पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

((कारण आपले काही भले करायला कोणी अज्ञात व्यक्ती वा शक्ती बसली आहे हे पटत नाही.

तर एखाद्या वास्तूत अशीच एखादी शक्ती वास करत असण्याची शक्यता आहेच.

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 September, 2020 - 00:05 >>> ))

म्हणजे आत्मा / भूत शक्तीवर विश्वास आहे, देव शक्तीवर (अद्याप) नाही एवढंच. आस्तिकत्व फार लांब नाहीय तुला.

माझा दोन्हीवर विश्वास नाही.

पण हा टीपी धागा नसेल तर सर्वप्रथम आधी मुलाकडे लक्ष द्या. स्वतःच समोर कोणीतरी आहे असे समजून एकटे बोलणे चांगले लक्षण नाही. वय लहान आहे त्याचे तरी त्याला विश्वासात घेऊन त्याला खरंच कुणाचे आवाज ऐकू येतात का हे त्याच्याकडून काढून घ्या. काय आहे की लहान वय आहे, लॉकडाऊनमुळे खेळायला कुणी नाही आणि त्यात नविन जागी ते आणखी जाणवत असेल, मुलगा खेळण्यात आपल्या काल्पनिक सवंगड्याशी बोलतोय की त्याला खरंच कुण्या व्यक्तीचे (मग त्या व्यक्तीचे वय काही का असेना) आवाज ऐकू येतात हे जाणून घ्या. जर त्याला खरंच आवाज ऐकू येत असतील तर डॉक्टरना भेटा, कुण्या मांत्रिक/जाणकाराला नव्हे. जर तसे नसेल तर त्याला सोबत देऊन त्याचे काल्पनिक सवंगड्याशी बोलणे कमी होते का पहा, होत असेल तर त्याला सोबतीची गरज आहे.

बाकीचे मनात अस्वस्थ वाटणे, भास होणे वगैरे, मनात भीती असेल तर ते अधिक जाणवते, अधिक भास होऊ लागतात. रात्री अपरात्री निर्जन ठिकाणी रहावे लागणारे लोक आठवा: जंगलात रात्रभर एकट्याने मचाणावर बसून निरीक्षण करणारे प्राणी/ पक्षी शास्त्रज्ञ, कुठे नवीन भागात बांधकाम सुरू असलेल्या जागी रात्री एकटे/दुकटे रहाणारे वॉचमेन, जंगलात २०-३०च्या वस्तीत रहाणारे आदिवासी, स्पेस स्टेशनवर अवकाशात महिने एकटा रहाणारा अवकाशयात्री.
आणि आपण चक्क शहरात राहतोय आणि घाबरतोय! रात्री अपरात्री बिनधास्त एकटे दुकटे फिरणारे प्राणी, दिसते का त्यांना कधी भूत, प्रेताची भीती. स्मशानाच्या आवारात रहाणारे लोक आहेत, कसे रहात असतील? आणि आपण भर शहरात स्वतःच्या मालकीच्या घरात रहात आहोत, कसली आलीय भीती? काढून टाका मनातून भीती. वर वावे यांनी लिहिल्या प्रमाणे शोध घ्या भांडी का पडली रात्री ते. काही भूत बित नाहीये, त्याला खरेखुरे काहीतरी कारण आहे ते शोधा. तुम्ही ज्या मानसिकतेतून कारण शोधाल त्याच प्रमाणे तुम्हाला उत्तर सापडेल, अंधश्रद्धेतून शोधाल तर अमानवीय नक्की असे वाटेल, अंधश्रद्धेतुन बाहेर येऊन शोधाल तर खरे कारण सापडेल.
अचानक सुरू होणारा नळ आमच्याकडे होता, आतील थ्रेड्स खराब झालेले, पाण्याचं प्रेशर ठराविक पेक्षा जास्त असले की भसकन सुरू व्हायचा.
रात्री खोलीतला दिवा अचानक लागला आपोआप. त्या दिव्याच्या बटणातील स्प्रिंग जरा लूज होता, म्हणजे एवढाही लूज नाही की आपोआप लागेल, किड्याच्या मागे धावणाऱ्या पालीचा पाय पडून बटन ऑन झाले होते.
अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्याचे स्पष्टीकरण थोडे मोठे आहे म्हणुन आवरते घेतो.

