Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पहिल्याच पानावरच्या पहिल्या
पहिल्याच पानावरच्या पहिल्या पोस्टमध्ये दिल्लीला सपोर्ट दिलेला ती फायनलला आहे.
मुंबई तर पहिल्या सीजनपासून अखेरच्या श्वासापर्यंत नेहमीच पहिली पसंती.
थोडक्यात फायनलला आता मनाने मी कुठेच नसेल. प्लेन एंजॉय करता येईल मॅच.
शेवटी पदरात आनंदच पडणार आहे एवडे तर आज नक्की झालेय
*बाकी दिल्लीची स्टॉईनिसला
*बाकी दिल्लीची स्टॉईनिसला घेऊन ओपन करण्याची मुव भलतीच यशस्वी ठरली. * ...व रहाणेऐवजी हेटमायरला वर फलंदाजीला पाठवण्याचीही !!
बोल्ट नसेल तर मुंबई ची
बोल्ट नसेल तर मुंबई ची गोलंदाजी बरिच कमकुवत वाटते, patinson, कर्तेनील, कृनाल बरेच weak लिंक्स आहेत
मुंबईने रोहितला फायनलला
मुंबईने रोहितला फायनलला ओपनिंगला पाठवावे?
आज दिल्ली सगळी निराशा झटकून,
आज दिल्ली सगळी निराशा झटकून, एका प्लॅनला पकडून खेळली आणी जिंकली. विल्यमसन असेपर्यंत हैद्राबाद ला जिंकायची संधी होती. पण तो आऊट झाल्यावर रबाडाच्या एका ओव्हरमधे मॅचचा निकाल स्पष्ट झाला.
आता मंगळवारी दिल्ली वि. मुंबई!! सुरूवातीला ज्या दोन संघात फायनल मॅच होईल असं वाटलं होतं, तेच दोन संघ फायनलमधे दिसतील.
आज दिल्ली सगळी निराशा झटकून,
आज दिल्ली सगळी निराशा झटकून, एका प्लॅनला पकडून खेळली आणी जिंकली. विल्यमसन असेपर्यंत हैद्राबाद ला जिंकायची संधी होती. पण तो आऊट झाल्यावर रबाडाच्या एका ओव्हरमधे मॅचचा निकाल स्पष्ट झाला.
आता मंगळवारी दिल्ली वि. मुंबई!! सुरूवातीला ज्या दोन संघात फायनल मॅच होईल असं वाटलं होतं, तेच दोन संघ फायनलमधे दिसतील.
मुंबईकराच्या नेतृत्वाखाली
"मुंबईकराच्या नेतृत्वाखाली दिल्ली पहिल्यांदाच अंतीम फेरीत". वेट, आय डिडंट मेक दॅट अप, हि लोकसत्ताची हेडलाइन आहे. इदर वे, वी (मुंबईकर) विन. थोडक्यात वर ऋन्म्या म्हणतोय तसं, एंजॉय द गेम...
बोल्ट नसेल तर मुंबई ची
दोन्ही संघ समतोल व तुलयबळ असल्याने, अंतिम सामना कुणाच्या तरी अफलातून खेळीमुळे किंवा अक्षम्य चुकीमुळे एका बाजूला झुकण्याची शक्यता अधिक वाटते.
*बोल्ट नसेल तर मुंबई ची
*बोल्ट नसेल तर मुंबई ची गोलंदाजी बरिच कमकुवत वाटते* -
चूकीचा नंबर आहे हो हा. तरी पण, बोल्ट फिट होत नसेल तर 'नट' लावा ना एखादा, गल्ली बोळात कुठेही मिळतात हल्ली त्या टीव्ही सिरियलसमुळे !
**
माझेही केस असेच दाट व डार्क होते , मीं क्रिकेटच्या चर्चेत भाग घेत नसे तेंव्हा !!
भाऊ, मस्तच!
भाऊ, मस्तच!
नट, नट्या हल्ली तश्याही क्रिकेटच्या आसपास घुटमळत असतातच कॅमेर्यात दिसण्यासाठी!
