आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गंभीर इंग्लंड नि ऑस्ट्रेलिया मधे कसोटी सामन्याम्मधे फेल झाला २०११ पासून नि त्याचा परीणाम त्याच्या लिमिटेड क्रिकेट वर पण झाला. त्या द्रबिंग साठी अनायासे त्याच्यावर ठपका ठेवला गेला. (भारतीय ओपनर ना ही मार्जिन ऑफ एरर फारच कमी असते हे लक्षात घ्या) धवन नि शर्मा तेंव्हा अशा गोल्डन फॉर्म मधे होते कि त्यांना प्रीफर केले जाणे साहजिक होते,.

आज जर किशान ने विकेट फेकली तर ........

अगदीच पकाऊ, टाकाऊ टाईप्स झाली आहे चेन्नईची टीम.

किशन आणि डीकॉक एकमेकांवर कुरघोडी करणार्‍या एम्प्लॉयी सारखे वाटत आहेत... ट्राईंग टू प्रुव देअर वर्थ.
किशनला वाटत असेल स्साला हा नस्ता टीम मध्ये तर माझी एवढं चांगलं खेळून सुद्धा अशी आत बाहेर अवस्था झाली नसती. Proud

गंभीर - सेहवाग ह्या विषयावर लिहीणार नव्हतो, पण काहीही चाललंय. २०११ च्या ऑस्ट्रेलिया वन-डे सिरीज च्या वेळी धोनी ने पब्लिकली असं सांगायला सुरूवात केली होती की सचिन, गंभीर आणी सेहवाग (उपकप्तान) तिघांना एकत्र खेळवता येत नाही कारण फिल्डींग स्लो /अचपळ होते. त्याच वेळी सेहवाग ने एक डायव्हिंग कॅच घेतल्यावर प्रेस कॉन्फरन्स मधे विचारलं होतं की ही अचपळ फिल्डींग होती का. असो. हा काव्यात्मक न्याय आहे की नेहमी 'तरूण' खेळाडूंचा आग्रह धरणारा धोनी स्वतः चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे आणी डॅडीज आर्मी चं नेतृत्व (?) करतोय!

आजपण चेन्नई हारणार!!

किशनला वाटत असेल स्साला हा नस्ता टीम मध्ये तर माझी एवढं चांगलं खेळून सुद्धा अशी आत बाहेर अवस्था झाली नसती. Proud
>>>>>

त्याने मुंबई ईंडियनच्या संघात नाही तर भारतीय संघात जागा मिळवण्याचे लक्ष ठेऊन खेळावे.
स्पर्धा डिकॉकशी नाही तर सॅमसन पंतशी करावी Happy

स्पर्धा डिकॉकशी नाही तर सॅमसन पंतशी करावी >> आजची इनिंग बघता नि पंतचा लिमिटेड ओव्हर्स चा फॉर्म बघता मनावर घेतलेले दिसतेय.

कारण फिल्डींग स्लो /अचपळ होते >> खर होते ना पण ते. प्रामाणिकपणे फिल्डींग करणे वेगळे पण स्लो असणे जाणवतच होते ना. धोनी स्वतः जागा अडवून बसला आहे का ह्याचे उत्तर फक्त किपिंग च्या जोरावर त्याला खेळवणे चेन्नई ला परवडतेय का ? ह्यावर ठरेल

गावस्कर 'मुरली विजय ने तो रेग्युलर ओपनर आहे म्हणून ओपन करायला हवे होते' म्हणाला मधेच. गायकवाडचे समजू शकतो पण विजय कधी लिमिटेड क्रिकेट मधे ओपनर होता भारताचा ? त्याने आयपीएल मधे सक्सेस्फुल ओपन करून सुद्धा बराच काळ झाला. सगळेच डोक्यावरून गेले माझ्या.