तर एक तर मनातून भीती, अंधश्रद्धा विचार काढुन टाका झाल्या प्रकरणांचा छडा घ्या आणि बिनधास्त रहा सगळे.

आणि हे जर जमतच नसेल तर "तुम्हा दोघांचा" ज्या कोणी जाणकारावर विश्वास आहे की हा आपल्याला नक्की मदत करेल, हवी ती पूजा अर्चा / शांती करून ते आत्मे किंवा जे काही असतील त्यांचा कायमचा बंदोबस्त करेल त्याला बोलवून करवून घ्या. या मार्गाने मनातील भीती दूर करा. पण यात आधीच्या उपायाप्रमाणे बिनधास्त रहाता येणार नाही, मन उद्या दुसरीच काही खुसपट काढु शकते, परत काही पूजा बिजा असे चालूच राहील पण इलाज नाही जर हाच मार्ग तुम्हाला योग्य वाटत असेल तर.

देव असतो की नाही - भूतप्रेत असतात की नाही हा कधीही तडीस न जाणारा मुद्दा आहे. दोन्ही बाजूंची मंडळी त्यांच्या पातळीवर बरोबर असतात आणि शक्यतो एकमेकांना समजवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. नशीब इथे तसा वाद अजून सुरु झाला नाही. धागाकर्त्याने त्यांना आलेले अनुभव अमानवीयच आहेत असाही कुठे स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तरी दोन्ही बाजूंकडून आलेले सल्ले वाचून त्यांनी त्यांना योग्य वाटते तो निर्णय घ्यावा आणि वाचकांसाठी अजून विस्तारपुर्वक खुलासा करण्याची तसदी घ्यावी.

वास्तू 'बाधिक' असणं म्हणजे नक्की काय? भारतीय वास्तू शास्त्रानुसार वास्तू कधीच बाधिक नसते. अशी कोणतीही गोष्ट आपल्या शास्त्राने मान्य केलेली नाही. वास्तू शास्त्रानुसार जागेत दिशादोष (मुख्यतः दक्षिण), आपली कर्मं, मानसिक अवस्था, कुंडलीतील दोष, मृतात्म्यांचा एखाद्या व्यक्तीच्या मनावर ताबा असणं अशा गोष्टींमुळे राहणाऱ्या व्यक्तींना त्रास होतात. पण जागा 'बाधिक' होणं अशक्य आहे. बहुतांशी हे सत्य असलं तरीही संशोधनात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अज्ञात गोष्टींना पूर्णपणे मी नाकारत नसल्यानं हे शास्त्र भविष्यात वास्तू बाधिक होते असं सिद्ध करणारच नाही असा माझा दृष्टिकोन नाही. असो, याबद्दल अनेक मत मतांतरं आहेत. माझ्या अभ्यासानुसार आणि अनुभवांनुसार माझी जी मतं आहेत ती मी इथे मांडायचा प्रयत्न करत आहे. त्याच्याशी सगळेच सहमत होतील असं नाही याची मला जाणीव आहे.