तुम्ही सगळे मराठी असून दिल्ली
तुम्ही सगळे मराठी असून दिल्ली जिंकल्यावर आनंद होईल असं म्हणूच कसं शकता?
*तुम्ही सगळे मराठी असून
*तुम्ही सगळे मराठी असून दिल्ली जिंकल्यावर आनंद होईल असं म्हणूच कसं शकता?* - मुंबै जिकली तर आनंद तर आहेच आहे. पण केवळ मराठी आहोत म्हणूनच मात्र नाहीं . कारण

1) टीम ' मुंबई ' नसून ' मुंबई इंडीयनस' आहे;
2) मुंबई टीमचे मालक मराठी नाहीत ;
3) इंडीयाचा कर्णधार बेंगलोरचा कर्णधार असूनही त्याची टीम हरली तेंव्हा इंडीयनस असूनही आम्हाला दु;ख झालं नाहीं ;
व
4) दिल्लीतही आमचा रहाणे आहेच ना !
>>तुम्ही सगळे मराठी असून
>>तुम्ही सगळे मराठी असून दिल्ली जिंकल्यावर आनंद होईल असं म्हणूच कसं शकता?
या लॉजिकने मग मला "पुणे वॉरीयर्स" ला सपोर्ट करावा लागला असता काही सीझन्स
मुंबई टीमचे मालक मराठी नाहीत>
मुंबई टीमचे मालक मराठी नाहीत>>> एकीकडे बोलता मुंबईचे मालक मराठी नाहीत दुसरीकडे मी याच धाग्यावर काही दिवसांपूर्वी अय्यर, शॉ, दुबे हे परप्रांतीय आहेत मराठी नाहीत मग त्यांना मुंबईकर का बोलता असा प्रश्न विचारला होता तेव्हा भाऊ तुम्ही पुढील उत्तर दिलं होतं.
*सगळे दिल्ली, यूपी बिहारी आहेत.* - परकार बंधू कोकणातले आहेत. पॅडी शिवलकर, रामनाथ पारकर, मुजूमदार हे अस्सल मराठीच. शिवाय, केवळ क्रिकेटपुरते मुंबैत न येतां इथेच स्थायिक असलेल्या कुटुंबातील मुलं क्रिकेटमधे पुढे आली, तर त्याना मुंबैकरच म्हणणं योग्य.
Submitted by भाऊ नमसकर on 26 September, 2020 - 10:43
मग आता अंबानी पण मुंबईकर झाला
मग आता अंबानी पण मुंबईकर झाला असल्याने तुमचा दुसरा मुद्दा खोडण्यात येतोय.
चवथा मुद्दा दिल्लीमध्ये रहाणे
चवथा मुद्दा दिल्लीमध्ये रहाणे आहे. रहाणेला दिल्लीच्या संघात काडीईतकीही किंमत नाही. कालच्या सामन्यात सगळ्यांना कळून चुकलंय. राहाणेच्या घरचे पण मुंबईला सपोर्ट करत असतील. वारंवार अपयशी , शून्यवर आऊट होऊन त्याने दिल्ली सपोर्टर्सच्या कितीतरी शिव्या खाल्ल्या असतील. जर दिल्लीच्या रस्त्यावर एकटा दुकटा फिरताना लोकांना आढळला तर त्याला बेदम चोप देतील.
*एकीकडे बोलता मुंबईचे मालक
*एकीकडे बोलता मुंबईचे मालक मराठी नाहीत दुसरीकडे मी याच* - 'मराठी असून ..... ' असं आता म्हणतांना ' मराठी 'ची व्याप्ती तुम्हीच संकुचित केली व त्याला उत्तर म्हणून माझे आतांचे काॅमेंट आहेत !
*रहाणेला दिल्लीच्या संघात काडीईतकीही किंमत नाही. *
' मराठी असून ..' याचा अर्थ केवळ मराठी आहे म्हणून मुंबैला पाठिंबा द्यायलाच हवा असा होतो व त्याला उत्तर महणून रहाणेचा उल्लेख केला. तो मराठी आहे मग त्याला दिल्लीत किंमत आहे कीं नाहीं याचा तरी कां विचार करायचा !
