पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

किल्ली, उपाय योग्यच आहे, पण भिमरुपी म्हणण्याआधी श्री रामरक्षा म्हणावी. रामदूत असल्याने आधी रामाचे नाव घेतल्या शिवाय मारुती प्रसन्न होत नाही म्हणतात.

अनिळजी उपाय करुन बघा. अतुट विश्वास व श्रद्धेने केले तर सगळे पावते.

माझ्याकडे तीन उपाय आहेत ते करून बघा.
1. घराच्या मधोमध तीन डोळ्यांचा नारळ ठेवा. त्यावर हळद कुंकू लावा. जर घरात दुष्ट शक्ती असेल तर नारळ गोलगोल फिरायला लागेल. आणि नारळाचा शेंडा त्या दिशेला जाऊन थांबेल ज्या दिशेला दुष्ट शक्तीचा वास आहे.
2. रात्री जेवण केल्यावर केळीच्या पानात प्रसाद म्हणून थोडं जेवण बाजूला काढा आणि घरात गाय घेऊन या. जर गाय प्रसाद ना खाताच घरातून निघून गेली तर समजा तुमच्या घरात दुष्ट शक्ती वास करते.
3. हा तिसरा उपाय जरा डेंजर आहे. यात जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या उपयात संपूर्ण घराची लाईट घालवून घराच्या मधोमध दिवा पेटवा आणि तुमच्या रक्ताचे दोन तीन थेंब दिव्याभोवती टाकून लगेच घराबाहेर निघून जा. जर दुष्ट शक्ती असेल तर ती तुमच्यासमोर प्रकट होईल.

3. हा तिसरा उपाय जरा डेंजर आहे. यात जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या उपयात संपूर्ण घराची लाईट घालवून घराच्या मधोमध दिवा पेटवा आणि तुमच्या रक्ताचे दोन तीन थेंब दिव्याभोवती टाकून लगेच घराबाहेर निघून जा. जर दुष्ट शक्ती असेल तर ती तुमच्यासमोर प्रकट होईल.>>>> अग बाबौ !

भिमरुपी म्हणण्याआधी श्री रामरक्षा म्हणावी >>>>> @ रश्मी रामरक्षा कवच आहे मान्य. पण मोठे / संस्कृत स्तोत्र म्हणायला येत नसेल तर श्रीरामांची इतर स्तोत्रे उदा रामस्तुती / १३ अक्षरी जप चालतो का? की रामरक्षाच हवी?

नाही कारवी, रामरक्षाच हवी असे नाही कारण प्रत्येकाला संस्कृत येईलच असे नाही. पण जिथे रामाचे नाव तिथे मारुती सुक्ष्मरुपाने हजर असतो असे म्हणतात. त्यामुळे रामाचा त्रयोदशकारी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र कधीही उत्तमच. ह्याला काळ वेळेचे बंधन नाही. Happy

त्यामुळे रामाचा त्रयोदशकारी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र कधीही उत्तमच. ह्याला काळ वेळेचे बंधन नाही
+१११११
श्रीराम नामाचा अव्याहत जप करा मनापासून श्रद्धेने
किंवा ज्या दैवतावर तुमची श्रद्धा असेल त्यांचा जप किंवा पारायण करा
गुरुचरित्र वाचावे असे म्हणतात अशा प्रसंगी पण त्याविषयी मला अधिक माहिती नाही, कुणाला इथे माहिती असल्यास1 सांगावे

अनिळजी अजून एक स्तोत्र आहे, ते जरुर म्हणा. मोजुन ३ - ४ मिनीटे लागतील. श्री वासुदेवानंदसरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांचे घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे म्हणल्यास छातीतील धडधड कमी झाल्याचा मला चांगला अनूभव आहे.

https://www.maayboli.com/node/13468#comment-535830

घाबरवत नाहीये पण जर खरच तुम्हाला त्रास होतोय तर नवरात्रीच्या वेळीस प्लीज दुसरीकडे राहायला जा. तुम्ही याआधीही गेलेलात म्हणून सांगत आहे. कारण त्या दिवसात जर भूतबाधा झाली तर मांत्रिक उपाय करत नाही हे अनुभवाचे बोल आहेत.
इथे या गोष्टींची काही सदस्यांकडून टर उडविली जाईल म्हणून जास्त डिटेल सांगत नाही पण अनिळजी तुम्हाला शक्य असल्यास नवरात्रीत दुसरीकडे राहायला जा. आणि शक्य नसल्यास नवनाथ पाचवे अध्याय आणि रामरक्षा घरात सतत सुरू ठेवा. बाजारात मंत्र पठणाचे ऑडियो मिळतात.

