पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

<<< घर घेणे आणी ते असे मिळणे फारच त्रासदायक अनुभव! >>> हो ना, आणि मी लिहीलेले माझा अनुभव आहे,
व्यक्तीनुरुप अनुभव अन विश्वास दोन्ही वेगळा असु शकतो

माझ्या मते जसा विश्वास ठेऊ तसा अनुभव येतो (आला असे वाटतो) . आणि वाटते मात्र उलटे.. कि अनुभव आला म्हणुन विश्वास आहे.
भूतखेत नसतातच असे मनात पक्के ठरवले की अनुभव येत नाहीत असा माझा पक्का विश्वास आहे.
मानव आणि atulD यान्च्या प्रतिसादास पूर्ण अनुमोदन.

रात्री भाऊ पुन्हा हॉलमध्ये झोपला होता. रात्री त्याला आजूबाजूला कोणीतरी जोरात श्वासोच्छ्वास करत रांगतंय असं वाटलं. शेवटी त्याने लाईट लावून झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप लागल्यावर पुन्हा कोणीतरी कानात कुजबुज करू सुरू केली. विशेष म्हणजे सुरवातीला जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा हा कुजबुजण्याचा त्रास मलाही झाला होता. पण मी दुर्लक्ष केलं. शेवटी वैतागून हॉलमध्ये लाईट तसाच सुरू ठेऊन तो बेडरूममध्ये माझ्या बाजूला येऊन पडला. दोघेही बराच वेळ नुसते पडून होतो. काय होतंय नक्की कळायला मार्ग न्हवता. नन्तर कधीतरी डोळा लागला. रात्री साडेतीन वाजता स्वयंपाकघरात चक्क कोणीतरी माणसं एकमेकांशी बोलत असल्याचा आवाज यायला लागला. या प्रकाराने आम्ही दोघेही चांगलेच उडालो. काहीतरी अगम्य भाषेत ते तिघे चौघे बडबड होते. बेडरूममध्ये लाईट सुरू केल्यानंतर तो आवाज अचानक यायचा बंद झाला. त्यानंतर झोप लागली नाही. सकाळी उठून बॉसला कल्पना दिली आणि भावासोबत घरी आलोय. काही दिवस इकडे राहून पुन्हा तिकडे जाण्याचा विचार आहे. आता गेलो तर एखाद्या व्यक्तीला पूर्वकल्पना न देता तिथे नेणार आहे. काहीतरी विचित्र आहे त्या घरात एव्हडं नक्की.

>>>सामो, प्रार्थना जरूर करू पण कशी करणार? नुसतं नागपुरात राहणारे अनिलजी आणि कुटुंबीय एवढंच म्हणणार का?>>>> होय मला वाटतं इनफ व्हावं.

>>>>रच्याकने खरेखुरे जाणकार माबोवरच आहेत पण ते स्वतःच विनोदी मोड ऑन करून बसलेत.>>> जिद्दू यांचे म्हणताय ना? मलाही वाटतं त्यांनी काहीतरी बोलावं या धाग्यावरती.

ते लोक कुठल्या भाषेत बोलत होते काही कल्पना? ते बोलत असताना तुम्ही दोघांनी सोबत जाऊन प्रत्यक्ष पाहून घ्यायला होत की नक्की काय प्रकार आहे..काहीतरी वेगळं कारण सुद्धा सापडलं असत कदाचित..

@सामो, तो मी नव्हे. दुसरे असेल कोणी. माझे हातावर पोट असल्याने बहुतेक वेळ टपरी सांभाळण्यात जातो. मी चहा आणि भज्यांमधला जाणकार आहे फक्त. मीबी आता इथल्या काही विज्ञानवादी पोस्ट्स वाचून शहाणा झालोय. आपल्या मनाचे खेळ असतात हे सर्व.
तरीबी रात्री घराच्या दक्षिणेला चहा-भजे-बीडी-तंबाखु ठेऊन पहा.

या पितॄपक्षाच्या जरा आधीपासून, सलग २ दिवस, सारखे वाघाचे स्वप्न पडू लागले. बरं हा वाघांचा कळप अगदी बरगड्या दिसेल असा हडहडलेला होता. परत मला काहीच करत नसे पण अन्य कोणाकोणाच्या मागे लागे. मला हे सांकेतिक वाटले.
या वेळेला आयुष्यात पहील्यांदा दक्षीणेला म्हणजे पितरांच्या दिशेला, प्रसाद ठेवला.

