काहीतरी उपाय सुचवा.

Submitted by आगबबूला on 20 September, 2020 - 05:17

सध्या माझं मधल्या मध्ये मरण होतंय. वर्ष होत आलं मी एक पेईंग गेस्ट म्हणून राहतोय. लॉकडाउन सुरू व्हायच्या आधी सगळं व्यवस्थित सुरू होतं. म्हणजे आम्ही आठवड्यातून चार दिवस बहुतांशी नॉन व्हेज खातो. ज्यांच्याकडे राहतोय ते काका, काकी आणि आजी प्युअर व्हेज आहेत. त्यामुळे नेहमी व्हेज पदार्थांची देवाणघेवाण व्हायची. लॉकडाउन सुरू झालं आणि ज्यांच्याकडे राहतोय त्यांचा मुलगा त्याच्या फॅमिलीसोबत इथे राहायला आला.सून भांडखोर असून त्यांच्या घरच्यांसोबत सारखी भांडत असते. ते दोघे नॉनव्हेज खातात त्यामुळे आम्ही नॉनव्हेज काही केलं की त्यांना द्यायला सुरुवात केली. हळूहळू सून कंसिडर करू लागली की आठवड्यातून चार दिवस आम्ही त्यांना नॉनव्हेज देणारच. नॉनव्हेजचा वार असेल त्या दिवशी सारखी आमच्याकडे काही ना काही कारणास्तव येणे, स्वयंपाक रुमबाहेर फिरणे असल्या गोष्टी करायला लागली. नाही दिलं की मागून घ्यायला लागली. नॉनव्हेज केलं आणि दिलं नाही तर त्यांच्या घरच्यांसोबत भांडते आणि उपाशी राहते. एक दोनदा तर बायकोच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांच्यासमोर बायकोवर वैतागून तू नॉनव्हेज कधी देणार आहेस बोलली. तरीही आम्ही काही बोललो नाही. सहन करत राहिलो. आता ती बाई घरच्यांसोबत व्यवस्थित राहत नाही म्हणून आजी बोलतात की या बाईला नॉनव्हेज केलं की देत जाऊ नका. असं मधल्यामध्ये फसल्यासारखं झालंय.रूम सोडून दुसरीकडे जायचा विचार करतोय पण या कारणास्तव रूम सोडणे मनाला पटत नाही. काका, काकी, आजी यांच्यासोबत खूप छान नातेसंबंध जुळलेत. यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

घराच्या दरवाज्यातच बाहुली वगैरे अशी ठेवा.. ती तुमच्यकडे यायलाच घाबरली पाहिजे..(बाहुलीची अशी काही स्टोरी रंगवून सांगा कि )

हि गोष्ट आधी वाचली आहे पण त्यात सून नव्हती. बायांगी होती.. हो कि नाही?

भुताटकी आहे काय सुनेवर?नॉनवेज नाही दिले कि इतकी चिडते.
मग तीला आधी मांत्रिकाला दाखवायला सांगा काय बाधा -बीधा असेल तर आधी ते दुर करतील ,तुम्ही कशाला उगीच रुम सोडायचा त्रास घेता.... Proud

आतातरी तुम्हाला पटलं ना, माझ्या सगळ्या गोष्टी सत्य घटनेवरच आधारित असतात.>>> Lol
जास्त तिखट मिसळून देत जा >>> अन्नाची कशाला नासाडी करावी. त्यापेक्षा तिला एका डब्याचा काय चार्ज आहे ते सांगा. किंवा स्पष्ट शब्दात नकार देणे उत्तम.

