पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

काल खूपच भयानक अनुभव आला. जेव्हा मला कळलं की अमावस्या आहे तेव्हा मी हिला सांगितले की सामान भर आपण आज हॉटेलमध्ये जाऊ. हिने लगेच सामानाची बांधाबांध केली आणि बाहेर जायला निघणार इतक्यात जोराचा वारा सुटला आणि आम्ही तिघे आमच्या समानासाकट मागे फेकले गेलो. दरवाजा जोरात बंद झाला. मी नन्तर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण यश नाही आलं. पोलिसांना फोन लावायला गेलो तर मोबाईलला रेंज न्हवती. फक्त वायफाय सुरू होतं त्यामुळे इथे मायबोलीवर मेसेजेस करू शकत होतो. व्हाट्सएप कॉल करणार इतक्यात त्या दुष्ट शक्तीचा आवाज आला 'खबरदार कॉल केलास तर , रक्ताचे पाट वाहतील इथे'. यानंतर मी शांत बसून राहिलो. ही खूप घाबरली होती. मी हिला बोललो जा दोन कप चहा तरी ठेव. इतक्यात ती दुष्ट शक्ती छतावरून इकडे तिकडे पळू लागली. रात्रभर आमच्या आसपास ती शक्ती फिरत होती. नन्तर कधीतरी सकाळ झाली आणि आम्ही वाचलो.

दुष्ट शक्तीला चहा विचारला नाही.. तर ती चिडणारच ना..

Submitted by श्रवु्
अगदी अगदी.

अनिळजी, तुम्ही त्या शक्तीला चायनास्ता देऊन टाका बघू.
आणि एक मुलाखत घ्या.ती इथे छापा. और एक सेल्फी तो बनती है।

कोणत्या पेज वर आहे व्हिडीओ ,
>>>>
तो मागच्या पेजवरचा छतावर लटकलेल्या भूताचा..
पण तिथे बहुधा आता विडिओ काढून फोटो टाकला आहे..

हो हो अतुलजी दुष्ट शक्तीला सात्विक पदार्थ चालत नाही. तामसी पदार्थ लागतात. मटन दारु शिवाय पर्याय नाही. Lol

हा फार महत्वाचा मुद्दा आहे... खरेच कोंबडी वगैरे द्या दुष्ट शक्ती ला.. उगा भेंडीची भाजी चपाती वगैरे ऑफर करून उपयोग नाही...

खूप छान अनिळ जी उर्फ बोकल त.
असेही मी emotional fool आहेच पण पुन्हा एकदा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. कुणावर लगेचच विश्वास ठेवू नये याची पुन्हा एकदा शिकवण मिळाली.

उगा भेंडीची भाजी चपाती वगैरे ऑफर करून उपयोग नाही...
बरोबरे..... ज्यायला उगाच ते भुत बुळबुळीत व्हायचे भेंडी खावुन खावुन

शुद्ध शाकाहारी माणसांचे आत्मे असतील तर?
पॉईंटे...पण एकदा का मेले तर रक्तच किंवा ताजे फ्लेशच लागते (इति. हॉलीवुड मुवी कृपा) म्हणुन मांसाहारी बोललो मी.

दोन्ही ठेवायचे त्याला (भुताला) जे आवडेल ते खाईल न खाल्ला गेलेला मांसाहार बोकलत "त्या सुनेला" देतील.

नवरात्र चालू आहे ना.. मग दारू मटण बंद.. चहा चालेल कि ..दुष्ट शक्तीचा हँगओव्हर पण जाईल.. छतावरून डायरेक्ट खाली बेडवर येऊन झोपतील..

बोकलत अरे निदान वेगळ्या शैलीने तरी लिहायचे.. पकडले गेलात लगेच...
का जो आहे तो मुद्दाम बोकलत शैली वापरतोय??

अमानवीय प्रकारही मानव निर्मितच आहे. त्यामुळे त्यांनाही शा/मांं , पेताड/टीटोटलर , धर्म इत्यादी सर्व नियम लागू

अनिलजी आज काहीतरी भयानक घडवा हो.. मी आजपण १२.३० पर्यंत जागी राहणार.. कालचा सेकंड हॅन्ड दुष्ट शक्तीचा फोटो नको.. आतापासून चित्र काढायाला सुरवात करा.. रात्री १२.00 पर्यंत पूर्ण होईल..

झालं सिद्ध.
अनिळजी तुम्ही नाही.

आजपासून तर अनुभव वाढायला हवेत, मी ऐकलंय की नवरात्रीत भुते एकदम फॉर्म मध्ये असतात, देव मंदिरातून बाहेर येत नाहीत सो यांचेच राज्य असते

एन्जॉय

Pages