पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

भावाला माहीत होतं. त्याला कल्पना देऊनच मी इकडे बोलावून घेतलं. त्याचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. पण कालच्या प्रकरणामुळे तो जरा अस्वस्थ झालाय.

घरी कोणाला बोलावून त्यांना शोधाशोध करायला लावणं मला पटत नाही. या लोकांचे व्हिडिओ पाहिले युट्युबवर. हे लोकं काही विचित्र इन्स्ट्रुमेंट्स घेऊन येतात आणि हा आवाज आला, त्या यंत्राच्या दोन लाईट पेटल्या तीन लाईट पेटल्या असले उद्योग करतात शेवटी निष्पन्न काहीच नाही.

आज साडेबाराला पौर्णिमा सुरू होते. आज पुन्हा भावाला एकटं झोपू द्या. खरोखरच अमानवीय काही असेल तर काल जे घडलंय त्यापेक्षा अधिक घडेल. तसं झालं तर भावासोबत तुम्ही ते घर सोडा. पौर्णिमेला तिथे राहू नका.

किंवा या वास्तूत तुमचं पूर्वकर्म जसं असेल तसे अनुभव येतात अशी प्रसिद्धी द्या. तुमच्या मनातील भीती समोर येते असं सांगा. मिरर ऑफ एरीसेड सारखं. हवं तर एक छानसा आरसा आणून ठेवा. आणि मग नाईटली पैसे घेऊन तो अनुभव विका.
तुमचं मन स्वच्छ असेल तर काही अनुभव येणार नाही. इ. इ. सांगा.
आणि अनुभव आला तर भीतीला मागे आरशात टाकून ते लोकं घरी जातील अशी त्याच्या मनाची खात्री पटावा.
अनुभवांची गाठोडी उकलाणारी खोली - कर्मावर विजय! अशी टॅग लाईन बरी वातात्येय मला.

>> भिंतीतून घोरण्याचा आवाज येउ लागला.... लक्षात अालं की समोरच्या बंगल्यातून हा आवाज येतोय. इतका लांबचा आवाज इतक्या स्पष्टपणे भिंतीतून येताना बघून आम्हाला प्रचंड आश्चर्य वाटलं

हे आश्चर्यजनक आहे पण घडू शकते. बोललेला आवाज हवेतून थेट ऐकायला येत नाही पण दोऱ्याच्या फोन मधून मात्र स्पष्ट येतो Happy ते तत्व लागू पडत असावे. मी सुद्धा पूर्वी असा अनुभव घेतला होता. उशीतून माणसांच्या बोलण्याचा अस्पष्ट आवाज येत असे. थोडे डोके वर उचलले तर मात्र भयाण शांतता Lol

@प्रणवंत, नाही हो घाबरवत नाही. पौर्णिमेला आणि अमावस्येला या गोष्टी घडतात म्हणून पूर्वकल्पना देतोय. आज कदाचित त्याच्या भावाला दरवाजा ठोठवण्याचा , खिडकीतून कोणीतरी बघण्याचा, अंगावरील चादर ओढण्याचा, भेसूर हसण्यासोबत रडण्याचा आवाज येणं हे भास होऊ शकतात.

अजून एक दृष्टीकोन (अनुभवातून आलेला) असा आहे कि, जेंव्हाकेंव्हा मला एकटे थांबावे लागले (कामाच्या निमित्ताने वगैरे) तेंव्हा मला असे जाणवले कि कामाचा ताण असेल किंवा अन्य कोणत्याही चिंतेने/विचाराने डोके पूर्ण भरून गेलेले असेल तेंव्हा असे भास कमी जाणवतात. किंबहुना बाकीच्या विचारांना/तणावांना आपसूकच अधिक प्राधान्य दिले जाते. कधीमधी घरी एकटा असेल तेव्हा सुद्धा माझा हाच अनुभव आहे. फार कसला तणाव नसेल तर स्वत:च्या इतकी वर्षे राहत असलेल्या घरात सुद्धा भास होतात Happy अनोळखी ठिकाणी तर अजूनच जास्त.

प्रकरण गंभिर आहे.. पण तुम्ही युनिवर्सली विचार करा. मायबोलीवर मुख्यता हिंदु लोक आहेत ते त्यांच्या विचारा आचाराप्रमाणे उपाय सांगणार.. भुत असावे असे तुम्हाला वाटते पण ते अद्रृश्य आहे, दिसत नाही पण अस्तित्व जाणवतेय याचा अर्थ ते कुठल्या धर्माचे आहे याबाबत स्पष्टता नाही.. तुम्ही घरात एक सर्वधर्मिय प्रार्थना घ्या त्याने वातावरणात आशादायक बदल होउ शकतो. भटजी, मुल्ला मौलवी, पादरी, भंते जी, जैन मुनी यांच्याकडून प्रार्थना करवुन घ्या.. यातही एक अशी गोम आहे की भुत नास्तिक ही असु शकते त्यामुळे अंधश्रध्दा निर्मुलन वाल्यांना ही बोलवून एखादे चर्चासत्र ठेवा.. दाराबाहेर देवदेवतांचे फोटो लावताना कंजुषी करु नका सर्व धर्मातले देव वा पवित्र चिन्ह यांना सामावुन घ्या.. शत्रु अदृश्य आहे त्यामुळे ही सर्व काळजी घ्या. मार डोक्याला नि मलम गुडघ्याला असे व्हायला नको़.

