पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

धागाकर्ता आणि समस्या किती जेन्युईन आहे यावर पूर्वानुभावरुन मला मोठीच शंका आहे. >> +१००
एक आठवडा जुना आयडी योग्य विभागात धागा काढतो, शुद्ध मराठी लिहितो म्हणजे एक तर एक्झिस्टिंग आयडीचाच हा प्रॉब्लेम आहे जो त्याने नवीन आयडी घेऊन मांडला असावा.
अन्यथा ताजे प्रेत ना जो भयंकर विनोदी त्रास दिला त्यातून माबोकरांची वहावत जाण्याची नस ओळखून कोणी तरी असा हाँटेड हाऊसच्या लाईव रिपोर्टिंग चा फार्स ऊभा केला असावा.

जर जेन्यूईन प्रॉब्लेम असेल तर,
(ईंडिपेंडंट घर आहे असे समजून) प्लंबिंग आणि एग्झॉस्ट चेक करा... विचित्र प्रेशर बिल्ड अप होऊन आवाज येत राहतात आणि आपण सोयीस्कर अर्थ काढतो. दोन वर्षे वयाच्या मुलांचे आपल्यात रममाण होऊन एकट्याने बोलणे कॉमन आहे, पण एवढ्या लहान मुलाला त्रयस्थ माणूस दिसल्यास ते त्यांच्याजवळ न जाता आधी आईवडिलांकडे येतात कारण ऊपजत ईन्सिक्युरिटी. लहान मुलांचे असे समोर कोणी ऊभे असल्यासार्खे बोलणे मी फक्त टीवी, सिनेमात ऐकले, पाहिले आहे.

खाली, वर, आजूबाजूला राहणाऱयांचा आवाज असेल का?>>>>

पहिल्या मजल्यापासून वर राहणारे लोक जमिनीवर गाद्या टाकून झोपत असतील तर उशीवर डोके टेकताक्षणी खालच्या मजल्यावरचा फिरणारा पंखा, टीव्हीचा आवाज, घरातील लोकांची बडबड हे सगळे नकोसे वाटणारे आवाज कानावर पडतात. उशिवरून एक सेमी जरी डोके वर केले तरी हे आवाज गायब होतात. डोके टेकले की परत आवाज सुरू.

Submitted by साधना on 30 September, 2020 - 10:32>>> हो. हे अनुभव आले आहेत.
भिंतीला कान लावले तरी पलिकडचे नीट ऐकू येते.

पण एवढ्या लहान मुलाला त्रयस्थ माणूस दिसल्यास ते त्यांच्याजवळ न जाता आधी आईवडिलांकडे येतात कारण ऊपजत ईन्सिक्युरिटी.>>> हो एकदम बरोबर,

भुतं रूप बदलून येऊ शकतात त्यामुळे त्या मुलाजवळ जाताना ते त्याच्या आई बाबाच्या रुपात जात असतील आणि त्यामुळे तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल.

ह्यांचे सगळे भास हे ऑडिओ प्रकारातील आहेत
व्हिज्युअल काही अनुभव दिसत नाहीत
नुकसानप्रद अनुभवही नाहीत , म्हणजे रोज दूध नासते , काहीतरी फुटते वगैरे , म्हणजे जे कुणी अदृश्य आहेत , त्यांचे तुमचे वैर तरी दिसत नाही.

तोवर उजेड ठेवून घरात वावरावे , प्रत्येक खोलीत चंदन / मोगरा / उद वगैरे धार्मिक सुगनधी वातावरण ठेवावे , आणि जमल्यास आवाजाचा शोध घ्यावा , काही मागचा इतिहास समजतो का पहावे

लगेच घर सोडले तर तसेही घर लगेच विकले जाऊन पैसे येण्याची शक्यता कमी आहे , तोवर घरात न राहिल्यास त्याची व्हॅल्यू अजूनच कमी होईल

तुम्ही खरोखर अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांची मदत का घेत नाही ?
तिथे काही असेल च अंनिस वाल्याना अस्तित्व मान्य करावं लागेल, यात तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळेल प्लस याची मोठी बातमी झाली तर कोणी चॅनल वाले भरभक्कम पैसे देऊन घर विकतही घेतील.
तिथे काही नसेल तर तुम्ही निश्चितपणे तिथे राहू शकाल.

घर घेताना सगळी चौकशी का केली नसेल बरं तुम्ही ?

