नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.
Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बोकलत वालचंद ईंजिनीअरींग
बोकलत वालचंद ईंजिनीअरींग कॉलेज सांगलीत आहे. विश्रामबाग परीसरात. मिरजही जवळच आहे.
नाही बदलले अजून. कुणी असा
नाही बदलले अजून. कुणी असा फटकन निर्णय घेत नाही, आज हा विचार तर उद्या तो, हे तुला माहीत असायला पाहिजे. वर लिहिले आहे त्यांनी आठवड्या भराने परत जाणार आहेत तिथे. योग्य ते सल्ले दे त्यांना, घाबरवण्या पेक्षा.
Manav +1.
Manav +1.
नानबा तुमच्या नातेवाईकांचा
नानबा तुमच्या नातेवाईकांचा कारचा काय अनुभव आहे? भुत वगैरे नाही पण आमची एक गाडी बरीच अनलकी होती आमच्यासाठी.
वालचंद इंजिनियरिंग कॉलेज ,
वालचंद इंजिनियरिंग कॉलेज , विश्रामबाग सांगलीत आहे
त्याच्या समोरच Willingdon कॉलेज आहे , सांगली मिरज रोडवर , शेजारी चिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्स आहे
वानलेस हॉस्पिटल मिरज येथे आहे , त्यालाच मिशन हॉस्पिटल म्हणतात
अजुन एक छोटे वानलेस टीबी / चेस्ट हॉस्पिटलही त्याच रोडवर आहे , विजयनगर
मानवमामा ओके
मानवमामा ओके
मला वाटले बदलले घर त्यांनी. तात्पुरते सोडलेय हे माहीत नव्हते.
@ ब्लॅककॅट हो तेच वालचंद कॉलेज
आयला मी पण वालचंद सांगलीला
आयला मी पण वालचंद सांगलीला होतो. १९९५ ला पास झालो. चार वर्ष हॉस्टेलला होतो पण एकपण भुत पाहिले नाही. बहुतेक आम्हाला भुतं टरकून असावीत.
नानबा तुमच्या नातेवाईकांचा
नानबा तुमच्या नातेवाईकांचा कारचा काय अनुभव आहे? भुत वगैरे नाही पण आमची एक गाडी बरीच अनलकी होती आमच्यासाठी.
>> i started typing , but then there are few things u dont even want to remember or recite.
@नानबा damn..was it that sad
@नानबा damn..was it that sad ?
अनिळजी तुमच्या मनावरचा ताण
अनिळजी तुमच्या मनावरचा ताण हळका व्हावा म्हणून आम्ही अधूनमधून जोक्स मारतोय.
अमोघ शिवकवच म्हटलत का?
अनिलजी, अमोघ शिवकवच म्हटलत का?
@बोकलत, तुम्ही सध्या जिथे
@बोकलत, तुम्ही सध्या जिथे राहता आणि जिथे तुमच्या सौ काम करत आहेत ते जीएमसीएच काळ्या मांजराचे अल्मा माटर!
अल्मा माटर!>>> हे काय असतं?
अल्मा माटर!>>>
हे काय असतं?ओके आपले ब्लॅककॅट तिथले पास आऊट आहेत काय? पण ईथे gmch मध्ये खरोखरच एक काळं मांजर रोज रात्री फिरत असतं. सगळा स्टाफ त्या मांजराला दचकून असतो. कोरोना सुरू झाल्यापासून जास्तच दिसून येतं ते. अजून कोणाला काही त्रास नाही दिला. मला वाटतंय ते ईच्छाधारी मांजर असावं.Black cats and dogs are
Black cats and dogs are ordinary innocent animals . Please try not to push your beliefs and misconceptions on them.
Black cats and dogs are
Black cats and dogs are ordinary innocent animals +१
(No subject)
ब्लॅक कॅट सेलिब्रेशन मंथ आहेच
ब्लॅक कॅट सेलिब्रेशन मंथ आहेच हा!
मंत्र म्हणून काय होणार? त्या
मंत्र म्हणून काय होणार? त्या अमानवीय शक्ती ला ती भाषा माहीत हवी ना...
नक्की कुठे फिरते मांजर जी एम
नक्की कुठे फिरते मांजर जी एम सी मिरजेत ?
रात्री सगळ्या वॉर्डात जाते.
रात्री सगळ्या वॉर्डात जाते.
नानबा राहू द्या मग. प्रणवंत
नानबा राहू द्या मग. प्रणवंत तुमचा गाडीचा अनुभव लिहा
मला यातलं काही कळत नाही , पण
मला यातलं काही कळत नाही , पण सर्वांना आपापल्या घरात सुरक्षित व निर्भय वाटले पाहिजे एवढे महत्त्वाचे वाटते. तुमचा त्रास लवकरात लवकर दूर होऊन तुम्हाला पूर्वीप्रमाणेच शांत झोप लागू दे या सदिच्छा ..