आता सोप्या शब्दांत सांगायचं तर वास्तूला बाधा होणं म्हणजे एखाद्या वास्तूत जेव्हा निरनिराळ्या योनितील अतृप्त आत्म्यांचा वावर असून त्यांच्या मार्फत त्या जागेतील व्यक्तींना मानसिक क्लेश होतात आणि त्याचं पर्यवसान शारीरिक क्लेश वा भौतिक घडामोडींवर होतं. काही वेळा हे नैसर्गिकरित्या घडतं, तर काही वेळा सिद्धीप्राप्त तांत्रिक हे घडवून आणतात. शक्यतो हे आत्मे त्या वास्तूच्या बाहेर आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत. त्यामुळे ती वास्तू त्यांच्या बंधनात अडकते आणि त्या वास्तूला त्यांची बाधा होते, म्हणजेच ती वास्तू अप्रत्यक्षरीत्या 'बाधिक' होते. या पारलौकिक शास्त्राला इतके कांगोरे आहेत कि त्याचा अभ्यास असलेली व्यक्तीच याचं योग्य निदान करू शकते. त्या अतृप्त आत्म्याची (योनि) शक्ती किती आहे, नक्की कोणत्या कारणासाठी तो अतृप्त आहे, किती काळापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे आणि कसा झाला आहे, एकाच आत्म्याचा वावर आहे कि जास्त अशा अनेक गोष्टींवर होणारा त्रास अवलंबून असतो. एखाद्या मृतात्म्याचा वावर एखाद्या योनित किती काळ असतो यालाही काही मर्यादा असतात. त्यामुळे असे काही वावर असतील तर त्या आत्म्याचं देहावसान फार पूर्वी झालेलं नसणार. ज्या वेळी काही शेकडो वा हजारो वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तींची नावं अशा बाबतीत घेतली जातात ते मला पटत नाही. पण नुकत्याच मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतात्म्याबद्दल एखाद्या जागेत राहून काही त्रास देणं शक्य आहे. मग त्यासाठी त्या जागेत असणाऱ्या एखाद्या कमकुवत मनाच्या व्यक्तीच्या मनाचा ताबा घेणं हा सर्वात जास्त अनुभवलेला प्रकार असतो. तसंच जिवंतपणी त्या व्यक्तीच्या भावना किती तीव्र होत्या आणि आताची योनि कोणती यावरही सर्व फळं अवलंबून असतात. मृतात्मा जेव्हा अशा अवस्थेत असतो तेव्हा त्याला स्वतःला काहीही करता येत नाही. त्यामुळे अशा विचित्र अनुभवांच्या वेळी जागेवर ताबा असतो म्हणजे बऱ्याचदा त्या जागेत राहणाऱ्या व्यक्तींना विचित्र अनुभव येतात, त्यांच्या हातून काही गोष्टी घडतात. बऱ्याचदा अशा ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना वाईट स्वप्न पडतात किंवा मृतात्मा त्यांना स्वप्नात दिसतो. अशा व्यक्ती त्या मृतात्म्याला जिवंतपणी ओळखतही नसतात. पण निद्रावस्थेत असताना जिवंत व्यक्तीच्या मनाचा ताबा घेणं तुलनात्मकरित्या सोपं असतं. या बाबतीतला विशेष अनुभव म्हणजे जेव्हा कोणी पोटावर वळून झोपतं तेव्हा अशी स्वप्नं जास्त पडतात. पण एरवीसुद्दा वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तरी पोटावर वजन पडेल असं झोपलं तर वाईट स्वप्नं पडतात कारण त्यामुळे पचनक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे कोणत्याही अशा पारलौकिक अनुभवांच्या वेळी सगळ्या शक्यता पडताळून पाहाव्यात.

साभार https://madhuramay.blogspot.com/

मानव - अनुभव आल्याखेरीज विश्वास बसणे कठीण... माझाही नव्हता पण एका 5 वर्षे मुलीला त्रास होताना पाहिलंय ..
असे समजा तुम्हाला एकच मुलगा आहे.. मी नाही .. मला मटण पाहिजे...मी उडी मारून जीव देईन असे घाबरवताना पाहिलंय...
पूर्ण व्हेज फॅमिली.. त्या मुलीला मटण म्हणजे काय हेही माहीत नसावे...
नंतर अमावास्येला कोंबडी उतरवून टाकली तर ती कोंबडी तडफडून मेली हे स्वतः पाहिलंय...
नंतर ती बरी झाली पण शाळेचे एक वर्ष वाया गेले ...

छान लिहिलेत मानवजी.
मुलं बऱ्याचदा शाळा-शाळा, घर-घर वगैरे एकटीच खेळतात, समोर कोणी बसलंय असं समजून..
अर्थात 2 वर्षाचा असल्याने शाळा/घर कल्पून खेळण्याचे वय नाही.
थोडा जास्त वेळ मुलाला द्यायला हवा असं मला वाटतं...

