पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

अनु Lol

>> उंटाच्या दुधाचे जार, सोन्याची नाणी आणि तो डोक्याला लावायचा पट्ट्याचा हेडगिअर वगैरे पडलेला असेल

Lol
हो, अनिळजी आपल्या पिरॅमिड मध्ये परत आले तेंव्हा हेच दिसले त्यांना. पिरॅमिड तसेही पछाडलेलेच असतात

Rashmi and Veeru, praratisad chan ahet.
Pan ekada chabaratpana kalalyavar kaay fatal padato.
Manane virtual jagat involve hou naye..

<<<भयानक अनुभव रोजच येत आहेत. पण देवाच्या कृपेने आम्हाला काही होत नाही. आमच्या भोवती एक कवच निर्माण झालंय. ते तोडणं त्या शक्तीला शक्य होत नाही.>>> ह्या भ्रमात राहु नका, नक्कीच ते योग्य वेळीची संधी बघत असणार (बळीसाठी? )

<<<मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली.. >> धाग्यातील परिवाराच्या या उल्लेखामुळेच अनेकांनी काळजीपोटी आपल्यापरीने उपाय सुचवले, >>> विरु, हो, किमान मी तरी त्यांच्या मुलाची काळजी वाटली म्हणुन प्रतिसाद लिहीले.

@VB , ते उशीखाली चालू घेऊन झोपलं तर वाईट स्वप्न पडणार नाहीत आणि शांत झोप लागेल का? की फक्त भुतांसाठी तो उपाय प्रभावी आहे?

कमला, ते माहित नाही, पण चाकु ऊशीखाली ठेवल्याने मनातिल भिती कमी होवुन शांत झोप लागते हा स्वानुभव Happy

श्रवु, कोणाही दुष्टाचा जावो बळी, बघु कोण वरचढ ठरतो अनिळ जी कि भुत

उशीखाली सूरी घे
झोपी जाण्याचा प्रयत्न का
बघ
माझी आठवण येते का

लवकरच घर सोडायचा विचार आहे. पण आमच्या या प्लॅनची चाहूल त्या दुष्ट शक्तीला लागली आहे. त्यामुळे विविध अडथळे निर्माण होत आहेत.

अनिळजी बिनधास्त सोडा घर. तुमच्याभोवती दैवी कवच असल्याने तुम्ही जिथेकुठे फिराल तसे तुमचे कवचपण फिरेल की? या कवचावरून मेंढपाळांची कुत्री आठवली. त्यांच्या गळ्यात काटेरी पट्टा असतो कवच म्हणून. तसे तर नाही ना तुमच्याकडे काही ?

काहीहि ह वि बी ..अनिलजी काही दुष्ट नाही आहेत.. दुष्ट शक्तीचा सेल्फी छान यावा म्हणून ते दुष्ट शक्तीला आय फोन घेऊन देतायत.. आणि अनिलजीना कसे काही होईल.. माबोच कवच निर्माण झालंय त्त्यांच्याभोवती..

<<< भुतासकट खालच्या घरात पडतील ना ते, दुरूस्तीचा भुर्दंड वरून>>> अशक्य हसले या वाक्यावर ईमॅजिन करुन

अनिळजी जास्त दिवस त्या घरी राहिले तर त्या दुष्ट शक्तीचा आत्मा अनिळजींच्या शरीरात प्रवेश करू शकतो. हा अनर्थ टाळायचा असेल तर मला पिस्तुल घेऊन त्या शक्तीच्या मधोमध गोळी मारायला लागेल. डॅमिट. मी काय कौलावरून मुद्दाम घसरून त्या शक्तीचे लाड नाही करणार. दिसल्या दिसल्या कपाळमोक्ष.
#ओम भग भूगे भग्नी भागोदारी...

भुतासकट खालच्या घरात पडतील ना ते, >> चांगलं होईल की, "भुताला दिल्या घरी सुखी रहा" असं म्हणुन टाटा करायचा आणि गुपचुप आपल्या घरी पळुन यायचं.

मला बघायचं होतं ना. मीच ती अनिळजींच्या घरातली दुष्ट शक्ती. माझी चेष्टा करून चांगलं नाही केलंत मायबोलीकरांनो. या अनिळजीला या घरातून कधीच बाहेर जाऊ नाही देणार. तुम्हाला पण बघून घेईन. अनिल्या मेल्या घे हा फोन आणि लवकर आयफोन मागव माझ्यासाठी.
images (4).jpeg

बोकलत, सिरीयसली ! बोकलत, तुम्ही निदान मूळ नावाने तरी ( बोकलत या आय डीने ) विचारायचे होते ना. Sad आमच्यासारखे काही असतात भावनीक, ते पण प्रतीसाद द्यायचे बंद होतील आता.

ते हे धागा विसरलेही होते.
लोकांनी धागा वर काढून काय झालं, काय झालं करत विचारायला सुरवात केली.
मग घ्या आता स्टोऱ्या.

Submitted by मानव पृथ्वीकर on 15 October, 2020 - 14:43

अनिळजीच रात्री 12 वाजल्यानंतर वाघ बनत असावेत राहुल रॉयसारखे.
Submitted by बोकलत on 16 October, 2020 - 16:26

उशीखाली सूरी घे
झोपी जाण्याचा प्रयत्न का
बघ
माझी आठवण येते का
Submitted by किल्ली on 20 October, 2020 - 12:18

Lol

Pages