नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.
Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>> जेन्यूईनिटेशु
>> जेन्यूईनिटेशु
पछाडलेल्या वास्तुत एवढा एकच शब्द मोठ्याने उच्चारला तरी कान किर्रर होऊन भूत पळून जाईल
<<<आजकाल लोकांना फसवलं
<<<आजकाल लोकांना फसवलं गेल्याचं वाईटही वाटेनासं झालंय.>>> कुठे अन कोणत्या बाबतीत फसवले गेलोय यावर रिअकॅशन अवलंबून असते.
इकडे माबोवरचे जास्तीत जास्त कोतबो फेक असू शकतात हे आधीच माहीत असल्याने काही वाटायचा प्रश्नच येत नाही.
शंभरातील एक जरी खरोखर गरजू असेल तर ? हा विचार करून प्रतिसाद द्यायचे. नाहीतर इग्नोरस्त्र बरे.
ह्या धाग्यात पण लहान मुलगा नसता तर कितीजणांनी प्रामाणिक उपाय सुचवले असते? किमान मी तर नक्कीच नसते, अन ते लिहिताना हे माहीत होते की हा टीपी धागा असू शकतो. सो राग नाही आला पण धागाकर्त्यावर कीव आली
अनिळजींनी या platform चा
अनिळजींनी या platform चा गैरफायदा घेतला आहे आणि यामुळे मायबोलीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिह्न निर्माण होऊ शकते. हा आयडी उडवावा हेमावैम.
मायबोली ही एक standard site आहे. ही timepass ची जागा नाही. खोटे बोलून सहानुभूती मिळवणार्या अनिळजी यांचा मी निषेध करते.
वि बी आपण मजाही घेतली ना..
वि बी आपण मजाही घेतली ना.. अनिलजीच्या भुताची.
आता काही वेळासाठी त्या दुष्ट
आता काही वेळासाठी त्या दुष्ट शक्तीने मला बाहेर सोडलंय. तुम्ही सगळे खरच काही विरोधात बोलून चेष्टा करू नका. ती शक्ती खूपच भयानक आहे.
हो श्रवु, कारण कुठेतरी आधीच
हो श्रवु, कारण कुठेतरी आधीच माहित होते की हा टिपी प्रकार असु शकतो
VB,
VB,
तुम्ही मजा घेतलीत.
पण अमुक स्तोत्र म्हणा इ. उपाय सुचवणारी भाबडी जनता मजा घेत होती का?
मजा आ गया अनिळजी. ये मजा आप
मजा आ गया अनिळजी. ये मजा आप हर माबोकर देते जावो.
अनिलजी तुम्ही एकदा तरी माझ्या
अनिलजी तुम्ही एकदा तरी माझ्या घरी एकदा त्या दुष्ट शक्तीला पाठ्वाच ..तुमची दुष्ट शक्ती किती भयानक आहे ते याची देही याची डोळा एकदा बघून घेते.. कायमचे ठेऊन घेते त्याला धुण्या भांड्याला.. रोज सुग्रास आम्ही जेवतो तेच डायटवाले जेवण मिळेल त्याला..बाकीचे काय रात्री काय गोंधळ घालायचा तो तुमच्यकडे जाऊन घालेल तो.. तसही तुम्ही त्याला साधा चहा हि विचारात .. त्याच्यासमोर बसून स्वतः एकटेच चहा ढोसता..
आता सध्या तरी चारच धागे
आता सध्या तरी चारच धागे धावतायत.. मुंग्या..बाईचे घर.. अनिलजी..आणि तनिष्क
कायमचे ठेऊन घेते त्याला
कायमचे ठेऊन घेते त्याला धुण्या भांड्याला.>>

प्रेमळ दिसतेय भूत !!
रोज सुग्रास आम्ही जेवतो तेच डायटवाले जेवण मिळेल त्याला>> आणि पगार ?!
भुताच्या राज्यात कुठे पगार
भुताच्या राज्यात कुठे पगार असतोय व्हय..हात लांब करून काय हवे ते मॉलमध्ये जाऊन घेऊन येईल..त्याला वाटलंच तर आम्हाला पण आणून देईल.. जबरदस्ती नाय..
भरत, तो ज्याचा त्याचा प्रश्न
भरत, तो ज्याचा त्याचा प्रश्न अन विचारांची पद्धत आहे.
तसे बघता मी पण उपाय सुचवले होतेच की, कापुर जाळा, नित्यपुजा करा वगैरे. फक्त हेच की हा धागा ज्येन्युईन असेल अशी अपेक्षा नव्हती तो फसविले गेली वगैरे काही वाटले नाही.
आमच्यासारखे काही असतात भावनीक
आमच्यासारखे काही असतात भावनीक, ते पण प्रतीसाद द्यायचे बंद होतील आता.
>> thats d aim.
Jasa amanaviya dhaga band padala tasech he
मी पण एकदा उल्लू बनली आहे..