मनुष्य मरण पावल्यावर जी पहिली अवस्था असते त्यातली एक म्हणजे 'वासनाशव'. एखाद्या मनुष्याचा किंवा प्राण्याचा मृत्यू झाला तरीही त्याच्या मेंदूच्या भागात 'धुगधुगी' असते हे आपणही पाहतो. हि धुगधुगी म्हणजेच चेतना एक ऊर्जा असते जी जिवंतपणी त्या मनुष्य / प्राण्याची जीवनउर्जा असते. पण मृत्यूनंतर ती एका क्षणात संपत नाही. उदाहरण द्यायचं तर मनुष्याचं शीर धडावेगळं केलं तरी किमान १५ सेकंद आपल्या आवती भोवती काय चाललंय हे त्याच्या मेंदूला समजतं. अशीच चेतना मृतात्म्यातही असते. जेव्हा ही चेतना जास्त असते तेव्हा मृतात्मा 'जिवंत वासनाशाव' होतो. पण अशी चेतना अत्यंत कमी किंवा जवळपास नसतेच तेव्हा तो मृतात्मा 'मृत वासनाशाव' असतो. ही चेतना प्रामुख्यानं मेंदूत असते. मी वरती वर्णन केलेले अनुभव येणं, एखाद्याच्या मनाचा ताबा घेणं ह्या गोष्टी जिवंत वासनाशवांकडून होतात. कारण तेव्हढी चेतना त्यांच्यात बाकी असते जी त्यांना उद्युक्त करते. यालाच संचार म्हणतात. मृत वासनाशवांकडून झालेले त्रास अजून तरी सिद्ध झालेले नाहीत. काही वेळा देवतांचे गण मनुष्य मनाचा ताबा घेतात आणि माणसाला दुष्कृत्य करायला भाग पाडतात. याला 'गणसंचार' म्हणतात. पण ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. काही वेळा दुष्ट व्यक्ती, तांत्रिक अशांचे मृत्यू झाल्यावर त्यांना पिशाच्च योनि मिळते. याचेही संचार असतात ज्यांना 'पिशाच्चसंचार' म्हणतात. पिशाच्च ही शवभक्षक राक्षसी योनि असून नुकत्याच मरण पावलेल्या वासनाशवातील ऊर्जा पोषक द्रव्यासारखी वापरून ते आपली ऊर्जा वाढवतात.

काही लोकांचा गैरसमज असतो कि वास्तू बाधिक आहे म्हणजे ती संपूर्ण जागा / एखादी खोली / एखादा भाग / दरवाजा अशा गोष्टींवर मृतात्म्याचा 'कब्जा' असतो. कब्जा असणं म्हणजे त्या ठिकाणावर मृतात्मे सर्पासारखे वेटोळं घालून बसतात आणि कोणी तिथे गेलं तर ते त्रास देतात असंच काही लोकांना वाटतं. पण सत्य तसं नसतं. मृतात्मे तिथे वावर जरूर करतात पण कोणतीही वस्तू घट्ट धरून बसत नाहीत. एखाद्या व्यक्तीची जिवंतपणी ती आवडती जागा असते, त्या जागेसंबंधी काही तीव्र भावना असतात त्यामुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणाविषयी त्या खूप आक्रमक असतात. मृत्यूनंतर जी अवस्था असते त्यात प्रत्यक्ष काही करता येत नसल्यानं त्या आणखी आक्रमक होऊन दुसरा काही मार्ग नसल्यानं असे काही संकेत देतात, जेणेकरून त्या जागी दुसरं कोणी असलेलं त्यांना आवडलेलं नाही हे दर्शवता येईल. अर्थात त्या जागी त्यांच्याबाबतीत पूर्वी काही वाईट घडलं असेल तर त्यांना याचा संकेतही द्यायचा असतो किंवा त्यांच्यावर जिवंतपणी ज्यांनी अन्याय केला आहे अशा व्यक्ती तिथे आल्या तर मृतात्मे तीव्र भावना व्यक्त करायचा प्रयत्न करतात. पण ह्या सगळ्याला भौतिक जगात खूप मर्यादा असतात.