उशीतून माणसांच्या बोलण्याचा अस्पष्ट आवाज येत असे. थोडे डोके वर उचलले तर मात्र भयाण शांतता>> होय, होतं असं.
सध्या शाळेसाठी लवकर उठण्याची घाई नसल्याने आजूबाजूच्या घरांमधली छोटी मंडळी रात्री उशिरापर्यंत दंगा करत असतात. आम्ही लवकर झोपलो, तर असे उशीतून आवाज हमखास येतात Lol

अनिलजी, अमोघ शिवकवच उत्तम आहे. जरुर वाचा. आज भौमप्रदोष आहे. चांगला दिवस आहे शंकराची उपासना विशेषतः अमोघ शिवकवच वाचन सुरु करण्याचा. मल अखूप पॉझिटिव्ह अनुभव आहे. संस्कृत डॉक्युमेन्टसवरती आहे. थांबा लिंक देते -
https://sanskritdocuments.org/doc_shiva/amoghashivakavach.html

बोकलत व्यस्त असतील तर आगबबुला जाऊन येतील तिथे. त्यांची आग ओकणारी बुबुळे पाहुनच जे काय असेल ते कल्टी मारेल त्या जागेतुन पटकन.

किंवा बोकलत यांचे व्हिडीओ कॉल वर सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकतात. त्यामुळे...

>> घरमालकाच्या मुलाला आणि सुनेला नॉन व्हेज कोण देणार?

हा प्रश्न पण सुटेल.

आवडेल का माहित नाही पण दिसेल असे वाटते जरूर. कारण मायबोलीवरच एक कथा वाचली होती त्यात व्हिडीओ कॉल वर दिसते ते कथा नायकाला.

इंटरनेट वगैरे आधुनिक सुविधा वापरणार्‍या इथल्या लोकांचे कवच वगैरे उपाय वाचून डोळे (आणि डोके) भरून आले. धन्य!

इंटरनेट वगैरे आधुनिक सुविधा वापरणार्‍या इथल्या लोकांचे कवच वगैरे उपाय वाचून डोळे (आणि डोके) भरून आले. धन्य>>
याचे कारण हे खोटेच आहे आणि हे करणारी मंडळी बिन्डोक च आहेत असे तुम्ही गृहीत धरले आहे.
आपल्याला सर्व सत्य कळले आहे असे समजणे हा मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन असावा. Lol

माझी पोस्ट मराठीत बघून तुम्हाला अजून एक टडोपा क्षण मिळाला असायला हरकत नाही Wink

माझी पोस्ट मराठीत बघून तुम्हाला अजून एक टडोपा क्षण मिळाला असायला हरकत नाही
>
आपण नेहेमीच मराठीतून लिहित होता, पण लिपी रोमन वापरायचा. त्यामुळे ते वाचायला अत्यंत क्लिष्ट जात असे.
तुम्ही गेले अनेक दिवस देवनागरी लिपीतून लिहित आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन करणे राहून गेले. त्याबद्दल क्षमस्व.

>>
आपल्याला सर्व सत्य कळले आहे असे समजणे हा मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन असावा
>>
याच्या नेमका उलटा वैज्ञानिक दृष्टिकोण असतो. अनेक गोष्टींचे आकलन व्हायचे अजून बाकी आहे आणि म्हणून त्याचा शोध घेण्याची धडपड हेच तर वैज्ञानिकांचे आयुष्य असते. आजचा दिवस चांगला आणि तमूक कवच घातले म्हणजे हे अनुभव जातील वगैरे अंधश्रद्धांचा प्रसार म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोण असलेला मनुष्य करत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोण तयार व्हावा याकरिता शिक्षणपद्धतीत शास्त्र वगैरे विषय शिकवले जातात. मात्र त्या पद्धतीचा पराभव ढळढळीत इथे दिसतो आहेच.
याच धाग्यावर अनेकांनी असे अनुभव आले असताना विवेकी दृष्टिकोण बाळगून त्यामागची कारणे शोधल्यावर झालेल्या रंजक पण सामान्य घटनांबद्दल लिहिले आहे. त्यातून अंधश्रद्धा व डोळसपणा यातला फरक समजून येण्यास अवघड नसावे.

