पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

पाच वर्षापर्यंतच्या मुलांना असे प्रकार दिसतात असे म्हणतात.
सध्या तरी घराच्या प्रवेशद्वारावर 'पंचमुखी मारुतीचा' फोटो लावा - https://www.hindugodwallpaper.com/images/gods/zoom/1539_panchmukhi-hanum...

घरात शक्यतो सतत 'पंचमुखी हनुमान कवच' लावून ठेवा - https://www.youtube.com/watch?v=-CRoUn65_Bo

(जुना एखादा feature/smartphone असेल तर त्यात पंचमुखी हनुमान कवच mp3 format मध्ये डाउनलोड करून repeat mode वर ठेवू शकता.)

घराचे वातावरण, स्थिती, इंटिरियर कसे आहे इत्यादी आणि एकंदर परिस्थिती याविषयी लिहिले नाहीत आपण. या गोष्टी सुद्धा विचारात घ्याव्या लागतात.

माझ्या मित्राने एक घर घेतले होते. बरीच वर्षे झाली त्याला. असा अनुभव नाही पण उदास खूप वाटत होते त्याला व त्याच्या कुटुंबाला त्या घरात. सतत गूढ वातावरण. प्रकाशयोजना नीट नव्हती. हवा खेळती नव्हती. रीनोव्हेट करायचा खर्च पण खूप होता. अखेर त्याने विकून टाकले.

आजूबाजूला चौकशी करा. स्वस्तात मिळाला म्हणजे कायतरी आहे नक्की त्यात. एक शक्यता म्हणजे त्या शक्तीचं कनेक्शन आजूबाजूला कुठेतरी असू शकतं. तुमच्या परिसराच्या आजूबाजूला वाहतं पाणी(ओढा, नदी) असेल आणि त्याकाठी एखादं पडझड झालेलं झाड असेल तर त्या झाडाला अमावसेला एक नारळ देऊन बघा. दुसरी शक्यता म्हणजे ते जे काही आहे ते त्या घरातच असेल तसं असलं तर वर मायबोलीकरांनी सांगितले उपाय करून बघा.

इथे एक स्वप्ना हरिहर म्हणून आहेत,त्यांनी अमानवीय धाग्यात त्यांना घरात येणारे बरेच वेगवेगळे अनुभव लिहिले आहेत,
समस्या खरी असेल (,त्यांची आणि तुमचीही)तर काही मार्ग काढू शकता.

आणखी एकजण होती. तिने पण तिच्या घरी आलेले अनुभव लिहिले आहेत.तिच्याही मुलाला ती व्यक्ती दिसायची.पण वाईट अनुभव नव्हते. आयडीचे नाव आठवले तर लिहीन.

भीतीदायक आहे.घर बदलणं हा मार्ग जास्त बरा वाटतो.तिथे काही असेल किंवा नसेल पण सर्वांची मनाची ही नकारात्मक स्थिती सतत असायला नको.आता सध्या घरात आहे तोवर रोज संध्याकाळी राम रक्षा, मारुती स्तोत्र आणि सुगंधी धूप/शेणी जाळणे, एकंदर हवा खेळती ठेवून वातावरण प्रसन्न ठेवणे हे करता येईल.एक सतत मंत्रजप करणारे गॅजेट मिळते तेही घरात चालू ठेवता येईल.काही असेल किंवा नसेल, मन जितकं खंबीर तितकं यातून तुम्ही सगळे सुरक्षित बाहेर पडाल.

तुम्ही लिहिलंय की तुमचा दोन वर्षांचा मुलगा अदृश्य व्यक्ती शी बोलतो. हे जर चिंतेचे कारण आहे. तुम्ही रहायला कुठे आहात?
जर गाणगापूर ला जाणे शक्य असेल तर त्याला घेऊन जा एकदा. फरक पडतो. अंधश्रद्धा वाटत असेल तर दुर्लक्ष करा.
अजून एक म्हणजे रोज संध्याकाळी कापूर वात पेटवा अन कुळाच्या वारी गुलाल किंवा कुंकू चिमटीत घेऊन कुळदैवताचे नाव घेत क्लॉक वाईज पूर्ण घरात फिरवून शेवटी दरवाज्यात बाहेर तोंड करून उभे राहायचे अन तो गुलाल / कुंकू बाहेरच्या बाजूला फुंकयचा.