काही लोकांच्या अनुभवानुसार अशा जागेत त्यांना मृतात्मे 'दिसतात'. म्हणजेच एखादी पांढरी झालर ज्याला मनुष्याचा आकार असू शकतो वगैरे. ही जिवंत वासनाशवं असतात ज्यांना कधीकधी पिशाच्च योनि प्राप्त होते तर कधी इतर कोणती योनि मिळते. पण ही वासनाशवं त्यांच्यात चेतना असल्यानं इकडून तिकडे फिरत असतात आणि कधी कधी दर्शन देतात. रसायनशास्त्र, किमयाशास्त्र आणि पारलौकिक शास्त्र (पैशाचिक) अशा शास्त्रांत यांचा अभ्यास होतो. बऱ्याचदा असं काही 'दिसलं' तर इतर लोक त्या व्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवतात. पण अनेक कारणांमुळे असं 'दिसणं' शक्य आहे. याचा संपूर्ण अभ्यास केला जायला हवा. हि दिसणारी वासनाशवं किती त्रासदायक आहेत हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं ज्याबद्दल इथे सखोल माहिती देणं शक्य नाही.

असो, हा विषय इतका सखोल आहे कि एका लेखात सर्व माहिती देणं शक्य नाही. पण ठळक मुद्दे मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही मृतात्मा प्रत्यक्षात काही करू शकत नसल्यानं जी चुकीची माहिती पसरवली जाते त्याला बळी पडू नये. एखादं यंत्र (गॅजेट), कॅमेरा अशा कोणत्याही यंत्रात यांचे फोटो वा व्हिडिओ घेणं (सध्यातरी) अशक्य आहे. प्लँचेट सारखी पद्धत अवलंबताना शेकडो वा हजारो वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला 'बोलावणं' अशक्य आहे. एखाद्या शिकलेल्या व्यक्तीनं अभ्यास करताना मृतात्म्याला त्याच्या मनाचा ताबा घ्यायला परवानगी देऊन एखादी माहिती घेणं शक्य आहे. पण अशा शिकलेल्या व्यक्तींना 'माध्यम' म्हणतात. पूर्ण मार्गदर्शन घेतल्याशिवाय असे प्रयोग करू नयेत. अनिच्छेने कोणी माध्यम झालंच तर ते कमकुवत मानाचं लक्षण असल्यानं कोणत्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता मानसिक बल वाढवावं. त्यामुळे अशा गोष्टींतून सहज सुटका होते. काही पारलौकिक शास्त्रातले वा ज्योतिष शास्त्रातले उपाय यासाठी आहेत पण कोणत्याही शास्त्राच्या खूप आहारी जाऊन घाबरून जाऊ नये. मृतात्म्यांच्या अवस्थांना काळाची मर्यादा असते त्यामुळे कोणी आपल्या खूप आधीच्या पिढीतील व्यक्तींबद्दल काही सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर विश्वास ठेवू नये. श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसावी.

एकूण आकडेवारी पाहिली तर पारलौकिक घटनांमध्ये २ ते ५ % तथ्य असतं. बाकी निव्वळ गैरसमज, अंधश्रद्धा, मानसिक दौर्बल्य आणि भीती असते हे माझं स्पष्ट मत आहे.

ह्या विषयाचा अभ्यास करताना अनेक 'बाधिक' जागांबद्दल माहिती मिळाली. भारताबद्दल बोलायचं तर राजस्थान, दिल्ली, पुणे येथील किल्ले / वाडे (भांगरा किल्ला, शनिवारवाडा इ.), मुंबई / ठाणे येथील काही भाग, हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी, अमेरिकेचे व्हाईट हाऊस जिथे अब्राहम लिंकन यांनाही भास होत असत आणि आजही लिंकन यांचा आत्मा तिथे वावरतो असं म्हणतात, जगभरातील अनेक हॉटेलं, युद्धाची ठिकाणं, छळछावण्या, इस्पितळं, जुनी घरं अशा एक ना अनेक वास्तू बाधिक आहेत असं सांगणारे ठामपणे सांगतात. ह्यात तथ्य किती आणि आर्थिक फायद्यासाठी केलेली प्रसिद्धी किती हे वाचकांनी ठरवावं. अशाच एका बाधिक वास्तूबद्दल पुढील लेखात काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