धोनी ने पब्लिकली असं सांगायला सुरूवात केली होती की सचिन, गंभीर आणी सेहवाग (उपकप्तान) तिघांना एकत्र खेळवता येत नाही कारण फिल्डींग स्लो /अचपळ होते.
>>>>

एखादी कॅच घेणे वेगळे आणि ५० ओवर चपळतेने ग्राऊंड फिल्डींग करणे वेगळे.
हल्ली ती काय योयो टेस्ट असते ती त्या काळात असती तर किती जण ती टेस्ट पास करून खेळले असते हे बघणे रोचक ठरले असते. युवराजही अखेरीस फिल्डींगला ईतका ढिला झालेला की त्याला लपवावे लागत होते आणि हे बघून फार वाईट वाटत होते. त्यालाही शेवटी ती योयो टेस्ट पास करणे जमत नव्हते बहुधा.

बाकी सचिन सेहवाग सारख्या खेळाडूंच्या फिल्डींगबद्दल उघडपणे सांगायची हिम्मत दाखवणे हेच धोनीला धोनी बनवते.

राहिला प्रश्न आयपीएलचा तर ती तुलनाच चुकीची आहे.
ईथे फ्रॅंचायजी आणि त्यांची डोकॅलिटी टीम जो काही संघ लिलावात विकत घेईल त्यातलेच प्लेअर निवडून मैदानात उतरायचे असते. जर त्यापैकी एखादा युवा आणि अनुभवी यांच्यातील गुणात्मक फरक जास्त असेल तर निव्वळ फिटनेस या निकषावर युवाला खेळवू शकत नाही. आता येत्या लिलावात चेन्नई मॅनेजमेंट काय ॲप्रोच ठेवते हे महत्वाचे. एवढे वर्षे त्यांनी जो ऊस मजेने चोखून खाल्ला आहे त्याचे आता मूळ आले आहे हे त्यांना यंदा समजले.

ऋन्मेष, तू सिरियसली, काहीही लिहितोस मित्रा!! धोनी ला धोनी बनवतं काय, एखादा कॅच वि. ग्राऊंड फिल्डींग काय (काही डेटा आहे का की त्यांची ग्राऊंड फिल्डींग स्लो होती ह्यावर?), योयो टेस्ट असती तर काय! ... जे तेव्हा होतं ते तेव्हा होतं. उगाच मधूच्या आत्याबाईंना मिशा वगैरे लॉजिक ला अर्थ नाहीये. आणी महत्वाचं २०१७ पासून धोनी चा फॉर्म गंडलाय, वय झालंय. त्याला २०१९ च्या वर्ल्डकपला खेळवायच्या हट्टापायी ऑलरेडी टीम चं नुकसान झालंय. २०१५ नंतर काहीही सक्सेशन प्लॅनिंग नसण्याचा हा परिणाम होता. बाकी हा धागा आयपीएल चा आहे. त्यामुळे इथे आयपीएल चं कसं सगळं वेगळं असतं वगैरे मखलाशी अयोग्य आहे.

सॅमसनने प्रत्येक वेळी आपली कबर स्वतःच खोदली आहे... तो काही दिसत नाही काँपिटिशन मध्ये.
मात्र पंतला सिरिअस काँपिटिशन तयार केली आहे किशनने.... पण राहुलला फुल टाईम विकेट किपिंग करायला लावली तर पंत आणि किशन दोघांना वाट पहाण्याची वेळ येऊ शकते.
पंत आयपील मध्ये नॅशनल टीम मधली जागा डोळ्यासमोर ठेऊन आधी न दिसलेली मॅचुरिटी दाखवण्यासाठी खेळ करतो आहे असे वाटले का कोणाला?

नवीन Submitted by फेरफटका on 23 October, 2020 - 12:43>> अगदी अगदी. १४ च्या ऑसी सिर्रिज मध्ये टेस्ट आणि नंअतर वन डे कॅपटन्सी अचानक सोडून मनाचा मोठेपणा दाखवलेल्या धोनीचे पाय क्रिकेटमधल्या ऊतारवयात मातीचेच निघाले शेवटी.