अमितव Proud
हो ना. तेव्हा पाच वर्षांपूर्वी मी फ्लॅट बूक केला. क्लिअर टायटल, पाणी पुरवठा, पावसाळ्यात पाणी न साचणे, रस्ता अडेल असा आठवडी बाजार न भरणे,ध्वनी प्रदूषण नसणे, गुंडागर्दी नसणे इत्यादी चौकशा केल्या.

पण वास्तू पछाडलेली नसणे, भूत बाधा नसणे, रात्री अपरात्री, दिवसा ढवळ्या, अमावस्या पौर्णिमेला चित्र विचीत्र आवाज येणे, अनुभव येणे असल्या चौकशा नाही केल्या.

आता करायच्या म्हटलं तरी लोक नक्की कुठं करत असतील अशा चौकशा? शेजारी म्हटलं तर माझ्या सारखे शेजारी असले तर?

आता त्या घरी काय सुरू असेल याची कल्पना करून बघा. मिट्ट काळोख. ते जे काही आहे ते अनिळजीना शोधत असणार. कोणीही घरी दिसत नाही म्हटल्यावर ते अजून चवताळून उठलं असेल. अनिळजी अनिळजी हाका मारत घरभर फिरत असेल. पौर्णिमेच्या डाव साधायचा दिवशी अनिळजी घरातून निघाले म्हणजे ती शक्ती गप्प बसणार नाही. अनिळजीना शोधत शोधत आताच्या राहत्या घरातही जाऊ शकते. मोबाईलमधून आपल्या घरातही येऊ शकते. फोन स्विच ऑफ करून झोपा.पळा पळा पळा.

तेथे खरेच काही अमानवी आहे असं समजून माझे दोन आणे-
>>>>जर "खरोखरच" तिथे तुम्ही म्हणता तशी बाधा असेल तर वर सुचवलेले उपाय काम करणार नाहीत. ती ब्याद काढायच्या नादात उगाच "नसलेला" त्रास वाढवून घेसाल. अशे किरकोळ उपाय करून "खरेखुरेभूतप्रेत" गायब झालेले मी अजून नाही पाहिले कधी. हाकलून लावायचा प्रयत्न केल्यास "खरेखुरे" पिशाच अशे गप राहत नाहीत तर चांगले घोडे लावतात. यासाठी "खराखुरा" जाणकार "ऑफलाईन" शोधा. बादवे खरे जाणकार पैसे घेत नाहीत. त्या गल्लेभरू भटांच्या नादाला नका लागू . अजून काही एक्सपर्ट सल्ले मिळतीलच इथे.>>> जिद्दु यांच्या प्रतिसादाला +१

त्या जागेचा इतिहास काढा. जागेत भूतपिशाच्च आहे की त्या जागेवर काही 'बांधणी' करून ठेवलेली आहे हे खरा जाणकार सांगेलच.
सामान्य भूतपिशाच्च असेल तर ते काढणं तुलनेनं सोपं असतं. लवकर हाकलवता येतं. जर कुणी मांत्रीक-तांत्रीक मरुन त्याचं भूत झालेलं असेल तर ते लवकर जाता जात नाही आणि जागेवरच जर काही बांधणी केलेली असेल तर ती काढण्यासाठी बराच कालावधी [काही महीने-वर्षे] लागू शकतो. ती बांधणी किती पक्की आहे, जुनी आहे हे हिशोबात घ्यावं लागतं. शिवाय ती बांधणी न उलगडण्याइतपत पक्की असेल तर ती करणारा आता 'कुठे' आहे [जिवंत-मेलेला, स्वर्गा-नरकात-पाताळात] हेही जाणकाराला विचारात घ्यावं लागतं. 'समोर' 'जवाब' देणारं कोणी नसेलच तर चांगल्या जाणकारालाही मर्यादा पडतात. विषय सोडून द्यावा लागतो.
ती जागा आपल्याला मिळावी म्हणून वा निव्वळ त्रास देण्याच्या उद्देशाने सध्या कोणी असले उद्योग करीत असेल तर त्यांना 'कामाला' लावायला 'पक्का माणूस' लागतो. असा पक्का माणूस भेटणं ही ईश्वरेच्छा !
या सगळ्या भानगडीत भरपूर वेळ, श्रम आणि पैसासुद्धा खर्च होतो. वर होणारा मनस्ताप निराळा.
धागाकर्ते, तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा.