टीप: कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. उलटपक्षी अंधश्रद्धा दूर होण्यासाठी मी हि माहिती देत आहे. जो श्रद्धेचा भाग आहे आणि सुसंगत आहे तेव्हढाच मी मान्य केला आहे. त्यामुळे कृपया कोणत्याही प्रकारचे गैरसमज व अंधश्रद्धा यांना मी स्थान देत नाही आणि देणार नाही याची नोंद घ्यावी.

साभार https://madhuramay.blogspot.com/

रामराम

च्रप्स, Shamans, Mystics and Doctors by डॉ. सुधीर कक्कर हे पुस्तक वाचा.

मग लोक भगत, मांत्रिक वगैरेंकडे का जातात याचे उत्तर मिळेल, किंवा ती कोंबडी का मेली याचेही कदाचीत. (सगळ्यांचा विश्वास बसायला कोंबडी मरणे आवश्यक आहे, हेतू चांगला असेल त्या मागे).

पण ते काही लॉंगटर्म सोल्युशन नव्हे. यातून हळूहळू बाहेर पडायला हवे.

च्रप्स, शक्य असल्यास विस्ताराने लिहा यावर. आम्हाला उत्सुकता आहे वाचायची.

मी जे काही लिहिलंय ते अनुभव मला खरोखरच येत आहेत. टीपी करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. कालपासून तुमचे प्रतिसाद वाचतोय, तुमच्या सर्वांचे प्रतिसाद वाचून थोडा धीर आलाय. परवा रात्री साधारण तीनच्या सुमारास एक विचित्र आवाज आला. हा आवाज कसा होता हे आता नक्की सांगू नाही शकणार पण आवाज घरातूनच आला होता पण हा असा आवाज आयुष्यात प्रथमच ऐकला. फार भयावह न्हवता पण त्यांनंतर ही आणि मी जागाच होतो. अर्ध्या मिनिटात साधारण चार ते पाच वेळा तो आवाज आला असेल. काल शेवटी निर्णय घेऊन हिला आणि मुलाला माहेरी सोडून आलो. माहेरी गेल्यापासून म्हणजे काल संध्याकाळ पासून मुलगा एकदम व्यवस्थित आहे. आजी आजोबांच्यात रमलाय. मीसुद्धा आज सकाळीच इथे आलो. एकाला दुसऱ्याची सोबत म्हणून आज भावाला काही दिवस इथेच बोलावलंय. तुम्ही म्हणताय तस सकाळी संध्याकाळी देवांच्या आरत्या स्तोत्र मोबाईलवर लावलं की बरं वाटतं म्हणजे अस्वस्थता कमी होते कदाचित मानसिक प्रभाव असावा पण नंतर ये रे माझ्या मागल्या सुरू. आजूबाजूला विचारायला अजून तरी इथे जास्त लोकांशी ओळख नाही झाली आणि त्यात हा कोरोना त्यामुळे लोकांशी थेट जाऊन बोलायला थोड्या मर्यादा पडतात. आज भाऊ येणार आहे त्यामुळे बरं वाटतंय. पूजा घालायचा विचार आहे. तुम्ही सगळ्यानी सांगितले ते उपायही करून बघणार आहे. शेवटी घर विकून दुसरीकडे जाणं हा शेवटचा पर्याय आहेच.

आमच्या स्वैपाकघराच्या चिमनीच्या एक्झॉस्टमधे साळुंक्या घरटं करतात. त्यांची पिल्लं, रात्री हालचाल करतात आणि आवाज येतो. एक्झॉस्ट पाईपवर घासलं गेल्यामुळे. आता सवय झाली आहे तरी अर्धवट झोपेत दचकायला होतंच हमखास. तसं काही आहे का बघा.

