नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.
Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी रोज सगळ्या घरात अगदी पूर्ण
मी रोज सगळ्या घरात अगदी पूर्ण अंधार करून झोपतो, नाइट लॅम्प वगैरे काही नाही.
एवढा अंधार करतो की भूत घाबरतात माझ्या घरात यायला.
आता फक्त एकाच गोष्टीचे वाईट
आता फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटतंय.. आता मलाच घर साफ करावे लागेल आणि भांडीही घासावी लागतील..
मरणार नाहीयेत ग, सूर्योदय
मरणार नाहीयेत ग, सूर्योदय नाही बघू शकणार म्हणालेत. उशिरा उठणार असतील
चुकलंच ग माझे.. हो आज रात्री
चुकलंच ग माझे.. हो आज रात्री उशिरा झोपणार तर.. उद्या उठायला उशीर होणारच ना..
हो, मरु नका. Halloween पर्यंत
हो, मरु नका. Halloween पर्यंत थांबा. तोपर्यंत तरी अनुभव लिहा.
ढगाळ वातावरण असेल. सूर्योदय
ढगाळ वातावरण असेल. सूर्योदय दिसणार नसेल तिकडे.
>> खूपच भयानक गोष्टी घडत आहेत
>> खूपच भयानक गोष्टी घडत आहेत, उद्याचा सूर्योदय कदाचित मी पाहू शकणार नाही असं वाटायला लागलंय.
"जसं कि आता आपण पाहतो आहोत, या ठिकाणी" असं सांगणारा कोणी का च्यानेल वाला नाही का आसपास ?
'तुम्हाला आता कसं वाटतंय?'
'तुम्हाला आता कसं वाटतंय?'
'याबद्दल तुमचे काय मत आहे?'...... असेही काही प्रश्न
मोबाईल कॅमेरा लावून ठेवला
मोबाईल कॅमेरा लावून ठेवला होता त्यात आलेला दुष्ट शक्तीचा फोटो. ही शक्ती मी म्हटल्याप्रमाणे छतावर चालते.

आता काही भूत येईल असे वाटत
आता काही भूत येईल असे वाटत नाही.. जाते बाई झोपायला.. मला उद्याचा सूर्यास्त बघायचा आहे..बाई..
दुष्ट शक्ती मॉडर्न दिसतेय ..
दुष्ट शक्ती मॉडर्न दिसतेय .. छान स्टेप कट आहे केसांचा..
बाबो!!
बाबो!!
टॉप पण शाईन करतोय .. आताच
टॉप पण शाईन करतोय .. आताच पार्टी करून आलेली दिसतेय दुष्ट शक्ती..
दुष्ट शक्तीचा फोटो. ...
दुष्ट शक्तीचा फोटो. ...
शुटींग करून ठेवा अनिळजी. "प्रोजेक्ट नागपूर विच"
ए अनिळ्या मेलास तर खबरदार..
ए अनिळ्या मेलास तर खबरदार...तिथे येऊन तु भुत बनलास तर त्याला सुद्धा ठार मारेन...आता गोष्ट सांगत रहा...उद्या सुटी आहे...
ती जाळी कसली म्हणे? एसीची?
ती जाळी कसली म्हणे? एसीची? भारीच आहे की तुमचं घर.
मी झोपायला जाते.. मी उद्याचा
मी झोपायला जाते.. मी उद्याचा सूर्योदय नाही बघितला तर आमच्या घरची भुते उपाशी मरतील बिचारी..
बोकलत चांगला टीपी केलात..
बोकलत चांगला टीपी केलात..
@ रुन्मेष - वालचंद साण्गली ला
@ रुन्मेष - वालचंद साण्गली ला , तो पोरगा रॅगिंग नंतर रेल्वे खाली सुसाइड केला होत ते आठवते आहे का ?
त्याचा हात साप्डला नव्ह्ता ,
नंतर खुप दिवस होस्तेल रिकामे होते
नवीन Submitted by शाहिर on 7 October, 2020 - 02:37
.>>>>
आज खूप दिवसांनी पाहिला हा धागा आणि हा प्रतिसाद
येस्स आमच्या आधीच्या कधीतरीच्या बॅचचा तो किस्सा. ऐकून होतो. ते देखील ॲडमिशनच्या वेळीच वडिलांसमोर समजला. त्यामुळे मला बाहेरच पेईण्ग गेस्ट म्हणून राहा म्हणाले होते. एकुलता एक पोरगा पहिल्याण्दा बाहेर एकटा राहणार होता. त्यांना कोणतीही रिस्क नको होती.
अरे हे काय आहेत वरचे सारे
अरे हे काय आहेत वरचे सारे प्रतिसाद

म्हणजे हे सारे मजाक होते का?
पण तो वरचा भुताचा विडिओ खरेच भयानक आहे
क्या अनिलजी आपने भी सबका गेम
क्या अनिलजी आपने भी सबका गेम बनाया
पण तो वरचा भुताचा विडिओ खरेच
पण तो वरचा भुताचा विडिओ खरेच भयानक>>>कोणत्या पेज वर आहे व्हिडीओ ,
कालचे नवीन अपडेट ???????
काल रात्रभर जागाच होतो.
काल रात्रभर जागाच होतो.
म्हणजे आज सकाळचा सूर्योदय
म्हणजे आज सकाळचा सूर्योदय नाही बघितला तुम्ही..
तुम्ही फोटो काढताना भुतावर
तुम्ही फोटो काढताना भुतावर फ्लॅश मारला का? सेल्फी का नाही घेतली ?
ही बाथरूम आहे का?
ही बाथरूम आहे का?
इतकी narrow room ?
गुगल सर्च वर हे डेकोरेटिव्ह
गुगल सर्च वर हे डेकोरेटिव्ह सिलिंग म्हणून दाखवत आहे
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn%3AANd9GcSg6AszMRKoprD3ij...
तुम्ही उगाचच घाबरले
कुणीतरी आधीच फोटू काढून ते डेकोरेटिव्ह म्हणून विकत आहे
https://i.pinimg.com
https://i.pinimg.com/originals/c3/a5/ed/c3a5eda581fc0b84fd9b97ffbc125d15...
मला एक कळत नाही की तुम्ही
मला एक कळत नाही की तुम्ही अमावस्येच्या रात्री इतके भयानक अनुभव येत असताना मध्ये मध्ये माबोवर कसे येत होतात,, तुम्ही काय भुताला time please ..म्हणत होता काय ?
अॅडमिनना सांगून हा धागा
अॅडमिनना सांगून हा धागा विनोदी लेखनात हलवा किंवा विश्वास संपादन करून केलेले फ्रॉड्स असा काही तरी ग्रुप आहे, त्यात.
Pages