ज्येष्ठ संघ बाद! धोनीचा ज्येष्ठ खेळाडूंना त्यावेळी बाहेर ठेवायचा निर्णय योग्य होता हा त्याने यंदाच्या आयपीएलमधील चेन्नईच्या एकंदरीत परफॉर्मन्स वरून सिद्ध केले...

ऋन्मेष, तू सिरियसली, काहीही लिहितोस मित्रा!! >>>> ती तुम्ही किती पेशन्स ठेऊन त्यावर रिप्लाय करता... Wink

रच्याकने, मुंबई जिंकली !!!!!!!!!!!!!!

दमलेल्या धोनीची कहाणी साठा उत्तरी सुफल संपूर्ण.
पंजाब वि. चेन्नाइ फायनल नाही त्यामुळे मला मिठाचा खडा बर्फी म्हणून खावा लागणार नाही. संबंधितांनी बोध घ्यावा.

सेहवागला जेंव्हा काढल तेंव्हा काहिही कारण नव्हत. उगाचच रोटेशनची आयडिया आणली गेली.फिल्डिंगच्या बेसिस वर टीम निवडली गेली असती तर ९० च्या आधी एखादा दुसर्‍याचीच टीम बनली असती.
गंभीरने वर्ल्ड कप जिंकून दिला होता. फॉर्म काय, सचिनही एका सिरीज मधे फेल गेला होता. कोहलीची पहिली ऑस्ट्रेलिया टूर आठवा. तो तेंव्हा जरा मोठा असता तर त्यालासुद्धा धोनीने बाहेर काढले असते.

असो. बॅक टू आयपीएल. आता एकच जागा राहिलीय. मुंबई, दिल्ली, बंगलोर नक्की झालेत ऑलमोस्ट. चौथे कोण?. मला हैदराबाद येइल असे वाटतेय.

यावेळेस बॅटस्मनपेक्षा बॉलर्स गाजवत आहेत. मजा येतीय. Happy

ती तुम्ही किती पेशन्स ठेऊन त्यावर रिप्लाय करता. > >तुझीच कमी होती Happy

पंत आयपील मध्ये नॅशनल टीम मधली जागा डोळ्यासमोर ठेऊन आधी न दिसलेली मॅचुरिटी दाखवण्यासाठी खेळ करतो आहे असे वाटले का कोणाला? >> त्यने फारसे काहि केले नाही ह्यावेळी अजून वाखाणण्याजोगे. मला तरी आठवले नाही पटकन.

पण राहुलला फुल टाईम विकेट किपिंग करायला लावली >> बच्चे की जान लोगे क्या ? जेमतेम तो इंग्लंड मधल्या डीबॅकलमधून सावरलाय नि द्रुष्ट लागण्यासारखा खेळतोय. त्याला बॅटींग वर लक्ष देऊ दे फक्त. आयपील मधे आधीच तीन गोष्टी करून थकणार आहे तो.

त्यने फारसे काहि केले नाही ह्यावेळी अजून वाखाणण्याजोगे. मला तरी आठवले नाही पटकन. >> दाखवलेली मॅच्युरिटी परफॉर्मन्स मध्ये ऊतरली नाही हे मान्य..पण मागच्या दोन सीझन्स ला दाखवलेला दांडपट्टा म्यान करून फेन्सिंगवाली साधी तलवार घेऊन एक हात पाठी बांधून खेळतो आहे असे वाटले.

बच्चे की जान लोगे क्या ?>> जीव जडला त्याच्यावर तर सगळीकडे तोच हवा आणि तो सगळेच बरोबर करेल ही अपेक्षा आपण फॅन नाही करणार तर कोण करणार..मग द्रविड असो की लोकेश. Proud
कारण लक्षात घे, अगरवालने एक पाय ऑलरेडी नॅशनल वनडे टीममध्ये टाकलेला आहे, अय्यर, पांडे आहेतच लगोलग....आणि आता त्यांनाही ईग्नोर करणे अवघड आहे.
जडेजा लवकरच (म्हणजे लगेच नाहे पण सावकाश) जाऊन अक्षर किंवा कृणाल येईल असेही मला वाटते...वय अक्षरच्या बाजूने आहे.

