Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्ही दोन चार वर्षे
तुम्ही दोन चार वर्षे ईन्फोसिसचा स्टॉक सांभाळून ठेवला मग प्रॉफिट बुक करून विकून टाकला... आता तो खाली पडला तर तुम्हाला वाईट वाटते का?>>>म्हणजे राजस्थानचे आताचे मालक घाट्यात चाललेत?
*कॅमेराचं खेळापेक्षा
*कॅमेराचं खेळापेक्षा तिच्याकडे जास्त लक्ष असतं असं म्हणा * - खरंय व तिला याची जाणीव आहे , हेही खरं !
पंजाब मोठ्ठं लक्ष्य ठेवणार राजस्थानसमोर असं दिसतंय घ( 12 षटकात 98-1 ! )
रॉयल्स बॉलिंग चा प्लॉट हरतय
रॉयल्स बॉलिंग चा प्लॉट हरतय शेवटच्या ओव्हर्स मधे. किती लेंग्थ बॉल्स ते.
ते सूर्यकुमार यादवचे मॅच
ते सूर्यकुमार यादवचे मॅच जिंकल्यावरचे जेश्चर ( "मी आहे ना?" टाइप) काय होते आणि कोणाला उद्देशून होते काही समजले का?
आता त्याच्या मीम्स बनून फिरत आहेत
नाही, मलाही उत्सुकता आहे
नाही, मलाही उत्सुकता आहे त्याबद्दल. मल पांड्या, पोलार्ड शी केलेली गम्मत वाटते. हार्दिक बॅटींग करताना फार अॅनिमेटेड होता त्यादिवशी त्याच्याशी संदर्भ असू शकेल. पांड्या बंधू नि पोलार्ड चे पण भारी सुरू असते काही ना काहीतरी.
पंजाब हरल्यात जमा आहे. उगाचच उत्थपाला बाद केले.
जिंकले राजस्थान! संजू सॅमसन
जिंकले राजस्थान! संजू सॅमसन बरा खेळतोय याचं बरं वाटलं. 99वर गेल बाद होणं व पंजाब हरणं खेदजनक .
गेली हैद्राबाद प्ले ऑफ मध्ये.
गेली हैद्राबाद प्ले ऑफ मध्ये.
हैदराबाद कशी?
हैदराबाद कशी?
Kkr, rr आणि kxip मध्ये टक्कर
पंजाबच्या बॅटींग नंतर मॅचनंतर
पंजाबच्या बॅटींग नंतर मॅचनंतर बहुदा इथे येऊन 'आणी प्रिती हसली' असं लिहावं असं डोक्यात होतं. पण स्टोक्स-संजू चे प्लॅन्स वेगळेच होते.
राजस्थान गेल्या दोन मॅचेस मधे एकदम प्रोफेशनल चेस करतायत. पण बॉलिंग मधे फारच मार खातात. नुसते रन्स देण्याचा प्रश्न नाही, पण आर्चर आणी थोड्याफार फरकानं तिवातीया आणी त्यागी सोडले तर बाकीच्या बॉलर्स मधे उनाडकट, अॅरोन आणी राजपूत काही प्रभाव पाडू शकले नाहीयेत. गोपाळ सुद्धा ह्या वर्षी ब्लो-हॉट-ब्लो-कोल्ड आहे.
उद्याच्या दोन्ही मॅचेस मस्त आहेत.
यंदा फारच काटे की टक्कर
यंदा फारच काटे की टक्कर चालुये, नक्की कोण प्ले ऑफ ला जाणार हे शेवटच्या दिवशीच ठरणार
सूर्यकुमार आणि कोहलीची आधी
सूर्यकुमार आणि कोहलीची आधी नजरानजर झाली होती, त्यामध्ये कोहली बॉल घेऊन त्याच्या जवळ गेला होता.
पंड्या आणि मॉरिस मध्ये पण बाचाबाची झाली .
पंड्या बाद झाला. त्यामुळे "मी आहे,काळजी नसावी" अशी प्रतिक्रिया जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव ने पंड्याला पाहून दिली.