खरंतर माझा विश्वास नाही आहे या सर्वांवर पण हे साधे उपाय आहेत अन अघोरी नाहीयेत मग मनःशांती साठी करायला हरकत वाटत नाही.
गाणगापूर चा अनुभव कुटुंबातील एका व्यक्तीला आलाय. गाडीने नुसती गाणगापूरची वेस ओलांडली अन त्रासात फरक पडला होता.
पण शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न असतो. अगदी वर्षभरापूर्वी मीही नास्तिक होते
असो, पटले तर घ्या.
माझा अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू बिलकुल नाहीये

आणखी एकजण होती. तिने पण तिच्या घरी आलेले अनुभव लिहिले आहेत.तिच्याही मुलाला ती व्यक्ती दिसायची >>> dreamgirl (स्व प्नसुंदरी )का? .
खतरा अनुभव होते तीचे पण
Mi,_anu +10000.

असले प्रकार होताहेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मला मुरारी यांची कथा आठवली हे वाचून.

पण तुम्ही म्हणताय तर खरे असणार. भटजींना विचारून शांती वगैरे करून घ्या, फरक पडेल. मनात शंका/भीती असली तर वाऱ्याने हललेला पडदाही घाबरवतो.

घर बघायला गेलात तेव्हा अस्वस्थ वाटले हीच धोक्याची घंटा होती. घर आवडायला हवे हा निकष सर्वात वर हवा, बजेटमध्ये बसतेय का हा निकष त्यानंतर यायला हवा.

Light 1
जर "खरोखरच" तिथे तुम्ही म्हणता तशी बाधा असेल तर वर सुचवलेले उपाय काम करणार नाहीत. ती ब्याद काढायच्या नादात उगाच "नसलेला" त्रास वाढवून घेसाल. अशे किरकोळ उपाय करून "खरेखुरेभूतप्रेत" गायब झालेले मी अजून नाही पाहिले कधी. हाकलून लावायचा प्रयत्न केल्यास "खरेखुरे" पिशाच अशे गप राहत नाहीत तर चांगले घोडे लावतात. यासाठी "खराखुरा" जाणकार "ऑफलाईन" शोधा. बादवे खरे जाणकार पैसे घेत नाहीत. त्या गल्लेभरू भटांच्या नादाला नका लागू . अजून काही एक्सपर्ट सल्ले मिळतीलच इथे.
पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. >>ज्या व्यक्तीने तुम्हाला घर विकले त्याने स्वतः असे प्रयोग करून पहिले नसतील काय???
अर्थात तरी तुम्ही वरचे काही एक्सपेरिमेंट करून पाहू शकता पण नन्तरची अपडेट द्या मात्र. आवडेल ते अपडेट वाचायला.
Light 1

माझा स्वतःचा तरी असा वास्तू पछाडलेली असण्यावर विश्वास नाही.
तुम्ही घर नुकतंच विकत घेतलंय म्हणताय तर लगेच विकून टाकणंही सोपं नाही. तिथेच राहणार असलात तर मनाला शांती मिळेल असे काहीही, तुम्हाला पटणारे उपाय करा.

तुम्हाला पटणारे, हे महत्त्वाचं. उदा. मला असे अनुभव येत असते तर मी त्या अनुभवांच्या मागे काय कारणं आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला असता. एका जरी आवाजाचं नेमकं कारण मी शोधून काढू शकले तरी माझी अस्वस्थता बरीच कमी होईल. (म्हणजे उदा. मध्यरात्री भांडी पडली कारण उंदीर होता) पण हा उपाय मला पटणारा झाला. तो तुम्हाला पटेलच असं नाही.

