पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

अनिळजी हा आयडी अमानविय शक्तीना घाबरतो आणि बोकलत आयडी शिंगावर घेतो.
अजुन कोणता आयडी आहे का? दोन्हींचा मध्य सांधणारा....>>> Lol

अजुन कोणता आयडी आहे का? दोन्हींचा मध्य सांधणारा>> एक आहेत. मागे बाबा व्हायला निघाले होते. Light 1

मागे बाबा व्हायला निघाले होते.
>>>>
:आईने अकबरी मोड ऑन:
कोणाच्या पर्सनल बाबतीत आपण कशाला लक्ष घालायचं, कोण आई बाबा होतंय त्याची चारचा करायला ते काय सैफरीना आहे का

:आईने अकबरी मोड ऑफ:

कोणाच्या पर्सनल बाबतीत आपण कशाला लक्ष घालायचं, कोण आई बाबा होतंय त्याची चारचा करायला ते काय सैफरीना आहे का>> अरे देवा! अहो ते बाळाचे बाबा नाही, साधुबाबा होणार होते. तसा धागा काढला होता त्यांनी.

जुनी लोकं आपण जुनी आहोत हे सिद्ध करायला सारखी आईने अकबरीची आठवण काढत असतात असं आपले च्रप्र्स म्हणतीला आता! Proud Lol

Lol

मानवदा, आता ते काय आहे हे आईने अकबरी विचारतील आणि मग मी जुना डायलॉग 'अरे ये आईने अकबरी नाही जानता' असं म्हणत त्यांना लिंक देईन असं माझं स्वप्नं होतं खरंतर Rofl

आयुष्य सिम्पल आहे. कॉम्प्लिकेटेड करण्यात काही अर्थ नाही.
>>>>

ओ बोकलत, हे वाक्य मी बरेचदा वापरतो. तुम्ही नका वापरू. आधीच मानव पृथ्वीकर म्हणजे बोकलत म्हणजे एकच व्यक्ती अशी अफवा आहे मार्केटमध्ये. त्यात मानव पृथ्वीकर आणि माझा एक व्हॉटसपग्रूपही कॉमन आहे. त्यात आता आपण तिघेही या धाग्यावर उपस्थित आहोत. उगाच संशय घेणाऱ्यांना खाद्य पुरवू नका Happy

>> आईने अकबरी

हे मी जेंव्हा जेंव्हा मायबोलीवर वाचतो तेंव्हा तेंव्हा मला "आईनं दुपारी यमूनातीरी" हे गाणे हटकून आठवतं.

बायदवे अनिळजी झपाटलेले घर सोडून गेले तिथे आता गप्पांचा अड्डा भरतोय वाटतं Lol

मला ही कविता आठवते:
शिंगे रंगविली
बाशिंगे बांधीली
चढविल्या झुली
आईने दार!
(ऐनेदार)

जुनी लोकं आपण जुनी आहोत हे सिद्ध करायला सारखी आईने अकबरीची आठवण काढत असतात असं आपले च्रप्र्स म्हणतीला आता!
>>>+ 1

Pages