कोहली आणि सूर्यकुमार:-
https://youtu.be/zHFSgyDgZqw
(१:४९ पासून आहे)
पंड्या आणि मॉरिस:-
https://youtu.be/oATKtaB6IY4
*कोहली आणि सूर्यकुमार * - हा
*कोहली आणि सूर्यकुमार * - हा प्रकार आयपीएलमधे रंगत आणण्यासाठी असेल तर ठीक आहे; नपेक्षा, भारताच्या कर्णधाराने असं करणं, व तेंही आयपीएलमधे, अगदीच बालीश वाटतं. अशाने आपण पाॅटींगला हंसण्याचा हक्कच गमावून बसूं !

*यंदा फारच काटे की टक्कर चालुये* - कोणता खेळाडू कधीं अफलातून खेळी करून कोणत्या संघाला कुठे वर खेचून आणेल, सांगणं कठीण ! ' कठीण समय येतां कोण कामास येतो ! '. शेवटच्या षटकात अक्षर पटेलही तीन षटकार मारतोच ना !!
*उद्याच्या दोन्ही मॅचेस मस्त आहेत.* - रोहित शर्माची फलंदाजी मात्र पहायला नाहीं मिळणार !
मुंबईने दिल्लीला सहज मोठ्या
मुंबईने दिल्लीला सहज मोठ्या फरकाने हरवून प्ले ऑफ साठीच्या स्पर्धेत ढकलले आनि स्वतः १ ल्या क्वालीफायर मध्ये जागा निश्चीत केली!
बुमराहची अस्त्रे पुन्हा धारदार झाली गेल्या ३-४ सामन्यांपासून.
रशिद खान एक चतुर बॉलर आहे. टी
रशिद खान एक चतुर बॉलर आहे. टी-२० च्या फॉर्मॅट मधे इत्क्याश्या वेळात बॅट्समेन ला सेट-अप करून आऊट करणं किती अवघड आहे! फिलिपी ची विकेट हे क्लसिक उदाहरण होतं. तीन फास्ट लेगब्रेक्स नंतर एक फसवा स्लो गूगली फिलिपी ला मामा बनवून गेला.
पहिली मॅच एकतर्फी झालीच आहे आणी दुसरी त्याच मार्गावर (आत्तापर्यंत) आहे. आरसीबी च्या बॉलर्स वर सगळा भार आहे.
*कोहली आणि सूर्यकुमार * -
*कोहली आणि सूर्यकुमार * - मधे काही फारसे मोठे झाले असे मला वाटत नाही. भरपूर खेळाडूंनी हे बरेचदा सांगितले आहे कि मैदानाबाहेरचा कोहली वेगळा असतो, ह्या प्रसांगामधे तो अजिबात काही बोलला नाही ही तो बदलतोय हे दाखवतेय. He gets carried away during game situation and that drives him. Every one can not be Dravid or Tendulkar and 'm glad they are not. दादा, सेहवाग, गंभीर, भज्जी , कोहली ह्यांनी जो 'अरे ला का रे ' अॅटिट्युड आणला त्यामूळे बाकीच्या खेळाडूंची अरेरावी कमी झाली हा प्लस पॉईंट आहे. कोहली ला न डिवचता मैदानात खेळायचे इथवर ऑसी प्लॅनिंग करतात ह्यातच सगळे आले.
टॉस जिंकली मॅच जिंकल्यात जमा होतेय काही शेवटच्या सामन्यांमधे हा भाग वैतागवाणा आहे.
पृथ्वी शॉ सध्या तरी उन्मुक्त
पृथ्वी शॉ सध्या तरी उन्मुक्त चंद इन मेकिंग आहे that too on a fast track.
एवढे devoted आयुष्य, पण लहानसे technical flaws वेळीच न सुधारल्यामुळे पूर्ण करिअर वर प्रश्नचिन्ह उभे राहते.
*कोहली ला न डिवचता मैदानात
*कोहली ला न डिवचता मैदानात खेळायचे इथवर ऑसी प्लॅनिंग करतात ह्यातच सगळे आले.* माझ्यापुरते तरी , खेळ बघतांना ज्या गोष्टी आनंदावर विरजण घालतात, त्या निषिध्द. प्रत्येक चेंडूवर मैदानातलया कोहलीच्या चेहर्यावरचे ते आत्यंतिक खुन्नसचे भाव व हावभाव बघणं खेळाची मजाच घालवतं. आक्रमक, जिद्दी असणयासाठी त्याचं प्रदर्शन अजिबात आवशयक नसतं, हें कित्येक नामवंत खेळाडू सिद्ध करतच असतात. ज्या गोष्टीसाठी आपल्याला ऑसीजचा राग येतो, त्याच गोष्टीसाठी ऑसीज कोहलीचं कौतुक करत असतील, तर तें अभिमानास्पद समजायचं का ?