अंनिसच्या लोकांना संपर्क करा कारण ती मंडळी उत्सुक असतात अश्या केस हँडल करायला. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे भाड्याने रहा. त्यांना तिथे काही काळ राहून आल्यावर होऊन जाऊद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. नसेल काही तर नंतर बिनधास्त जा राहायला.

भीत्यापाठी ब्रह्मराक्षस

जर तुम्ही भुत - प्रेत - पिशाच्च / negative energy मानता तर सदगुरु तत्व - परमात्मा - परमेश्वर / positive energy ह्याचीसुद्धा शाश्वती मनात कायम ठेवा आणि वैयक्तिक श्रद्धास्थानानुसार उपास्य दैवताची नित्य आराधना शक्यतो एकत्र कुटुंबाने मोठ्या आवाजात म्हटल्यास त्या ध्वनिचा पॉझिटिव्ह परिणाम वास्तुवर जाणवत जाईल. रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र तसेच श्री दत्त आराधना / स्तोत्र (to be specific दत्तमाला मंत्र आणि दत्तस्तव स्तोत्र इकडेच मायबोलीवर स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह आहे त्यात मिळेल http://www.maayboli.com/node/13468?page=1#comment-541644 )

अनेकदा जुन्या स्मशान / दफन भूमिवर जी नवीन बिल्डिंग कंस्ट्रक्शन उभारली जातात त्यात असे अनुभव काही व्यक्तींना येऊ शकतात. असे काही घडलंय का ह्याची पडताळणी आजुबाजूस वास्तव्यास असलेल्या जुन्या पिढीतल्या मंडळीकडून होऊ शकते. त्या राहत्या घरात कधी काही अपमृत्यु (खून / आत्महत्या) घडलीय का ह्याची चौकशी नजिकच्या पोलिस स्टेशनला करू शकता. म्हणजे दैव वादी उपाय योजना / होम हवन आणि याग वगैरे करताना संबधित अधिकारी व्यक्तिस घराची मूळ समस्या अधिक विस्तृतपणे मांडता येईल.
रात्री झोपताना अगदीच मिट्ट अंधार न करता किमान झोपण्याच्या खोलीत आणि शक्य असल्यास सर्वच खोल्यात ५wt एल इ डी बल्ब / शुभ्र् प्रकाश योजना ठेवल्यास बऱ्याच कारणांसाठी फायदा मिळू शकतो.

सर्व लोकांनी प्रतिसाद दिलेच आहेत, माझेंही 2 आणे, मुलाशी एकदा बोलून बघा, नेमका काय आहे ते, मुले सांगतात, आजूबाजूला चौकशी करून पाहा, त्या घरात नक्की काय घडले, जर घर रिसेल चे असेल तर, पण बिल्डिंग ची जागा भारलेली असेल तर ,इतर लोकांना अनुभव आहेत का ते पहा
1 राज राम रक्षा म्हणा,
2 मुला साठी जाणकारया कडून काही सुरक्षा कवच करून घ्या
वर जिद्दु यांनी सांगितले तसे असे लोक कमी आहेत पण पैसे घेत नाही
उत्तम उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण , किंवा चंडी याग पण हे सर्व गुरुजी किंवा जाणकार यांच्या सल्ल्याने करा नाहीतर काही करता काही व्हायचे , आणि शक्य असेल तर दुसरीकडे राहायला जाणे उत्तम उगाच विशाची परीक्षा नको
अगदी जवळच्या कुटुंबातील किस्सा आहे शापित वास्तू मुले वाताहात झाली, तुम्हाला घाबरून टाकत नाही पण काळजीने0 लिहित आहे, काळजी घ्या

मलाही त्यांच्या मुलाची काळजी वाटली.
पण ते काहीच उत्तर देत नाहीयेत इथे कुणालाच, म्हणून ह्या प्रश्न/ धागा टीपी तर नसावा ना असे वाटतेय

