पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

पुण्यात 1976-77 ला जे कुप्रसिद्ध जोशी अभ्यंकर हत्याकांड घडले होते त्या बंगल्यात अजूनही कोणी राहत नाही. माझ्या माहितीनुसार सध्या तिथे मूक-बधीर विद्यार्थ्यांची शाळा भरते. वरची चर्चा ऐकून हा संदर्भ आठवला. सांगायचा मुद्दा असा कि बॅचलर्सला देणे किंवा ऑफिसला किंवा शाळेसाठी वगैरे देता येण्याचे पर्याय आहेत.

अमित, आजूबाजूची लोकं खूप चोंबडी असतात. शेजाऱ्यांना नॉर्मल विचारलं की हे घर कसं आहे, आम्ही राहायला येतोय की ते लगेच घराची कुंडली सांगतात.
आधी कोण रहात होतं, ते लोकं कसे होते स्वभावाने, ते कुठे राहायला गेले, काय करतात वगैरे वगैरे ( स्वानुभव)

अशी भुतं खेतं माहीत असेलेले लोकं आपल्याला फार एंटरटेन करत नाहीत. हो घ्या ना घर असं म्हणून पटकन दार लावून घेतात. एक तर नंतर आपल्याला एकटं गाठून माहिती देतात किंवा आपल्याकडे सतत संशयाने बघत राहतात.

शेजार चांगला नाही वाटला तरी घर घेऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे

मोक्याच्या ठिकाणची जागा, घर असो की सुस्थितीत असलेली कार असो कोणी विकत असेल तेही अपेक्षित किंमतीपेक्षा कमी किमतीत तर विकण्याचे कारण विचारुन, कारण योग्य वाटले तरच पुढे पाऊल टाकावे असे स्पष्ट मत आहे.

कारण योग्य वाटले तरच पुढे पाऊल टाकावे असे स्पष्ट मत आहे.>>>याचं उत्तर खरं येईल याची शक्यता खूप कमी असते,विकणारा स्वतः चा हात काढून घेण्याच्या नादात असतो ,तो कशाला सांगेल की अमुक अमुक भास होत आहेत म्हणून जागा /घर विकतोय किंवा सारखी बिघडते म्हणून गाडी विकतोय असं Uhoh

याचं उत्तर खरं येईल याची शक्यता खूप कमी असते,विकणारा स्वतः चा हात काढून घेण्याच्या नादात असतो
>> अगदी बरोबर. पण विकणारा जे कारण सांगतो त्यावरुन चौकशी करता येते.

का खोडले

चांगले होते , नाव xxx लिहून लिहायचे

नाव-गाव टाकलं होतं म्हणलं एखाद्याला खोटं वाटल्यास गावात जाऊन चौकशी करता येईल पण आमच्या तीर्थरुपांना सारा नगर ओळखत असल्याने उगा मीच कोण आहे ते माहित व्हायचं . वल्ड इज अ स्मॉल प्लेस यू क्नो Lol
इथं चहावाला बनून कायबी खरडता येतंय सध्या. अज्ञातात मोठे सुख असते म्हणतात ते खरे आहे.

बाकी, मी आता विवेकी-विज्ञानवादी झालो आहे तरी हे सारे मनाचे खेळ यु क्नो.>>>> हे लय भारीये ! Lol

बॅचलर भूतांशी सामना करतात हे लॉजिक काही वरच्या पोस्टमध्ये आलेय.
माझ्या ऐकण्यात बॅचलर लोकांना पेईंग गेस्ट म्हणून राहताना आलेले बरेच भूताचे अनुभव आहेत.
सर्वात मोठा म्हणजे आमच्याच ग्रूपमधील पोरे. ती सुद्धा वाह्यात, धाडसी, टवाळ पोरे. पण भूताच्या भितीने चौघे जण एकत्र सू सू करायला जायचे. पंधरा दिवसात पुर्ण महिन्याचे भाडे देऊन रूम बदलली. कारण अनुभवही तसेच होते.

एका बाईचा व्हिवळण्याचा आवाज जो सर्वांनाच ऐकू येई. जिने शेजारच्याच घरात स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली होती.
रोज रात्री बाहेरच्या कॉमन पॅसेजमधील आरसा खाली पडून खळक्कन फुटल्याचा आवाज यायचा. आणि सकाळी तो वन पीस खाली पडलेला दिसायचा. हे पुन्हा उचलून जागेवर ठेवायचे. फेकायची हिंमत दाखवायचे नाहीत. जेणेकरून ती बाई तो आरसा शोधत यांच्या रुममध्ये यावी. त्यांनी बांधलेल्या तर्कानुसार ती बाई आपलेले जळालेले रूप त्या आरश्यात बघून आरसा खाली पाडून फोडायची. वर उल्लेखल्या प्रमाणे चौघे एकत्र टॉयलेटला जायचे कारण बाहेर कॉमन टॉयलेट होते जे त्याच पॅसेजमधून जावे लागायचे.

