आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कोहली व रवी शास्त्री यांनी त्याचा पत्ता कट केला असे तर्क-वितर्क सोमिवर दिसत आहेत.>> असे ते करणार नाहीत. खरच तो दुखापत ग्रस्त असावा.

अजिंक्य रहाणेला टेस्ट मधे घेतल ते बर झाल. >> रहाणे अनंत काळापासून कायम टेस्ट टीममध्ये आहे. त्याला कधी ड्रॉप केल्याचे आठवत नाही.
व्हाईस कॅप्टन होऊनही अनेक वर्षे झाली आता.

माझ्या माहितीप्रमाणे रोहित ईंजर्ड नाही पण काही कारणाने फिटनेस टेस्ट पास करू शकत नाहीये.
(काहीतरी टेंपररी एलमेंट)

हाणे अनंत काळापासून कायम टेस्ट टीममध्ये आहे. त्याला कधी ड्रॉप केल्याचे आठवत नाही.>> त्याला मधन मधन ड्रॉप करतात. म्हणूनच तो अजून स्थिर झाला नाही.

ओह ओके.. मला समहाऊ त्याला ड्रॉप केलेल्या कुठल्या ओवरसीज टेस्ट सिरीज आठवत नाहीयेत.. बांग्ला विरूद्धच्या वगैरे वन ऑफ टेस्ट मध्ये केलेले असल्यास कल्पना नाही.
स्मिथ, कमिन्स टेस्ट साठी कसे गिअर्स बदलतात आणि महत्वाचे म्हणजे लाबुशेन आणि लिऑन होम ग्राऊंडवर आपापले डिपार्टमेंट्स कसे डॉमिनेट करतात ते बघायला मी फार ऊत्सुक आहे.

मला समहाऊ लिमिटेड ओवर्सचे शेड्यूल टेस्टच्या आधी ठेवणे आवडत नाही. ह्यावेळी मी बॉक्सिंग डे टेस्ट साग्रसंगीत बघायला बसणार आहे Happy

माझी टेस्ट साठी प्लेईंग ११

राहुल, मयंक, पुजारा, कोहली, रहाणे, विहारी, पंत, जडेजा(अश्विन), शमी, बुमरा, सैनी

रहाणेला एखादाच वेळी ड्रॉप केले आहे. ते देखील मायदेशात. स्पिनरसमोर फार फसत होता.
मायदेशात तो फ्लॉप जाऊन आणि त्यापेक्षा ईतर कोणीही फलंदाज मायदेशात जास्त धावा करेल असे असूनही त्याला खेळवतात आणि संघासोबत ठेवतात कारण बाहेर जायची वेळ येते तेव्हा त्याला जरा जास्त महत्व येते.
अर्थात गेले काही दौरे बाहेरही त्याने कमीच उजेड पाडलाय. हा दौराही असाच गेला तर त्याचे अवघड होऊ शकते. एक गोष्ट त्यातल्या त्यात त्याच्या पथ्यावर आहे की नवीन ताकदीच्या पोरांना कसोटीत जास्त रस नसावा.

रोहित आपीएल् खेळणार दिसतेय. सराव करीत होता म्हणे फलंदाजीचा.
>>>
अंबानी साहेबांनी पैसा खर्चा केलाय, छोटीमोठी दुखापत अंगावर काढून खेळू शकतो.
गावस्करने या विरोधात आवाज उठवलाय हलकासा. नेशन वॉन्टस टू नो म्हणत.

तरी कानावर आलेय की पुन्हा फिटनेस चाचणी होईल आणि त्यात ठरवले जाईल न्यायचे की नाही.

आज वॉर्नर आणी साहा वेगळ्याच गियरमधे खेळले. हैद्राबाद २२५ च्या मार्गावर आहे. तसं झालं तर दिल्लीची कसोटी लागेल असं वाटतंय. कितीही दव पडलं, आणी लहान बाऊंड्रीज असलया तरी स्कोअरबोर्ड चं प्रेशर येतंच.

*आज वॉर्नर आणी साहा वेगळ्याच गियरमधे खेळले.* +1 !
आतां रहाणे गिअर कसा बदलतो हें बघणं खूप इंटरेसटींग ठरेल !

ओह ओके.. मला समहाऊ त्याला ड्रॉप केलेल्या कुठल्या ओवरसीज टेस्ट सिरीज आठवत नाहीयेत.. >> साउथ आफ्रिका.

अपेक्षेप्रमाणे एकतर्फी झाली मॅच. रशिद खान जबरदस्त बॉलर आहे हे पूर्णपणे मान्य करूनही, भारतीय फलंदाज स्पिन बॉलिंग खेळताना अडखळतात, गूगली ओळखत नाहीत, बॉल हातातून रीड करत नाहीत हे बघताना यातना होतात. कालय तस्मै नमः म्हणायचं झालं! Uhoh

"कुठल्या सालची अफ्रिका सिरीज ?" - सुरूवातीला रोहित शर्मा ला खेळवून रहाणे ला बसवलं होतं आणी शेवटच्या टेस्ट ला आणलं. ९५ रन्स केल्या होत्या. बुमराह ची डेब्यू सिरीज. साल लक्षात नाही. पण ह्या गोष्टी अपवादात्मक.

आता रहाणे साठी ही सिरीज महत्वाची आहे असं वाटतंय. तो फ्लो मधे असताना त्याची बॅटींग बघायला मजा येते.

भारतीय फलंदाज स्पिन बॉलिंग खेळताना अडखळतात, > > अगदी सगळे नाही, बव्हंशी जे फारसे डोमेस्टिक क्रिकेट न खेळून आले आहेत ते भयंकर अडखळतात. ज्यांनी डोमेस्टिक मधे रतिब टाकलाय ते फूटवर्क वापरत खेळतात.

