आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कोणत्याही नवोदितावर, काट मारायची घाई करणं हें चूकीचंच !!>>>>
भाऊ, तुमचे बरोबर आहे पण पॉंटिंग सारखे लोक दोन शब्द त्याला सांगू शकतात..
आणि सांगूनही असा फटका मारून बाद होत असेल तर योग्य नाही.. तांत्रिक चुका सुधारायला हव्यात..

आज दिल्ली हारली तर दुसरी सेमी पुन्हा ह्याच दोन टीम्स होण्याची शक्यता आहे.

काय करावे ह्या रहाणेचे... शॉ आणि रहाणे सोडून तिसरा पर्यायच नाही दिल्लीकडे.

सीएसकेची nuisance value आतां कोणालाही महागात पडूं शकते. आज बेंगलोरला याची झलक बघायला मिळाली ! गायकवाडच्या अप्रतिम खेळीमुळे ( नाबाद 65) सीएसकेचा दणदणीत विजय !!

आज ऋतुराज गायकवाड एक impact inning खेळला. फार छान वाटलं. महाराष्ट्राकडून, इंडिया-ए कडून तो अनेकवेळा मोठ्या आणी महत्वाच्या इनिंग्ज खेळलाय, त्यामुळे आयपीएल मधे पण त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. वेल डन ऋतुराज!!

आता मुंबई वि. राजस्थान!

आज दुसरी मॅचसुद्धा मस्त झाली. हार्दिक पंड्याने मॅच राजस्थानकढून काढून नेली असं वाटत असताना स्टोक्स आणी संजू कमाल खेळले.

उद्या केकेआर वि. पंजाब! चौथ्या क्रमांकाचा सामना!

आऊट झाल्यावर एखादा खेळाडू मैदान सोडून गेलाच नाही. परत एकदा बॅटिंग करणार म्हणून सगळ्यांशी भांडून तिथेच थांबला तर काय निर्णय घेण्यात येईल?

आगामी ऑसी दौर्‍यासाठी राहूल टी२० आणि वन डे साठी फुल टाईम विकेट कीपर. (असामी Wink )
सॅमसन टी२० मध्ये आत, पंतचा पत्ता व्हाईट बॉल स्काड मधून पूर्ण कट.
वरूण चक्रवर्ती टी २० मध्ये का पण?
कुलदीपला का खेळवत आहेत वन डे मध्ये..?
टेस्ट स्क्वाड मध्ये अजून ऊमेश यादव का आहे? शॉ आणि सिराज पेक्षा गिल आणि दीपक चहार असायला हवे होते.

रोहित आणि ईशांत शर्मा बहुधा ईंजुरी मुळे नाहीत.

शॉ आणि सिराज पेक्षा गिल आणि दीपक चहार असायला हवे होते.>>> धोनी असताना चेन्नईच्या खेळाडूंची खोगीर भरती व्हायची आता कोहली कॅप्टन म्हणून rcb च्या खेळाडूंची होईल. मुंबईत राहून सुर्यकुमार यादव आणि ईशान किशनचा रायडू होईल की काय असं वाटायला लागलंय.

आगामी ऑसी दौर्‍यासाठी राहूल टी२० आणि वन डे साठी फुल टाईम विकेट कीपर. (असामी Wink ) >> टी२० साठि सॅमसन आहे . राहुल लवकरच संपवणार आपण.

धवन, राहूल, कोहली, अय्यर, पांडे , पंड्या, जडेजा हा अग्रक्रम फिक्स असतांना सॅमसनची वर्णी प्लेईंग ११ मध्ये...थेट लागणे अवघड आहे. रिप्लेसमेंट म्हणूनच लागू शकते.

राहुल लवकरच संपवणार आपण.>> हो असं होऊ शकतं. पण त्याचा ट्रॅ़क रेकॉर्ड बघता... आधी अचानक ओपनिंग मिळाली, मग किपींग, आता कॅप्टन्सी तो क्लास परर्फॉर्मर म्हणून तग धरून राहू शकेल असे वाटते. (गिलख्रिस्ट, डीकॉक, एबी, संगाकारा) ह्यांनी कीपींग आणि टॉप ऑर्डर बॅटिंग दोन्ही स्कील्स लीलया हाताळली..राहूलली नक्कीच करू शकेल.
अगरवालला मानायला हवे...चटकन तिन्ही फॉरमॅट मध्ये वाँटेड झाला तो.. पंड्याला वगळायला नको होते टेस्ट स्क्वाड मधून.

