Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>आजच्या सामन्याची रंगत ही
>>आजच्या सामन्याची रंगत ही फलंदाजांच्या त्यावेळच्या फटके निवडीवर आहे. मुंबैची जलदगती गोलंदाजी थोडी सरस आहे बंगळुरुपेक्षा तर बंगळुरुचे एकेरी दुहेरी धावा पळणे एवढाच काय तो फरक..
आज मुंबई विरूध्द दिल्ली मॅच आहे.... बंगळूरु नाही
दिल बोले दिल्ली और दिमाग बोले
दिल बोले दिल्ली और दिमाग बोले मुंबई
मुंबई विरूध्द दिल्ली मॅच आहे.
मुंबई विरूध्द दिल्ली मॅच आहे.... बंगळूरु नाही>>
सॉरी सॉरी...
माझ्या डोक्यात बंगळुरु का शिरले?
मुंबै बंगळुरु अंतिम सामना होतो की काय??!!
ये हे बॉम्बे ये हे बॉम्बे ये
ये हे बॉम्बे ये हे बॉम्बे ये हे बॉम्बे मेरी जान
आज मुंबैच जिंकणार मग!
आज मुंबैच जिंकणार मग! दिल्लीत ३ मुख्य फलंदाज मुंबईकर...
दिल बोले दिल्ली और दिमाग बोले
दिल बोले दिल्ली और दिमाग बोले मुंबई>> पृथ्वी आणि श्रेयस म्हणत असतील दिल बोले मुंबई और दिमाग बोले दिल्ली.
भाउ : मला वाटल तुमच कार्टून येणार. देवदास कपडे फाडत बसलाय.
तुम्ही कुठ जाताय. आम्हाला माहितीय. तुम्हालाच करमायच नाही.
ert
*तुम्हालाच करमायच नाही.* - खरंय. यंदाच्या आयपीएलमधला एकंदरीतच इंटरेस्ट खूपच वाढला आहे ! ÷
अहो, त्या 'आयपीएल'मधे तुमच्यापेक्षा खरा इंटरेस्ट मलाच आहे ! नाय तर घरांत रोज माझं डोकं खात बसलां असतात ना !!
अहो, त्या 'आयपीएल'मधे
अहो, त्या 'आयपीएल'मधे तुमच्यापेक्षा खरा इंटरेस्ट मलाच आहे ! नाय तर रोज माझं डोकं खात बसलां असतात ना !!>> आता यांच काय करायचं?. तमाम गृहिणींना पुढच्या आठवड्यापासून पडलेला प्रश्न.
*गृहिणींना पुढच्या
*गृहिणींना पुढच्या आठवड्यापासून पडलेला प्रश्न*. - आपले मिडियावाले सक्षम आहेत . नक्की काढतील कांहीतरी शोधून, लोकांना चघळत बसायला !!
श्रेयसने आज परत impress केले.
श्रेयसने आज परत impress केले.... बॉलींग चेंजेस आणि फिल्ड प्लेसमेंट दोन्ही चांगले आहेत आज त्याचे!
Still MI made 200
Still MI made 200
श्रेयसने आज परत impress केले.
श्रेयसने आज परत impress केले.... बॉलींग चेंजेस आणि फिल्ड प्लेसमेंट दोन्ही चांगले आहेत आज त्याचे! >> मला तरी असे काही वाटले नाही. अश्विनचा एक रेग्यूलर मास्टर क्लास सोडला तर बीलो अॅवरेज कॅप्टन्सी, बोलिंग आणि फिल्डिंग.
आणि बॅटिंग... अती झालं आणि हसू आलं
दिल्ली ० ला ३ बदक बदक बदक
दिल्ली ० ला ३

बदक बदक बदक
आला आला... रन आला.. वाईडचा
आला आला... रन आला.. वाईडचा आला
वाह दिल्ली वाह्ह्..... वरच्या
वाह दिल्ली वाह्ह्..... वरच्या फळीतील फलंदाजांची अप्रतिम फलंदाजी
>>Still MI made 200
>>Still MI made 200
Hmmm..... नुसते स्कोअरकार्ड बघून सगळ्या कॉमेंट्सचे अर्थ लावता येत नाहीत.
ती कॉमेंट स्टॉयनिसने कृणालला काढले १६-१७ व्या ओव्हरच्या आसपास तेंव्हा केली होती.... तोपर्यंत मुंबईसारख्या टीमला १७ व्या ओव्हरच्या आसपास १४०-१४५ च्या आसपास ५ विकेट्स काढून थोपवणे इथेपर्यंत सगळे दिल्लीच्या बाजूने चालले होते.
अर्थात शेवटच्या ३ ओव्हर मध्ये सगळे समीकरण परत बदलले!
मुंबई मात्र सध्या वेगळ्याच
मुंबई मात्र सध्या वेगळ्याच लीगमध्ये खेळतेय
"मला तरी असे काही वाटले नाही.
"मला तरी असे काही वाटले नाही. " - मलाही असं खूप काही वेगळं जाणवलं नाही. पण तरी रोहित आणी पोलार्ड ला फायर न होऊ देणं ही फार मोठी अचिव्हमेंट होती ह्यात शंका नाही.
बॅटींग ची सुरूवात निराशाजनक आहे दिल्लीसाठी. शॉ आणी रहाणे वि. बोल्ट म्हणजे त्यांच्या न्यूझिलंड दौर्याच्या आठवणी आणी जखमा ताज्या झाल्या असतील. पंत आणी स्टॉयनिस काही करू शकतील का इतकाच प्रश्न आहे. ह्या मॅचमधे हारणार्या संघाला अजून एक संधी आहे हाच दिलासा.