'मुंबै' टीमबददलच्या माझ्या आपुलकीचा माझ्या 'मराठी ' असण्याशी संबंध नाही , इतकंच मलां सांगायचंय.
तुम्ही सगळे मराठी असून दिल्ली
तुम्ही सगळे मराठी असून दिल्ली जिंकल्यावर आनंद होईल असं म्हणूच कसं शकता?>> बोकलत तुम्हीही अस म्हणूच कस शकता.
कोणीच म्हणत नाही दिल्ली जिंकावी. मुंबईच जिंकणार अर्थातच. डेप्थ. गणित तेच.
११-२ (रोहित, पोलार्ड) = ११ मुंबई
११-२ (स्टोइनिस, धवन) = ५ दिल्ली.
दोन्ही संघ समतोल व तुलयबळ
दोन्ही संघ समतोल व तुलयबळ असल्याने, अंतिम सामना कुणाच्या तरी अफलातून खेळीमुळे किंवा अक्षम्य चुकीमुळे एका बाजूला झुकण्याची शक्यता अधिक वाटते. >> ह्यापेक्षाही दव पडले तर एका बाजूला झुकण्याची शक्यता अधिक वाटते.
मला वाटतेय दिल्ली जिंकावी...
मला वाटतेय दिल्ली जिंकावी...
मुंबई पूर्वी देखील आयपील जिंकली आहे..
नवीन टीम ने जिंकलेले आवडेल...
कुठे फेडाल रे ही पापं?
कुठे फेडाल रे ही पापं? तुमच्या सगळ्यांची नाट लागून मुंबई हारु नये म्हणजे झालं.
*तुमच्या सगळ्यांची नाट लागून
*तुमच्या सगळ्यांची नाट लागून मुंबई हारु नये म्हणजे झालं.* -' मराठी 'चा मुद्दा काढून मुंबैच्या संघातल्या एकीच्या भावनेला सुरूंग लावण्याचं काम करणारयानी खरं तर आमच्या मुंबैच्या संघाला नाट लावलीय !
मुंबई पूर्वी देखील आयपील
मुंबई पूर्वी देखील आयपील जिंकली आहे..
नवीन टीम ने जिंकलेले आवडेल...
>>>
मुंबईच्या चाहत्यांना मुंबई अजून एक टायटल जिंकून चेन्नईच्या अजून पुढे गेलेली बघायचेय.
पाॅटींगचे ' टिपीकल ऑसी माईंड
पाॅटींगचे ' टिपीकल ऑसी माईंड गेम्स ' सूरू झाले ! दिल्ली आपला सीझनचा सर्वोत्तम खेळ करून मुंबैला हरवणार, अशी वल्गना केलीय आज त्याने !! नाहीं सुधरायचे हे ऑसी !!!
ऑस्ट्रेलियात कोण कॅप्टन.
ऑस्ट्रेलियात कोण कॅप्टन. रोहीत की रहाणे अशी मॅच आहे आज.
दिल्ली जिंकणे - प्रोबेबल बट नॉट पॉसिबल.
आज उशीरा सिक्रेट मिटींग
मोजक्याच लोकांची उशीरा सिक्रेट मिटींग लावलीय , 7.30 ते 11 ! तीनदां टिव्हीही तपासून घेतलाय !!
बहुतेक, राज्याचा दिल्लीबरोबर परत काय तरी मोठा वाद झालाय !!!
मुंबई ची मस्त सुरुवात २ विकेट
मुंबई ची मस्त सुरुवात २ विकेट काढून
तिसरी पण गेली
तिसरी पण गेली
चॅम्पियन झाले न झाले तरी
चॅम्पियन झाले न झाले तरी दिल्लीची ही चॅम्पियन टीम आहे, याबद्दल संशय नाहीं. तीन विकेट लवकर गेल्या असूनही असा जिगरी खेळ कौतुकास्पदच !
Pages