कोहली एक अत्यंत प्रतिभावान , मेहनती फलंदाज आहेच आहे व त्यासाठी त्याला त्रिवार सलाम! पण म्हणून त्याची मैदानावरील प्रत्येक गोष्ट मला कां आवडावी ! खेळ =खुन्नस, हें समीकरण मला कधीच भावलं नाहीं, पटलं नाहीं.. अर्थात, हा माझा दृष्टीकोन!
आयपीएल बघण्यात मजा आहे. पण
आयपीएल बघण्यात मजा आहे. पण सध्या जे घडतेय त्याने निर्णयातील उत्सुकता ठार मेलीय.
स्पर्धा निम्यावर येताच अचानक वरचे संघ हरायला लागतात आणि खालचे संघ जिंकायला लागतात.
गुण तालिकेत टॉपला असणारी दिल्ली सलग चार सामने हरते
तर तळाला असणारी पंजाब सलग पाच सामने जिंकते. त्यानंतर एक सामना हरते तो देखील तळाच्या राजस्थानशी हरते आणि त्यांचेही स्पर्धेतील आव्हान कायम ठेवते.
पुन्हा दिल्ली हरली, पुन्हा बेंगलोरही हरली, नुसती हरली नाही तर रनरेटच्या मोठ्या फरकानेही हरली
आणि त्यामुळे आता प्रत्येकाचा प्रत्येकी केवळ एक सामना शिल्लक असताना स्पर्धा अगदी रोचक रंगतदार स्थितीत आलीय की कोणीही आत येऊ शकते, कोणीही बाहेर जाऊ शकते ...
वेल डन !
चाहत्यांसाठी खुशखबरधोनीचा हा
चाहत्यांसाठी खुशखबर
धोनीचा हा लास्ट सामना नाही...
तो पुन्हा येणार
धोनी हे स्वता आताच टॉसला म्हणाला.....
(No subject)
कोणत्या चार टीम ? अहो, आत्तांच तर चहापत्ती टाकून उकळायला लागलंय पाणी ; इतक्यातच नका गाळूं, कडक , मस्त चहा हवा असेल तर !!!
(No subject)
पुढच्यावेळी चेन्नई फायनलला असणार आणि तो धोनीचा अंतिम सामना असणार ...
त्या साठी फायनल चेन्नईला असू शकते असे वाटते. जसे सचिनला वानखेडेवर निरोप दिला तसे तिथे धोनीला निरोप देतील.
He Deserves .... Actually more than this
आता त्या दिवसाची वाट बघणे राहील...
*He Deserves .... Actually
*He Deserves .... Actually more than this* - Yes , more than a stage- managed IPL victory for his send-off , with two World cup victories highlighting his illustrious career !!!
आत्ताच्या नियमानुसार तर
आत्ताच्या नियमानुसार तर पुढच्या वर्षीचा अंतिम सामना चेन्नई ला होणे अशक्य आहे, कारण जो ह्या वर्षी IPL जिंकतो त्याच्या घरच्या मैदानात पुढच्या वर्षीचा अंतिम सामना होतो.
एखाद दुसरा खेळाडू पैसे घेऊन fixing करू शकतो पण संपूर्ण स्पर्धा ही scripted आहे हे म्हणणे हस्यपद आहे. म्हणजे एका team चे कमीत कमी 16 प्लायेर्स आणि संपुर्ण ipl चे 128 खेळाडू हे एकाच वेळी भ्रष्ट आहेत असे समजावे लागेल. बाकी umpires, non playing staff आणि त्यांचे मालक पण भ्रष्ट. हे का तर आपल्याला पाहिजे तसे काही निकाल लागले नाहीत, म्हणजे आपण सोफ्यावर बसून काही prediction करणार आणि आपले prediction 2-3 वेळा चुकले की सगळे च भ्रष्ट हे म्हनने मूर्ख पानांचे आहे.