अमानवीय नाही काही यात. २००७
अमानवीय नाही काही यात. २००७ ला त्यावेळी नुकतीच आलेली झेन इस्टिलो गाडी घेतली आणि त्यानंतरच्या काळात बरेच व्यावसायिक नुकसान झाले होते माझे. योगायोगपण असेल त्यात पण तो लक्षात येण्याजोगा होता. मी माझ्या महत्वाच्या कामांसाठी भावाची गाडी घेऊन जायचो एवढी धास्ती बसली होती.
तिचा फार काही मेण्टेनन्सचा त्रास नव्हता किंवा कधी अपघातपण नाही झाला. आमच्या आत्याला त्या गाडीतच असताना हार्टअट्याक आला होता आणि पुढे आमच्या एका वयस्कर शेजाऱ्याला लिव्हरचा आजार होता आणि रात्री जास्त त्रास झाला तर आमच्याच एखाद्या गाडीत घेऊन जात असू दवाखान्यात. एकदा माझ्या गाडीत घेऊन गेलो तेव्हा मला वाटून गेले हे आता नाही जगत आणि ते खरोखरच दोन दिवसांत निवर्तले. मी लगेच महिन्याभरात गाडी विकून टाकली.
भुतांना पण आपल्या घरात
भुतांना पण आपल्या घरात सुरक्षित वाटायला नको का? माणसं त्यांच्या घरात येऊन लुडबूड करायला लागली की ते कूरबूर करणारच.
सा , हे लक्षात नाही आलं...
सा
, हे लक्षात नाही आलं... पण विनोद आवडला
अनाटमीतली 20 मढी , फॉरेनशिक
अनाटमीतली 20 मढी , फॉरेनशिक ची पोलीस केस ची रूम , परत्येकाच्या रूम मध्ये बोन सेट
पण कधी भीती वाटली नाही
एक नंबर हॉस्टेल मागे टेकडी दिसते , तिथे कब्रस्तान आहे , आम्ही एकदा त्याच्या पलीकडे खाजगी मेस लावली होती , तिथूनच जात होतो , पण कधी काही जाणवत नव्हते
(असेच मनात आलेले: झेन एस्टिलो
(असेच मनात आलेले: झेन एस्टिलो सारखी छोटी गाडी फारशी शॉक अब्सॉर्बर वाली नसणार. यातून नेताना आधीच वय झालेले, किंवा आजाराची हिस्टरी असलेले, हॉस्पिटल ला जायच्या कल्पनेने टेन्स असलेले नातेवाईक वारले तर तसे फार अनलकी किंवा अनपेक्षित नसेल. )
पण कधीकधी विश्वास बसतो खरा. आमच्याकडे खूप आधी (म्हणजे ३ महिने आधी बुकिंग करुन पैसे भरुन) प्लॅन केलेल्या ट्रॅव्हल हमखास काही मेडिकल कारणाने रद्द होतात.
अनिळजी पुधे काय झाले? शेजारी
अनिळजी पुधे काय झाले? शेजारी,कामवाली बाई, building watchman, पानवाला, पेपरवाला, भाजीवाला़ कोणाकडुन काही कळ्ले का? tuchya aadhi Kon rahat hotey chaukashi kaara. Ghar VikaNE titke soppe nahi. KadaChiT tithun kahi marg sapadel.
Me roz tucha pratisaad vachayla yetey. Hope you find a solution soon!
चार वर्ष हॉस्टेलला होतो पण
चार वर्ष हॉस्टेलला होतो पण एकपण भुत पाहिले नाही. बहुतेक आम्हाला भुतं टरकून असावीत.
>>>>>
वालचंद हॉस्टेल नाही. माझ्या मित्रांचा किस्सा बाहेर पेईंग गेस्ट म्हणून राहतानाचा होता.
यावरून आठवले. मी सुद्धा बाहेरच राहायचो. पहिल्या सेमला जिथे राहायचो तिथे त्या आधी जो मुलगा राहायचा त्याने ट्रेनखाली उडी मारून आत्नहत्या केली होती. आम्हालाही हे नंतर कळले. अजून दोन महिने तिथे आमचे बाकी होते. त्यानंतर तशीही जागा बदलायचीच होती. ते दोन महिने फारसा विचार न करता काढले. कारण कोणाला कसलाच अनुभव आला नव्हता. नंतरही मनात काही येऊ दिले नाही त्यामुळे आला नाही.
मांजराचे लूक्स मस्त आहेत..
मांजराचे लूक्स मस्त आहेत..
Pages