अशी आशा मात्र यामुळे कृपया
अशी आशा मात्र यामुळे कृपया मनात निर्माण करूं देवूं नका ! Wink>>
भाऊ, असे तुम्हीही मनात आणू नका! >>> +१
बोल्ट आणि बुमरा! काय बोलिंग केली आहे!
"ती कॉमेंट स्टॉयनिसने कृणालला
"ती कॉमेंट स्टॉयनिसने कृणालला काढले १६-१७ व्या ओव्हरच्या आसपास तेंव्हा केली होती.." - ओके, मेक्स सेन्स!!
बुमराह टोटल वेडा आहे च्यामारी
बुमराह टोटल वेडा आहे च्यामारी. ह्यापेक्षा अधिक काय बोलणार (हि कॉमेंट स्टोनिस च्या विकेट नंतर केलेली आहे
)
मुंबई फायनल मध्ये......
मुंबई फायनल मध्ये......
रोहित व पोलार्ड शून्यावर बाद
रोहित व पोलार्ड शून्यावर बाद होवूनही चांगल्या गोलंदाजी विरूद्ध मुंबै 200 करते, यासाठी प्रथम सलाम ! अंतिम सामना मुंबई जिंको न जिंको, अशी संघभावना व जिद्द निर्माण करणारे सर्व संबंधित कौतुकास पात्र ठरतात !! ( इरफान पठाणने तर स्वानुभवाने मुंबैच्या 'सपोर्ट स्टाफ ' चं खास कौतुक केलंय ! )
आज दिल्लीचं काय बिनसलं ? 200च्या दडपणाने ढेपाळले कीं अजून दुसरी संधी आहे याचाच विचार डोक्यात घोळत होता ? शाॅ व रहाणे याना दिल्ली मानवत नाहीं कीं विकेटवर रहाणंच !!! तरीही, दिल्ली फायनलला येईल, यावी, असं कां वाटतं ?
रोहित व पोलार्ड शून्यावर बाद
रोहित व पोलार्ड शून्यावर बाद होवूनही चांगल्या गोलंदाजी विरूद्ध मुंबै 200 करते, यासाठी प्रथम सलाम ! >>>> येस टोटली !! भारी बॅटींग. आणि नंतर बोल्ट आणि बुमराहची बॉलींगपण अत्यंत भारी.
मुंबई - दिल्ली --------------
मुंबई - दिल्ली --------------------- मुंबई
बेंगलोर - हैदराबाद --------------- बेंगलोर
दिल्ली - बेंगलोर ------------------ दिल्ली
मुंबई - दिल्ली -------------------- दिल्ली
आयपीएल ट्रॉफी - दिल्ली
फिक्सिंग वगैरे नाही - सिक्सड् सेन्स आहे Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 November, 2020 - 00:09
पहिली मॅच सोपा अंदाज. अचूक ठरला.
बेंगलोर हैदराबादचा अंदाज किंग कोहलीच्या भरवश्यावर आहे. जरी प्रथमदर्शनी उद्या हैदराबाद फेव्हरेट वाटत असली तरी.....
बोल्ट आणि बुमराह! काय सुटले
बोल्ट आणि बुमराह! काय सुटले होते. त्यातसुद्धा बुमरा भयंकर आवडला. टेस्ट मॅच डिलिव्हरीज होत्या एक से एक. बुमराने श्रेयसला बाद केल्यानंतर दिलेला लुक काय खतरनाक होता! जहबहरीही. फारेंडाच्या भाषेत टोटल रिस्पेक्ट. फास्ट बोलरच्या नादी लागायचं नाही बाबा!
मुंबई चा आजचा परफॉर्मन्स
मुंबई चा आजचा परफॉर्मन्स अगदीच रूथलेस होता.
"रोहित व पोलार्ड शून्यावर बाद होवूनही चांगल्या गोलंदाजी विरूद्ध मुंबै 200 करते, यासाठी प्रथम सलाम ! " - सहमत. बाकी कुठल्याच टीमकडे इतकी फायरपॉवर नाहीये
उद्या दोन्ही टीम्सकडून चुरशीचं क्रिकेट बघायला मिळो ही अपेक्षा.
रोहित व पोलार्ड शून्यावर बाद
रोहित व पोलार्ड शून्यावर बाद होवूनही चांगल्या गोलंदाजी विरूद्ध मुंबै 200 करते, यासाठी प्रथम सलाम ! >> मुंबईकडे बॅटींग आणि बोलिंग दोन्ही मधे डेप्थ आहे. टी- २० बेभरवशाचा खेळ असल्याने मुंबईची ही डेप्थच संघाला तारून नेते. ११-२ =११. मुंबईच्या बाबतीत. वेल प्लेड.
दिल्ली आणि बंगलोरमधे पण माझ्या मते दिल्लीची टीम जास्त बॅलन्सड आहे. त्यांना जास्त चान्सेस आहेत.
अर्थात एबीडी आणी विराट काहिही करू शकतात. पण ११-२ =० बंगलोरच्या बाबतीत.
हार्ट आणि हेड दोन्ही दिल्ली.
हार्ट आणि हेड दोन्ही दिल्ली.
*हार्ट आणि हेड दोन्ही दिल्ली* * -
काय हो, ' पृथ्वी ' आणि ' अजिंक्य ' म्हणजे हे दिल्लीवाले काय जग जिंकायचा अश्वमेध यज्ञ करताहेत !!! .
*हार्ट आणि हेड दोन्ही दिल्ली*
*हार्ट आणि हेड दोन्ही दिल्ली* * ->> आजच्यापूरतच.
काय हो, ' पृथ्वी ' आणि ' अजिंक्य ' म्हणजे हे दिल्लीवाले काय जग जिंकायचा अश्वमेध यज्ञ करताहेत !!! .>> बंगलोर म्हणजे जग नाही हो भाउ.
Pages