हे म्हणचे राजकारणामध्ये जो विरोधी पक्ष हारतो तो EVM वर टीका करतो बाकी आपला पक्ष जिंकला की evm भारी आसे झाले.
ऋतुराज गायकवाडची तीन सलग
ऋतुराज गायकवाडची तीन सलग अर्धशतकं. मस्त खेळला. त्याचा खेळ बघायला पण मजा येते.
चेन्नईच्या हातात हात घालून
चेन्नईच्या हातात हात घालून पंजाब उद्या परत येणार तर.
*त्याचा खेळ बघायला पण मजा
*त्याचा खेळ बघायला पण मजा येते.* +1 ! सहजतेने प्रत्येक चेंडू मेरीटवर खेळतो, उगीच हाणामारी न करता ! inside-out shots on frontfoot were a treat to watch !खूपच छान !!
*He Deserves .... Actually
*He Deserves .... Actually more than this* - Yes , more than a stage- managed IPL victory for his send-off , with two World cup victories highlighting his illustrious career !!! >>> १००% +
कसोटीतील निवृत्त्ती सिरीजच्या मधेच, वन डे व टी-२० इण्टरनॅशनल मधली निवृत्त्ती मधेच एक ट्विट करून, व आयपीएल मधली निवृत्त्ती इतकी खेचलेली- ये बात कुछ हजम नही हुई.
रोचक !
रोचक !
पंजाब आणि राजस्थान ज्यांनी तळाहून झेप घेत आपले आव्हान कायम ठेवलेले ते आता बाद झाले.
हार के भी जीतने वाले को बाझीगर कहते है शाहरूखने आज ते दाखवले.
केकेआरने मोठा विजय मिळवून रनरेट राखला
त्यामुळे आता दिल्ली - बेंगलोर आणि त्यांच्या रनरेटमधील फरक कमी झाल्याने रोचकता आणखी वाढली आहे.
त्यामुळे आता उद्या त्या दोघांपैकी जो हरेल त्याला मोठ्या फरकाने हरणे परवडणार नाही अशी स्थिती झालीय..
साधारण १८-१९ धावांचा फरक दिसतोय दिल्ली आणि कलकत्यामध्ये.. तर २२-२३ धावांचा फरक बेंगलोर कलकत्यामध्ये.. यापेक्षा मोठ्या फरकाने हरणे परवडणार नाही..
या स्थितीत दिल्ली बेंगलोरने संगनमताने सामना क्लोज करून हरले तर दोघे हमखास प्लेऑफला जाऊ शकतात.
पण यात जो जिंकेल तो पहिल्या दोघात येणार आहे त्यामुळे रोचकता आणखी आहे.
Finally, a 23 yr old
Finally, a 23 yr old inexperienced lad was needed to steer the capsizing ship of egoistic veterans....what an irony.
दिल्लीकडून खुप् अपेक्षा
दिल्लीकडून खुप् अपेक्षा होत्या यंदा पण गेल्या काही सामन्यातला त्यांचा खेळ बघता त्यांनी साफ निराशा केली आहे.... चेन्नई बाहेर पडल्यानंतर दिल्लीच्या खालोखाल पंजाब आवडायला लागलेले पण त्यांनीही ऐनवेळी गचाळ खेळ केला.
कोलकता आणि हैद्राबाद कधीच आपल्या टीम वाटल्या नाहीत.... म्हणजे माझे आवडते प्लेअर्स कधी त्या टीमकडून खेळले नाहीत आणि त्या टीममधले प्लेअर फारसे कधी आवडते झाले नाहीत!
आरआर अगदी पहला जरी नाही तरी दुसरा प्यार होता... बरेच दिवस प्रेमात होतो.... पण तेही गंडलेत.
कोहलीच्या माजामुळे बंगलोर आवडत नाही.
मुंबईला पण माज असतो पण गेल्या काही सामन्यात ते ज्या दर्जाचा खेळ करतायत त्यामुळे आवडायला लागलेयत ते!
ही स्पर्धा सुरु होताना वाटले नव्हते की स्पर्धा संपतासंपता मी मुंबईचा सपोर्टर होईन असे
Pages