टीम असल्याशिवाय फार मजा येत नाही" - ते नकळत होतंच. रोलिंग आवड असते कधी कधी. द्रविडची टीम म्हणून राजस्थानविषयी अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे (त्यांच्या खेळानं त्याचा पार 'अडगळीचा कोपरा' करून टाकतात हा भाग वेगळा), नवोदितांवर विश्वास दाखवून बांधणी केलेली टीम म्हणून दिल्ली विषयी आपुलकी आहे. केकेआर घाऊक प्रमाणात आवडत नसले (गंभीर गेल्यापासून तर ते फारच डळमळीत झाले आहेत), तरी त्यांच्याकडेही गिल, मावी, नागरकोटी, चक्रवर्ती वगैरे प्रॉमिसिंग खेळाडू आहेत. एबी आणी कोहली साठी (त्याची क्रिकेटवरची भक्ती, डेडिकेशन ह्यामुळे त्याच्या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूनही तो आवडतो), आरसीबी ही जिंकावी अधून-मधून असं वाटत रहातं. हैद्राबाद चा थिंकटँक एखाद्या आदरणीय वडिलधार्या मंडळींचा (लक्ष्मण, मुरलीधरन) राबता असणार्या आणी कर्तृत्ववान नविन पिढी (विल्यमसन) चा वाटा असलेल्या घरासारखा वाटतो. मुंबई ही माझी अक्वायर्ड टेस्ट आहे. त्यांच्याकडे कसलीच कमतरता नाही. त्यामुळे त्यांना पाठीराख्यांच्या प्रार्थनेच्या बळाची गरज नाही असं वाटत रहातं. त्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देतो असं न वाटता, त्यांच्या ताकदीमुळे तेच पाठीराख्यांना पाठबळ देतात असं वाटत रहातं. कुठेतरी अंबानीची टीम असल्याचा शिक्का जाणवत रहातो. शर्माची कॅप्टन्सी आणी बॅटींग बघायला आवडते पण मुंबईला पाठिंबा देण्याचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख क्वचित पदरात येतं आणी चेन्नई सारख्या बुली करणार्या, केवळ उदात्ततेचा देखावा करत आणी वेळोवेळी आपले पाय मातीचेच असल्याचा पुरावा देणार्या लीडरशिप खाली खेळणार्या टीम ला ते वेळोवेळी हारवू शकतात.
त्यादिवशी मनदीप ने घेतलेला
त्यादिवशी मनदीप ने घेतलेला गायकवाडचा कॅच नॉट आऊट दिला त्याबद्दल थर्ड अंपायरचे डिसिजन पटले का?
मला वाटते आऊट द्यायला हवे होते.
नॉट आऊट दिल्यानंतर तो लांब केसांचा अंपायर आणि राहूलची ईंटर अॅक्शन ... मला अंपायर राहुलशी कारण नसतांना एवढी सलगी दाखवत होता ते फार अनवॉरंटेड वाटले. टफ मोमेंट्स मधे अंपायर्सनी त्यांचा आब राखून वागले पाहिजे असे वाटते.
रहाणे आणि शॉ एकाचवेळी
रहाणे आणि शॉ एकाचवेळी टीममध्ये...
दिल्ली प्लेईंग ११ बनवायलाही किती झगडते आहे.
आज दोन्ही टीमपैकी जो कमी वाईट क्रिकेट खेळेल तो जिंकेल असे वाटते.
रहाणे आणि शॉ दोघेही कधीच
रहाणे आणि शॉ दोघेही कधीच एकत्र खेळले न्हवते. त्या दोघाना माहीत होतं की आपल्यापैकी कोणीतरी एकच खेळणार. त्यामुळे शॉ बॅटिंगला गेला की रहाणे प्रार्थना करायचा हा लवकर आऊट होऊ दे आणि रहाणे बॅटिंगला गेला की शॉ प्रार्थना करायचा. त्यामुळे दोघांना एकमेकांची नाट लागायची. कोच पॉंटिंगने हे बरोबर ओळखले आणि दोघांना एकाच वेळी खेळवले. आता बघा दिल्ली परत रुळावर आली.
फे फ मला सगळ्या टीम्स आवडतात
फे फ मला सगळ्या टीम्स आवडतात असे लिहिले असतेस तरी चालले असते
मला के के आर बद्दल एक आपुलकी आहे कारण ते नेहमीच नवोदित खेळाडूंना पुरेशी संधी देतात. तीच गोष्ट रॉयल्स ची पण यंदा त्यांचे डावपेच फारसे पतले नाहीत. स्मिथ अगदीच गंडलेला वाटला. दिल्ली ची नवलाई माझ्यापुरती तरी ओसरली आहे. पंजाब बद्दल उगाचच आपुलकी वाटत राहते. (प्रिटी मुळे असे कोण म्हणाले रे
) मुंबई तर नेहमीच आपली टीम आहे.
