नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?
पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.
Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
थोडक्यात काय तर
थोडक्यात काय तर अंधश्रद्धाळुपणा करा पण लिमिट मध्ये करा. कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये चांगली... वगैरे.
पण असं सारखं लोकांना सांगत का रहावं लागतं? कारण ते लिमिटमध्ये रहात नाहीत. दारूच्या आहारी गेलेला माणूस प्यायला सुरू करताना आज मी लिमिटमध्येच घेणार असे ठरवूनच करतो. आणि लिमिटमध्ये का एकदा घेतली मग त्याची लिमिटची व्याख्याच बदलते, जो पर्यंत अजून घेतल्या जाणे शक्य होत नाही ती नवी लिमिट बनते. अर्थात त्या स्टेज पर्यंत पोचवायला काही वर्षे लागली असतात त्याला.
अंधश्रद्धा लिमिटमध्येच करायची असे ठरवून सुरू केली की पुढे त्या लिमिटची व्याख्या केव्हा कशी बदलते हे लक्षात रहात नाही. एका चांगल्या हवेशीर, सोयीस्कर रित्या बनवलेल्या घराचे इकडले दार तिकडे, इकडली खिडकी बंद करून झाला अंधार, भलत्याच ठिकाणी चक्क नवी भिंत उभी कर, पाणी देणारी कूपनलिका सील करून दुसरी कडे कर, असे करून वाटोळे करून टाकलेले बघितले आहे. (प्राणीबळी नाही, नर बळी नाही, घर सोडून अजुन कुणावर क्रौर्य नाही). बरं एवढा अघोरी प्रकार करून सुटले का प्रॉब्लेम्स? नाही. अजून अमुक आणि तमुक सुरूच आहे. एवढं करून वरून घर विकणारेही आहेत, दुसरीकडे जाऊन सुखी होत असतील का? जीवन म्हटले की चढ उतार, विचित्र अनुभव येणारच. आला उतार, विचित्र अनुभव की परत सुरू. लिमिटमध्ये.
काल जरा विचित्र अनुभव आलेत.
काल जरा विचित्र अनुभव आलेत. इथून दुसरीकडे जाणं योग्य राहील असं वाटायला लागलंय. भुतांवर माझाही विश्वास नाही पण इथे नक्कीच काहीतरी आहे.
कावळे ज्या झाडावर बसले/झोपले
अजिंक्यराव,
कावळे ज्या झाडावर बसले/झोपले असतील तिथे एखादा साप म्हणा, घुबड म्हणा, (असं काही तरी, जे कावळ्यांना आवडत नाही) असं आलेलं असू शकतं. रात्रीच्या वेळी अचानक कावळे ओरडायला लागल्यावर भीती वाटणं स्वाभाविक आहे.
काल जरा विचित्र अनुभव आलेत. >
काल जरा विचित्र अनुभव आलेत. >> एवढा टोकाचा निर्णय एकदम? काय प्रकार झाला नक्की?
देअर हाऊस, देअर मनी, देअर
देअर हाऊस, देअर मनी, देअर रुल्स मानव

आमच्याकडे पूर्ण घरात देव ठेवता येतील असा एकच इशान्य कोपरा आहे. तिथे पुजेला उभं राहायला जागा नाही कारण डायनिंग टेबल आहे. आग्नेयेला मायक्रोवेव्ह पाहिजे तिथे बाथरुम आहे. काय आता, आपण परदेशातल्या आग्नेयेला आहे म्हणायचं गॅस आणि मायक्रोवेव्ह
काल जरा विचित्र अनुभव आलेत. >
काल जरा विचित्र अनुभव आलेत. >> अनिलजी जरा सविस्तर सांगाल का? अर्थात तुमची इच्छा असेल तरच.
इथल्या गप्पात भर टाकावी असं
इथल्या गप्पात भर टाकावी असं फार काही नाही माझ्याजवळ. पण हा धागा वाचून व.पु. ची कथा आठवली....
