Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
* आजच्यापूरतच.* - आज कुठंय
* आजच्यापूरतच.* - आज कुठंय दिल्ली !
काल मध्यंतरानंतर मला सामना
काल मध्यंतरानंतर मला सामना सुरु करायला अंमळ उशीर झाला..
तेंव्हा धावफलक १-३ असा दाखवत होता आणि बुमराह डावाचे दुसरे षटक टाकीत होता आधी कळलेच नाही ते १ बाद ३ आहे की ३ बाद १
पण श्रेयस आणि स्टोयनियस बघताच सत्य समजले. बोल्ट चे एक षटक २ बळी शुन्य धावा तर बुमराह १ वाईड एक बळी कसली भन्नाट गोलंदाजी..
इशान किशन मस्तच खेळतोय...
शारुकच्या संघाला खाली ढकलण्यासाठीच दोघांना विश्रांती दिली असे म्हणण्यास वाव आहे!
मुंबईकडे फायर पावर असणे
मुंबईकडे फायर पावर असणे माझ्या मते महत्वाचे नाही... त्या फायरपावर दिल्लीने स्वैर बोलिंग चे पेट्रोल ओतून भडकवण्याचा मुर्खपणा केला तो न करणे हा आहे. पंड्याला एक ईंचाचेही फुटवर्क न करता सलग ८० मीटर्स शॉट मारता येतात हा दिल्लीच्या ब्रेनलेस बोलिंगचा नमुना आहे.
शॉ आणि रहाणेच्या आयपीएल मधल्या ईनकाँपिटन्सी बद्दल तर मी अनेक वेळा लिहिले आहे.त्यांचा पुढच्या सीझनला पुजारा होणार नक्की.
मला वाटते ह्यावेळी हैद्राबाद बोलिंगच्या जोरावर कप जिंकणार.
कोहली आज संदीप शर्माच्या
कोहली आज संदीप शर्माच्या दबावाखाली खेळला की नॉकाअऊटच्या काही कळत नव्हते.
अत्त्यंत गचाळ खेळी गचाळ पद्धतीने संपवून बाद झाला…
एकदा टॉप ऑर्डर कोसळली की मग काय आनंदच असतो बेंगलोरचा…
मोईन अली, सुंदर, शिवम दुबे… हे फलंदाज म्हणून मॅचविनर वाटतच नाहीत.. आणि आयला तो शिवम दुबे.. त्यात मला आजवर कधीच काही स्पार्क दिसला नाही. लहानपणी राऊंड भरायचे त्यात अकराची टीम टाकायला एकदोन पकडून आणावे लागायचे त्यातला वाटतो तो.
साहाच्या अनुपस्थितीत आज
साहाच्या अनुपस्थितीत आज हैदराबादची फ्लाईंग स्टार्ट झाली नाही.. पण स्कोअर ईतका कमी आहे की विकेट हव्यात.. स्पिन ऑप्शन चार आहेत.. त्यात विकेट टेकिंग दोन.. पण मदत कितपत मिळतेय, दव पडतेय की नाही… लवकरच समजेल. हैदराबाद काही स्ट्राँग बॅटींग लाईन नाही. पण वॉर्नर, पांडे, विल्यमसन यांना उभे राहायचे माहीत आहे. त्यांना भेदून सामना पुढे जायला हवा. सलग दुसरा प्ले ऑफचा सामना बोअर करू नका. रंगत हवी स्पर्धेला. पब्लिक डिमांड आहे
सहाच्या आसपासचा रन रेट आहे
सहाच्या आसपासचा रन रेट आहे तेंव्हा सनराईजर्स जिंकण्याचे चान्सेस अधिक आहेत.
कालच्या सामन्यामधला तुमचा सर्वात आवडता शॉट कोणता ?