आजूबाजूला चौकशी करा की तिथे पूर्वी स्मशान होते का, किंवा कोणी आत्महत्या केली होती/ कोणाचा खून/अपघात झाला होता असे काही. कोरोनामुळे चौकशीला मर्यादा पडताहेत हे माहिती आहे पण तरीही.

जे इथे लिहितायत की मी अंधश्रद्धा पसरवत नाहीये, त्यांनी त्यांची अंधश्रद्धेची व्याख्या कृपया इथे लिहावी अशी मी विनंती करते Happy

ते चोर सुद्धा असू शकतात..आपल्या घरात कुणीतरी बोलतय म्हंटल्यावर किचन मधे जाऊन पाहायला पाहिजे होते.. हेमावैम

मला काय वाटतं
धागा कर्त्यांचा जेन्यूईन प्रॉब्लेम असेल तर जोक आणि घाबरवणारे भूतांचे मीम आपण अमानवीय धाग्यावर करू.
इथे सिरीयस प्रतिसाद टाकू(फॉर/अगेंस्ट काहीही मुद्देसूद आणि संयत भाषेत)

धागा कर्त्यांचा जेन्यूईन प्रॉब्लेम असेल तर जोक आणि घाबरवणारे भूतांचे मीम आपण अमानवीय धाग्यावर करू.>>>>

सहमत. त्यांची मनस्थिती अतिशय वाईट असताना वर बोकलत यांनी टाकलेले चित्र फारशी मदत करणारे नाही.

>> आपल्या घरात कुणीतरी बोलतय म्हंटल्यावर किचन मधे जाऊन पाहायला पाहिजे होते.. हेमावैम

किंवा मोबाईल वर पट्कन आवाज रेकॉर्ड तरी करायला हवा होता. पण ऐनवेळी ते लक्षात आले नसेल त्यांच्या.

जेन्युईन प्रॉब्लेमसाठी जेन्युईन (म्हणजे अंधश्रद्धाळू आणि बुडत्याला आणखी खोलात घेऊन जाणारी, आणि त्यातुन बाहेर पडायला काय करा/ आम्ही काय केलं अशी, कसा अ‍ॅटिट्युड ठेवा अशीही) उत्तरं देऊन झाली आहेत. सात पानी चर्चा झाल्यावर जर केलेल्या जोकांचं कुसळ दिसत असेल तर कुछ नही होने वाला.
धागाकर्ता आणि समस्या किती जेन्युईन आहे यावर पूर्वानुभावरुन मला मोठीच शंका आहे.

धागाकर्ता आणि समस्या किती जेन्युईन आहे यावर पूर्वानुभावरुन मला मोठीच शंका आहे.>>>>

ही भीती इथे कायम असते. Lol लोक आपले काम सोडून सल्ले देत बसतात आणि धागाकर्ते सुमडीत मजा बघत बसतात.

घरात सर्वत्र किमान ५ wt एल ई डी / शुभ्र् प्रकाश रात्रभर लावायला मी ऑलरेडी सुचवले होते पण बहुतेक काही उपाय न करताच विविध शंका मनात ठेवून घर सोडायचे असेच धागा कर्त्यानी ठरवलेले दिसते. प्रत्यक्ष असे आवाज येत असताना तिथे जायची भिती वाटत असेल ( नक्कीच वाटू शकते) तर किमान आपली विज्ञाननिष्ठ शहानिशा व्हावी म्हणून हिडन कॅमेरा तरी प्रत्येक खोलीत ठेवून पहायला हवे होते हेमावैम

आपली विज्ञाननिष्ठ शहानिशा व्हावी म्हणून हिडन कॅमेरा तरी प्रत्येक खोलीत ठेवून पहायला हवे होते >>> Paranormal Activity चित्रपट आठवला.

नवीन प्रतिसादवरुन ते फक्त काही काळासाठी बाहेर जाऊन नंतर एखाद्याला काही कल्पना न देता घेऊन येतो परत तिथे असे म्हणत आहे. आता परत काही दिवसांनीच येतील बहुतेक इथे. वाट पाहणे आलेच आता.

कोणीतरी माणसं एकमेकांशी बोलत असल्याचा आवाज यायला लागला. या प्रकाराने आम्ही दोघेही चांगलेच उडालो. काहीतरी अगम्य भाषेत ते तिघे चौघे बडबड होते.>> खाली, वर, आजूबाजूला राहणाऱयांचा आवाज असेल का?
आमची खिडकी उघडी असेल तर एक घर सोडून रस्त्यावर कोणी बोलत असेल तरी तो आवाज (कुजबुज) आम्हाला ऐकू येते.

Pages