एखादा कॅच वि. ग्राऊंड फिल्डींग काय (काही डेटा आहे का की त्यांची ग्राऊंड फिल्डींग स्लो होती ह्यावर?
>>>>>

सचिन गंभीर सेहवाग तिघांची मिळून एकत्रित फिल्डींग होत असेल एवरेज. कारण सचिनचेही तेव्हा वय झालेले. त्त्यानेही रडतखडतच आपली करीअर वाढवली होती. सेहवागचे रिफ्लेक्सेस कमी झालेले. गंभीरचा फॉर्म गंडलेला. अश्यात तिघांना एकत्र खेळवणे म्हणजे शर्मा, धवन आणि कोहली यांना पुरेशी संधी ना मिळणे वा आलटून पालटून मिळणे जे त्यांच्यातले पोटेंशिअल पाहता अन्यायकारक ठरले असते.
तसेच हरभजनची धार कमी होताच नव्या दमाचा आश्विनला आणले. ज्याने कसोटीत ३०० वेगवान बळी घेतले. जडेजावर विश्वास दाखवला. जो आजही संघाचा अविभाज्य भाग बनतोय.
त्या त्या वेळी ते निर्णय चाहत्यांना रुचत नाहीत. पण स्वताकडे वाईटपणा घेऊन घ्यावे लागतात. हि हिंमत धोनीने दाखवली.

.....

आणी महत्वाचं २०१७ पासून धोनी चा फॉर्म गंडलाय, वय झालंय. त्याला २०१९ च्या वर्ल्डकपला खेळवायच्या हट्टापायी ऑलरेडी टीम चं नुकसान झालंय.
>>>>>>>>

फॉर्म गंडलेला नाही बोलू शकत. स्लॉग ओवरमधील मोठी फटकेबाजी बंद झालेली आणि शैली बदलत त्याने इनिंग बिल्डींग सुरू केली.
उदाहरणार्थ वर्ल्डकपच्या आधीच ऑस्ट्रेलिया दौरयात याच कौशल्यावर तो एकदिवसीय मालिकेत तो मालिकावीर ठरला. चेस करताना पुढे येत त्याने दरवेळी डाव सावरत जिंकून दिले. आपण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व्हाईटवॉश दिला ज्याचा मालिकावीर धोनी होता.

आणि धोनी हा नुसता फलंदाज नव्हता. तर विकेटकीपरही होता. तो देखील त्या वयातही भारतातला सर्वश्रेष्ट. म्हणून वर्ल्डकपला संघात पंत आणि कार्तिक असतानाही किपींग धोनीच करत होता. ते दोघे या कौशल्याबाबत त्याच्या आसपासही नव्हते. अर्थात पंतची किपिंग सहासारखी वा सहाची लिमिटेड ओवरमधील फलंदाजी पंतसारखी असती तर गोष्ट वेगळी. पण तसे नव्हते.
आणि मग फलंदाजी आणि किपिंगच्या जोडीला त्याचे कप्तान दिमाग, त्याची खेळाची समज, त्याचा स्ट्रीट स्मार्टनेस... कोहलीला विचारा तो कर्णधार असतानाही त्याला धोनीची काय आणि किती मदत होत होती.