१. सूर्याचा बॅक फूट वर रेलून अक्षर ला मारलेला स्क्वेअर ड्राईव्ह वाला फोर
२. सूर्याचा ऑन कम कव्हर ड्राईव
३. किशनचा रबाडाला मारलेला पूल- हूक
४. किशनचा शेवटचा कव्ह्र वरून मारलेला सिक्स
५. डिकॉकचा ओपनीम्ग स्ट्रेट ड्राईव्ह
६. सूर्याचा अश्व्नि च्या थांबण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत पुढे नाच येऊन मारलेआ सिक्स
७. पांड्याचा बॅकफूट वर रेलत फक्त हात घूमवून मारलेला पहिला सिक्स
माझ्यासाठी पहिला. अचूक रीड नि नितांत सुंदर बॅलॅन्स , परफेक्ट प्लेसमेंट. किशनचा पूल- हूक अगदी त्याजवळ येतो. खर्या अर्थाने डिस्डेनफूल ट्रीटमेंट होती.
स्पिन ऑप्शन चार आहेत.. त्यात
स्पिन ऑप्शन चार आहेत.. त्यात विकेट टेकिंग दोन..
>>>>
य दोघांपैकी एकाने पांडेला घेतला... गेम ऑन?
विल्यमसन बाकी आहे...
आणि दुसर्या विकेट टेंकिंग
आणि दुसर्या विकेट टेंकिंग स्पिनरने प्रियम गर्ग घेतला….
सामना फिरतोय
कोहली संघ बाद!!
कोहली संघ बाद फेरीत बाद!!
न उलगडलेला प्रश्न..
फिंच असताना कोहलीने ओपन का केले?
फिंच असताना कोहलीने ओपन का
फिंच असताना कोहलीने ओपन का केले?>>>कोलीला दाखवायचे होते की तो रोहित शर्मापेक्षा चांगला ओपनर आहे. बरं झालं कोलीचा संघ बाद झाला. आता उर्वरित आयपील शिव्याविरहित संपन्न होईल.
*फिंच असताना कोहलीने ओपन का
*फिंच असताना कोहलीने ओपन का केले?* वाढदिवस होता ना कोहलीचा. वय वाढे, अक्कल बुडे !!!
फलंदाजीत एसआरएच वाॅरनरवर खूपच अवलंबून असते, हें आजही दिसलं. चॅम्पियन होण्यात ही मोठी कसर ठरूं शकते. फायनल मुंबै वि. दिल्ली असंच अजून वाटतंय !
फायनल मुंबै वि. दिल्ली असंच
फायनल मुंबै वि. दिल्ली असंच अजून वाटतंय ! >>लीग स्टेज मध्ये हैद्राबाद ने दोन्ही वेळेस दिल्लीला हरवले आहे. एकदा २००+ सुद्धा केले आहेत.
ह्याऊलट दिल्ली दोन्ही वेळेस १५० सुद्धा करू शकली नाही...एकदा तर पूर्ण २० ओवर्स सुद्धा टिकू शकली नाही.
विल्यमसन बाकी आहे.. हे
विल्यमसन बाकी आहे.. हे निर्णायक ठरले !
विकेट पडलेल्या तिथे मोईन अलीने एक ओवर टाकत चार रन्स दिलेल्या. त्याला अजून एखाददुसरी ओवर देत चहल झंपाची एखाद दुसरी ओवर मागे ठेवता आली असती. चहल झंपा फिनिश झाले तसे पुढे सरळसोट सामना झाला.
>>फायनल मुंबै वि. दिल्ली असंच
>>फायनल मुंबै वि. दिल्ली असंच अजून वाटतंय !
मुंबई पण हेच म्हणत असेल.... तसे कुणीही आले तरी त्यांना फारसा काही फरक पडत नाही म्हणा.... तरी त्यातल्या त्यात!
तसे कुणीही आले तरी त्यांना
तसे कुणीही आले तरी त्यांना फारसा काही फरक पडत नाही म्हणा
>>>>
जर चेण्डू बॅटवर चांगला येत असेल तर त्यांना फरक पडू नये. . पण स्लो ॲण्ड स्लगिश असेल तर मात्र हैदराबाद धक्का देण्याचे चान्सेस वाढतील.
