पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

दिवसा काही वाटतं नाही..रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून झोपताना कसला खुट्ट आवाज जरी झाला तरी भीती वाटते मग..

ऋन्मेष, धाग्याकर्त्याला मार्ग काढायला दोन्ही सल्ले उपयुक्त ठरू शकतात, यातून जो मार्ग निवडायचा तो ते निवडतील.
म्हणुन मी एकाच प्रतिसादात त्यांना दोन्ही बाजूचे सल्ले दिले आहेत.

आणि त्यांनी यातून घ्यायचा तो निर्णयच घेतला आहे, घर विकण्याचा. शेवटी त्यांना तिथे रहायचं आहे, आयुष्य काढायचं आहे तेव्हा त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला.

कदाचित दुसऱ्या व्यक्तीने दुसरा निर्णय घेतला असता. आणि असे झालेलेही आहे.

असो या विषयावर एक नवा धाग्याचा।विषय सुचला आहे, पाडतो ... आपलं काढतो मी धागा.

ऋन्मेष, आपल्याला ज्या आवाजामुळे किंवा घटनांमुळे (भांडी खाली पडणे, नळ सुरू होणे) भीती/काळजी वाटते, त्याचं कारण आपल्याला माहिती नाही, ते दूर करणं आपल्या हातात नाही, या विचाराने मला तरी जास्त भीती वाटेल. उलट, जर त्या आवाजाचं म्हणा, घटनांचं म्हणा, कारण शोधलं, तर ते दूर करणं माझ्या हातात असू शकतं किंवा दूर करू शकले नाही, तरी कारण कळलं की भीतीही कमी होईल.
एखाद्या अनुभवाला अमानवीय समजून कुणाला त्या घटना सहन करण्यासाठी बळ मिळणार असेल, तर त्याने तसं खुशाल समजावं. मी माझं मत सांगितलं.

शिवाय, मनःशांतीसाठी प्रत्येकाचे उपाय वेगवेगळे असूच शकतात. मला अस्वस्थ वाटलं की मी कदाचित टीव्हीवर एखादा चित्रपट पाहीन. दुसरं कुणी भजनं ऐकेल. कुणी बाहेर फिरून येईल. कुणी देवासमोर दिवा लावेल. ते वेगळं.

एखाद्या अनुभवाला अमानवीय समजून कुणाला त्या घटना सहन करण्यासाठी बळ मिळणार असेल, तर त्याने तसं खुशाल समजावं...................

वावे सहमत

तसे या केसमध्ये भूताबाबतही हेच म्हणता येईल. भूत असो वा नसो. जर एखाद्याचा विश्वास आहे आणि तो त्या अनुभवांनी घाबरला आहे तर याक्षणी भूत वगैरे काही नसते हे त्याला समजावून सांगण्यात काही अर्थ नाही. याने फक्त आपण कसे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे आहोत हेच मिरवून होईल. पण समोरच्या व्यक्तीला काही फायदा नाही होणार >> अगदी बरोबर.
धागालेखक आणि त्यांचा परिवार ज्या मनस्थितीतुन जात आहेत ते पाहता त्यांना मानसिक आधार देता येत नसेल तर किमान या ठिकाणी "भुत वगैरे काही नसते हो" हे तरी
समजावत बसु नका. बाकीच्या चर्चा दुसऱ्या ठिकाणी करता येतील.

त्यांनी नागपुरात घर विकत घेतलंय म्हणजे बरेच पैसे मोजले असणार आणि कोणताही उपाय वगैरे करायच्या आतच त्यांनी एकदम एवढा टोकाचा निर्णय घेतलाय. आता घर विकणे आणि दुसरीकडे बिऱ्हाड हलवणे एवढं साधं काम असेल का? काल असा त्यांना नेमका काय अनुभव आलाय की त्यांनी थेट तडकाफडकी घर विकायचा निर्णय घेतलाय याचीच उत्सुकता आहे. करोना वगैरे जरी असेल तरी निदान आजूबाजूला काही चौकशी तरी करणार की नाही? सोसायटीतील चार लोकं गोळा करून मालकाला दम द्यायला हवा.

नकारात्मक असे ३ अनुभव मला आहेत पैकी २ अनुभव मी क्लासिक हायपोमॅनिया म्हणुन सोडले समजा तरी तीसरा टोटली अनाकलनिय आहे.

