पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

रात्री अपरात्री निर्जन ठिकाणी रहावे लागणारे लोक आठवा: जंगलात रात्रभर एकट्याने मचाणावर बसून निरीक्षण करणारे प्राणी/ पक्षी शास्त्रज्ञ, कुठे नवीन भागात बांधकाम सुरू असलेल्या जागी रात्री एकटे/दुकटे रहाणारे वॉचमेन, जंगलात २०-३०च्या वस्तीत रहाणारे आदिवासी, स्पेस स्टेशनवर अवकाशात महिने एकटा रहाणारा अवकाशयात्री.>>>>> अगदी अगदी.
मला नेहमी प्रश्न पडतो ज्यांचा खून होतो किंवा जे घडवून आणलेल्या अपघातात मारले जातात त्यांचे आत्मे-भूत मारेकर्‍याला त्रास का नाही देत?

हो बरोबर आहे. ज्या एरियात व्यक्तीचा खून होतो त्या ठिकाणापासून आत्मा दूर गेला की त्याला धुरकट दिसू लागतं. ज्याने खून केला ती व्यक्ती काही दिवसांनी खुनाच्या ठिकाणी गेल्यावर भुताने बदला घेतल्याच्या कितीतरी कथा आहेत.

आपल्याला ज्यांचा कार्यकारणभाव कळत नाही अशा अनेक गोष्टी, घटना घडत असतात. पण निदान कार्यकारणभाव शोधून बघण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे अशा मताची मी आहे. कार्यकारणभाव शोधताना सर्वाधिक शक्यता कसली आहे याचा विचार आधी केला पाहिजे. उदा. आपलं पोट दुखत असलं तर आपण आधी अपचनाची शंका घेऊ की कॅन्सरची? अर्थात अपचनाची, कारण ती शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे घरात आवाज आले तर थेट भुताटकीची शंका घेण्याच्या आधी (आपला विश्वास असो किंवा नसो) इतर, भौतिक कारणांमुळे ते आवाज आले असतील का असा विचार करणे जास्त व्यवहार्य आहे असं माझं मत आहे.

आम्ही एका भाड्याच्या घरात राहत होतो...तिथे गेल्यावर अजिबात प्रसन्न वाटत नव्हते. ए बी सी वींग्जमधे,बरोबर मधोमध तो फ्लॅट होता..तिथे गेल्यानंतर आमच्यात भांडणे जास्त होत होती.. मुलगी एक वर्षाची, जास्त किरकिर करत होती.. एकदा आजारी पडली, दवाखान्यात ऐडमिट करावे लागले होते..मुलगा हि एक दोनदा आजारी पडला.. माझी खूप चिडचिड व्हायची..

कारणे अशी होती..
बी विंगमधे मधोमध फ्लॅट असल्याने अजिबात हवा आणि सूर्यप्रकाश येत नव्हता.. आणि प्रसन्न वाटत नव्हते..
आधीच्या घरी पाच वर्षे राहिल्यामुळे तीथल्या शेजार्यांची मुलांना खूप सवय झाली होती आणि ती चिडचिड करत होती...
नवीन रंगकाम केलेले घर,शिफ्टींग आणि मुलीला अंगठा चोखायची सवय,आजारी पडली..
कामवाली मिळत नसल्याने सगळी काम माझ्यावर पडली परिणामी चिडचिड आणि भांडणं...
फक्त आणि फक्त सू्र्यप्रकाश आणि खेळती हवा पाहिजे या कारणाने आम्ही घर बदलले...
आताही तीथे सहा महिन्यपेक्षा जास्त कुणी राहत नाहीये म्हणजे तिथे काहीतरी आहे असे होत नाही..आजुबाजुला मिळून 140 कुटुंबं राहतात गुण्यागोविंदाने.त्यामुळे सारखा कसलातरी आवाज यायचाच.अगदी रात्रीसुध्दा. नवरा बर्याचदा बाहेरगावी जातो कामानिमित्त,एकटी पण राहिले आहे.
(माझा अनुभव आणि द्रुष्टीकोन)

आमच्या घरी आई-बाबांना भास होत कोणीतरी बुटकी व्यक्ती घरात फिरण्याचा. म्हणजे डोळ्याच्या कोपर्‍यातून झपकन कोणितरी गेले असे काहीतरी भासे. आईला संडासात नळ सोडल्याचा आवाज येइ. मला तर भयंकर त्रास सहन करावा लागला होता. भयंकर म्हणजे भयाण. पण तो त्रास अनडायग्नोसड बायपोलर डिसॉर्डरचा असावा असे वाटते. पण त्रास विचित्र होते तिथले.