त्यातही पहिल्या डावात पिच असा असेल आणि नंतर दव पडून सुधारला तर मग फारच अवघड. याऊलट दिल्लीला त्या प्रतिकूल परीस्थितीतही पुरेसा स्कोअर बोर्डावर टाकून त्या प्रेशरखाली हरवू शकतात.
असो.हे पुढचे झाले
सध्या दिल्ली टेंशनमध्ये असेल. त्यांना बेंगलोर कधीही परवडली असती. आता त्यांना वेळीच खेळ ऊंचवावा लागणार. धवनचे खेळणे फार म्हणजे फार महत्वाचे ठरणार. नुसते ओपनिंग नाही तर स्पेशली राशीद खानचा किमान पहिला स्पेल काढायची जबाबदारीही त्यानेच घ्यायला हवी.
फ्री हिटवर एकाच पद्धातीनं बाद
फ्री हिटवर एकाच पद्धातीनं बाद होता येतं, ते सुद्धा आज मोईन अली ने करून दाखवलं. ब्रेन-फ्रीझ चा अत्त्युत्तम नमुना होता तो.
विल्यमसन असेपर्यंत हैद्राबाद ला भिती नव्हतीच आणी त्याची बॅटींगच निर्णायक ठरली. माझ्या मते विल्यमसन हा हैद्राबादचा वॉर्नरपेक्षा जास्त महत्वाचा खेळाडू आहे (खरं तर कप्तानपदी सुद्धा तोच अधिक योग्य आहे)
बॉलिंगमधला नवखेपणा नडला आरसीबी ला पण तरी इतक्या कमी स्कोअरमधे चांगली लढत दिली त्यांनी. मॉरिस असता तर कदाचित आणखीन चुरशीची झाली असती मॅच.
फ्री हिटवर एकाच पद्धातीनं बाद
फ्री हिटवर एकाच पद्धातीनं बाद होता येतं, ते सुद्धा आज मोईन अली ने करून दाखवलं. ब्रेन-फ्रीझ चा अत्त्युत्तम नमुना होता तो. >> अनुमोदन. फ्री हिट बॉल वर मोठी शॉट बसली नाही तरी रन आलेच पाहिजे ह्या दडपणातून मोईन अली रन पॉसिबल नसतांनाही धावला असे वाटले. कारण रनिंगचा कॉल मोईनचा होता.
खरंतर नेहमी असं वाटतं बंगलोर
खरंतर नेहमी असं वाटतं बंगलोर चे खेळाडू कोहली च्या दबावाखाली खेळताहेत. तो कधी काय करेल याचा भरवसा नाही कोणाला काढेल, कोणाला घेणार, कोण कुठे खेळणार. महत्वाच्या मॅचेस मध्ये काय करु नी काय नको या नादात चुकीचे निर्णय घेतले जातात विराट कडुन. वर्ल्डकप सेमी मध्ये पण असंच केलं कालच्या सारखं.
फक्त आणि फक्त मी च जिंकणं हा अट्टाहास नडतो.
कोली कॅप्टन असेपर्यंत आपण
कोली कॅप्टन असेपर्यंत आपण कधीच वर्ल्डकप जिंकणार नाही.
आतातायी आक्रस्ताळे पणा भोवला
आतातायी आक्रस्ताळे पणा भोवला कोहलीला.
लहान चिल्ल्या पिल्यांना बाद केले तरी उगाचच हावभावांचे प्रदर्शन. भुवीकडून त्याने शांतपणा शिकायला हवा. कितीही उच्च दर्जाच्या फलंदाजाला बाद केले तरी ओरडणे नाचणे अंगविक्षेप कधी त्याने केले नाही.