> पहिल्या मजल्यापासून वर राहणारे लोक जमिनीवर गाद्या टाकून झोपत असतील तर उशीवर डोके टेकताक्षणी खालच्या मजल्यावरचा फिरणारा पंखा, टीव्हीचा आवाज, घरातील लोकांची बडबड हे सगळे नकोसे वाटणारे आवाज कानावर पडतात. उशिवरून एक सेमी जरी डोके वर केले तरी हे आवाज गायब होतात. डोके टेकले की परत आवाज सुरू. > +1.
===

Can stress cause hallucinations?
- Stress can exacerbate the symptoms of psychotic, mood, anxiety, and trauma disorders. And when these disorders are at a severe level is when the risk of psychosis is heightened. So, in a way, stress can indirectly cause hallucinations.
===

Is it normal to hallucinate?
- About 1 in 20 people in the general population has experienced at least one hallucination in their lifetime that wasn't connected to drugs, alcohol or dreaming, according to a new study.
===

Causes of Hallucinations and hearing voices
• taking illegal drugs or alcohol.
• a mental illness , such as schizophrenia.
• a progressive neurological condition, such as Alzheimer's disease or Parkinson's disease.
• loss of vision caused by a condition such as macular degeneration – this is known as Charles Bonnet syndrome.

जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. >> म्हणजे तुम्हाला थोडीतरी जाणीव झाली होती, पण फायद्याचा व्यवहार असल्याने तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आता घर विकुन टाकणे हे काही फायद्याचे होणार नाही. फार तर एखाद्या वर्षासाठी कोणतीही पुर्वकल्पना न देता बॅचलर मंडळींना भाड्याने देऊन पहा. ते वर्षभर टिकले तर तुम्हालाही धीर येईल.

धागाकर्ते पुरेशी स्पष्टता देत नाहीत. कारण ते त्या मनस्थितीत नाहीत. बाकी एखाद्या वास्तूत प्रवेश केल्यावर प्रसन्न वाटते वा त्या उलटही होते हे सर्वसाधारण निरिक्षण आहे.

आनंद. +१
Light 1 शिवाय समोरची पार्टी "बलाढ्य"असेल तर त्याचा सामना करायला स्वतःचे "लष्कर" पदरी असावे लागते. असे "'लष्कर'' कमवायला आयुष्याची बरीच वर्षे खर्ची करावी लागतात. बरीच बंधने पाळावी लागतात. सध्या अशी मंडळी बोटावर मोजण्याइतकेच उरली असतील. आपला आवाका लक्षात न घेता अहंकारापायी नको तिथे भिडून बरबाद झालेले लोकं माहितीत आहेत. "लष्कर" जुन्यापिढीचा शब्द आहे. आनंद यांना कदाचित माहित असेल. Light 1
बाकी, मी आता विवेकी-विज्ञानवादी झालो आहे तरी हे सारे मनाचे खेळ यु क्नो.

एक सल्ला देवू का? वर कोणी सल्ला दिल्याप्रमाणे अंनिस वाल्यांना संपर्क करा. किंवा स्वामी समर्थ केंद्रात मदत मागावी.
स्वतःची शम्का निरसन होऊ दे. नाहीतर आयुष्यभर हे दडपण मनावर राहील की खरंच तिथे काय होतं?

का बॅचलर लोकांच्या जीवावर उठलाय वीरू..
Submitted by च्रप्स
>> नाही हो च्रप्स Lol
पण पण फॅमिलीला घर भाड्याने दिले आणि पत्नी गृहिणी असेल जास्त वेळ घरातच असेल मग कुठे खट्ट वाजले तरी खापर भुतांवर फुटेल आणि असं काही खरोखर असेल तर घरातल्या लहान मुलांवर पण परिणाम होऊ शकतो. याऊलट बॅचलर मंडळी बऱ्याचवेळा दोन चार मिळुन घर भाड्याने घेतात आणि त्यांचा बराच वेळ बाहेरच जातो. दोघेचौघे असले तर धाडसपण जास्त गोळा होते.

बॅचलर्सला काही जाणवायची शक्यता कमी आहे, आपल्याच धुंदीत जगायचे दिवस त्यात कसलेही बंधन नाही, रूमवर आल्यावर असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळायची शक्यता कमीच आहे.

अनिळजी, काल राहिलात घरी की नाही?

Pages