टेस्ट स्क्वाड मध्ये अजून ऊमेश यादव का आहे? शॉ आणि सिराज पेक्षा गिल आणि दीपक चहार असायला हवे होते. >> सिराज टेस्ट स्क्वाड मध्ये आहे. तॉ अ संघाकडून नि रणजी मधे नियमीत खेळतोय गेली काही वर्षे नि चांगला खेळतोय. चहर त्या फॉर्मॅटमधे ओ के खेळलाय पण लिमिटेड मधे भयंकर ईम्प्रेसीव्ह खेळलाय.

माझे एकंदर ईम्प्रेशन हे की आय पी एल ला फारसे मह्त्व दिलेले नाहीये इथे टेस्ट साठी. आधीचे प्लेयर्स बर्‍यापैकी सुरू ठेवलेत.

वर्ल्डकपची २०-२० अकराची पहिली टीम काय असेल?

शर्मा
धवन (याच्यावर आधी डाऊट होता. पण अचानक याने ईंटेट दाखवत तिकीट बूक केले)
कोहली
अय्यर / मनिष पांडे / ……?
राहुल
पांड्या (हा बॉलिंग टाकेल गृहीत धरून)
जडेजा किंवा अक्षर / कृणाल / सुंदर वगैरे फिंगर स्पिनर जो फलंदाजी करू शकतो.
चहल किंवा कुलदीप (रिस्ट स्पिनर जो बॉल वळवून विकेट काढू शकतो)
बुमराह
अजून दोन वेगवान असतील - शमी, सैनी, खलील, सिराज, चहर, शार्दुल वगैरे पैकी.

तर दोन ऑलराऊण्डर असलेल्या टीममध्ये त्यानंतर कोणाही गोलंदाजाला फलंदाजी येत नसेल तर राहुललाच किपिंग करायला लावतील वर्ल्डकपला असे वाटते.
पंत वा सॅमसन कोणा फलंदाजाला रिप्लेस करू शकतील व तसा फॉर्म दाखवतील तरच त्यांना कीपर म्हणून घेतील असे सद्यस्थितीत वाटते.
अर्थात राखीवमध्ये स्थान कोणाला मिळेल यावरही आता पंत सॅमसनमध्ये चुरस बघयला मिळेल. कारण तिथूनच कदाचित ते स्पर्धेच्या मध्ये अकरात येऊ शकतात जसे ५०-५० च्या विश्वचषकात झाले. अर्थात त्यात तर धमाल होती. सेमीफायनलला धोनी, पंत, कार्तिक, राहुल चार कीपर एकत्र खेळत होते Happy

असो,
मला तर उत्सुकता आहे की पंतची गेल्या ऑस्ट्रेलिया दौरयातील कामगिरी पाहता कसोटीत त्याचा विचार साहाच्या आधी केला जाईल का? बहुतेक नाही.. पण एखादा सामना हरता आणि त्यात साहाची फलंदाजीतील कामगिरी विशेष नसल्यास लगेच पंतकडे वळतील का?
अर्थात ती वेळ येऊ नये यासाठी गोलंदाजच प्रार्थना करतील Happy

वर्ल्डकपची २०-२० अकराची पहिली टीम काय असेल?

शर्मा
मयांक
कोहली
अय्यर
राहुल ( धवन, पंत बॅकप)
पांड्या
जडेजा/ अक्षर / सुंदर
चहल
बुमराह
शमी
चहर (सैनि बॅकप)

मनोज कोण रे? मनीष की मयंक
राहूल आजच्या घडीला टॉप टी२० प्लेअर आहे....त्याला ओपन करायला न पाठवणे म्हणजे त्याला वेस्ट करण्यासार्खे होईल..तो ओपन तर करतोच पण पूर्ण २० ओवर्स सुद्धा बॅटींग करू शकतो. त्याला अ‍ॅकॉमोडेट करण्यासाठी रोहित शर्मा किंवा धवन (मोस्टली शर्मा) चा बळी जाणार असे दिसते.