सुरक्षित रहा.
घर भाड्याने दिलंत तरी शक्यतो एकट्या भाडेकरु ला आणि व्यवस्थित कल्पना देऊन द्या.
जर पूर्व इतिहास, खून्/मृत्यू याने घरात काही निगेटिव एनर्जी तयार होत असेल तर मंत्र पठण, होम, रोज धूप जाळणे याने पॉझिटिव्ह एनर्जी पण तयार होईल.
जमल्यास मनःशक्ति केंद्रात सायं संस्कार नावाची निळी डिव्हीडी असते ती आणा. त्यात एक यज्ञ प्रार्थना आहे ती खूप प्रसन्न करते.
ही रिमिक्स सॅक्रीड चांट आम्हाला आवडलेली काही.
याच्या २ डिव्हीडी आमच्या कडॅ आहेत. पण सॅक्रीड चांट या नावाखाली बाजारात असंख्य स्तोस्त्र डिव्हीडी आहेत. त्यामुळे युट्युब लिंक

सर्वेषाम स्वस्तिर्भवतु
https://www.youtube.com/watch?v=yQhEhulrH2U

ध्येय सदा सवित्रमंडलं
https://www.youtube.com/watch?v=sXVLp2TRRQY

शुक्लांबरधरं विष्णुं
https://www.youtube.com/watch?v=H9qhFKMaTWY

महिषासुरमर्दिनी स्तोस्त्र
https://www.youtube.com/watch?v=Ii8QQXSySMU

माटी बनी ग्रुप चं कर्पुर गौरं करुणावतारम
https://www.youtube.com/watch?v=FyuOkfEFfN4

मनःशक्ति ची प्रकाश प्रार्थना (याची डिव्हीडी घेतल्यास उत्तम. युटुब व्हर्जन बहुधा इल्लिगल असेल.)
https://www.youtube.com/watch?v=spn45RYjahs

जगात चांगल्या गोष्टी असतात त्याप्रमाणे वाईट शक्तीही असतात. तुमच्या घरी जे काही आहे ते तुम्हाला त्रास देत नाही म्हणून स्वस्थ बसू नका. या शक्तींचा प्रभाव हळूहळू वाढत जातो. देवासमोरचा दिवा 24 तास तेवत ठेवा.

@मानव @वावे आणि तत्सम प्रतिसाद
+111
डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळे विश्व अत्यन्त रुक्ष अशा गणिती समीकरणांनी आणि ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार सुरू आहे. आणि त्या दोन गोष्टी आकाशगंगांच्या पातळीवर जाणवतात. पृथ्वीवर नाही. Happy राहता राहतात स्थानिक वातावरणामुळे निर्माण होणारे मनाशी संबंधित प्रश्न. ते कसे सोडवायचे हे अखेर ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात हे माझे मत मांडले. कोणास समजून सांगण्यासाठी अथवा कोणाचे मत खोडण्यासाठी किंवा मतपरिवर्तन करण्यासाठी वगैरे नव्हे.
जसे वरती एका प्रतिसादात म्हटले आहे, आपल्यामूळे इतरांनी आपली मते बदलावीत असा आग्रह धरण्यात अर्थ नसतो.

श्री अभिजित जोशी हे एक जाणकार व्यक्ती आहेत, कोणतेही पैसे घेत नाहीत, पुणे येथे राहतात. Paranormal expert आहेत. विशिष्ठ उपकरणे लाऊन शोध घेतात. त्यांच्याशी संपर्क करा.

तुमच्या पत्रिकेत चतुर्थात राहु आहे का ते बघा. जर असेल तर त्याचा त्रास हा कायम भासमान असतो. चतुर्थ स्थान हे घराचे असते. घर जर विकायचे नसेल तर घरात लघु रुद्र करुन घ्या. वर लिहीले आहे तसेच जाणकारांमार्फत करुन घ्या. दररोज श्री दुर्गा कवच वाचा. याने हळू हळू हे त्रास कमी होतात. तसेच मुख्य दरवाजावर श्री पंचमुखी हनुमानाचे चित्र लावा.

वावेच्या शंका आणी सूचना रास्त असल्या तरी काही गोष्टी मनाला पटल्या नाही तरी अस्तित्वात आहेत. पण जर त्या आहेत म्हणजे देव आहेच. देवाची निराकार निर्गुण उपासना ही वास्तुत शूभ लहरी उत्पन्न करते.