माझ्या या गोष्टीवर विश्वास नाही. तरीही कधीकधी बदल म्हणून यावर गप्पा मारायला आवडते. रोजच्या रुटीन आयुष्यात तेवढाच विरंगुळा. अनेकवार घाबरलो सुद्धा आहे. तो एक मनाचा थ्रिलर मोड असतो तो ऑन होतो इतकेच.

काही वर्षांपूर्वी एका रिसोर्ट मध्ये गेलो होतो. मुलगा तेंव्हा चार-पाच वर्षांचा होता. जंगलाच्या मध्ये हे रिसोर्ट. त्यांची कॉटेजेस सुद्धा त्यांनी मुद्दामहून जुन्या पद्धतीने बनवली होती. आतले लाईट सुद्धा पिवळे नारंगी वगैरे रंगाचे. लख्ख शुभ्र असे काही ठेवलेच नव्हते त्यांनी. जंगल थीम म्हणे! Happy त्यामुळे रुममध्ये गूढगंभीर वातावरण असायचे. पहिल्या दिवशी रात्री तिथे झोपताना मनावर अनामिक दडपण होते. भूतखेत हा भाग वेगळाच. पण अनोळखी ठिकाण. त्यातही या अशा रूम्स. त्यामुळे हे दडपण. रुममध्ये बेडरूमच्या बाजूला मोठा आरसा होता. रात्री अकरा साडेअकरा वाजलेले. सर्व लाईट्स बंद केल्या आणि बेडवर पडलो. चिरंजीव माझ्या शेजारीच होते. दहा पंधरा मिनटे झाली तरी त्याची चुळबूळ सुरुच होती.

"काय रे. झोप ना. इतक्या रात्री काय चुळबुळ सुरु आहे? झोप येत नाहीये का?... यासाठीच गाडीत झोपू देत नव्हतो मी तुला मघाशी..."

चिरंजीव शांतपणे म्हणाले, "पप्पा तुम्ही झोपलाय का? मला आरशात कोणतरी दिसले आता. मला वाटले तुम्हीच उभे आहात."

"मुकाट्याने झोप आता. मस्करी नको आहे. मला प्रचंड झोप आली आहे. तुला आजवर कितीवेळा सांगितलेय भूत वगैरे काही नसते. सर्व काही सायन्सच्या नियमानुसार समजून घेता येते. सांगितलेय ना?"

"हो"

"मग झोप बघू. सगळे भास असतात ते. सावली असेल कसलीतरी तुला मघाशी दिसलेली. सकाळी बघू आपण. शहाणे बाळ. झोपा..."

आणि त्यानंतर पाचच मिनिटात तो झोपला सुद्धा. पण माझा थ्रिलर मोड ऑन झाला होता. रात्रभर झोप पार उडाली. समजा आरशाकडे चुकून लक्ष गेलेच आणि मला सुद्धा त्यात कोणी दिसले तर काय घ्या Lol
---

असो. धागाकर्त्यांसाठी हा विषय गंभीर आहे, तसेच प्रतिसाद त्यांना अपेक्षित आहेत. व मिळत सुद्धा आहेत. पण थोडेसे वातावरण हलके होण्यासाठी हा प्रतिसाद. बाकी काही नाही. (अवांतर होत असेल तर डिलीट करून टाकतो. असे काही नाही)

मला वाटते की त्यांना अपेक्षीत प्रतिसाद त्यांना मिळालेत तरी आता आपण नवीन काही प्रतिसाद देत बसण्यापेक्षा त्यांच्याच पुढच्या पोस्टची वाट पाहणे योग्य राहील.

समजा आरशाकडे चुकून लक्ष गेलेच आणि मला सुद्धा त्यात कोणी दिसले तर काय घ्या Lol
Lol
अशी भीती मला पण वाटते, भुतांचे सिनेमे बघितल्यावर दोन दिवसांपर्यंत. Lol

मृणाली, प्रतिसाद आवडला.

अतुल, दांडेली का? कारण तिथली कॉटेजेस मलाही अजिबात आवडली नव्हती अंधारी असल्याने Happy तिथे शेजारी आरसाही होता आणि मोठा (मला कुणी दिसलं मात्र नाही आरशात Wink )
असो. हे अगदीच अवांतर होतंय आता.