३३ मिनीटाची आहे, मजेदार आहे!
https://youtu.be/Z4bWAwb-FmE
आज त्या घरात थांबू नका असेच
आज त्या घरात थांबू नका असेच म्हणेन, आज पौर्णिमा आहे.
कोणाचा विश्वास असो वा नसो. मला पौर्णिमेला नेहमीच काहीतरी त्रास होतो. वाद होतात, नको ते कानी येते ईत्यादी....
मी पण घाबरवत नाही पण मलाही
मी पण घाबरवत नाही पण मलाही पौर्णीमेचा त्रास होतो. मी तसा धागाही काढला होता ईथे.
पण तुम्हाला विचीत्र म्हणजे नक्की कसला अनुभव आला ते ही लिहा.
अनु
आमच्या घरी तर देव्हार्याला अशी जागाच नाहीये निट, अन त्यात मम्माचे डझनभर देव. मग किचन ओट्याला लागुनच जे शेल्फ बनवले त्यात खाली देव अन वर मायक्रो.
हे असे आठेक वर्षे होते काही त्रास नव्हता पण या वर्षी काशी वरुन श्री दत्तगुरुमुर्ती आली तेव्हा त्यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी एक नातेवाईक बाई आल्या न मागे लागुन लागुन जागा बदलायला लावली देव्हार्याची.
आपल्याला पौर्णिमेला (किंवा
आपल्याला पौर्णिमेला (किंवा अमावास्येला, किंवा for that matter कुठल्याही विशिष्ट दिवशी/तारखेला/तिथीला) त्रास होतो असं जर आपल्याला वाटत असलं, तर आपण त्या त्या सुमारास मानसिकदृष्ट्या नकळतपणे थोडे हळवे होतो. स्त्रियांंच्या बाबतीत दर महिन्याला होणारे संप्रेरकांमधले चढउतार हादेखील एक अधिकचा घटक असतो. विनिता किंवा VB, तुम्हाला नक्कीच पौर्णिमेच्या सुमारास काही त्रास होत असेल. पण त्याचं कारण पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या विशिष्ट स्थितीवर अवलंबून असण्याऐवजी काही इतर असू शकतं का याचा विचार करून बघा.
असा विचार करून पाहिल्याने आपण स्वतः जास्त कणखर होतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे.
मी कालच काहीतरी जास्त घडू
मी कालच काहीतरी जास्त घडू शकतं याबद्दल शंका व्यक्त केली होती.
पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला
पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. >>>>> हा तांत्रिक बिघाड असतो. माझ्या किचन मधे असाच नळ चालु व्हायचा. मी एकदा घट्ट करुन निरिक्षण करत राहिलो. तोटी हळू हळू लुज होते स्प्रिंग टेन्शन्चा परिणाम व कुठल्या तरी क्षणी आतले पाणी प्रेशर ने बाहेर येउ लागते. हे निरिक्षणातच समजले.
बोकलत पौर्णिमा आज रात्री सुरु
बोकलत पौर्णिमा आज रात्री सुरु होणार आहे .
वावे, माझ्या बाबतीत खूप काही करून झाले आहे, मी तर कॅलेंडर बघतही नाही , मला कधीच माहीत नसते की अमावस्या आहे की पौर्णिमा की दुसरा कुठला तिथी.
पण पौर्णिमा आपसूकच कळून जाते त्रास झाल्यावर
काही इतर असू शकतं का याचा
काही इतर असू शकतं का याचा विचार करून बघा. >> नाही, असे नाहीये.
बर्याचदा काही समोर आल्यावर मला हे कोणीतरी म्हणाले. मागील घटना मी चेक करत गेले तर खरंच त्या वेळी पौर्णिमा होती / असायची.
घटना घडल्यावर, मला पौर्णीमेची काहीही कल्पना नसतांना जर हे घडत असेल तर हळवे होण्याचा संंबंधच नाहीये.
मी अंधविश्वासू नाहीये
अमावासया पौर्णिमाला नवरा
अमावासया पौर्णिमाला नवरा जास्त भांडतो असे मला कोणीतरी बोलले

पण मी काय असे रेकॉर्ड ठेवलेले नाही
तो रेकॉर्ड तुमच्या बायकोने
तो रेकॉर्ड तुमच्या बायकोने ठेवला असेल.