भुवी फिट होईल की तोवर मग चहर्/सैनी ची गरज पडणार नाही. माझ्या मते टीम अशी असेल

राहूल, धवन(शर्मा), कोहली, अय्यर, पांडे(मयंक), पंड्या(पंत), जडेजा(सुंदर, अक्षर), भुवी, शमी, बुमरा, चहल
(सैनी, चहार, चक्रवर्ती)

किंवा शर्माला कॅप्टन्सी देऊन कोहली ने २०२० वर्ल्डकप साठी ब्रेक घेतला तरी मला नवल वाटणार नाही.

आजच्या घडीला टॉप टी२० प्लेअर आहे....त्याला ओपन करायला न पाठवणे म्हणजे त्याला वेस्ट करण्यासार्खे होईल..तो ओपन तर करतोच पण पूर्ण २० ओवर्स सुद्धा बॅटींग करू शकतो. >> आजच्या घडीला तो करतो म्हणूनच व्र्ल्ड कप पर्यंत आडवा झालेला असेल रे. पांड्या नि अय्यर बरोबर हुकुमी फटकेबाजी शेवटच्या ४-५ ओव्हर्स मधे करू शकेल असा मला दुसरा कोणि दिसत नाही राहुल शिवाय. पंत पांड्या पेक्षा बेभरवशाचा आहे.

आज ऋतुराज गायकवाड एक impact inning खेळला. फार छान वाटलं >> +१

पॉइण्ट्स टेबल पाहिले तर अजून बरेच "ओपन फील्ड" आहे असे दिसते. अगदी चेन्नई व राजस्थान सोडले तर बाकी तिघे अजूनही येउ शकतात टॉप ४ मधे: पंजाब, कलकत्ता आणि हैदराबाद. मुंबईचा रन रेट पाहता तीन गेम्स क्लोज खेळून त्यापैकी किमान एक जिंकले तरी सील करतील बहुधा.

शर्माचा बळी हे ऐकायलाच कसेतरी वाटते. शर्माचे खेळपट्टीवर उभे असणेच ईतके आश्वासक वाटते की स्कोअरबोर्ड काहीही रीड करत असला तरी आपण गेममध्ये आहोत असे वाटते. कारण तो कधीही एखादा बॉलर पिक करून हव्या तितक्या धावा आपल्या पोतडीत टाकू शकतो हा विश्वास. महत्वाचे म्हणजे तो मोठ्या सामन्यांचा मोठ्या स्पर्धांचा खेळाडू आहे. वर्ल्डकपमध्ये एखादा खेळाडू ५ शतक मारणार आहे असे कोणी आधीच भविष्य वर्तवले असते तर तो कोहली नाहीतर शर्माच असेल हे कोणीही सांगितले असते. इनिंग बिल्ड करण्यात दोघे बाप माणूस आहेत.

हे झाले ऑन फिल्ड
आणि मला वाटते की ऑफ फिल्ड सुद्धा शर्माचे वजन ईतके आहे की कोहलीनंतर त्याचे नाव लिहिले जात असावे.

खरा 'होम ग्राऊंड' चा प्रकार नसल्यामूळे पहिल्या दोघांमधे असणे मह्त्वाचे आहे, बाकी एक किंवा दोन ला काही मह्त्व नाही.

अजिंक्य रहाणेला टेस्ट मधे घेतल ते बर झाल. ऑस्ट्रेलियात टेस्ट मधे तो , पूजारा आवश्यकच.
कुलदीप सध्या काय करतो?.
रोहित नसल्यामुळे टीम एकदम स्ट्राँग आहे असे वाटत नाहीये.

रोहीत शर्मा ला नक्की काय झाले आहे?

कोहली व रवी शास्त्री यांनी त्याचा पत्ता कट केला असे तर्क-वितर्क सोमिवर दिसत आहेत.

आयपीएल मध्ये रोहित चार वेळा कप जिंकलाय आणि कोहली एकदाही नाही. त्यामुळे कोहली त्याच्यावर खार खाऊन असावा. रोहित टीममध्ये असला की कोहलीपेक्षा रोहित कसा चांगलं कॅप्टन आहे याची चर्चा सोमीवर होते. हे एक कारण असू शकतं.

Pages