घर विकत घेतले आहे ना, मग कशाला सोडताय? अहो जर भूतांवर तुमचा विश्वास आहे तर मग देवावर का नाही? निगेटिव्ह एनर्जी जर अस्तित्वात आहे तर पॉझीटिव्ह असणारच ना? त्या भूत अंकल ( जॅकी श्रॉफचा लहान मुलांसोबतचा सिनेमा ) मध्ये एक डॉयलॉग आहे की " डर " से डरो मत , बल्की उसकी आंखोंमे आंखे डालके देखो, डर अपने आप भाग जाएगा. "

निल्सन, तुझा अनूभव खरा असेलच, पण माझे ठाम मत आहे की पॉझीटिव्ह विचार आणी उपाय याने मनातली भिती जातेच जाते.

घमंड कर हे तान्हाजी मधले गाणे ऐका. जाम एनर्जी येते. खरे तर सांगु, जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा झटकेवाली आणी देवाची गाणी ऐकावी. मन रिफ्रेश होते.

अनिळजी, मुलाला शूर वीरच बनवा. त्याच्या कोवळ्या मनावर परीणाम होऊ देऊ नका. चला बिनधास्त.

https://www.youtube.com/watch?v=eYLOulvyzLg

आधी कोण मेले होते तिथे ते माहीत करा..
संस्कृत किंवा मराठी श्लोक त्याला कळायला तरी हवेत...
हिंदी असेल तर हनुमान चालीसा ट्राय करू शकता..
हिंदू नसेल तर मग वेगळे उपाय लागतील...
रूट शोधणे महत्वाचे... आसपास चौकशी करा तिसऱ्या माणसाकडून... जमले तर डिटेक्टिव्ह हायर करा चौकशी साठी...

जमले तर डिटेक्टिव्ह हायर करा चौकशी साठी...
Submitted by च्रप्स >> डिटेक्टीव्ह कशाला पाहिजे. आजुबाजुच्या घरात येणाऱ्या कामवाल्या‌ मावश्या, सोसायटीचे आजी माजी वॉचमन यांच्याकडे चौकशी केली तरी बरीच माहिती मिळु शकते.

अजून एक विचार येतो की घर स्वस्तात मिळाले ते यांनी घेतले, पण दुसर्‍या कोणाला ते घर हवे असेल ( जर आधी काही कारणाने नाकारले असेल तर ) तर ती व्यक्त्ती तर यांना घाबरवत नाहीये ना ?

घर स्वस्तात मिळाले इथेच खरी मेख आहे.
अनिळजी लवकर पुजा/वास्तुशांती करुन घ्या.
घरात कुलदेवतेचा, स्वामी समर्थांचा फोटो ठेवा. नित्यपुजा करा. इष्टदेवतेच्या नामस्मरणाने, नित्यपुजेने घरात सकारात्मक उर्जा निर्माण होईल.
(ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी टिंगल करु नये ही विनंती.)

एक शंका: वर जी ऊर्जा देणारी गाणी सांगितली आहेत. ती लावली तर ती ऐकुन भूतांना पण नाही ना ऊर्जा मिळणार?
जाणकारांकडुन खात्री करुन घ्या आधी.