@ मानवमामा,
म्हणजे आत्मा / भूत शक्तीवर विश्वास आहे, देव शक्तीवर (अद्याप) नाही एवढंच. आस्तिकत्व फार लांब नाहीय तुला.
माझा दोन्हीवर विश्वास नाही
>>>>>

१) तुमचा भूतांवर विश्वास नाही आणि भूत जगातच नाहीत या दोन भिन्न गोष्टी झाल्या.

२) एखादी गोष्ट आहे हे सिद्ध करता येते. पण एखादी गोष्ट नाही हे आपण सिद्ध करू शकत नाही. अमुकतमुक लॉजिक लावत हे घडणे वा असे असणे शक्यच नाही ईतकेच मांडू शकतो.

३) मी लिहिले आहे की मला स्वत:ला भूतांचा अनुभव नाही. पण ते लॉजिकली असू शकतात हे मी मान्य करतो. देवांबाबत मला कुठले लॉजिक न सापडल्याने मी त्यांचे अस्तित्व मान्य करत नाही.
पण भूत मानतो म्हणजे आज ना उद्या देवही मानेलच असे म्हणता नाही येणार. दोघांचा आपसात संबंध नाही. तसेही गेले पंधरावीस वर्षे मी नास्तिक आहे. आणि भूतंही तेव्हापासून मानतोय. तर आता काय माझे मरून भूत झाल्यावर मी आस्तिक होणार..

मॉरल - भूत वा देव आहेतच वा नाहीतच हा दावा कोणीच करू शकत नाही. आपण मानतो किंवा नाही मानत ईतकेच याबाबत आपण म्हणू शकतो.

भूलभुलैया म्हणून एक छान चित्रपट आहे.
भूत न दाखवता कशी एखादी कहाणीत आपण गुंततो ते कॅरेक्टर आपल्यात शिरते. आणि आपण तसा विचार करू लागतो. अश्यावेळी कशी आपल्यातली आंतरीक शक्ती जागी होते की आपण अगदी बेडही उचलू शकतो हे दाखवलेय.
त्यावरचा मानसशास्त्रशी संब्ंधित उपायही छान दाखवलाय.
असे चित्रप्ट बघा. अश्या प्रकारचे वाचन करा. यातून आपल्या मनात येणारया विचारांची दिशा आपसूकच बदलेन. येत्या काळातही भूताखेतांची भिती कमीत कमी होईल.

आपणास एक नाव सुचवले आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. विपु मध्ये डिटेल्स आहेत. नागपुर हल्ली मुक्कामी अस लिहिलेत, टेकडी मंदिरात जाऊन या.

सामो, केतू राहुप्रमाणे काम करत नाही. उलट तो शुभ असेल तर अध्यात्माकडे ओढा असतो. केतू मोक्षकारक आहे. तो गुरु बरोबर उपासना दाखवतो. राहु हा भास निर्माण करतो. उगीच भिती निर्माण होते. मी पत्रिकेतली जाणकार नाही पण अनूभव मात्र आहेत. राहु मुळे मला जाम त्रास झाला. उगाच कोणी विरोधात जाणे, आपल्या बद्दल गैरसमज करुन घेणे असे अनूभव आले. राहुला शिव उपासना फलदायी असते.

धन्यवाद रश्मी. नवर्‍याच्या चवथ्या घरात केतु आहे. काही वर्षातच त्याची शनि म हादशा सुरु होइल. देव करो आणि अध्यात्म दृष्ट्या खूप फलदायी ठरो. असां आपलं उगाचह दिवास्वप्न. Happy त्याला विशेष नाही भक्तीचं काही. पण कधी कलाटणी मिळेल कोणी सांगावं.

माझ्या प्रथम घरात केतु आहे. व १२ व्यात शनि.उपासना वगैरे नाही पण श्रद्धाळू स्वभाव आहे.

बाकी बरेच ग्रहमान पाहूनच ठरवावं लागतं हे खरे आहे.

Pages