आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy

खरं तर शुभमन गिलपेक्षा सूर्यकुमार यादव बरा आहे प्रेझेंट फॉर्मवर. >> हो, फक्त गिल टेस्ट स्क्वाड मधे आहे. म्हणजे आधीपासूनच होता, नी राहिलाय. यादव ला व्हाईट बॉल साठी न्यायला हवे होते. रेड बॉल मधे तो ओपन करू शकणार नाही नि मधल्या जागा फिक्स आहेत.

वय नाही सूर्यकुमारच्या बाजुने... पुन्हा त्याच स्टाईलने खेळणारे, मयंक, कोहली, पांडे, अय्यर ऑलरेडी आहेत संघात.
गिल फ्युचर ईन्वेस्टमेंट आहे ...त्याला गेम नाही मिळाला तरी टीम बरोबर राहिल्याने मॅचुरिटी आणि प्रेशर हँडलिंग टॅकटिक्स मिळत राहतील.
एका सीझनमध्ये ५००+ रन्स आणि १५० चा स्ट्रा रेट वगैरे ठेवला तर एखाद्या देशातल्या सिरीजमध्ये नंबर लागेल पण फार ईन्वेस्टमेंट होणार नाही.

जाधव आणि ३डी प्लेअरचा पत्ता कट झाल्याचे लक्षात आले का?

Team India ODI squad: Virat Kohli (Captain), Shikhar Dhawan, Shubman Gill , KL Rahul (vice-captain & wicket-keeper), Shreyas Iyer, Manish Pandey, Hardik Pandya, Mayank Agarwal, Ravindra Jadeja, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Navdeep Saini, Shardul Thakur

मी म्हटलं पाहण्यात गफलत झाली का काय म्हणून सगळं स्क्वाडच बघितलं.

मनीष‌ पांडे तरी यादवपेक्षा सध्या काही फार खेळतो आहे असं काही नाही.

अरे हो की, मी फक्त टी २० बघितले आय पील ला धरून. मला त्याचा वन डे रेकॉर्ड फारसा माहित नाहीये.

३डी प्लेअरचा पत्ता कट झाल्याचे लक्षात आले का? >> ३ डी ?

पांड्या ला लवकरच एक ऑलराऊंडर पर्याय शोधायची वेळ येईल असे मला वाटते कारण तो आता बोलिंग करणार नाहीये असे दिसते.

करंट सिनॅरिओ मध्ये फक्त तेवातिया हे एकच नाव डोळ्यासमोर येते... दुबेकडून अपेक्षा होत्या पण तो समहाऊ फार एनर्जेटिक वाटत नाही.
शंकरची बॅटींग स्फोटक नाही त्यामुळे ६-७ नंबर वर तो अगदीच निरुपयोगी आहे

पंजाब वि. केकेआर ही एक गेम (पहिले तीन सोडून) बाकी सगळ्यांचे चान्सेस रद्द करणार, की अजून काही शक्यता आहेत? चेन्नई उरलेल्या दोन्ही जिंकले तर ते १२ वर येतील. आत्ताचे १० वाले १० वरच राहिले तरी १२ वर दोन टीम्स आहेत - पंजाब आणि केकेआर. त्यांच्या एकमेकांविरूद्धच्या गेम मधे एक टीम १४ वर जाणार. बाकी तिघे १४+ आहेत ऑलरेडी.

तसे असेल तर राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई ऑलरेडी आउट. वरच्या पाचातून चार ठरतील.

जाधव आणि ३डी प्लेअरचा पत्ता कट झाल्याचे लक्षात आले का?
>>
शन्कर इंज्युअर्ड आहे ना? पण तसाही तो पण पांडे, कोहली, अय्यर
जाधव वर्ल्डकपमधे काहीही भरीव न करू शकल्यानी बाहेर बसणार हे ठरलंच होतं.

पंजाब वि. केकेआर ही एक गेम (पहिले तीन सोडून) बाकी सगळ्यांचे चान्सेस रद्द करणार, की अजून काही शक्यता आहेत?
>>>>>>
झालाय हा सामना
दोघांचे आता राजस्थान आणि चेन्नई विरुद्द बाकी आहेत.