ह्यावेळचा नवोदीत खेळाडू निर्विवाद पणे रुतूराज. धोनि ने सुरूवातीपासून विश्वास ठेवला असता (जसा कोहली ने पड्डीकल वर ठेवला) तर कदाचित चेन्नई चे चित्र वेगळे दिसलेही असते. त्या नंतर त्यागी. मला त्याचे अॅग्रेशन भयंकर आवडले. खरा खुरा फास्ट बॉलर वाटतो. रॉ आहे अजून पण भयंकर गुणी वाटतो आहे. मावी, नि नागर कोटी पेक्षाही जास्त ईफेक्स्टीव्ह वाटला.
स्पेशल मेंशन : तेवाटिया. निव्वल त्याचा आत्मविश्वास बघून त्याला ऑसी मधे घेऊन जायला हवे होते. लंबे रेस का घोडा नही लगता पण सध्याच्य फॉर्म वर मॅचेस काढून देईल असे वाटते.
दिल्लीचे खेळाडू कोहलीला
दिल्लीचे खेळाडू कोहलीला घाबरून आहेत. जर शेवटपर्यंत खेळलो तर हा भडकू डोक्याचा कोहली आपला भारतीय संघात येण्याचा रस्ता बंद करेल या भीतीत आहेत. त्यामुळे आता जवळ जवळ जिंकल्यात जमा असून सुद्धा मुद्दाम विकेट फेकताहेत.
झाले दिल्ली बंगळुरू दोन्ही
झाले दिल्ली बंगळुरू दोन्ही संघ प्ले ऑफ साठी तयार आता कुणीही जिंकले तरी.. शारुकच्या संघाचे भविष्य मुंबईच्या हाती..
शारुकच्या संघाचे भविष्य
शारुकच्या संघाचे भविष्य मुंबईच्या हाती.. >> मुंबई कितपत सिरीयस घेईल सामना ? नवीन खेळाडूंना ट्राञ करेल का ? अटी तटीने नाही खेळला तरी टॉप एलेव्हन (नो रोहित अर्थात) खेळवावी म्हणजे सराव कायम राहील असे वाटते.
आज दुबईत ब्लू जिंकले आणि रेड
आज दुबईत ब्लू जिंकले आणि रेड हारले....आता ऊद्या अमेरिकेत ब्लू जिंकणार की रेड?
शर्माची कॅप्टन्सी आणी बॅटींग
शर्माची कॅप्टन्सी आणी बॅटींग बघायला आवडते >>>> फेफ, रोहीत (अँड यू) हॅव कम अ लाँग वे !!
केवळ उदात्ततेचा देखावा करत आणी वेळोवेळी आपले पाय मातीचेच असल्याचा पुरावा देणार्या लीडरशिप खाली खेळणार्या टीम ला ते वेळोवेळी हारवू शकतात. >>>>> अगदी पूर्ण अनुमोदन !
दिल्ली भारी खेळले आज. पंजाब बाहेर गेले आणि दिल्ली आत राहिले हे राहूल आणि श्रेयसमुळे आवडले.
*त्याबद्दल थर्ड अंपायरचे
*त्याबद्दल थर्ड अंपायरचे डिसिजन पटले का?* हो. झेल घेणार्या खेळाडूचा पकडलेल्या चेंडूवर पूर्ण ताबा असणं, हा महत्वाचा निकष आहे. तसा ताबा येण्यापूर्वी हातातून चेंडू सुटला, तर झेल पूर्ण होत नाहीं (जें संबधित झेल घेतांना स्पष्टपणे झालं ). म्हणूनच, झेल घेतल्याबरोबर हवेत भिरकावला तरी तो झेल वैध समजतात कारण तसं करताना चेंडूवर ताबा असल्याचं सिद्ध होतं.
रहाणे आणि शॉ एकत्र खेळवणे
रहाणे आणि शॉ एकत्र खेळवणे मास्टरस्ट्रोक ठरला. दोघांचे प्रेशर गेले असेल.
आणि फॉर्म बाजूला ठेवला तर दोघेही वेगळ्या शैलीचे खेळाडू आहेत. एकत्र संघात राहू शकतातच.
आज रहाणे टेस्ट क्रिकेटचे शाॅट
आज रहाणे टेस्ट क्रिकेटचे शाॅट खेळत होता तेंव्हा 'आल वेल' होतं. 'टी-20'चा शाॅट खेळायला गेला आणि आऊट झाला !
"फे फ मला सगळ्या टीम्स आवडतात
"फे फ मला सगळ्या टीम्स आवडतात असे लिहिले असतेस तरी चालले असते" -
पण त्यात चेन्नैचा पण नंबर लागला असता ना! 