बरोबर फेफ,
रोहित शर्मावर ऊठलेल्या टीकेची झोड मुळे ही सिरीज गाजलेली. रहाणे एखाद दुसर्‍या मॅचच्या प्लेईंग ११ मध्ये नसेल पण तो सातत्याने स्क्वाड होताच होता. त्याला कुठल्या टूरवर नेले नाही असे मला तरी आठवत नाही.

आता रहाणे साठी ही सिरीज महत्वाची आहे असं वाटतंय. तो फ्लो मधे असताना त्याची बॅटींग बघायला मजा येते. >> त्याची स्ट्रेग्थ म्हणजे त्याची डिफेन्सिव फुटवर्क टेक्निक सॉलिड गंडलेली दिसली अलिकडच्या काळात. बॉल नवा असतांना तर तो खूपच वल्नरेबल असल्यासारखा आणि विचित्र खेळतो. त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप कमी झाल्यासारखा वाटतो आणि अ‍ॅट टाईम्स ही लूक्स कनफ्यूज्ड. पूर्वी काऊंटी क्रिकेट मध्ये जाऊन वगैरे टेक्निक सुधारून येत असत पण आता आयपील मुळे तो ट्रेंड बंद झाला की काय असे वाटते.

*बॉल नवा असतांना तर तो खूपच वल्नरेबल असल्यासारखा आणि विचित्र खेळतो* - रहाणेने पुजारासारखं फक्त कसोटी क्रिकेटशीच एकनिष्ठ रहाणं हितावह ठरलं असतं, असं मला नेहमीव वाटतं आलंय.

रहाणेने पुजारासारखं फक्त कसोटी क्रिकेटशीच एकनिष्ठ रहाणं हितावह ठरलं असतं, असं मला नेहमीव वाटतं आलंय
>>
त्यांच्या जोडीला विहारी पण...

आणि रोहित, पण्ड्या, राहुलनी लिमिटेड ओव्हर क्रिकेटशी...
खूप संधी दिल्या
शॉ आणि मयंक ओपनिंग पेअर सेट होत असताना देशातल्या सामन्यात रोहितला खेळवायचंच या आट्टाहासापायि ओपनिंग करवलं, पण थोड्याच महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात मात्र नवख्या विहारीला ओपनिंगला पाठवलं होतं (रोहित फेल जायची खात्री असावी)

श्रेयस अय्यर ला टेस्टला ट्राय करायला हवं होतं आणि राहुलला व्हाइस कॅप्टन बनवायला नको होतं...
(राहुल फक्त याच आयपीएलमधे पंजाबचा कॅप्टन झालाय, पण अय्यर गेल्या सीझनपासून दिल्लीचा कॅप्टन आहे, आणि चांगली लीडरशिप दाखवली आहे...)

तो सातत्याने स्क्वाड होताच होता. त्याला कुठल्या टूरवर नेले नाही असे मला तरी आठवत नाही.>> बरोबर. पण त्याला मधेच कारण नसताना ड्रॉप करतात. कंसिस्टन्टली खेळवत नाहीत. म्हणून मला शंका होती की आता ड्रॉप करतात की काय.

अचानक
पॉईण्टस टेबलमधील खालचे संघ जिंकू लागलेत आणि वरचे हरू लागलेत...
देव स्पर्धा रंगतदार करत आहे
कुठेही ड्रीम ईलेव्हन वगैरे टीम बनवताना वा पैसे लावताना हे लक्षात ठेवा...

भारतीय टीम मधे फक्त चेच खेळाडू आहेत का ? मला तरी कोहली, चहल , सुंदर, सैनी मधे काही कमी दिसत नाही किंवा असे इतर कोणी दिसत नाही जे त्यांच्या जागी हवेच होते . सिराज चा रणजी नि अ टीम मधला फॉर्म चांगला असल्यामूळे तो सिलेक्ट होणे समजू शकते. राहता राहिला तर यादव, पण तो आधीच बॅकप म्हणून भारतीय संघामधे होताच नि शर्मा नाही म्हटल्यावर तो तिसरा अनुभवी खेळाडू म्हणून असणे साहजीक नाही का ? त्यागी, नागरकोटी किंवा मावी अजून अपरिपक्व आहेत , त्यांना ह्या दौर्‍यावरच्या ग्राईडं वर का न्या ?

यादव ला न्यायला हवे होते म्हणजे इतर निवड झालेले अपात्र आहेत असा अर्थ का घेताय ?

भा - गणित काय म्हणते तुमचे? एक चेन्नई सोडले तर इतर सर्वांना अजूनही "टेक्निकल" संधी आहे असे वाटते १२ गेम्स झाल्यावर. मुंबई बरीचशी सर्टन आहे पण १००% नाही अजूनही. त्यांचा रन रेट जबरी आहे त्यामुळे जवळजवळ शुअर आहे.

मला अजून ड्रीम११वाल्यांनी 'तुम्हाला गणित काय सांगितलं म्हणजे फिक्स्ड आहे असं वाटणार नाही', ते सांगितलं नाहीये. तो मेसेज आला, की लगेच इकडे लिहितो. Proud

मुंबई पहिल्या दोघांतही फिक्स झालीय अतिप्रचंड रनरेटमुळे भले दोन्ही सामने हरत १६ लाच थांबली तरी..
कारण दिल्ली बेंगलोर आपापसात सामना आहे. म्हणजे एक जो हरणार तो पॉईंटमध्ये मुंबईच्या पुढे जाऊ शकणार नाही.

Pages