Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल मात्र मजा आली. दोघे संघ
काल मात्र मजा आली. दोघे संघ अगदी सिरीअसली खेळले. शेवट माझ्या ईच्छा आणि अपेक्षेप्रमाणेच झाला. सामना शेवटपर्यंत गेला आणि दोघे क्वालिफाय झाले.
बेंगलोर हरली कारण ते पहिली फलंदाजी करताना सावध खेळले. पॉवरप्ले नंतर विकेट हातात असूनही कोहली, पडीकल वा ईतर कोणी येऊन तुटून पडले नाही. अन्यथा १६५-१७० सहज शक्य होते. पण त्यांना भिती होती की त्या नादात १४० ला अडकलो तर उगाच १७ ओवरमध्ये चेस व्हायचा. दिल्लीनेही फुकटच्या धावा वाटल्या नाहीत आणि १५० टारगेटला दिल्लीचा विजय जवळपास पक्का झाला.
मुंबई आज हैदराबादला हरवायलाच
मुंबई आज हैदराबादला हरवायलाच बघेन.
कारण पुढे मागे गाठ पडली तर मुंबईलाही कलकत्ता सोपी टीम आहे, ट्रॅक रेकॉर्ड कलत्यासमोर खूप चांगला आह, त्यामुळे हैदराबाद आणि राशीद खानचा सामना करण्याऐवजी तीच पहिली पसंती राहतील.
बाकी बेंगलोर आणि दिल्लीपेक्षाही मुंबई फार पुढे वाटते कागदावर. त्यामुळे मला ८० टक्के हि आयपीएल मुंबईचीच वाटत आहे.
काल पृथ्वीला सिराजने मस्त
काल पृथ्वीला सिराजने मस्त काढला. बाळाला अजून शिकायचय. >>> टोटली! हायलाइट्स मधे तो सेट अप केवळ त्या बॉल्स ना फोर मारले होते म्हणून दिसला
>>>
अगदी
आणि तो चेंडूही नेमका क्लास आणि अगदी पुस्तकी पडला. पर्रफेकट लेंथ लाईन टॉप ऑफ द ऑफ स्टंप!
ज्या खेळाडूचा फॉर्म नसतो त्यासमोर चांगले चेंडू पडताना आपण बरेचदा बघतो. कारण त्याच्यासमोर बॉलरचा आत्मविश्वास जास्त असतो.
कालचा त्याचा रसेल चा सेट-अप
कालचा त्याचा रसेल चा सेट-अप पण मस्त होता. बॉलगणिक, तो त्याच्यापासून टप्पा लांब आणी खोल (वाईड & फुलर) ठेवत गेला आणी शेवटी रसेल जस्ट वॉक्ड इन द ट्रॅप.
>>>>>>
हे सुद्धा छान होते. ईक्बालची आठवण झाली तेव्हा
पण तरीही त्याला वगळले आणि काल
पण तरीही त्याला वगळले आणि काल पुन्हा घेतले कारण जिंकायचा सामना तर कालचा होता Happy>हे मात्र बरोबर आहे तुमचे. पण जे सामने नंबरवर परिणाम करणार नाहीत हे माहित आहे तिथे कोच वेगवेगळी कॉम्बीनेशन करून बघत असेल तर त्यात चुक काय आहे. त्याच्या दृष्टीने ते बरोबरच आहे. शेवटी टॉप टू मधे आल्याशी मतलब.
बाकी बेंगलोर आणि
बाकी बेंगलोर आणि दिल्लीपेक्षाही मुंबई फार पुढे वाटते कागदावर. त्यामुळे मला ८० टक्के हि आयपीएल मुंबईचीच वाटत आहे.>> हेही बरोबर. म्हणजे शेवटी संघाचे बळ आणि मैदानातला परफॉर्मन्स काउंटस. तेच तर म्हणतोय आम्ही सगळे. क्रिकेट मधे ग्लोरियस अनसर्टनिटीज इनहरंट आहेतच. तीच मजा. त्याला फिक्सिंग म्हणणे रसभंग करणारे ठरते. येवढेच.