जे लोक नाॅनव्हेज खात नाहीत त्यांनाच फार चटक लागते हा माझा अनुभव आहे. तुम्ही आयते ताट देता म्हणून प्रकरण हाताबाहेर गेले. एक दिवस कच्चे देऊन बघा किंवा त्यांच्या घरात बनवून एकदा दाखवा. स्वतः करावे लागू नये म्हणून काय कारण देतात यावर एक निबंध लिहावा लागेल. (तुम्हाला फक्त नाॅनव्हेज चा फटका बसला आमच्याकडे तर फुकट अपेयपानाचा ही फटका बसला. शेवटी घर बदलावे लागले. )

सुनेचा वाटा काढून त्यात जास्त तिखट मिसळून देत जा बोकलत...>>>. याने काहीही फरक पडणार नाही, उलट ती जेवताना आम्हाला शिव्या देत जेवेल ते वेगळंच.
@श्रवू, यानेही काही फरक पडणार नाही, एकदा तर व्हाट्सएप मेसेज करून मागवलं होतं.
स्पष्ट शब्दात नकार देणे उत्तम.>>> हे वाटतंय इतकं सोपं नाही.
@सियोना, सहमत +1111

माझी पण एक शेजारी होती.आम्ही वीकेंडला नॉनव्हेज केलं की ती वासावरून बरोबर ओळखायची..ती व्हेज आहे.तीला नॉनवेज बनवता पण येत नाही पण तीच्या नवर्याला खूप आवडते..मग ती मला मागून घ्यायची.. नंतर नंतर मी बनवले कि स्वतः हून द्यायचे..आता तेच गेले घर बदलून दुसरी कडे...

नाॅनव्हेज महाग असल्याने सातत्याने ते फुकट देणे परवडणार नाही हा मुद्दा कुणीही मान्य करेल. हे त्यांना समजूतदारपणे सांगा. ते ऐकतील. नंतर नाॅनव्हेजचे पैसे (ते बनवण्यासहित) भाड्यातून कट करून बाकीचे भाडे देत चला.

द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. दोघे खाऊन खाऊन किती खाणार. पण मुद्दा हा आहे की त्यांच्या घरचेच बोलताहेत देऊ नका कारण ते देवपूजा खूप कडक पाळतात, आणि ही बया मागायला येते. त्यामुळे सगळा तणाव निर्माण झालाय.

@अतुलपाटील घरोब्याचे संबंध असतील तर भाडे वजा करता येत नाही. नाॅनव्हेज महाग तर असतेच पण त्याला स्वच्छ करायला मेहनत लागते (उदा: मासे, कोळंबी) मसाला वाटण, सढळहस्ते वापरलेले तेल इतका खर्च 2 वाटी रश्शासाठी लोक करत नाहीत. वरुन उरलेले नाॅनव्हेज शिळे दुसर्या दिवशी कोण खाणार. अशी बरीच नाटके असतात. त्यात फुकट दारू मिळत असेल तर कोण नाही म्हणेल. स्वतः इतका खर्च करणार कोण.

नका कारण ते देवपूजा खूप कडक पाळतात,........ मग त्यांच्या घरात भले वेगळी खोली का असेना नॉनव्हेज कसे चालते?
व्हेज khanaryaanna नॉन व्हेज चा वास चालत नाही.

द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. दोघे खाऊन खाऊन किती खाणार. पण मुद्दा हा आहे की त्यांच्या घरचेच बोलताहेत देऊ नका कारण ते देवपूजा खूप कडक पाळतात,
हेच कारण नाही का सांगता येणार की तुमच्याच घरच्याना दिलेल आवडत नाही? का तुम्ही पण भिडस्त Happy

>> हेच कारण नाही का सांगता येणार की तुमच्याच घरच्याना

+१ सहमत
सुनेला म्हणायचे "अमी काय करू शकत नाही. वरनं ऑर्डर आहे आम्हाला" Proud

मग त्यांच्या घरात भले वेगळी खोली का असेना नॉनव्हेज कसे चालते?>>> आधी खायचे, अलीकडे सोडलंय त्यांनी. आमची रूम तशी अलिप्त असल्याने चालतं त्यांना. कधीतरी क्वचित त्यांना पण द्यायचो. खातात ते Lol Lol
बादवे तुम्ही भाडेकरू आहात की पेयींन्ग गेस्ट??>> मला वाटतंय मी दोन्ही आहे.
हेच कारण नाही का सांगता येणार की तुमच्याच घरच्याना दिलेल आवडत नाही?>> मग तर फुल हाणामारी होईल. रक्तपात, दंगल.
मिरजेतले घरमालक कोण आहेत ते सांगा, मग बंदोबस्त कसा करायचा ते सांगू>>> Lol Lol नको सध्यातरी.

Pages