भांडणारा थोडी ठेवतो असले काही लक्षात
मला आलेले गेल्या वर्षातला दोन
मला आलेले गेल्या वर्षातला दोन अनुभव नोंदवावेसे वाटतात.
१
ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी जातो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला.
२) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.
जर अमावस्या पौर्णिमेला किंवा
जर अमावस्या पौर्णिमेला किंवा ठरावीक तिथीला मला कुठला त्रास होत असेल तर मला ते कळणारच नाही कारण मला तिथ्या ठाऊकच नसणार. तेव्हा आज अमुक तिथी म्हणुन त्रास होतोय म्हणण्या पेक्षा जेव्हा जो काय त्रास होईल त्याला कसे तोंड द्यायचे आणि तो कसा घालवायचा हेच बघितले जाते.
tपाच दिवसांपूर्वी बाथरूममधला
tपाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. >>>>> हा तांत्रिक बिघाड असतो. माझ्या किचन मधे असाच नळ चालु व्हायचा. मी एकदा घट्ट करुन निरिक्षण करत राहिलो. तोटी हळू हळू लुज होते स्प्रिंग टेन्शन्चा परिणाम व कुठल्या तरी क्षणी आतले पाणी प्रेशर ने बाहेर येउ लागते. हे निरिक्षणातच समजले>>>>
तांत्रिक बिघाड असेल तर सतत व्हायला हवा. कधीतरी एकदा नको.
तांत्रिक बिघाड असेल तर सतत
तांत्रिक बिघाड असेल तर सतत व्हायला हवा. कधीतरी एकदा नको.>>>> क्वचित असे एकदा दोनदा असला तरी तो तांत्रिक बिघाड. प्लंबरलाही विचारले मी.
मी आधीच म्हटल्याप्रमाणे
मी आधीच म्हटल्याप्रमाणे मुळविषय राहिला बाजुला आणि दोन्ही साईडचे लोकं चालु झालेत. अनिलजी सुद्धा आता विस्ताराने सांगतील असं वाटत नाही. घर सोडण्याचं निर्णय घेतलाच आहे तर निदान काय झालं काल ते तरी सांगा. तेवढंच आम्हाला क्लोजर मिळेल आणि धागा बंद होईल.
नवीन Submitted by प्रकाश
नवीन Submitted by प्रकाश घाटपांडे on 30 September, 2020 - 11:40 >>
हो असे होते. माझ्या बाबतीत बरेचदा होते, मी एखाद्या कामात / गोष्टीत लवकर आणि खूप एकाग्र होतो.
त्यात मध्येच मी स्वतः चहा ठेवला आणि परत त्या कामात येऊन दोन मिनिटात परत गॅस जवळ गेलो, पाणी उकळायला लागले असेल म्हणुन तर पाणी निम्म्याहून जास्त आटून गेले असते.
बायको चहा घेणार का म्हणुन विचारते मी हो म्हणतो आणि इतक्या लौकर आणुन देते की आश्चर्य वाटते इतक्यात कसा केला हिने. अर्धा मिनिट थोडा कमी गरम झाला की घेऊ म्हणुन मनातल्या अर्धा मिनिटाने घेतला की तो पर्यंत थंडगार झाला असतो.
घर सोडण्याचं निर्णय घेतलाच
घर सोडण्याचं निर्णय घेतलाच आहे तर निदान काय झालं काल ते तरी सांगा. तेवढंच आम्हाला क्लोजर मिळेल आणि धागा बंद होईल.
Submitted by प्रणवंत >> +१
मी आधीच म्हटल्याप्रमाणे
मी आधीच म्हटल्याप्रमाणे मुळविषय राहिला बाजुला आणि दोन्ही साईडचे लोकं चालु झालेत>>>उकल करताना अनुषंगिक व समांतर गोष्टी या मुख्य प्रवाहाला पूरकच बनतात. विचारांची व्याप्ती वाढवतात. कधी कधीतर मूळ चर्चेपेक्षा उपचर्चा वा उपउपचर्चा याच अधिक उपयुक्त वा रंजक होतात.