*कोच वेगवेगळी कॉम्बीनेशन करून
*कोच वेगवेगळी कॉम्बीनेशन करून बघत असेल तर त्यात चुक काय आहे. * खरंय. क्रिकेटच नाहीं तर इतर खेळांतील स्पर्धेतही ( विश्वचषक सुद्धा) अंतिम टप्प्यात बाद फेरीत आपल्याला कुणा विरूद्ध खेळणं अधिक सोपं जाईल याचा विचार करून गोल सरासरी, पाॅईंटस , रनरेट, इ.इ. गणित मांडून संघ निवड करणं व खेळ ॲडजस्ट करणं सर्रास होतंच. व, मुख्य म्हणजे, तें खेळाच्या डांवपेंचाच भाग म्हणून सर्व मान्यही असतं !
पण जे सामने नंबरवर परिणाम
पण जे सामने नंबरवर परिणाम करणार नाहीत हे माहित आहे तिथे कोच वेगवेगळी कॉम्बीनेशन करून बघत असेल तर त्यात चुक काय आहे.
>>>>
हो पण तशी स्थिती होती का दिल्लीची ? पहिले दोनात सोडा चाराच्याही बाहेर जाईल अशी स्थिती अखेरच्या सामन्यापर्यंत होती.
तरीही तसे समजून प्रयोग करत असतील तर याचा अर्थ आपली सीट पक्कीच आहे हे त्यांना आधीच माहीत होते असा अर्थ झाला ना
माझी फक्त भारतीय खेळाडूंची
माझी फक्त भारतीय खेळाडूंची ALL IPL 2020 टीम
धवन
अगरवाल
राहुल (wk)
सूर्यकुमार
श्रेयस
हार्दिक
जडेजा
सुन्दर
शमी
चहल
बुमराह
दोनच पेसर्स?
दोनच पेसर्स?
फास्ट पीच वर स्पीनर्सना सॉलिड सिरिअस फटके पडू शकतात. पावर प्ले आणि डेथ ओवर मध्ये मग स्पीनर लावणार की कसे? कारण अधे मध्ये बुमरा आणि शमीला एखादी ओवर सुद्धा देण्याची सोय तुम्ही ठेवली नाही. पुन्हा कॅप्टन कोण असणार? राहुल की श्रेयस?
बाकी ठीक आहे पण जडेजा किंवा सुंदर पैकी एकाला बसवून नटराजन, अर्शदीप, त्यागी असे घ्यावे लागतील वाटते. श्रेयस ५ वर काहीच कामाचा नाही कारण त्याला जास्त वेळ लागतो ईनिंग बिल्ड करायला. वरती धवन, अगरवाल, राहूल असतील तर सूर्यकुमार ऐवजी कोहली १०० पैकी १०० दिवशी भन्नाट परफॉर्म करेल. ईशान किशन सूर्यकुमार पेक्शा जास्त ईफेक्टिव एनी पोझिशन एनी सिच्युएशन असा फ्लेक्सिबल प्लेअर आहे असे मला वाटते.
माझी टीम अशी असेल
धवन
राहुल (wk)
कोहली
अय्यर/सुर्यकुमार/सॅमसन
किशन/हुडा (सहावा बोलिंग ऑप्शन पाहिजे असल्यास)
हार्दिक
जडेजा/तेवातिया/सुंदर
नटराजन/सैनी/अर्शदीप
शमी
बुमरा
चहल/चक्रवर्ती
केकेआर मुबैविरुद्ध खेळू दे
केकेआर मुबैविरुद्ध खेळू दे नाहीतर नको खेळू दे. मुंबई त्यांच्या पदरी नेहमी निराशाच देते.
त्याला फिक्सिंग म्हणणे रसभंग
त्याला फिक्सिंग म्हणणे रसभंग करणारे ठरते. येवढेच. >> राहवले नाही ना तुम्हालाही
नटराजन/सैनी/अर्शदीप
शमी
बुमरा >> तीन हवेत नि दीपक चहरचा उल्लेख पण नाही ?
दोनच पेसर्स?
दोनच पेसर्स?
फास्ट पीच वर स्पीनर्सना सॉलिड सिरिअस फटके पडू शकतात. पावर प्ले आणि डेथ ओवर मध्ये मग स्पीनर लावणार की कसे? कारण अधे मध्ये बुमरा आणि शमीला एखादी ओवर सुद्धा देण्याची सोय तुम्ही ठेवली नाही. पुन्हा कॅप्टन कोण असणार? राहुल की श्रेयस?