सुरुवातीच्या अनुभवांनंतर त्यांच्या मालकाला त्यांनी विचारले असता त्यानेच मग सांगितले होते की शेजारच्या रूममध्ये अमुकतमुक झालेले त्यामुळे असे अनुभव येतात !

वालचंद सांगलीला असतानाचा हा अनुभव आहे.

कार मध्ये ही भूत असतं का? >> फार वाईट अनुभव आहे का कारचा. एका जवळच्या नातेवाईका चा >> नानबा, इथे अनुभव लिहा प्लीज

धागाकर्ते आधीच अमानवीय काहीतरी आहे या भीतीने ग्रासले आहेत, त्यात अशा ऐकीव कहाण्या सांगून त्यांना अजून का घाबरवत आहेस?

काही आयडीना या प्रसंगाचे गांभीर्य नाही असं दिसतंय एकंदरीत. ज्यांना या थापा वाटत असतील त्यांनी इकडे दुर्लक्ष करावे.

अनिळजी,
तुम्हाला आलेले किंवा येत असलेले अनुभव या थापा आहेत असं मी तरी म्हटलेलं नाही. उलट असे आवाज घरात येऊ शकतात, नळ आपोआप सुरू होऊ शकतो, भांडी पडू शकतात असे अनुभव अनेकांना आलेले आहेत आणि त्यांनी ते इथे लिहिलेलेही आहेत.
मनःशांती मिळवण्यासाठी घरात पूजा करणे, स्तोत्र म्हणणे अशा उपायांना माझा तरी तत्त्वतः विरोध नाही. मीच वर एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असंच माझं मत आहे.
माझा मुद्दा असा आहे की माणसांच्या बोलण्याचे आवाज शेजारच्या किंवा खालच्या/वरच्या घरातून येत असतील, तर ते पूजा करून किंवा स्तोत्र म्हणून थांबणार नाहीत, घरात उंदीर असेल आणि त्यामुळे भांडी पडली असतील, तर तेही या उपायांनी थांबणार नाही, पर्यायाने तुम्हाला मनःशांतीही मिळणार नाही.
तुम्ही या आवाजांची कारणं शोधण्यासाठी काही प्रयत्न केले असले तर ते इथे लिहिलेत तर बरं होईल.

@ ऋन्मेऽऽष तिथे बाकीच्यांना तो अनुभव नव्हता येत का? की फक्त त्या रूममध्ये राहणाऱ्यांच यायचा तो अनुभव. एकत्र सुसुला जायचे म्हणजे बाईंची लैच दहशत होती बहुतेक.

वालचंद सांगलीला असतानाचा हा अनुभव आहे.>>> मिरजेत आहे तेच ना वालचंद(wanless). मिशन हॉस्पिटल बोलतात त्याला. मी त्याच परिसरात राहतोय सध्या.

अनिळजी कृपया गैरसमज करुन घेऊ नका. उलट तुमच्या समस्येवर चारही बांजुनी चर्चा होत आहे, त्या चर्चेला सकारात्मकपणे घ्या. इथे प्रतिसाद लिहिणाऱ्या प्रत्येकालाच तुमच्या समस्येचं कारण जाणुन घ्यायची उत्सुकता आहेच पण समस्येचं निराकरण होऊन तुम्ही तुमच्या नवीन घरात सुखाने वास्तव्य करावे ही मनापासून इच्छादेखिल आहे. फक्त प्रत्येकाची व्यक्त होण्याची पध्दत वेगळी आहे इतकंच.. आणि अनेकांना इथे त्याच्या समस्यांवर चांगले मार्गदर्शन देखिल मिळाले आहे.

त्यात अशा ऐकीव कहाण्या सांगून त्यांना अजून का घाबरवत आहेस?
>>>
आता बदलले ना त्यांनी घर. धागा संपला. आता वाटू दे त्यांना भूत खरेच असू शकते म्हणून. म्हणजे आपण योग्यच निर्णय घेतला याचे समाधान लाभेल.

Pages