"फेफ, रोहीत (अँड यू) हॅव कम अ लाँग वे !!" - हे कधीतरी मला ह्या फोरमवर अपेक्षित होतंच. (सगळं इथेच फेडावं लागतं म्हणतात ते उगाच नाही:) ). रोहित आणी मी - दोघंही adaptable आहोत.
"त्यागी. मला त्याचे अॅग्रेशन भयंकर आवडले" - कालचा त्याचा रसेल चा सेट-अप पण मस्त होता. बॉलगणिक, तो त्याच्यापासून टप्पा लांब आणी खोल (वाईड & फुलर) ठेवत गेला आणी शेवटी रसेल जस्ट वॉक्ड इन द ट्रॅप.
तिवातिया: जिगरी आहे (लाखा सारखा दिसतो लगान मधल्या
).
"आज रहाणे टेस्ट क्रिकेटचे
"आज रहाणे टेस्ट क्रिकेटचे शाॅट खेळत होता तेंव्हा 'आल वेल' होतं. 'टी-20'चा शाॅट खेळायला गेला आणि आऊट झाला ! " - तो आणी धवन, अगदीच सापळ्यात चालत जाऊन फसावं तसे फसले अगदी
आरसीबी आणि केकेआर मधे फक्त "०
आरसीबी आणि केकेआर मधे फक्त "०.०४" इतकाच फरक आहे रन रेट मधे! पण त्यामुळे आरसीबी प्लेऑफ्स मधे नक्की आहेत. उद्याचा निकाल काहीही लागला तरी. मॅच लाइव्ह बघितली नाही त्यामुळे तो पॉईण्ट नक्की कोठे होता माहीत नाही - म्हणजे दिल्ली ३-४ बॉल्स लौकर जिंकले असते तर कदाचित आरसीबी खाली घसरले असते.
एकूण उद्या हैदराबाद जिंकले तर केकेआर खाली जातील असे दिसते. कारण त्यांचा रनरेट ऑलरेडी चांगला आहे.
मला मुंबई आवडतेच. साहेबांची लीगसी. व डग आउट मधे अधूनमधून झहीर दिसतो (आणि अजूनही फिट वाटतो). धोनी आवडतो पण चेन्नई नाही. त्यांचे खेळाडू अचानक भारतीय संघात दिसू लागले तेव्हापासून गफलेबाज वाटतात. केकेआर ने प्राचीन काळी दादाला काढल्याने व नंतर गंभीरला चांगली ट्रीटमेण्ट न दिल्याने आवडत नाही. आरसीबी का कोणास ठाउक पण आवडत नाहीत. बाकी सगळे सारखेच.
धवन आणि रहाणेला आऊट करणे
धवन आणि रहाणेला आऊट करणे बँगलोरला आज सॉलिड महागात पडू शकले असते...पण कोहली आणि टीम लकी ठरली.
कारण पुढे अय्यर, स्टॉईनिस, पंत सारखे अॅग्रेसिव बॅट्समन येणार होते...त्यांनी केवळ नऊ बॉल्स आधी गेम संपवला असता, तर बँगलोरऐवजी कोलकाता क्वालिफाय झाले असते.
धवन आणि रहाणे रिस्क न घेता स्ट्राईक रोटेट करून खेळत होते...त्यांनी फार तर एखादा शॉट मारून तसेच कंटिन्यू केले असते...पण अय्यर, स्टॉईनिस बद्दल असे खात्रीने सांगता आले नसते हे त्यांच्या ईंटेंट वरून दिसून आलेच.
मला वाटले कि अय्यर नि स्टोनिस
मला वाटले कि अय्यर नि स्टोनिस येईतो कॅपीटल तशी रिस्क घेण्याच्या स्टेजमधे पोहोचले होते. जर समजा ते दुसर्या तिसर्या ओव्हर मधे आले असते तर तेही धवन राहाणे सारखेच खेळले असते १५ ओव्हर्स पर्यंत.
हो हो...मी साधारणतः धवन आऊट
हो हो...मी साधारणतः धवन आऊट झाला त्या १२-१३ ओवरनंतर म्हणतो आहे.
कारण मॅच तोवर दिल्लीच्या खिशात आलेली (रन अ बॉल असे फॉर्टी ऑड रन्स बनवायचे होते फक्त) आणि थोडी प्रॅक्टिस म्हणून की काय मोठे शॉट्स लगावण्यासाठीच्या तयारीतच अय्यर, स्टॉईनिस, पंत दिसले... नॅचरली ते अॅग्रेसिवच आहेत.
त्यांना मॅच हारली तरी २३ की काहीतरी पेक्षा कमी रनांनी हरली तरी चालणार होते....तेवढे त्यांच्या क्वालिफिकेशनसाठी पुरेसे होते.