त्याच्या ह्याच गोष्टींना प्रतिस्पर्ध्यांनी हेरले. संदीप शर्माने प्रत्येक वेळी बकरा बनविले तरी आघाडीला येऊन त्याच्यावर हल्ला करायचा ह्या विचाराने तो मुद्दाम आला असवा असे वाटले पण बदल म्हणून होल्डरचा बकरा बनला.
कोहलीने विल्यमसनला आदर्श
कोहलीने विल्यमसनला आदर्श ठेवला पाहिजे वर्तणुकीच्या बाबत. भारताच्या टीमचे जो प्रोब्लेम आहे तोच बंगलोरचा. कुणालाही सेंटल होउनच द्यायच नाही.
आता दिल्ली हैदराबाद मधे मला वाटते दिल्ली जिंकेल.
तिन्ही संघ समतोल आहेत पण समबल नाहीत. मुंबई सर्वोत्तम.
आज कोण बाश्शा जिंकेल की नवाब?
आज कोण बाश्शा जिंकेल की नवाब?
अरे कुणी बघत नाहिये का मॅच?
अरे कुणी बघत नाहिये का मॅच?
स्टॉयनिसला ओपनिंगला पाठवून डीसी ची चांगली मूव्ह!
१४व्या ओव्हरला फक्त २ विकेट्स आणि १२५-१३० च्या आसपास स्कोअर.... २०० करतील का?
या व्यक्तीने आयपील मध्ये काय
या व्यक्तीने आयपील मध्ये काय होईल हे 27 जुलै मधेच लिहून ठेवले आहे. आतापर्यंत सगळे बरोबर येत आहे.. पुढे बघूया..
https://twitter.com/R3Mitul/status/1287794625831489539?s=08
आत्ता बघतीये 31 बाॅल 61
आत्ता बघतोये 31 बाॅल 61 .possible not probable.
5 बाॅल 21 मॅच संपली.
5 बाॅल 21 मॅच संपली.
मुंबई दिल्ली.. दोन सर्वोत्तम टीम फायनल मधे.
विल्यम्सन एकटाच लढला..
विल्यम्सन एकटाच लढला..
आता MIDC मध्ये फायनल
आता MIDC मध्ये फायनल
*फलंदाजीत एसआरएच वाॅरनरवर
*फलंदाजीत एसआरएच वाॅरनरवर खूपच अवलंबून असते,चॅम्पियन होण्यात ही मोठी कसर ठरूं शकते* - हें आजही दिसलं व निर्णायक ठरलं !
विल्यमसनला मानलंच पण वाॅरनरबद्दलचा आदरही आज दुणावला. दिल्लीच्या फलंदाजीत हैदराबादचया अनेक misfields झाल्या, कांहीं झेल सुटले त्यावेळी तो नाराज होवूनही वैतागून निरुत्साही वातावरण निर्माण करत नव्हता. त्याच्या संघाची फलंदाजी ढेपाळत असतानाही त्याने खिलाडूपणाने व हंसत तें स्विकारलेलं स्पष्ट दिसत होतं. खूप भावलं त्याचं हें वागणं !
अनुमोदन भाऊ.
अनुमोदन भाऊ.
पण कोहली काही सुधारणार नाही... त्याच्या खेळासाठी त्याचे वागणे जस्टीफाएबल आहे म्हणत त्याला कायमचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट देऊन टाकलं आहे क्रिकेटिंग कम्युनिटीने त्यामुळे बाकीचे त्याचा अब्यूज सहन करत राहतात.
त्याला एकदा वागण्यावरून वॉर्नर, स्मिथ सारखा तडाखा मिळालेला बघायला आवडेल.
बाकी दिल्लीची स्टॉईनिसला घेऊन ओपन करण्याची मुव भलतीच यशस्वी ठरली. तरीही अय्यर आणि पंतचे अपयश दुर्लक्ष करणे अवघड आहे.
बोल्ट असणार आहे का फायनल मध्ये?.... असल्यास दिल्लीने मुंबईच्या ओपनिंग अॅटॅकवर काही तोडगा काढला असेल अशी आशा करूयात.
Pages