राजस्थानचा रनरेट फार वाईट आहे तरीही आपले पंजाब केकेआर सोबतचे दोन्ही सामने जिंकत १४ झाले. तसेच पंजाब केकेआर राजस्थानसोबत चेन्नईशीही हरत १२ वरच थांबले तर राजस्थान त्यांच्यापेक्षा सरस ठरेल. हैदराबादही एक सामना हरला तर १२ लाच थांबेल. हा राजस्थानचा ४ संघाना पॉईंटवर मागे टाकत पुढे जायचा मार्ग झाला.
राजस्थान जातेय तर बाकीचेही कोणीही आत वा बाहेर दोन्हीकडे जाऊ शकतात.

फक्त मुंबई पहिल्या दोनात जवळपास फिक्स आहे.
आणि चेन्नई भारतात पोहोचली सुद्धा एव्हाना.
अर्थात तरीही या दोन्ही संघांच्या उर्वरीत सामन्यांना अर्थ आहे.

स्पर्धा फारच रंगतदार करतोय देव Happy

झालाय हा सामना >> अरे हो की! काल काय खाउन शेड्युल पाहिले माहीत नाही. म्हणजे मग मौका सभी को मिलेगा. टेक्निकली तरी.

चेन्नै ला मॅथमॅटीकल चान्स सुद्धा नाहीये ("enjoying the painful 12 hours!!" per MSD) . बाकी सगळ्यांना आहे. पण बहुदा फारसे चमत्कार नाही घडले तर पहिल्या पाचातूनच प्ले-ऑफ्स च्या टीम्स ठरतील असं वाटतंय. KKR ने सावध सुरूवात केलीये. गिल ची बॅटींग बघायला छान वाटते. तसंच आज पण ऋतुराज गायकवाड चा खेळ बघायची उत्सुकता आहे.

मॉर्गन टॅक्टिकल मिस्टेक करत आहे की धिनी येण्याआधी लीड स्पीनर्सच्या ८ पैकी ५ ओवर्स संपवल्या.
धोनी समोर स्पीनर्स आणले की अ‍ॅवरेज ६ च्यावर जाणार नाही ह्याची निश्चिती असते.

मॉर्गनने धोनीला आऊट करून दुसरी टॅक्टिकल मिस्टेक केली.
धोनी अजून दोनेक ओवर्स टिकला असता तर त्याने मॅच डीप नेऊन नक्कीच कोलकाताला जिंकून दिली असती.

"धोनी अजून दोनेक ओवर्स टिकला असता तर त्याने मॅच डीप नेऊन नक्कीच कोलकाताला जिंकून दिली असती." - Rofl

लॉकी फर्गसन - एका ओव्हरमधे हीरो चा झीरो झाला. दवामुळे बॉल निसटत होता असं वाटलं त्याची १९ वी ओव्हर बघून.

ऋतुराज गायकवाड - another marvelous inning!! फूटवर्क जबरदस्त आहे पठ्ठ्याचं. डोमेस्टीक क्रिकेट मधे घाम गाळण्याचा परिणाम असावा. ते नवीन खेळाडूंत स्पार्क नव्हता त्याचं काय झालं कुणास ठाऊक! Wink

धोनी अजून दोनेक ओवर्स टिकला असता तर त्याने मॅच डीप नेऊन नक्कीच कोलकाताला जिंकून दिली असती. >> Happy आज नागरकोटी हिरो होउ शकला असता. दोन बॉल्स नी घात केला रे.

डोमेस्टीक क्रिकेट मधे घाम गाळण्याचा परिणाम असावा. >> बघ. म्हणूनच सिराज ला संधी द्यायला हवी Happy

त्या दिवशी साहाची इनिंग बघताना पटकन जाणवले कि तो स्पिन कसला लिलया खेळतो. फक्त फूटवर्क, व्रीस्ट नाही तर स्वीप पण सहज वापरतो. दोन्ही मस्त करणारा तत्कालीन भारतीय बॅटस्मन विरळाच.

बाहेरच्या दौर्‍यांमधे किती खेळाडू नेता येतात ह्यावर बंधने असतात का ? १६-१७ हाच आकडा नेहमी दिसतो. एक सहज वाटले कि पैशाचा प्रश्न नाही नि कोविड मूळे संधी आहे तर त्यागी, , मावी, नागरकोटी ह्यांना बरोबर घेऊन जाऊन ऑसीज पिचेस वापरू दे. नेट प्रॅक्टिस ला पण हे १४० बॉलर्स उपयोगी येतील. त्यांना पण अनुभव येईल.