राहिला प्रश्न वर्ल्डकपचा तर तेव्हा जे शर्माने आणि टॉप ऑर्डरने साखळी सामन्यात केले ते पाहता बाकीच्यांना करायला फार काही उरले नव्हते. पण सेमीला जेव्हा ते सारे गळपटले तेव्हा जडेजासोबत धोनीच उभा राहिलेला. आणि तो सामना हरलो आपण ते केवळ शास्त्री कोहलीच्या ईगो प्रॉब्लेम म्हणा वा नादान निर्णयामुळे जे धोनीला पंत, कार्तिक, पांड्या या सर्वांच्या नंतर पाठवला. जसे काही या तिघांनी वर्ल्डकपमध्ये आधी खूप काही भरीव कामगिरी केली होती. बाकी कश्याला खुद्द दादाही म्हणाला की धोनी पुढे आला असता तर पडझड तिथेच थांबली असती. पंत जो सॅंटनरला हवेच्या विरुद्ध चुकीचा फटका मारून बाद झाला तो धोनी समोर असता तर आला नसता... असो, चटका लावतो तो पराभव नेहमी. आणि त्यातला तो धोनीचा रन आऊट.. आजही !

...

बाकी हा धागा आयपीएल चा आहे. त्यामुळे इथे आयपीएल चं कसं सगळं वेगळं असतं वगैरे मखलाशी अयोग्य आहे.
>>>>>>>

हे काही कळले नाही.
धागा आयपीएलचा असला तरी ईंटरनॅशनल आणि आयपीएलमध्ये फरक आहे की नाही. देशासाठी खेळताना कप्तान जो संघ बनवतो. आणि खाजगी संघ मालकाच्या मर्जीनुसार बनवतो यात फरक आहे की नाही? दोन्हीकडे संघबांधणीचा हिशोब बदलतो हे मान्य करायला हरकत काय आहे ..

असो,
ऋन्मेषशी चर्चा करण्यात अर्थ नाही हा स्टॅण्ड आपण नक्कीच घेऊ शकता. विश्वास ठेवा याचा अर्थ आपल्याला माझे मुद्दे खोडणे जमले नाही असा मी कदापि घेणार नाही. ईथे प्रत्येकाला आपले म्हणने मांडायचा आणि हवे त्याला इग्नोर करायचा हक्क आहेच

पंत आयपील मध्ये नॅशनल टीम मधली जागा डोळ्यासमोर ठेऊन आधी न दिसलेली मॅचुरिटी दाखवण्यासाठी खेळ करतो आहे असे वाटले का कोणाला?
>>>>>>

हे मी पहिल्या दुसरयाच सामन्याला म्हटले होते. त्यालाही तसा रोल दिलाय असे वाटते. पण स्पर्धा जशी पुढे सरकतेय तसे मला बोअरही होऊ लागले. तो माझा फार आवडता प्लेअर कारण त्याच्यातले वेगळेपण. मॅच्युरीटीच्या नादात ते गमावले तर कदाचित घर का ना घाट का होईल.

आणखी एक ऑब्जर्व्ह झालेली गोष्ट म्हणजे आता जवळपास प्रत्येक संघ त्याला ऑफ स्टंप बाहेर गोलंदाजी करून रोखायला बघत आहेत. तो देखील इनिंग बिल्डींगच्या नादात तिथे जे सिंगल डबल एखादी बाऊंडरी वगैरे रन्स मिळतील ते घेतोय. पण २५-३० धावा झाल्यावर जेव्हा गेअर बदलायची वेळ येते तिथे तो सातत्याने बाद होतोय. गेल्या सामन्यात तर २० बॉल १४ अशी साधारण खेळी करून बाद झाला. त्यामुळे त्याने पुन्हा स्वताला रिबूट करणे फार गरजेचे आहे आता. उद्या दुपारी सॉरी आज दुपारी थोडाफार खेळला तर समजेलच त्याचा ईंटेंट..

अरे हो, वर उल्लेखलेला ऑफ स्टंपबाहेर गोलंदाजी करून रोखायचा प्लान हे गेल्यावेळी सेमीला धोनीने त्याच्याविरुद्ध केलेला. सहज आठवले

त्या २०११ च्या सिरीजला धवन टीममधेच नव्हता आणी गंभीर second highest run scorer होता भारताचा (फॉर्म!!). असो.

उद्या केकेआर वि. दिल्ली!!