संध्याकाळी भाऊ आलाय. थोडं बरं वाटतंय. त्याला अजूनतरी काही जाणवलं नाही. त्याचा विश्वास पण नाही म्हणा असल्या गोष्टींवर.

मागे अनवट नावाचा मराठी सिनेमा आला होता. त्यात शेवटी एक छान वाक्य आहे 'ज्याचा विश्वास असतो त्याला भूते दिसतात पण ज्याचा विश्वासच नसतो त्याला कधीच दिसत नाहीत'.

अनवट नावाचा मराठी सिनेमा आला होता. >> त्यातले काही सीन खरंच भिती निर्माण करतात. एक दोनदा मला धस्स झालेलं!

धागाकर्ते, जाणत्या माणसाकडून मार्गदर्शन घ्या.

अनिळजी,
जागा पछाडलेली आहे की कसे त्यावर काही भाष्य करावयाचे नाही पण आता मुलाच्या वागण्यातला सकारात्मक बदल दिसत असला तरी आधी त्याचे जे वागणे होते त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू नका असे सुचवेन. आता त्याच्या सभोवतीच्या बदललेल्या गोष्टींची (जागा, आवडीची माणसे, खेळणी, समवयस्क मुले ई.) नोंद ठेवा...कदाचित त्याचे आधीचे गूढ वागणे घर बदलण्याच्या प्रोसेस मध्ये त्याच्याकडे झालेले दुर्लक्ष्य, तुमच्यावर ताण आला असेल तर तुमचे वागणे, एकटेपणा, त्याला नवीन ठिकाणी अ‍ॅडजस्ट होण्यात येणार्‍या अडचणी अशा गोष्टींचे पर्यावसान असू शकते.
नवीन घरात सुखी समाधानी आयुष्य लाभण्यासाठी तुम्हाला शुभेच्च्छा.

समजा विकायच झाल तर तुम्ही का विकताय अस विचारल्यावर खर कारण सांगणार का? हा प्रश्न आहेच. तुम्ही विकत घेताना असा प्रश्न विचारला होता का?

विकायचा झाला तर खरं कारण सांगणार आहे. काल रात्री भाऊ हॉलमध्ये झोपला होता सकाळी उठला तेव्हा अस्वस्थ वाटत होता.त्याच्या म्हणण्यानुसार रात्री झोप लागल्यावर कोणीतरी त्याच्या कानात कुजबुजत होतं. तोसुद्धा चांगलाच गांगरून गेलाय या प्रकाराने. कालचा दिवस चांगला गेला आज पुन्हा दिवसभर तशीच अस्वस्थता होती.

एक दत्ताचा फोटो आणू त्या समोर गुरुचरित्र पोथी ठेवा, सकाळ संध्याकाळ धूप लावून राम रक्षा म्हणा किंवा you tube वर लावा

बाप रे!!
रामरक्षेचा उपयोग होत नाही. माझ्या अनुभवानुसार राम, विष्णु हे फार उशीरा प्रसन्न होणारं दैवत आहे. कितीही डोकं फोडा, काही फरक पडत नाही. मग त्यामानाने शंकरांचे अमोघ शिवकवच खूपच परीणामकारका आहे.

वावे, मानव प्रतिसाद आवडले.
तुमचा आणि पत्नीचा विश्वास आहे तर त्यातुन तुम्हाला बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा. मनाची समजुत घालायला जे शक्य आणि कायदेशीर असेल (म्हणजे कोणाचे बळी वगैरे देऊ नका) ते करा. पण अशा भिती लहान मुलाला घालू नका आणि त्याच्या समोर बोलू ही नका.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस! हे लक्षात ठेवा.

भित्यापाठी ब्रह्मराक्षस! हे लक्षात ठेवा. >>> exactly ! म्हणून तुमच्या भावाच्या अनुभवाबद्दल तुम्ही लिहिलं तेव्हा विचारणार होते की त्याला पार्श्वभूमी माहीत होती का? त्याला काही न सांगता नेलं असतं तर हा अनुभव आला असता का हे पण तपासायला हवं होतं.
मानसिक किंवा अमानवीय, जे असेल ते, यातून तुमची लवकर सुटका होऊन तुम्हाला लवकरात लवकर नवीन घराचा आंनद उपभोगयला मिळो हीच सदिच्छा.