आज नागरकोटी हिरो होउ शकला असता. दोन बॉल्स नी घात केला रे. >> मला वाटते राणाला ओवर द्यायचा गँबल केला तो करायला नको होता.
नागरकोटीचा दोष नाही... त्याला १ली, १२वी आणि २०वी ओवर दिली .... मॅचच्या तीनही वेगळवेगळ्या पिरिअड्स मध्ये ...दोन ओवर्स सुद्धा सलग नाहीत..म्हणजे आधीच्या ओवर मध्ये मॅच आणी पीच कंडिशन्स चे अंडरस्टँडिंग मिळाले ते पुढची ओवर मिळेपर्यंत बिनकामाचे झाले... राणाची ती ओवर फर्ग्यूसनला दिली असती आणि नागरकोटीला १२ आणि १४ ओवर्स दिल्या असत्या तर त्याचा त्याला २०वी ओवर करतांना थोडातरी फायदा झाला असता.

आज शेवटी ९ बॉल २७ होते. तोपर्यंत जशी बॉलिंग अ‍ॅक्युरेट पडत होती ते पाहता सामना निसटला चेन्नईकडून असेच वाटत होते.
मग अचानक लौकी फर्गुसनने एक लेग साईडला गुडघ्याच्या वर फुलटॉस टाकला. बॅट लावताच सहज फोर गेला.
मग पुढचा बॉल त्याहून अचाट टाकत छातीवर फुलटॉस टाकला. नो बॉल झाला. फ्री हिट मिळाला.
मग अचानक सारे यॉर्कर बंद झाले. लेंथ बॉलवर फ्री हिटलाही फ्री सिक्स आला.
अगदी अखेरीस २ बॉल ७ ला गोलंदाज यॉर्करच्या फंदात न पडता जडेजा स्लॉगमध्ये कसा ऑट होईल हेच बघायला गेला.
आणि हेच नडले. शेवटचे नऊ बॉल फलंदाजांना न रोखता मारायचे लालच दाखवत बाद करायला गेले. डावपेचच चुकले Happy

नागरकोटीचा दोष नाही... >> नाही माझा तो हेतू नव्हता. त्याने एक वाईट बॉल टाकला फक्त जो पहिला सिक्स देऊन गेला जाडेजाला, पुढे दोन बॉल मधे एक पोरखेळ होता. आधीचे तीन बॉल चांगले होते म्हणून चूटपूट लागून राहिली. दवामूले किंवा कसेही असो, फर्ग्युसनचे शेवटचे दोन बॉल सगळे गणीत बिघडवून गेले. सर बॅटींग जोषात करताहेत पण सध्या.

"दव आणि देव" यात एक साम्य दिसू लागलेय हल्ली. ज्याच्या मनी "भाव" असतो त्यालाच ते दिसते Happy

बाकी सुर्यकुमारला न घेतल्याने वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. पुढच्या मालिकेसाठी त्याचा विचार होऊ शकतो. जर मनीष पांडेची जागा बनते तर सुर्याचीही त्याच जागी जागा बनू शकतेच.
बाकी मुंबई ईण्डियन्स बॅटींग लाईनमध्ये तर तो की प्लेअर वाटतो. पांड्या बंधू, ईशान किशन आणि पोलार्ड हे चौघे जिथे मिडल ऑर्डरला एकत्र आहेत तिथे तो स्थिरता देतो. कुठल्या प्रकारच्या बॉलरला खेळणे आणि चौफेर फटके खेळणे त्याची स्ट्रेंथ असल्याने समोरच्या कर्णधाराचे डावपेच तो थांबवतो.

"त्यागी, , मावी, नागरकोटी ह्यांना बरोबर घेऊन जाऊन ऑसीज पिचेस वापरू दे. नेट प्रॅक्टिस ला पण हे १४० बॉलर्स उपयोगी येतील. त्यांना पण अनुभव येईल." - नागरकोटी, कार्तिक त्यागी, टी. नटराजन आणी इशान पोरेल चालले आहेत ऑस्ट्रेलियाला इंडीयन स्क्वाड बरोबर.

