नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.
Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अनिळजी पुढेमागे नक्कीच भयकथा
अनिळजी पुढेमागे नक्कीच भयकथा लिहतील..
आणि मायबोलीकरांंना उल्लू कसे
आणि मायबोलीकरांंना उल्लू कसे बनवावे हा लेख ही लिहितील.
आणि मायबोलीकरांंना उल्लू कसे
आणि मायबोलीकरांंना उल्लू कसे बनवावे हा लेख ही लिहितील. >>
दरवाजाच्या बिजागर्या बदलून
दरवाजाच्या बिजागर्या बदलून घ्या, गंजल्या असतील.>>
हे असं मागून कोणी गेलं, दार आपटताय असले अनुभव आले की तुमची पहिली प्रतिक्षिप्त क्रिया काय असते? तुम्ही ओरडता की नाही?
आज अमावस्या आहेत.>>> हे
आज अमावस्या आहेत.>>> हे लक्षात न्हवतं माझ्या. माहीत असत तर दुसरीकडे गेलो असतो राहायला. आज अस्वस्थता खूप वाढले. आज काहीतरी भयानक होणार.
थोडी वातावरणनिर्मिती
थोडी वातावरणनिर्मिती माझ्याकडून:
https://youtu.be/cFVJq5yuTKo?t=2122
आज काहीतरी भयानक होणार.
आज काहीतरी भयानक होणार.
Submitted by अनिळजी >>
अजुन वेळ गेलेली नाही. अनिळजी पळा तुम्ही.
>>>>आज अमावस्या आहेत. उद्याचा
>>>>आज अमावस्या आहेत. उद्याचा किस्सा जोरदार असायला हवा>>>>

आज अमावस्या आहेत.>>> हे
आज अमावस्या आहेत.>>> हे लक्षात न्हवतं माझ्या. माहीत असत तर दुसरीकडे गेलो असतो राहायला. आज अस्वस्थता खूप वाढले. आज काहीतरी भयानक होणार.
सर्व प्रथम हे डोक्यातुन कढुन टाका त्याने जास्त त्रास होइल. त्या पेक्षा घरात जे कोणी आहे असे वाटते आहे त्याला विचारायचा प्रयत्न करा की काय हवे आहे. मी नारळ उतरवुन टाकेन . आम्हाला सुखात राहू दे. आज रात्रि नारळावर गुलाल, बुक्का वाहून घराच्या बाहेर उभे राहून तिन वेळा नारळ वरुन खाली फिरवा आणि तिन रस्ते मिळतात तिथे ठेवुन या. जाताना एकदापण मागे वळुन पाहू नका. आल्यावर पायावर पाणि घेतल्याशिवाय घरात जाऊ नका.
अनिळजी = बोकलत
अनिळजी = बोकलत
बोकलतने हा धागा काढला असेल
बोकलतने हा धागा काढला असेल माबोवर तांत्रिक/मांत्रिक असले उपाय सुचवणारे कोण कोण दिसतात ते पाहण्यासाठी.
खरेच इथे एव्हड्या मोठ्या प्रमाणावर यावर विश्वास ठेवणारे आहेत हे पाहून मला तरी खूप आश्चर्य वाटले.
तो मी न्हवेच.
तो मी न्हवेच.
मलाही आश्चर्य वाटलं.
मलाही आश्चर्य वाटलं.
हो ना अगदी सुमडीत घाऊक मध्ये
हो ना अगदी सुमडीत घाऊक मध्ये पॅकेज निघाले अनेकांचे.

विश्वास ठेवणारे आहेतच पण ऊपाय सांगणारे सुद्धा अंधश्रद्धाळू लोकांच्या वरताण आहेत. मला फार आशा होती कोणी कोंबडं वगैरे कापून टाका असे सांगते की काय.
आणि हे खोटे निघाल्याने काहींना सात्विक संताप वगैरे पण आला.
जे कोणी लेखक आहेत त्यांनी भारी कल्पना लढवली, अभिनंदन हो!
निळा रंग हा भुतासाठी धार्जिणा
निळा रंग हा भुतासाठी धार्जिणा असतो ..आणि ह्यांच्या तर नावातच नीळ रंग आहे..