एक करू शकता निदान सुट्टीच्या दिवशी दिवसभर झोप घेऊन रात्री जागे रहा. रात्री सर्व दिवे लाऊन टीव्ही पाहत बसा. मग काय अनुभव येतोय का पहा?

मी पूर्वी अमानवीय धाग्यावर एकदा लिहिलं होतं हे. तिथून कॉपी पेस्ट करतेय.

<<<कॉलेजला पुण्याला असताना मी पेइंग गेस्ट/कॉट बेसिस वर राहायचे. घरमालकांचं कुटुंब खाली राहायचं, वर समोरासमोर दोन खोल्यांमधे आम्ही मुली राहायचो. तशीच खालीपण एक खोली होती, त्यात दोन मुली राहायच्या. एकदा पी. एल. मधे मी रात्री अभ्यास करत बसले होते. रात्रीचा एक वाजला होता. माझी कॉट भिंतीला लागून होती, त्या भिंतीतून अचानक घोरण्याचा आवाज येउ लागला. रूममेट झोपली होती पण ती घोरत नव्हती. समोरच्या रूममधे त्या रात्री कुणीच नव्हतं हे मला माहिती होतं, खालच्या रूममधून आवाज येत असेल असं म्हणून मी पुस्तक बंद करून झोपले. त्यानंतर खूप दिवसांनी एकदा असंच रात्री उशीरापर्यंत आम्ही तिघी जाग्या होतो आणि परत एकदा मला असा भिंतीतून घोरण्याचा आवाज येउ लागला. मी मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांनी आधी मला वेड्यात काढलं पण माझ्या कॉटवर बसून आवाज ऐकल्यावर त्या टरकल्या, कारण त्या दिवशी खालच्या रूममधे कुणीच नव्हतं, हे आम्हाला माहिती होतं । आणि समोरच्या रूममधली मुलगी आमच्याबरोबरच होती. आधीही असा आवाज आल्यामुळे यावेळेस मी ठरवलं की या आवाजाचं मूळ शोधायचं . मी खाली जिन्यात जाउन उभी राहिले आणि मैत्रिणीला सांगितलं की आवाज आला की मला सांग. असं ३-४ वेळा केल्यावर लक्षात अालं की समोरच्या बंगल्यातून हा आवाज येतोय. इतका लांबचा आवाज इतक्या स्पष्टपणे भिंतीतून येताना बघून आम्हाला प्रचंड आश्चर्य वाटलं, पण १००% खात्री झाल्यामुळे आम्ही निर्धास्त झोपलो.>>>

सांगायचा मुद्दा असा, की लांबचा आवाज फार जवळून आल्यासारखा वाटू शकतो.

ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. >>>>> म्हणजे त्याला काही असे अनुभव येत नव्हते असे त्याला म्हणायचे होते का?

आणखी एक आपल्या मायबोलीवरील कोणी शुरवीर, असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसलेला आयडी यायला तयार असेल तर त्यांना बोलवा काही दिवस मुक्कामी Light 1

वावे, घोरण्याच्या आवाजाची वारंवारता त्या भिंतीच्या नैसर्गिक वारंवारतेशी मिळती जुळती असावी.

तुम्ही आणि बायकोचा मुळात भुताखेतांवर पूर्वी विश्वास होता का? की या घरात असे अनुभव आल्यामुळे विश्वास बसला?
एक कल्पना सुचली म्हणजे ( कदाचित वेडेपणा वाटेल पण वर्थ थिंकिंग) तुम्ही या समस्येला जरा प्रसिद्धी का देत नाही? म्हणजे मित्र, मित्रांचे मित्र यांची मदत तरी घ्या किंवा चक्क मिडिया / सोशल मिडियाच्या मदतीने एखादे चॅलेन्ज सुरु करू शकता, या घरात पूर्वी असे असे अनुभव आलेत, तुम्ही इथे एकटे एक रात्र राहून दाखवा, किंवा समस्या खोटी आहे हे सिद्ध करून दाखवा इ.
जर कोणी सिद्ध केले की हे मनाचे खेळ आहेत किंवा अमूक एक कारणामुळे असे प्रकार घडत आहेत तर उत्तमच, प्रोब्लेमच संपला तुमचा, पण ते प्रकार खरे असतील आणि या प्रसिद्धीतून कोणी पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स वगैरे मिळालेच तर कदाचित खराच प्रॉब्लेम असेल तर तोही सुटेल! काही नाही तर या भयानक प्रकारात एकटे पडल्याचे फीलिंग तरी जाईल.

Pages