उद्या रॉयल्स वि. पंजाब! मागच्या वेळी एकमेकांविरूद्ध खेळले होते तेव्हापासून दोन्ही टीम्स मनमोहन देसाईच्या सिनेमांतल्या हिरोजसारखी दोन टोटली वेगवेगळ्या दिशांनी गेल्या आहेत. आजच्या केकेआरच्या पराभवानंतर तर पंजाब चे प्ले-ऑफ्स चे चान्सेस आणखीनच वाढले आहेत (तसंही प्रितीचा दु:खी चेहरा बघवत नाही, त्यापेक्षा हसली की खळ्या छान दिसतात Happy ).

*केकेआरच्या पराभवानंतर तर पंजाब चे प्ले-ऑफ्स चे चान्सेस आणखीनच वाढले आहेत* - हरण्या - जिंकण्याने फरक पडत नसेल तर तो संघ स्वत:चा खेळ उंचावू शकतो तर त्याच्या विरूद्धचा संघ दडपणामुळे अडखळू शकतो . चेन्नईसारखे संघ आतां म्हणूनच खतरनाक ठरूं शकतात.

*(तसंही प्रितीचा दु:खी चेहरा बघवत नाही, त्यापेक्षा हसली की खळ्या छान दिसतात * - तिचं लक्ष खेळापेक्षा कॅमेराकडेच अधिक असावं, असं तिच्या एकंदर अदाकारीमुळे कां वाटत रहातं ! Wink

तसंही प्रितीचा दु:खी चेहरा बघवत नाही, त्यापेक्षा हसली की खळ्या छान दिसतात * - तिचं लक्ष खेळापेक्षा कॅमेराकडेच अधिक असावं, असं तिच्या एकंदर अदाकारीमुळे कां वाटत रहातं ! >> कॅमेराचं खेळापेक्षा तिच्याकडे जास्त लक्ष असतं असं म्हणा Wink

शिल्पाचा काही संबंध नाही आता राजस्थानशी.. तिच्या नवर्‍यावर बीसीसीआय ने कायमची बंदी घातली आहे.
प्रिती हसली तर जुही रडेल पण.

तरीपण दहा वर्षे मालकीण होती ती हाब. आपला कसला काय कशाशी संबंध नाही तरीपण आपला आवडता संघ हारला की आपल्याला वाईट वाटतं.

तरीपण दहा वर्षे मालकीण होती ती हाब. आपला कसला काय कशाशी संबंध नाही तरीपण आपला आवडता संघ हारला की आपल्याला वाईट वाटतं. >> तुम्ही दोन चार वर्षे ईन्फोसिसचा स्टॉक सांभाळून ठेवला मग प्रॉफिट बुक करून विकून टाकला... आता तो खाली पडला तर तुम्हाला वाईट वाटते का?

सूर्यकुमार यादव संदर्भातल्या वादावरून मला वाटते की ,
ईंडिया A team चा रिलेवन्स अजून वाढवायला हवा, तिन्ही फॉर्मॅट साठी.... म्हणजे नॅशनल टीममध्ये घेतांना आणि तिथून काढतांना एक्स्लुझिवली A team वापरायला हवी.. नॅशनल टीम मधून काढलेला पुन्हा A team जाईल आणि नॅशनल टीम मध्ये A team squad मध्ये असल्याशिवाय घेता येणार नाही.
नाही तर एवढ्या मोठ्या टॅलंट पूल मधून एखाद्याला अचानक घेणे जसे विजय शंकरला घेतले होते आता वरूण चक्रवर्तीला घेतले... तसे ब्ल्यू स्काय थिंकिंग होणार नाही. नॅशनल टीम मधून ड्रॉप झालेल्या पंत, जाधव साठी पुन्हा टीम मध्ये परतण्यासाठी एक बफर रेडी असेल.
सेहवाग, गंभीर ह्यांची जशी अनप्लेझंट एक्झिट झाली ते टाळता येणे काही अंशी शक्य होईल.
क्रिकेटर्सनी सुद्धा ड्रॉप होणे, इन्क्लुजन न होणे हा ईगो ईश्यू करू नये...जसा रायडू ने केला होता.

Pages