बाकी अमोघ शिवकवचाचा प्रचंड सकारात्मक अनुभव आहे. ज्यांना विजान वि अंधश्रध्दा वाद घालायचा आहे त्यंनी जरुर घाला. माझ्यापुरता हा वाद नाहीये.

तडकाफडकी घर विकण्याचा निर्णय मलाही पटला नाही.

नवीन घरात प्रवेश करताना, घरभरणी, वास्तुशांती किंवा किमान गणेशपूजन तरी केले की नाही.

नसेल तर एकदा करून पहा.

अन एकदा सोसायटीमध्ये, आजूबाजूला चौकशी करा.

मला रात्रीची भीती वाटली की मी उशीखाली चाकू ठेवून झोपते. असे काही करून बघा

नाही घेत हो, अजूनतरी नाही घेतला, मुळात आमच्याकडे भूत नाहीये. मी रात्री उशिरापर्यंत हॉरर (इथले अमानवीय किस्से नाही ते फारच साधे वाटतात) वाचले की वाटते कधी कधी भिती.

पण चाकू उशीखाली ठेवल्याने मन निर्धास्त होते अन शांत झोप नक्की येते.

पण चाकू उशीखाली ठेवल्याने मन निर्धास्त होते अन शांत झोप नक्की येते>> नक्की करून पाहील यावेळेस..पण काय लॉजिक असेल या मागे..? सहज curiosity म्हणून विचारतेय..

उशीखाली चाकू मला फार डेंजर गोष्ट वाटते.म्हणजे काहीतरी झोपेत चुकीच्या हालचाली होऊन किंवा उशी सरकून लागला तर?
किंवा वेगळा बोथट चाकू वापरावा लागेल, प्लास्टिक बर्थडे नाईफ सारखा.

गायत्री मंत्रात अन्य लोकांचा उल्लेख आहे उदा - भु, भुव, स्व: , जनलोक, तपोलोक . गुरबाणीमध्ये उल्लेख आहे.
मला सांकेतिक स्वप्नांचा अनुभव आहे.
अनिलजी व त्यांच्या कुटुंबियांकरता प्रारथना करणं आपल्याला सहजशक्य आहे.

मी लहानपणी झोपेत घाबरुन उठायचे, चालाय्चे पण, म्हणून माझ्या उशीखाली पण घरातले चाकू ठेवायचे Happy

एका नाभिकाने ताईत बनवून दिला होता, त्यानंतर मी कधी झोपेत चालले नाही व घाबरुन उठले ही नाही.

गायत्री मंत्रात ओम भु वगैरे नंतर कुणीतरी जोडले आहे
मूळ ऋचा ततसवितु ... प्रचोदयात इतकीच आहे

पण तुम्ही म्हणताना आज जसे म्हणताहेत तसेच म्हणा

उशिखाली चाकु ठेवायचे कारण म्हणजे लोखंडी टोकदार वस्तु वा हत्यार असेल तर वाईट शक्ती त्रास देत नाही असे म्हणतात.
मी पण लहानपणी कधीतरी झोपेतुन दचकुन ऊठायचे तेव्हा मम्मी चाकु ठेवायची असा, तेच अजुन करतीये.

सामो, प्रार्थना जरूर करू पण कशी करणार? नुसतं नागपुरात राहणारे अनिलजी आणि कुटुंबीय एवढंच म्हणणार का?
रच्याकने खरेखुरे जाणकार माबोवरच आहेत पण ते स्वतःच विनोदी मोड ऑन करून बसलेत.

उशिखाली चाकु ठेवायचे कारण म्हणजे लोखंडी टोकदार वस्तु वा हत्यार असेल तर वाईट शक्ती त्रास देत नाही असे म्हणतात.
मी पण लहानपणी कधीतरी झोपेतुन दचकुन ऊठायचे तेव्हा मम्मी चाकु ठेवायची असा, तेच अजुन करतीये..>> धन्यवाद VB

>>त्या अनुभवांनी घाबरला आहे तर याक्षणी भूत वगैरे काही नसते हे त्याला समजावून सांगण्यात काही अर्थ नाही.