उत्तम उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण , किंवा चंडी याग पण हे सर्व गुरुजी किंवा जाणकार यांच्या सल्ल्याने करा नाहीतर काही करता काही व्हायचे , आणि शक्य असेल तर दुसरीकडे राहायला जाणे उत्तम उगाच विशाची परीक्षा नको >>> अगदी अगदी .
खरोखरच्या बाधित जागेत सामान्य लोकांनी असे पाठ सुरु केल्यास एकतर काही परिणाम होतच नाही आणि झालाच तर ते जे काही आहे ते मोठा आघात करू शकते. ज्यांची सिद्ध उपासना आहे देवी किंवा दत्त यांची तेच जागा बांधून असे पारायण करू शकतात. तिथे आधी शुद्धीकरण करावे लागते , बरेच सोपस्कार असतात. उगा आपले बसले पोथी मांडून आणि गेलं ते पिशाच पळून असे गोष्टीतच घडू शकते. असल्या गोष्टींवर इथे लिहिणे बंदच केलंय पण खरोखर कुणाला असेल समस्या तर उगाच नुकसान नको म्हणून थोडक्यात सांगितलं. बाकी ज्याचं जळत त्यालाच कळतं. उदाहरणे देऊन घाबरून नको सोडायला म्हणून तेही टाळतोय. शक्य असेल तर दुसरीकडे जाण्यातच हित आहे. त्यांना लहान मुलगा आहे म्हणून काळजी वाटते. फ्री अडवाईस द्यायला कुणाचं काही नुकसान नाही पण तुम्ही इथे धागा काढून विचारात आहात म्हणजे तुम्हाला येत असलेले अनुभव भास आहेत की खरोखर वेगळे प्रकार आहेत हे तुम्हीच ठरवू शकता.

मी नास्तिक आहे. माझा देवावर विश्वास नाही. कारण आपले काही भले करायला कोणी अज्ञात व्यक्ती वा शक्ती बसली आहे हे पटत नाही.

पण मी भूतांवर मात्र अविश्वास दाखवत नाही. भूत म्हणजे आत्मा. मनुष्यातील चैतन्य जे एक निर्जीव शरीर सजीव बनवत चालवते. जे शरीर मृत पडल्यावर तो आत्मा त्यातून बाहेर पडू शकतो. लॉजिकली भूत असू शकते हे मला पटते. भले मला १०० टक्के खात्रीचा अनुभव का नसेना.

तर एखाद्या वास्तूत अशीच एखादी शक्ती वास करत असण्याची शक्यता आहेच. जरा चौकशी करा. भूतबाधा करणी पिशाच्च वगैरे एक्सपर्टाईज असलेला मांत्रिक तुम्हाला भेटेलच. कुठला अघोरी उपाय सांगत असेल तर प्लीज त्या नादाला लागू नका. पण बाकी तो सांगेल ते करून बघायला हरकत नाही.

घर स्वस्तात घेतले असेल तर स्वस्तात वा थोडाफार घाटा सोसून पुन्हा विकायला हरकत नाही. पण ज्याला विकाल त्या बिचारयाला पुन्हा हाच त्रास झेलावा लागेल. जर कोणी इन्व्हेस्टमेण्ट म्हणून सेकंड होम घेत असेल तर असा एखादा गिर्हाईक मिळतो का बघा. तो भाडेकरू ठेवत जाईल. कोणाला मानवले घर तर ते राहतील. न मानवणारे पळतील. कोणी उगाच अटकायला नको यात असे वाटते.

अवांतर - हा धागा आणि ईथली चर्चा वाचून आज मलाजी भास होतील असे वाटते. आमचेही घर नवीनच आहे.

अनिळजी, माहीती हवी आहे या विभागात धागा काढलाच आहे तर निदान लोकांना प्रतिसाद तरी देत जा. ताजेप्रेत मोडमधे नका जाऊ.

Pages