तेवढंच आम्हाला क्लोजर मिळेल
तेवढंच आम्हाला क्लोजर मिळेल आणि धागा बंद होईल > +१
आपली ती श्रद्धा ईतरांची
@ मूळ धागा आणि सल्ले
आपली ती श्रद्धा ईतरांची अंधश्रद्धा हे फार कॉमन आहे.
आमच्या ऑफिसमधील बायका एकदा गाडीला लिंबू लावणे कशी अंधश्रद्धा आहे यावर तावातावाने चर्चा करत होत्या. जेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही घरी पोरांची नजर नाही का काढत तेव्हा ते वेगळे आणि हे वेगळे म्हणत तणतणत उठल्या.
भूत वा अमानवीय शक्ती आणि त्यांनी घडवलेले उत्पात तसेच त्यावरील विविध उपाय हे सारे झूठ आहे म्हणणारे कधी न दिसलेल्या देवावर विश्वास ठेवणारे असू शकतात.
जसे देव असो वा नसो देवावरचा विश्वास जर कोणाला मानसिक बळ देत असेल तर त्यावर विश्वास ठेवण्यात नुकसान नाही. एखाद्या नास्तिकाने उगाच त्यांचा तो विश्वास तोडायच्या फंदात पडू नये.
तसे या केसमध्ये भूताबाबतही हेच म्हणता येईल. भूत असो वा नसो. जर एखाद्याचा विश्वास आहे आणि तो त्या अनुभवांनी घाबरला आहे तर याक्षणी भूत वगैरे काही नसते हे त्याला समजावून सांगण्यात काही अर्थ नाही. याने फक्त आपण कसे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे आहोत हेच मिरवून होईल. पण समोरच्या व्यक्तीला काही फायदा नाही होणार. कदाचित त्याच्या मनात संभ्रम तयार होतील ज्याने मानसिक स्थिती आणखी डळमळीत होईल. किंवा त्याची चीडचीड होईल. म्हणजे अरे मला ईथे विचित्र अनुभव येत आहेत, रात्र कशी जीव मुठीत घेऊन काढतोय माझे मला माहीत, आणि हे शहाणे लोकं आपल्या घरात सुरक्षित बसून कि बोर्ड बडवत भूत वगैरे काही नसते असे सल्ले देत आहेत असे वाटू शकते.
म्हणून अश्यावेळी जास्त संभ्रम निर्माण न करता, ठिक आहे, अमानवीय शक्ती आहेत, तर त्यावर काही उपायही आहेत, ते आम्ही तुम्हाला सुचवतो असा स्टॅण्ड हवा.
जर ते उपाय माहीत नसतील वा त्यावर विश्वास नसल्याने सुचवण्यात रस नसेल तर निदान वर म्हटल्याप्रमाणे हे कसे झूठ असते हे पटवून द्यायचा प्रयत्न करू नये. स्वत:ला धागाकर्त्याच्या जागी ठेवा. या मनस्थितीत तुमचा विज्ञानवादी दृष्टीकोण त्याला पटणे अवघडच आहे.
त्यापेक्षा त्यांना एक स्टॅण्ड घेऊ द्या. जेणेकरून यावर ते जे उपाय वापरतील त्यावरही त्यांचा पुर्ण विश्वास बसेल आणि साईकोलॉजिकली ते काम करतील.
ऋन्मेष +१
ऋन्मेष +१
माझा पण भूत वगैरे गोष्टींवर
माझा पण भूत वगैरे गोष्टींवर विश्वास नाही..पण कधीतरी रात्री झोप येत नसेल तर अमानवीय धागा वरच्या चर्चा आठवतात आणि भीती वाटते.
इथली चर्चा वाचून पण भीती वाटेल वाटते आता रात्री..
इथली चर्चा वाचून पण हसू येतेय
इथली चर्चा वाचून हसू येतेय मला......
ऋन्मेऽऽष. +११११
ऋन्मेऽऽष. +११११
Pages