नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.
Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्यांनी भुतांना पसारा करायला
त्यांनी भुतांना पसारा करायला लावले आणि तिथेच ते सापडले.
अनिळजी = बोकलत >> +७८६
अनिळजी = बोकलत >> +७८६
(No subject)
त्यांनी भुतांना पसारा करायला
त्यांनी भुतांना पसारा करायला लावले आणि तिथेच ते सापडले.>>>>>>>>
????
आज दुपारी आम्ही झोपलो असताना
आज दुपारी आम्ही झोपलो असताना हॉलमध्ये कोणाच्यातरी फिरण्याची चाहूल लागली. बाहेर गेलो तर कोणी न्हवतं पण खूपच गारवा जाणवत होता.
भंकस करत आहेत अशी शंका खरच
भंकस करत आहेत अशी शंका खरच येते आहे. कोणी राहील का अशा घरात. हार्ट अॅटॅक येइअल एखाद्याला. रोज नवा प्रकार .... आणि तरी हे रहातायत.
अहो मला खरच असे अनुभव येत
अहो मला खरच असे अनुभव येत आहेत.
अनिळजी आज फिरायला नाही गेलात
अनिळजी आज फिरायला नाही गेलात का?
नाही आज घरीच थांबलोय.
नाही आज घरीच थांबलोय.
खरं सांगायचं तर आज दुपारी
खरं सांगायचं तर आज दुपारी भिंतीवर कोणाच्यातरी पावलांचे ठसे उमटले होते. अगदी छतापर्यंत ते गेले होते पण मायबोलीकरां विश्वास बसणार नाही म्हणून गप्प होतो.
खरंय बोकलत
खरंय बोकलत
माझा तर आहे ब्वा विश्वास तुम्ही नेहमी खर्याखुर्या गोष्टी. सांगता.
अनिळजी माझा डू आयडी नाही डू
अनिळजी माझा डू आयडी नाही
डू आयडी असता तर मी कशाला उपाय सांगितले असते त्यांना.
भिंतीवर कोणाच्यातरी पावलांचे
भिंतीवर कोणाच्यातरी पावलांचे ठसे उमटले होते. अगदी छतापर्यंत ते गेले होते >> मोराचं पीस ठेवा भिंतीवर. पाली येणार नाहीत.
अरे मी बोकलत लिहिले काय..
अरे मी बोकलत लिहिले काय..
त्यांचा आणि तुमचा आवाज सेमच वाटला मला
मला असं वाटतंय आपण
मला असं वाटतंय आपण अनिळजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना या प्रकरणातून बाहेर निघण्यास मदत करायला पाहिजे.
<<< खरं सांगायचं तर आज दुपारी
<<< खरं सांगायचं तर आज दुपारी भिंतीवर कोणाच्यातरी पावलांचे ठसे उमटले होते. अगदी छतापर्यंत ते गेले होते पण मायबोलीकरां विश्वास बसणार नाही म्हणून गप्प होतो. >>> अहो त्यात काय एवढे, काढायचा छताचा फोटु अन टाकायचा ईकडे. अस्थाव्यस्थ घराचा फोटु पण टाकता येईल की
ह्या असल्या टीपीमुळे कुणाला खरच गरज असेल सल्ला - माहितीची तरी शंका येते हेतुवर
होना आता इतके पुरावे मिळताएत
होना आता इतके पुरावे मिळताएत तर टाकायचा न फोटो
घरातल्या पसार्याचा
भिंतीवरील पावलांच्या ठशांचा
मदत मिळायला उपयोगी झाले असते न
काही असेल तर टाकतील न फोटो.
काही असेल तर टाकतील न फोटो.
दया येते अश्या लोकांची अन अश्या मानसिकतेची.
लहान मुलगा लिहुन वर अजुन सिंपथी मिळवायची हौस असते काहींना
अनिळजी आपण अंनिसची जरुर मदत
अनिळजी आपण अंनिसची जरुर मदत घ्या.
https://antisuperstition.org/352-2/
मला असं वाटतंय आपण
मला असं वाटतंय आपण अनिळजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना या प्रकरणातून बाहेर निघण्यास मदत करायला पाहिजे.
>> u r d expert! Houn jaudya kusti!
अनिळजी फोटो टाका भिंतीवर
अनिळजी फोटो टाका भिंतीवर चालण्याचा.
अनिलजी प्लीज फोटो टाका.
अनिलजी प्लीज फोटो टाका. हे काहीतरी विचित्र वाटतय. कोणीतरी माणुस / माणसं तुम्हाला घरातून हाकलायला बघतय/ बघतायत असे वाटते.
ईथे पोथ्या, स्तोत्र बित्र
ईथे पोथ्या, स्तोत्र बित्र रिकमेंड करणार्या गलेबल लोकांबद्दल फार हसू येते आहे आणि त्यांच्याबद्दल कीव आणि काळजी सुद्धा वाटली.
बहुतांश हेच लोक डिप्रेशनच्या धाग्यावर डॉक्टरची मदत घ्या , काऊन्सिलिंग घ्या वगैरे सांगत आहेत.
डिप्रेशन काय किंवा नसलेल्या गोष्टींची भिती वाटून भास होणे (अर्थात हा धागा तद्दन फार्स आहे हे आधीच लिहिले होते) दोहोंसाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेणे जरूरी आहे. पण जिथे सेफ आहे तिथे पोथ्या/मंत्र, कर्मकांड रिकमेंड करायची आणि जरा रिस्क वाटली की डॉक्टर/तज्ञ गाठा म्हणायचे
नवीन Submitted by VB on 15
नवीन Submitted by VB on 15 October, 2020 - 18:47>>> +1
मजा घेत आहेत ते
मजा घेत आहेत ते
छताचा फोटो आहे त्यात स्पष्ट
छताचा फोटो आहे त्यात स्पष्ट दिसतंय

हे हाताचे फोटो वाटताहेत.
हे हाताचे फोटो वाटताहेत.
Are फोटो टाकताना हाताचे ठसे
Are फोटो टाकताना हाताचे ठसे झाले की.
>>बाहेर गेलो तर कोणी न्हवतं
>>बाहेर गेलो तर कोणी न्हवतं पण खूपच गारवा जाणवत होता. >> हे डिमेंटर्स तर नसतील ना? पेट्रोनस जमतो का?
देवकी, यांचे इथले भुत खालील
देवकी, यांचे इथले भुत खालील प्रजातीचे असेल त्यामुळे त्याचे हात हेच त्याचे पाय

Pages