@ फेरफटका, तिथे प्रामुख्याने धोनीच्या रडारवर सचिन असावा. २०११ विश्वचषकानंतर सचिनने आपल्या १०० व्या शतकासाठी किमान वन डे संघातली जागा तरी फार काळ ऊबवू नये हा हेतू असावा. पण सचिनला कसे थेट सुनावणार... कारण सचिन आपल्याकडे देव वगैरे.. असो !

प्रथम, कपिल देव लवकरात लवकर पूर्ण बरा व्हावा म्हणून मन:पूर्वक प्रार्थना ! अजूनही तरूण खेळाडूनी मैदानावर माॅडेल म्हणून अनुसरावा असा तो एक खेळाडू आहे !
इथली चर्चा, कोपरखळ्यांसहित, छान चालली आहे. इतके बारकावे ही मंडळी नेमके लक्षात ठेवते, याचं कौतुक वाटतं.
*जडेजा लवकरच (म्हणजे लगेच नाहे पण सावकाश) जाऊन अक्षर किंवा कृणाल येईल असेही मला वाटते...वय अक्षरच्या बाजूने आहे.* - ' अक्षर हा मला एक 'बेरक्या ' खेळाडू वाटतो ', असं मीं इथेच म्हटल होतं ( ' बेरक्या ',चांगल्या अर्थाने ). जरी खूप भरीव कामगिरी केली नसली, तरी गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण करतांना त्याच्या देहबोलीत खास जिद्द व चलाखी मला सतत जाणवते. कां तें निश्चित नाहीं सांगता येणार. बघूं कितपत माझी इंटयूशन बरोबर निघते तें.
हा कुरन ' ऑल टाईम गरेट ऑलराऊंडर ' च्या पंक्तित बसण्याच्या दिशेने वाटचाल करतोय, ही देखील माझी आणखी एक अशीच इंटयूशन !
असाच आपला एक विचार- हया आयपीएलची खासियत ही पण आहेच - आत्यंतिक सुरक्षा/सावधगिरी, रिकामे स्टेडियम व खेळाडूना घरच्यांची सतत काळजी ! प्रत्येक खेळाडूच्या खेळावर, त्याच्या मानसिकतेनुसार , या गोष्टींचा कळत नकळत कमी- अधिक परिणाम होतच असणार. खेळाडूंच्या आत्ताच्या कामगिरीचं मूल्यमापन करताना, हा ' डिसकांउट फॅकटर' ही लक्षात घेणं योग्य ठराषं.

( सचिन, गंभीर आणी सेहवाग (उपकप्तान) तिघांना एकत्र खेळवता येत नाही कारण फिल्डींग स्लो /अचपळ होते. इथे 'अचपळ' जर 'संथ' हया अर्थाने वापरला असेल तर तें साफच चूकीचं. त्याचा अर्थ नेमका उलटा आहे -
'अचपळ मन माझे, नावरे आवरिता' - मनाच्या वेगाने धांवतं, तें 'अचपळ' !
आमच्या गरीब बापड्या मराठीची उगीचच विकेट जायला नको, म्हणून म्हटलं! Wink )

*आजच दिलं नारळ व श्रीफळ पृथ्वीला* - एखाद्या सामन्यात वगळणं , याचा अर्थ असा होत नाहीं व तसं होवूंही नये. अशा परिस्थितीत नवोदित खेळाडूला शाल व श्रीफळ नाहीं, तर सल्ला व विश्वास देणंच शहाणपणाचं ठरतं. शाॅवर , किंवा कोणत्याही नवोदितावर, काट मारायची घाई करणं हें चूकीचंच !!

रहाणे गोल्डन डक !
मिडल ऑफ मिडल स्टंप !
१९५ टारगेट असताना बेभरवश्याचा असला तरी शॉ च हवा होता असे लंच टाईमला वाटलेले.
धवन आज पुन्हा खेळला. पुन्हा शतक मारले आणि जिंकवून दिले तर त्याला भारतरत्न द्यायला हरकत नाही.

Pages