बायको किचन मध्ये एकटी गेली बघायला????ते पण भासांची हिस्टरी माहीत असताना???
आता नक्की कसली भीती वाटतेय मग??मला वाटतंय तुम्ही दोघे आता एनफ नॉर्मल झाला आहात, इतके दिवस रात्र कसे का होईना रहाताय,म्हणजे हळू हळू होईल सगळी सवय,
आता कशाला घर सोडायचे मग.
खरंतर
इतके धडाधड अनुभव येत नाहीत शक्यतो ,अर्थात अनुभव नाहीच पण ऐकीव असतातच अशा गोष्टी,थोडाफार त्रास वगैरे असं ऐकलं होतं व धाडकन कुणीतरी जाणवणार ते ही सातत्याने थोडं संशयास्पद वाटतंय.
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे तुम्ही घर विकावं म्हणून खरंच जाणूनबुजून करत असेल तर त्या बाजूनेही चौकशी करा,
भूतच आहे असं समजून सोन्यासारखी वास्तू हातातून घालवून बसाल

रच्याकने एक कथा आठवली कौतुक शिरोडकर यांची,किंचित साधर्म्य वाटले

https://www.maayboli.com/node/11333

माफ करा पण रश्मी ह्या आयडीचे इथले प्रतिसाद वाचले की वाटते त्यान्चे वय १०-१२ वर्षे असेल. फारच बालीश असं वाटतय. इयत्ता ५ - क तुकडी.

अनिळजी, मी काही सल्ला देण्याइतकी नाहीये पण राहवत नाहीये म्हणून सांगतेय सगळेजण इतके सल्ले देतायत. तुम्ही लिहिलंय की पूजा घालण्याचा विचार होता पण आई बाबा त्रास होतोय म्हणून भावासोबत गेले. मग तुम्ही तिघांनी पूजा घालून घ्यायची ना. आता राहायचेय ज्यांना ते तर आहेत ना घरात . लोकडाऊन ही नाहीये आता. गुरुजीही मिळतील.
ते रामरक्षा , मारुतीस्तोत्र, रोजची पूजा. धूप , नामसमरणाच मशीन हे सगळं एव्हाना करून बघणं सहज शक्य होतं. धागा आलाय 25 सप्टेंबर ला ,आज आहे 14 ऑक्टोबर. मध्ये 10 दिवस तुम्ही नव्हता तरी 15 - 20 दिवसात तुम्हाला हे घरच्या घरी करून बघण्यासारखं होतं.
तुम्हाला लवकर शांत समाधानाने राहायला मिळो ही सदिच्छा!

झंपु बाळा, तुझा जुना राग समजू शकते. Proud असे कर एखाद्या पीर- फकीर वा मौलवीला बलावुन घे, त्यांच्याबरोबर अनिळजींकडे जाऊन तिथले भूत पळवुन लाव. माझे प्रतीसाद बालिश आहेत बाबा, पण ते माझ्या हिंदु धर्माकरता आहेत, तुमच्या धर्मा ला लागु नाहीत. ( झंपु दामले हे तुम्हीच मागे कुठल्याश्या धाग्यावर सांगीतलेत की तुम्ही मुस्लिम आहात आणी कोकणातले आहात. तुम्ही मुस्लिम आहात याला माझा आक्षेप नाही, पण इथे तुमचा विश्वास नाही तर कशाला ही मगजमारी? नाही का ! )

वर्णिता +१
मलाही थोडसे ऑड वाटले हे प्रकरण. त्यांच्या काळजीपोटी इथे त्यांना एवढे सल्ले मिळाले लोकांचे त्यातल्या एकाही प्रतिसादाला त्यांनी काही सविस्तर प्रतिसाद दिला नाही की मी अमुकतमूक प्रयत्न करतोय यासाठी. पुजा घालायचा विचार आहे एवढाच काय तो प्रतिसाद दिला असेल. इथं पब्लिक रोज त्यांना नवनवीन सल्ले देत आहे की तुम्ही हे करा-तुम्ही ते करा. त्यांची असे पूजापाठ स्वतः करायची इच्छा आहे का हे तर आधी जाणून घ्या. Happy

आज चेंज म्हणून संध्याकाळी तिघेही बाहेर फिरायला गेलो होतो. जाताना सगळं घर व्यवस्थित आवरून ठेवलं होतं. साधारण तासाभरात परत आलो तेव्हा घरी सगळा पसारा होता. सगळं सामान इकडे तिकडे पसरलं होतं. आताच सगळं आवरून झालं.

Pages