अय्यर स्पीनर्स ना ईनसाईड आऊट असे डीप एक्स्ट्रा कवर वरून मारायचे फटके अॅक्रॉस खेळत लाँग ऑन ला मारतो आहे...आणि सातत्याने आऊट होतो आहे. शॉट सिलेक्शन गंडते आहे त्याचे...तेवढे त्याने सुधारायला हवे. तो फार सातात्याने लाँग ऑन च्या बाँड्रीवर कॅच आऊट होतो आहे.
*एकूण उद्या हैदराबाद जिंकले
*एकूण उद्या हैदराबाद जिंकले तर केकेआर खाली जातील असे दिसते. * - तसं झालं तर ती ह्या आयपीएलची ' अपूर्वाई ' म्हणावं लागेल !!
काल पृथ्वीला सिराजने मस्त
काल पृथ्वीला सिराजने मस्त काढला. बाळाला अजून शिकायचय.
चहलला कस खेळायच हे कालची रहाणे आणि धवनची बॅटिंग पाहून सगळ्या फारीनर्सनी शिकाव. एकंदरीतच लेग स्पिनर समोर सगळे इतके का चाचपडतात हे मला कळत नाही. चांगल फूटवर्क मात्र प्[हिजे. मला स्वतःला लेग स्पिन खेळायला फार आवडायच. ऑफ स्पिन म्हणजे डोक्याला कट्कट वाटायची.
मुंबैची टीम कशीही असली तरी आमचीच. पार सनी, दिलिप पासून ही सवय लागलीय. मुंबई क्रिकेट कल्चर, त्यांची नसानसातली खडूसगिरी, शिवाय मोठ्ठा वारसा. क्रिकेटवर खर प्रेम करणारी आणि समजणारी माणसं. मुंबई आणि मुंबईचे फॅन्स. मुंबईत मॅच बघण ही पण मजा असायची.
असो. हैदराबाद ची टीम जिंकली तर मला आवडेल. रशिद साठी.
लेग स्पिन.... ह्म्मम.... मोठा
लेग स्पिन.... ह्म्मम.... मोठा विषय आहे!
मला पण लेग स्पिन करायला फार आवडायचे.... कॉलेजच्या दिवसात मी खुप विकेट्स काढल्यात लेग स्पिनवर!
.
.
.
.
.
.
EA sports च्या गेममध्ये!
तसं झालं तर ती ह्या आयपीएलची
तसं झालं तर ती ह्या आयपीएलची ' अपूर्वाई ' म्हणावं लागेल !! >>>
भाऊ, मस्त 
काल पृथ्वीला सिराजने मस्त काढला. बाळाला अजून शिकायचय. >>> टोटली! हायलाइट्स मधे तो सेट अप केवळ त्या बॉल्स ना फोर मारले होते म्हणून दिसला. नाहीतर हायलाइट्स म्हणजे फोर्स, सिक्सेस आणि विकेट्स दाखवायच्या असे बिनडोक लॉजिक आहे या हायलाइट्स वाल्यांचे.
मुंबैची टीम कशीही असली तरी आमचीच. पार सनी, दिलिप पासून ही सवय लागलीय >>> हो साहेबांची लीगसी म्हणण्यापेक्षा थोरल्या साहेबांची म्हणायला हवे
एकूण उद्या हैदराबाद जिंकले तर
एकूण उद्या हैदराबाद जिंकले तर केकेआर खाली जातील असे दिसते. * - तसं झालं तर ती ह्या आयपीएलची ' अपूर्वाई ' म्हणावं लागेल !! Wink>>

हो हेही एक कारण आहे हैदराबाद जिंकायला पाहिजे अस वाटायच.
जे संघ खाली रहातील असे
जे संघ खाली रहातील असे सुरूवातीच्या सामन्यांनंतर खाली रहातील असे वाटत होते तेच खाली राहिले. काहिही गडबड झाली नाही. मुंबई निर्विवादपणे पहिली आली. शंका घेणार्यांचा मुखभंग झाला.
Submitted by विक्रमसिंह on 2 November, 2020 - 17:58
>>>>>>
अहो सर, उलट यानेच तर शंकेला बळकटी आली. वरचे अखेरीस वरच राहिले. पण मधल्या काळात दिल्ली बेंगलोरने डाऊन होत स्पर्धेत रंग भरले

दिल्लीने मागच्या सामन्यात अक्षर पटेलला वगळणे बरेच जणांना अनाकलनीय वाटलेले. कारण त्याने गोलंदाजीच नाही तर मोठी फटकेवाजीही केलेली. एक सामना तर धवनच्या शतकानंतरही हरायच्या स्थितीत आलेले तो जिंकवून दिलेला. पण तरीही त्याला वगळले आणि काल पुन्हा घेतले कारण जिंकायचा सामना तर कालचा होता
Pages