बाकी ठीक आहे पण जडेजा किंवा सुंदर पैकी एकाला बसवून नटराजन, अर्शदीप, त्यागी असे घ्यावे लागतील वाटते. श्रेयस ५ वर काहीच कामाचा नाही कारण त्याला जास्त वेळ लागतो ईनिंग बिल्ड करायला. वरती धवन, अगरवाल, राहूल असतील तर सूर्यकुमार ऐवजी कोहली १०० पैकी १०० दिवशी भन्नाट परफॉर्म करेल. ईशान किशन सूर्यकुमार पेक्शा जास्त ईफेक्टिव एनी पोझिशन एनी सिच्युएशन असा फ्लेक्सिबल प्लेअर आहे असे मला वाटते.
माझी टीम अशी असेल
धवन
राहुल (wk)
कोहली
अय्यर/सुर्यकुमार/सॅमसन
किशन/हुडा (सहावा बोलिंग ऑप्शन पाहिजे असल्यास)
हार्दिक
जडेजा/तेवातिया/सुंदर
नटराजन/सैनी/अर्शदीप
शमी
बुमरा
चहल/चक्रवर्ती
हायझेनबर्ग, चांगले प्रश्न
१. हार्दिक जरूर पडेल तशी बोलिन्ग करेल असे धरले आहे. तो जखमी आहे हे माहिती आहे.
२. सुंदर पॉवर प्ले मधे २ ३ ओव्हर्स टाकू शकेल.
३. श्रेयस कॅप्टन
४. तेवाटियाचा विचार केला पण सुंदरला राईट आर्म स्पिन आणि लेफ्ट हँड बॅट म्हणून प्राधान्य
५. कोहलीला वगळले हा वैयक्तिक आवडीचा मामला आहे. Nothing to do with his cricket skills or performance
६. सैनी हा पिच पेसला फेवरेबल असेल तर खेळेल सुंदरच्या जागी.
७. इशान किशनला अगरवाल ऐवजी खेळवता येईल. फ्लोटर म्हणून तो जास्त चांगला आहे अगरवालपेक्षा.
दीपक चहार? नाय बा..त्याच्या
दीपक चहार? नाय बा..त्याच्या आधी संदीप शर्मा लाईन मध्ये आहे.
सैनी खरं पर्फॉर्मन्स बेसिसवर डीझर्व करत नाही पण मला त्याचा नव्या बॉलनी मिळणारी स्पीड आणि मुवमेंट किलिंग वाटते. तशी शमी सोडून कोणाकडेच नाही.
शुक्रवारी जेव्हा राजस्थानने पंजाबला हरवले होते तेव्हाच हैद्राबाद प्ले ऑफ मधे येणार हे फिक्स झाले होते. बँगलोर/दिल्ली की कोलकाता ह्यपैकी दोन कोण एवढेच बघणे बाकी होते.
शुक्रवारी जेव्हा राजस्थानने
शुक्रवारी जेव्हा राजस्थानने पंजाबला हरवले होते तेव्हाच हैद्राबाद प्ले ऑफ मधे येणार हे फिक्स झाले होते. बँगलोर/दिल्ली की कोलकाता ह्यपैकी दोन कोण एवढेच बघणे बाकी होते.
>>
आज मुंबै ने हैदराबादला हरवले असते तर त्यंचे १२ पॉइन्ट्सच राहिले असते आणि के के आर आले असते प्ले ऑफला.
हैदराबाद पॉइन्ट्स वर मग आउट होते.
व्हायला तर काहीही होऊ शकले
व्हायला तर काहीही होऊ शकले असते.... ऋन्मेष म्हणतो तसे शाहरूखने केलेले फिक्सिंग ऊघडे झाल्याने कोलकाता स्पर्धेतून बाद झाल्याने आणि त्यांचे पॉईंट्स अपोनंट्सला दिल्याने पंजाब व राजस्थान क्वालिफाय झाले असते.
जोक्स अपार्ट... हैद्राबाद मागच्या दोन-तीन सामन्यांपासून भन्नाट खेळत होते... आणि ती टीम कोअर मध्ये सॉलिड आहे...खासकरून बोलिंग.