या विधानाशी पूर्ण सहमत नाही. भीती दूर करण्यासाठी भूत वगैरे काही नसते हे त्यास समजून सांगणे हे हेतूत: योग्यच आहे ना. काय चूक आहे. अर्थात, त्या व्यक्तीने ते कसे घ्यावे याबाबत मतांतरे असू शकतात. कारण, ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे:

1. काही व्यक्ती म्हणतील "मला अनुभव येतोय आणि तू असे काही नसते म्हणून सांगतोस. म्हणजे मी मूर्ख आहे का.

2, काही म्हणतील "हो नसते असे काही हे मान्य आहे. पण भीती वाटते आणि भास होत आहेत हे सुद्धा तितकंच खर आहे त्याचे काय?

3. काही म्हणतील "हो नसते हेच खरे. पटतेय मला. तरीही कळते पण वळत नाही असे आहे. परिस्थिती नुसार भास होतातच. तुझ्याकडे अजून काही माहिती असेल तर सांग जेणेकरून माझा यावरचा पूर्ण विश्वास उडेल'

नवीन घरात प्रवेश करताना, घरभरणी, वास्तुशांती किंवा किमान गणेशपूजन तरी केले की नाही. >> आम्ही असलं काहीच केलं नाही. Ghar#1 फर्निचर झाल्यावर आवरायला जायचं , तर एके दिवशी सासुबाई म्हणल्या राहुयात इथे तर राहायला लागलो Lol

सध्याचे घर - घर घेतल्या घेतल्या एकदा कलश ठेवलेला देवाला .नैवेद्य दाखवला. पण त्यावर वास्तुशांत वगैरे तसले काही केले नाही.
काही वर्षांनी पुण्यात परत आल्यावर फर्निचर करून घेतले आणि राहायला आलो.

आमच्या इथे घराच्या अगदी मागे ग्राउंड आहे इथे गुर पुरायचे म्हणे. ग्राउंड वर लोकांना वेगवेगळ्या वेळी अपघात झाले.
काही लोकांनी क्रिकेट खेळायला जायचं सोडलं, तेव्हाही आम्ही हसलो. नवरा अर्थातच जात राहिला, मुलगी खेळायला ग्राउंड वर जाते. पण आम्हाला स्वतःला अनुभव आला असता (तसे जाणवले असते) तर मात्र तसेच वागत राहिलो नसतो.

सांगायचा मुद्दा काही केलं नाही तरी चालतं.
पण वाईट अनुभव आल्यावर कानाडोळा करू नये

पक्कं भूत असलं तर घरभरणी, वास्तूशांती, गणेशपूजन अशा फुटकळ उपायांना दाद देत नाही. त्याला घालवण्यासाठी पक्का देवलाशीच लागतो.

चाकूवरुन आठवलं, फार फार पूर्वी मी कुर्‍हाड घेऊन झोपायचो आले चोर तर त्यांची खांडोळी करायला पण माझ्या दुर्दैवानं कोणी घावलं नाय.

व्हीबी आयडिया छान आहे. पण मी उशी खाली चाकू ठेऊन झोपलो तर थोड्याच वेळात विसरून जाईन आणि रात्री मध्येच मला उशी इकडे तिकडे करणे आणि मध्येच काढुन जरा वेळ बिना उशी झोपणे अशी सवय आहे. मग त्या चाकुने मलाच इजा होण्याची शक्यता जास्त.
त्यापेक्षा पिस्तुल उशीखाली घेऊन झोपलेले चांगले. सेफ्टी कॅच मागे करून. आता त्याचे लायसन्स मिळायला हवे, ते कसे मिळवावे हा नव्या धाग्याचा विषय आहे. मला असा धागा पाडण्यात इंटरेस्ट नाही बघा कुणाक पडायचा असेल तर.

अरे कशाला पाहिजे पिस्तुल... एक पेग मारून झोपलेले बरे.. डायरेकट सकाळीच जाग आली पाहिजे... दिवस आपला.. रात्र भुतांची... एकमेकांना डिस्टरब नाही करायचे...

धागा भरकटवू नका प्लीज!
धागाकर्ते टेशनमधे आहेत, लक्षात घ्या.
घर घेणे आणी ते असे मिळणे फारच त्रासदायक अनुभव! Sad

Pages