पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

>> Submitted by बोकलत on 20 October, 2020 - 17:58

काही असो अनिळजीचे "डू आयडी" भूत बोकलत यांची पाठ सोडणार नाही

ते बोकलत नसावेत ..
बोकलात ह्यांचे अमानवीय वर irritate झालेले शत्रू असतील कुणी Lol

तेवढ्यासाठी कोण असे धागे काढत बसेल? हो पण आम्ही दोघे नवराबायको आणि लहान मुलगा हा डिटेल म्याच होतोय मात्र Wink
माबोकर कोणी काही मदत मागायचा अवकाश की लगेच सगळे धावत येतात. त्यांच्या याच सद्गुगुणाचा दुरुपयोग होतो कोतबोवर. जाऊद्या तेवढीच करमणुक पण मला आधीच शंका होती म्हणुन मी पहिल्याच पानावर अनिसकडे जाण्याचा सल्ला दिला होता.

ह्या धाग्यावर पहिली xomment मझी आहे, गमतीत दिलेली।।
नंतर सगळ्यांचे गंभीर प्रतिसाद बघून मी एडिट केली
Regretting

अनिळजी आज भाजी नको मला. बोकडाचं मटण आन दोन तीन किलो. भाजी दिसली ताटात तर याद राख. तुमची सेवा मला आवडायला लागली आहे. मी तुला कुठेच जाऊन नाही देणार आणि माबोकरानो तुम्हाला पण बघून घेईन एक दिवस.
images (4).jpeg

भूताला दाताच्या ट्रिटमेंट ची, शिवाय केसांत चांगले सिरम आणि कंडीशनर वापरण्याची प्रचंड गरज आहे.
शिवाय काचबिंदू ऑपरेशन ची पण.

भरत अनुमोदन..मायबोलीकरांनी काळजीपोटी इतके सल्ले दिले..
मी तर दिवसाला 2 3 वेळा हा धागा उघडून पहायची. काय झालं असेल अशी काळजी वाटत राहायची. आणि धागाकर्ते इथे खुशाल लोकांना फसवून त्यांची मज्जा पाहत बसले अजुन वरून आपल्या छोट्या मुलाचा उल्लेख करून सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न केला हे अतिशय निंदनीय आहे. कोतबो लोकांच्या मदतीसाठी आहे. लोकांना फसंवण्यासाठी नाही असं मला तरी वाटते.

>> आजकाल लोकांना फसवलं गेल्याचं वाईटही वाटेनासं झालंय.

किती गंभीर फसवणूक आहे त्यावर अवलंबून. अपेक्षाभंगाने विनोद होतो. पण अपेक्षा गंभीर स्वरूपाच्या असतील तर मात्र दु:ख होते वाईट वाटते. इथे या निमित्ताने चर्चा झाली ती व्यर्थ नाही गेली हेमावैम. धाग्यांच्या निमित्ताने विविध अंगानी चर्चा होते हेच खूप आहे, निदान मला तरी.

चर्चा झाली ती व्यर्थ गेली नाही असं माझंही मत आहे.
पण 'माहिती हवी आहे' किंवा कोतबो या सदरातले धागे गांभीर्याने घेण्यासाठी असतात. यापुढे खरोखरच कुणाला मदत हवी असेल तर ती गांभीर्याने दिली जाईल का, याची शंका वाटते.
मला तर हा एक प्रकारचा सर्व्हे वाटला. आणि सर्व्हे घेताना विरंगुळा सदरात धागा काढून प्रामाणिक प्रतिसाद आले नसते हेही आहेच.

मी प्रामाणिक सल्ला दिला
नंतर आपण येडे बनलो याची गंमतही वाटली
सल्लेवाधिकारस्ते मा जेन्यूईनिटेशु कदाचन ||

अनु Proud

Pages