नाव बदलून घ्या सर्व काही ठीक
नाव बदलून घ्या सर्व काही ठीक होईल..
विश्वास ठेवणारे आहेतच पण ऊपाय
विश्वास ठेवणारे आहेतच पण ऊपाय सांगणारे सुद्धा अंधश्रद्धाळू लोकांच्या वरताण आहेत>> म्हणजे आम्ही का?
"परत आलो तेव्हा घरी सगळा
"परत आलो तेव्हा घरी सगळा पसारा होता.." या घटनेआधीचे त्यांचे अनुभव मुख्यत्वे 'भास' या स्वरूपाचे होते. आवाज येणे, कुजबुज जाणवणे, अस्वस्थता वाटणे, चाहूल लागणे वगैरे. याला फक्त हा एक अपवाद 'बाथरूममधला नळ आपोआप सुटणे' हा होता जो भास नव्हता, पण तो नियम सिद्ध करण्यापुरता अपवाद म्हणून खपून गेला. पण त्यानंतरचे अनुभव भास नाहीत. ते खरोखरीचे घडून आलेले बदल आहेत. पसारा, पावलांचे ठसे, साडी वगैरे. भास ते वास्तव असा बदल झाल्याने कदाचित विश्वास उडाला असेल बहुतेकांचा.
पोलिसांना का नाही दाखवत काय
पोलिसांना का नाही दाखवत काय माहीत एवढे पुरावे आहेत.
जगात सगळं आपल्या डोळ्याला
जगात सगळं आपल्या डोळ्याला दिसतं तितकंच सरळसोट असतं असा समज असेल तर ठीक आहे पण सगळ्यांनी असाच समज ठेवावा असा हट्ट का?इथे कुणीही बुवा बाबा etc etc सल्ला दिला नाही,
मंत्र जपा, घरात धार्मिक वातावरण असू द्या असेच सल्ले दिले आहेत,जनरली स्वानुभवाने च दिले आहेत,मला स्वतः ला घरात एकटीच असताना,थोडं अस्वस्थ वाटत असताना देवापुढे दिवा लावला की घरात आणि मनात प्रसन्न वाटतं.
मुळात मी इथे वाचलेल्या प्रतिसादात सुद्धा मन शांत,खंबीर होण्यासाठीच उपाय दिलेले मला आठवत आहेत.
ऐकतर टोकाचं आस्तिक किंवा नास्तिक असंच असलं पाहिजे का?
दिवा,सुगंधी अगरबत्ती लावल्यावर मला खूप बरं वाटत ,नवरा देवासमोर हात सुद्धा जोडत नाही पण त्यांनाही ते वातावरण छान positive वाटत त्यासाठी माझी अंघोळ झाली आहे /नाही,मी nonveg खाल्लय का? पिरियड चालू आहे का ?असले प्रश्न ही पडत नाहीत मला
मग हे आस्तिकता की नास्तिकता नक्की कशाचे लक्षण?
अनिल यांनी गम्मत केली असेल पण उपाय ही बरेच बरे आहेत की,त्यांच्यासारखे धडाधड अनुभव नाही पण काही ठिकाणी अस्वस्थता वाटतेच कधीकधी, त्या हेतूने त्यांचे मन शांत व्हावे म्हणून बरेच प्रतिसाद दिसले,अर्थात सगळे मी वाचले नाहीत
आता श्रद्धा आणि बुवाबाजी यात काहीच फरक नाही असं कुणाचं मत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे,
फक्त माझं इतकं म्हणणं आहे आपलं मन आपण स्वतः ताळ्यावर आणावं,बुवा बाबा आई अशा लोकांकडून प्रयत्न केला तर तो तद्दन मूर्खपणा ठरतो
पसारा, पावलांचे ठसे, साडी
पसारा, पावलांचे ठसे, साडी वगैरे. भास ते वास्तव असा बदल झाल्याने कदाचित विश्वास उडाला असेल बहुतेकांचा.">>>होय माझा तरी याच मुळे उडाला,मी त्यांनी दिसतंय कुणी वगैरे सांगितले तेव्हाच म्हटलं कुणीतरी बकरा करतंय म्हणून,
कारण माझ्यामते फक्त ती एनर्जी असू शकते आपण तिला negative एनर्जी म्हणू,थोडं अस्वस्थ वाटणं, बेचैनी किंवा अशीच काहीतरी फिलिंग असू शकते इतकंच
पण आवाज काढणं,दिसणं,भांडी आपटन,पसारा करणं,साडी देणं या गोष्टी त्या एनर्जी ला शक्य होणार नाहीत.