त्यांना फक्त चांगल्या ओपनिंगची गाज होती जी साहा ने दिली.
बाकी कोलकाता, बंगलोर, दिल्ली काही झाले तरी डळमळीत कोअर वाल्या टीम्स आहे त्यात त्यांच्या कॅप्टन्सी सॉलिड नाहीत (कोहली धरून).
ह्याऊलट वॉर्नर आणि बाकी थिंक टँक कसलेला आहे..क्रंच मोमेंट्स मध्ये परफॉर्म करून ते प्लेऑफ मध्ये येणारच होते.
मी ३० तारखेलाच ईथे लिहिले होते जेव्हा मुंबई सोडून एकही टीम क्वालिफाय करेलच म्हणून सांगता येत नव्हते
Now is the best time to keep
Now is the best time to keep your fingers crossed, .....or, keep Burnol handy !
तरीपण , दिल है जो मानताही नहीं..... मुंबै !!!
"दिल है जो मानताही नहीं.....
"दिल है जो मानताही नहीं..... मुंबै !!!" - +१
मुंबई इंडियन्स इट इज !!!!
मुंबई - दिल्ली --------------
मुंबई - दिल्ली --------------------- मुंबई
बेंगलोर - हैदराबाद --------------- बेंगलोर
दिल्ली - बेंगलोर ------------------ दिल्ली
मुंबई - दिल्ली -------------------- दिल्ली
आयपीएल ट्रॉफी - दिल्ली
फिक्सिंग वगैरे नाही - सिक्सड् सेन्स आहे
खामोश! मुंबईच फक्त. बाकी
खामोश! मुंबईच फक्त. बाकी सर्वांना मास्क मधला जिम कॅरे म्हणतो तसे:
"You are good kid, real good. But as long as I am around you will always be the second best!"
अआइ
*खामोश! मुंबईच फक्त. * -
-
लग्नाच्या वाढदिवसाला कधीं लग्नातला सूट घातला नाहीत पण आयपीएल असलं कीं मात्र बरा हाच ड्रेस घालून गेलीं 13 वर्ष मिरवताय !!
गुरूवारी ओपनिंग पेअरचा
गुरूवारी ओपनिंग पेअरचा प्रॉब्लेम दिल्ली कसा सोडवते त्यावर त्यांचे जिंकणे हारणे ठरणार आहे.
लीग स्टेजच्या पहिल्या हाफ मध्ये दिल्लीने मोठे स्कोअर्स ऊभे केले ते फक्त फास्ट पीचेस वर धवन आणि शॉ ने मोठ्या (कमीतकमी ५०) पार्टनर्शिप दिल्यानंतरच. जसे पीचेस स्लो होत गेली आणि शॉ चे फुटवर्क ऑर लॅक ऑफ ईट कुचकामी ठरले तसे दिल्ली ची बॅटिंग अतिशय वीक दिसू लागली. नव्या बॉलवर खेळायला अय्यर आणि कंपनी चाचपडू लागली. आणि परिणामी सेकंड हाफ मध्ये त्यांना १५० गाठतांना हफिंग फफिंग होऊ लागले.
गुरूवारी पुन्हा दुबईचे पीच असणार आहे आणि समोर पुन्हा बोल्ट असणार आहे. ईथेच त्यांचे चार दिवसंपूर्वी मुंबईकडूनच ११० मध्ये पानिपत झाले होते. मागच्यमॅच मध्ये सिराजच्या मुव होणार्या बॉलवर शॉ पुन्हा चकला पण रहाणेने एक बाजू लाऊन धरल्याने अय्यर आणि बाकी लाईनअप पुन्हा एक्स्पोज झाली नाही. अय्यरने पहिल्या ८ ओवरमध्ये बॅटिंगला न आल्यासच बरे आहे. पण ह्या स्ट्रॅटेजीने त्यांना मोठा स्कोर ऊभारता येणार नाही.