मी पण एकदा उल्लू बनली आहे.. नवीन होते एकदम.. सगळे खरंच वाटायचे.. तुमचा अभिषेक या आयडी ने माझे वय ६७ आहे आणि मला जगावेसे वाटत नाही कि आत्महत्या असा काहीसा धागा होते..आणि मी मारे चांगला सल्ला दिला.. आणि अर्ध्या तासाने येऊन बघते तर ते दुसऱ्या आयडी बरोबर चक्क भांडतायत..मग मला कळले कि आपण उल्लू बनलोय.. त्यानंतर धडा घेतला.. किल्ली च्या नंतर दुसरा रिप्लाय मी देणार होते.. घराला आग लावा.. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी म्हणून.. पण नाही दिला.. कारण मग माझ्यावर सगळ्यांचे आरोप प्रत्यारोप झाले असते..गप्प राहिले..
Jasa amanaviya dhaga band
Jasa amanaviya dhaga band padala tasech he>>> बंद नाही पडला. मी असेपर्यंत तरी बंद नाही पडणार तो धागा. मी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन ती ज्योत अखंड तेवत ठेवणार आहे. संभवा मी युगे युगे (जोरात शंखनाद)
तुमचा अभिषेक नाम कही तो जाणा
तुमचा अभिषेक नाम कही तो जाणा पेहचाना लगता है.
अर्ध्या तासाने येऊन बघते तर
अर्ध्या तासाने येऊन बघते तर ते दुसऱ्या आयडी बरोबर चक्क भांडतायत..>>>>
रूनम्या जुन्या काळी भांडायचा????
बोकलत..हम आपके साथ है।
बोकलत..हम आपके साथ है।
येऊ द्या त्या धाग्यावर आजच एक थरारक किस्सा
श्रवु, कोतबो ग्रुपवरचे एकेक
श्रवु, कोतबो ग्रुपवरचे एकेक धागे वाचा मग कळेल त्यातले किती खरे असायची शक्यता आहे. पण जसे मी वर लिहीलेय एकाला जरी खरी गरज असेल तर??
म्हणुन एकतर ईग्नोर करा किंवा खोटे असु शकते हे लक्षात ठेवुन प्रामाणिक प्रतिसाद लिहा ते आपले आपण ठरवायचे
येऊ द्या त्या धाग्यावर आजच एक
येऊ द्या त्या धाग्यावर आजच एक थरारक किस्सा>>> सध्या नको. हे अनिळजी एकतर माझ्यासारखं लिहिताहेत त्यामुळे संभ्रमात आहेत सगळे.
सुरवातीला असे धागे
सुरवातीला असे धागे श्रोडिंगेरचे मांजर तत्वानुसार खखोराटा स्थितीत असतात. नंतर कळते खरा कि खोटा किंवा कधी कधी अखेरपर्यंत स्थिती खखोराटाच राहते
बंद नाही पडला. मी असेपर्यंत
बंद नाही पडला. मी असेपर्यंत तरी बंद नाही पडणार तो धागा. मी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन ती ज्योत अखंड तेवत ठेवणार आहे. संभवा मी युगे युगे (जोरात शंखनाद) >> पडला नाही हो, पाडला.
नाही हो पाडला नाही. सुरू आहे
नाही हो पाडला नाही. सुरू आहे अजून. पहिल्यापेक्षा जास्त थरारक झालाय तो धागा आता. आधी याच्या त्याच्या ऐकीव गोष्टी सांगायचे सगळे आता स्वतः भुतासोबत कशी कुस्ती खेळली हे सांगतात सगळे.
मी एकच धडा घेतला.. आणि मला तर
मी एकच धडा घेतला.. आणि मला तर त्यावेळी मराठी लिहिताच येत नव्हते..त्यामळे मी जास्तकरून ROM मधेच असायचे..मला काही वाईट वैगरे वाटले नाही.. हे वर्चुअल जग आहे.. आपण कोणावर किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवायचे.. समोरच्याने नाही.. आणि एकदा खाल्ली माती .. आले शहाणपण..
पछाडलेल्या वास्तूत येणारे
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.Submitted by अनिळजी
पछाडलेल्या धाग्यावर भाबड्या मायबोलीकरांना येणारे अनुभव.....
√ असे बरोबर वाटतेय
हा धागा बघितल्यावर "लांडगा
हा धागा बघितल्यावर "लांडगा आला रे आला" गोष्ट आठवते.
मी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन ती
मी पुन्हा पुन्हा जन्म घेऊन ती ज्योत अखंड तेवत ठेवणार आहे. संभवा मी युगे युगे (जोरात शंखनाद)
Submitted by बोकलत >> कसे आहात बोकलत. बरं वाटतेय का आता??
तो भुताचा फोटो गुगलवर शोधला
तो भुताचा फोटो गुगलवर शोधला अन तो तर एक शो पीस निघाला , तेंव्हाच ओळखले होते , बोगस धागा आहे
तो भुताचा फोटो गुगलवर शोधला
तो भुताचा फोटो गुगलवर शोधला अन तो तर एक शो पीस निघाला , तेंव्हाच ओळखले होते , बोगस धागा आहे >> फार लवकर ओळखलं तुम्ही.
Pages