निसर्ग कुणालाही वरचढ होऊ देणार नाही त्यामुळे अशी एनर्जी असेल तर त्याला मर्यादा ही निसर्ग खूप कमीच देणार
सस्पेन्स थ्रिल गूढ भुतेखेते.
सस्पेन्स थ्रिल गूढ भुतेखेते.,आत्मा, पुनर्जन्म, अतिंद्रिय अज्ञात अगम्य अशा गोष्टीतून मेंदु आपले करमणूक मूल्य शोधत असतो. आपण भयपट त्यासाठीच पहातो. भीती ही सुद्धा एन्जॊय करण्याची गोश्ट बनते
विश्वास ठेवणारे आहेतच पण ऊपाय
विश्वास ठेवणारे आहेतच पण ऊपाय सांगणारे सुद्धा अंधश्रद्धाळू लोकांच्या वरताण आहेत>> म्हणजे आम्ही का?
Submitted by वावे on 16 October, 2020 - 10:06 >> मंत्र/तंत्र पोथ्या पुस्तके असे अर्थाअर्थी संबंध नसलेले ऊपाय सांगणार्यांबद्दल मी म्हणालो. तुम्ही असे काही ऊपाय सांगितले नाहीत असे मला वाटते.
अंग तापले आहे मग बर्फाच्या लादीवर झोपा टाईप दुष्ट विरूद्ध सुष्टाचा ऊपाय..
अनिळजी आयपीएल बघताय काय?
अनिळजी आयपीएल बघताय काय?
सगळ्यांची पॅकेज निघाले
सगळ्यांची पॅकेज निघाले आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर , सर्व जुने जाणतातच

अनु कुणी कुणाचा पॅकेज काढल्याने - कोणाचेही पॅकेज निघत नाही खरंतर.
"दुसऱ्याला खरं ते कळत नाहीये" असं प्रत्येक गटाला वाटतं. अगदी ठामपणे.
आणि खरंतर आपल्याला कळलं आहे तेच actual खरं , पण दुसऱ्याला खरं वाटतय तो मात्र बावळटपणा हेदेखील.
हा काय प्रकार आहे : अओ:
हा काय प्रकार आहे
मला ही शंका आहे की अनिळजी आणि
मला ही शंका आहे की अनिळजी आणि बोकलत एक आहेत पण आणि तो फोटो आहे ना भिती वर चा तो पण मी अमानवी धागा आहे ना त्यात बघितला आहे.
सर्व प्रथम हे डोक्यातुन कढुन
सर्व प्रथम हे डोक्यातुन कढुन टाका त्याने जास्त त्रास होइल. त्या पेक्षा घरात जे कोणी आहे असे वाटते आहे त्याला विचारायचा प्रयत्न करा की काय हवे आहे. मी नारळ उतरवुन टाकेन . आम्हाला सुखात राहू दे. आज रात्रि नारळावर गुलाल, बुक्का वाहून घराच्या बाहेर उभे राहून तिन वेळा नारळ वरुन खाली फिरवा आणि तिन रस्ते मिळतात तिथे ठेवुन या. जाताना एकदापण मागे वळुन पाहू नका. आल्यावर पायावर पाणि घेतल्याशिवाय घरात जाऊ नका.>>>>>
जीओ! हा खरा उपाय
पूर्वी, मी तसाच फोटो अमानवीय
पूर्वी, मी तसाच फोटो अमानवीय धाग्यावर टाकला होता, आमच्या ऑफिसची काही बॅचलर मुलांच्या घरचा होता, मलाही वाटले एक क्षण की तोच आहे की काय
पण शोधायच्या भानगडीत पडले नाही
VB तुम्ही टाकलेल्या फोटोत बूट
VB तुम्ही टाकलेल्या फोटोत बूट/चपलीचे ठसे होते, पंजाचे नाही.
Pages