शॉला ओपनिंगला रिप्लेस करू शकेल असा दुसरा बॅट्समनही नाही... त्यामुळे पाँटिगने शॉला कान पिरगाळून पहिल्या दोन-तीन ओवर्स फक्त स्ट्राईक रोटेट करण्यावरच भर देण्यास सुनावणे हा एक ऑप्शन आहे. किंवा रहाणे हे जमवू शकत असल्यास मग त्याला ओपनिंग ला पाठवून खाली अॅलेक्स कॅरीला आणता येईल. हेट्मायर पेक्शा कॅरी सेफर बेट आहे.
प्लेऑफ्स आहेत, त्या दिवशी जो
प्लेऑफ्स आहेत, त्या दिवशी जो संघ चांगला खेळेल नि मह्त्वाचे म्हणजे जो टोस जिंकेल तो सामना जिंकेल. बाकी फॉर्म वगैरे सगळे फिक्सिंग आहे.
अंबानींच्या संघाने ठरवून
अंबानींच्या संघाने ठरवून शारुकच्या संघाला बाहेर केलेले वाटले!
भाऊ, मुंबई - दिल्ली कुणीही जिंकले तरी निळूभाऊ जिंकणार
माझा पुढील सामन्यांत
*मुंबई - दिल्ली कुणीही जिंकले तरी निळूभाऊ जिंकणार * - मुंबैचा ओरिजिनल आहे, दिल्लीचा तिथल्या प्रदूषणामुळे झालाय !
माझा पुढील सामन्यांत फलंदाजीसाठीचा बेसिक प्लॅन-
विरूद्ध संघातील सर्वात भेदक दोन गोलंदाजांना खेळताना सावधपणे सरासरी धांवगती 5-6 ठेवावी ( एकूण 40ते 50 धांवा ) . बाकीच्या 12 षटकात हीच सरासरी 8+ ठेवावी ( एकूण 100 धांवा). सेट झालेल्या व लय सांपडलेल्या फलंदाजानी मात्र कांहींशी स्वैर फटकेबाजी करत 30-35 धांवांची यांत भर टाकावी. संथ होत चाललेल्या विकेटसवर 170- 180 चांगला स्कोअर समजायला हरकत नसावी.
अनपेक्षितपणे 2-3 विकेटस लवकर गेल्या तरी जिद्दीने या प्लॅनशी अढळ रहावे. विश्वास जागवला तर तळाचे फलंदाजही धांवांची कसर भरून काढतात ( अक्षर पटेलचे शेवटच्या षटकातील 3 षटकार !). 20 षटकांच्या सामन्यात विकेट राखून ठेवण्याला अर्थ नसतोच.
धांवसंखयेचा पाठलाग करतानाही, लक्ष्य काय आह हें पाहून या प्लॅनमधे आवश्यक ते बदल करावे.
( टीप - वयोमानानुसार मीं आतां कोचिंगच्या ऑफर स्विकारणं बंद केलं आहे !
)
त्याला फिक्सिंग म्हणणे रसभंग
त्याला फिक्सिंग म्हणणे रसभंग करणारे ठरते. येवढेच. >> राहवले नाही ना तुम्हालाही Happy>>
वयोमानानुसार मीं आतां
वयोमानानुसार मीं आतां कोचिंगच्या ऑफर स्विकारणं बंद केलं आहे >>
वयोमानानुसार मीं आतां
वयोमानानुसार मीं आतां कोचिंगच्या ऑफर स्विकारणं बंद केलं आहे ! >>>
असामीजी, फारएणडजी व इतर कुणी
असामीजी, फारएणडजी व इतर कुणी ,
वयोमानानुसार मीं आतां इथे येणंही बंद करणार, अशी आशा मात्र यामुळे कृपया मनात निर्माण करूं देवूं नका !
आजचा सामना रंगतदार व्हावा अशी सार्थ अपेक्षा आहे. Happy viewing !!
अशी आशा मात्र यामुळे कृपया
अशी आशा मात्र यामुळे कृपया मनात निर्माण करूं देवूं नका ! Wink>>
भाऊ, असे तुम्हीही मनात आणू नका!
आजच्या सामन्याची रंगत ही फलंदाजांच्या त्यावेळच्या फटके निवडीवर आहे. मुंबैची जलदगती गोलंदाजी थोडी सरस आहे बंगळुरुपेक्षा तर बंगळुरुचे एकेरी दुहेरी धावा पळणे एवढाच काय तो फरक..
Pages