पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

काल खूपच भयानक अनुभव आलेत पण इथले लोक कितपत विश्वास ठेवतील माहित नाही त्यामुळे इथे न लिहिलेलंच बरं.>>>>

उगाच उत्सुकता चाळवलीत. आता लिहाच.

आणि नागपूरला अंनिसचे ऑफिस आहे, त्यांच्याशी संपर्क करा.

हे बरंय. धागाकर्ते काल्पनिक समस्या निर्माण करून इथे भुतांना मानणारे आणि न मानणारे यांचे भांडण enjoy करत आहेत.

मी कोणाचाही डुआयडी नाही आणि मला येणारे अनुभव खरे आहेत. रात्री साधारण दीड च्या सुमारास मला जाग आली. स्वयंपाक घरात भांड्यांचा आवाज येत होता.स्वयंपाक खोलीत गेलो तर सगळी भांडी व्यवस्थित होती. पाणी प्यायला जाणार इतक्यात पाठीमागून कोणीतरी झपकन गेल्याची जाणीव झाली. पुढच्या क्षणात बाथरूमधला दरवाजा हवेने जोरात आदळू लागला. विशेष म्हणजे झोपताना त्या दरवाजाला नेहमी कडी घालतो. बाथरूमजवळ गेल्यावर आतमध्ये कोणीतरी असल्याची जाणीव झाली. पण प्रत्यक्षात आत कोणीही न्हवतं. पुन्हा झोपायला जाणार इतक्या बाथरूममधून कोणीतरी जंगली प्राणी गुरगुरतोय असा आवाज आला. पण पाठीमागे बघितलं तर कोणीही न्हवतं. या सगळ्या प्रकरणामुळे रात्री झोप व्यवस्थित नाही लागली.

अनिळजी
आपण अंनिस शी संपर्क करा
आपण मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या
यातून मार्ग नक्की निघेल.

प्रकाशजी त्यांना सल्ले नको आहेत, धागा चालवायचा आहे.
त्यांनाही यात काही दोष देता येणार नाही काही तरी अमानवीय ऐकण्याची आणि त्यावर "तसले" उपाय सांगण्याची इथे काहींना खुमखुमी आहे, ते पुढं काय झालं सांगा अनिळजी करत त्यांना खतपाणी देताहेत.

एके ठिकाणी एक एरिया आहे. तिथे एक गुंड जखमी होता आणि सर्व घरात पाणी मागत मेला. त्याला कोणीही पाणी दिले नाही. आजही त्या एरियात दारावर थाप पडते आणि पाणी मिळेल का आवाज ऐकू येतो.

मग अनु आपण त्याला पाणी द्यायचे आणि आपल्याला हवे ते काम त्याच्याकडून करून घ्याचे..भांडी घासून घ्याची..

स्वयंपाक घरात भांड्यांचा आवाज येत होता.>> फारच गंभीर आहे हे. एकतर भुताला भुक लागली असावी किंवा ते भांडी घासुन तुम्हाला काही इशारा देत असावे.

वीरू बहुतेक भांडी रिकामी असतील.. बहुतेक भूत भुकेलं असेल आणि भांडी रिकामी बघून भांडी आपटली असतील..

पुढच्या क्षणात बाथरूमधला दरवाजा हवेने जोरात आदळू लागला. >> तुम्ही लवकरात लवकर दरवाजाच्या बिजागर्‍या बदलून घ्या, गंजल्या असतील. आमच्या सुकडू सुतारला पाठवतो पाहिजे तर.

प्रणवंत, नाही
आम्ही कोल्हापूर ला हॉकी स्टेडियम च्या भागात एकदा नवऱ्याच्या मित्राना भेटायला गेलो होतो तेव्हा हा विषय चालू होता.मग त्यावरून 'दार उघडून 3-4 जणांनी पाणी दिलं तर परत दारं वाजून 'बाथरूम मिळेल का' वाला भुताटकी प्रकार चालू होईल वगैरे जोक चालू होऊन विषय तिथेच संपला.

नाही, ते मुळातले वाक्य चावट असेच आहे, पण दोन- तीन महिन्यापूर्वी मी एका मासिकात हा शब्द वाचल्याने मला हसू आले. त्यामुळे इथे लिहुन बघीतले.

बहुतेक भांडी रिकामी असतील.. बहुतेक भूत भुकेलं असेल..>>
अनिळजी आज जास्तीचा स्वयंपाक करुन ठेवा. भुताचा काय भरवसा, रात्री तुम्हाला उठवुन जेवन मागत बसेल.

अनिलजींना नक्कीच मांजराचीच गुरगुर ऐकु आली असणार. रात्री चूकुन कधीतरी झोपेत त्याच्या पायावर किंवा हातावर यांचा पाय पडला असेल ते लक्षात ठेऊन ते चिडले असेल. नाहीतर एखादा वाघ फिरत फिरत आला असेल तर?

https://www.youtube.com/watch?v=lHw1ue6nWEY

अनिलजींना नक्कीच मांजराचीच गुरगुर ऐकु आली असणार. रात्री चूकुन कधीतरी झोपेत त्याच्या पायावर किंवा हातावर यांचा पाय पडला असेल ते लक्षात ठेऊन ते चिडले असेल. नाहीतर एखादा वाघ फिरत फिरत आला असेल तर
इयत्ता 3 क तुकडी

Pages