दोन्ही बाजुकडच्या लोकांचे विचारमंथन(?)घडुन यावे असा सुप्त हेतु असावा या धाग्याचा. धाग्याने उगाच नाही शंभरी पार केली. हा एव्हरग्रीन टॉपिक आहे इथला Happy

काही आहे किंवा नाही या अ‍ॅनालिसीस लांब बसून आपण करु शकत नाही. पण जो काही डल्/निगेटिव्ह प्रभाव घरावर आहे (काहीतरी वाईट आठवणी, भूतकाळाचे ओझे, घराचीच मूळ अंधारी रचना, झाडे वगैरे) तो कमी करायला, फिका पाडायला जे जे आवश्यक वाटते, घरात राहणार्‍यांसाठी चांगले वर्क करते ते नक्की करावे. कवच काय किंवा श्लोक्/मंत्र्/उदबत्त्या काय.अन्यथा अश्या घरात नुसतेच राहून मनःस्थिती खराब असेल. उदास असेल. साध्या साध्या गोष्टी पण काही शक्तीने घडवून आणलेल्या वाटायला लागतील. हे सर्व होऊ नये, मने खंबीर राहावी यासाठी जे आवडेल ते करावे. (यात प्राण्यांचे बळी/नरबळी किंवा कोणाला खराट्याने बडवणे,उपाशी ठेवणे असे क्रौर्यपूर्ण उपाय अंतर्भूत नाहीत. ते अंनिस्/श्रद्धाळू दोन्ही साईडला चुकीचेच.)

मित्रांनो, हे विज्ञानवादी दृष्टिकोन, डोळसपणा, विवेक वगैरे बिनकामाच्या गोष्टी आहेत. मी तर आमच्या साहेबांचा चेला आहे. त्यांचे सर्व गुण माझ्यात उतरवता येतील यासाठी प्रयत्न करतो. वरील एकबी अवगुण त्यांच्यात नाही. काय नुकसान झालं त्यांचं ? आज कुठे आहेत ते ? सकाळी त्यांचे नाव घेऊन दिवसभर चहा उकळत- भजी तळत बसतो(तिरुमला तेलातच फक्त). रिकाम्या वेळात त्यांचे फोटो - वरून आलेल्या पोस्ट्स फॉरवर्ड करणे, देशविरोधी लोकांना ट्रोल करणे, इथे येऊन अमानवीय आणि हा धागा वाचणे यात छान वेळ जातो.
बादवे काल काय अनुभव आले अनिलजी ?

फार नाही, परवाचीच गोष्ट. मी पिंपळे सौदागर परिसरात राहतो. तर झालं असं कि आनंद यादवांचे "नांगरणी" वाचत होतो. त्यामुळे झोपायला रात्रीचे अडीच वाजले. साधारण २.४० ला मला नीट झोप लागली होती. तासभर झोपल्यासारखं वाटलं आणि कावळ्यांच्या कर्कश्श आवाजाने जाग आली. आवाजही असा कि जगातले सगळे कावळे आमच्या सोसायटीत शिरलेत आणि ठरवून ओरडत आहेत असं वाटावं. मी मोबाईलला टाइम बघितला तर २.५७ झालेले. उठून बाल्कनीत आलो तर झाडांवर काहीच हालचाल दिसेना, कि आवाजाची दिशा ठरवता येईना. थोडक्यात माझ्यापुरता कार्यकारणभाव शोधून तो मला सापडला नाही. मग सरळ बेडवर पडलो, हनुमानचालीसा म्हणत म्हणत झोपी गेलो.

हनुमानचालीसा का? : आपल्या मनाला ज्या गोष्टी कळत नाहीत, त्यांची भीती वाटत राहते. मग मनाला मी असं ट्रेन केलंय कि हनुमान चालीसा म्हटल्यावर/ ऐकल्यावर ते निर्धास्त होतं. यात माझ्यावर संस्कार झालेत मारुतीच्या भक्तीचे त्याचा परिणाम असावा. लहानपणापासून जर "हाड तुझ्यायला " म्हटल्यावर भूत जाते असं शिकवलं असतं, तर माझी खात्री आहे त्यानेसुद्धा भुते पळाली असती.

पूर्णपणे विज्ञानावर विश्वास ठेवायचा तर कष्ट फार पडतात, त्या मानाने अध्यत्माचा मार्ग जरा सोपा पडतो! ज्या गोष्टी निस्तरण्यात व्यर्थ शक्ती पणाला लावायची नसते त्या गोष्टी निःशंक होऊन देवाच्या हवाली करून निर्धास्त व्हावे. मध्यंतरी स्वामी समर्थ तारक मंत्र वाचनात आला त्यात सुद्धा मनाला उद्देशूनच जे काय आहे ते लिहिलंय. थोडक्यात, सब मन का खेळ!

मी अनु +१११
महत्वाचे हे आहे की असं काही घडत असताना मन खंबीर असलं पाहिजे भले त्यासाठी मंत्र,जप,देवाचे फोटो असे इतर कुणालाही त्रासदायक ठरणार नाही असे उपाय वापरावे लागले तरी चालेल,मन ताळ्यावर आल्यावर मग बाकीच्या गोष्टी म्हणजे भास असतील का होत आहेत,आवाज येत असतील तर त्याचे मूळ,अंधारी रचना असेल तर त्यावर उपाय असं मुळापर्यंत जाता येईल,शेवटी ते राहतं घर आहे त्यांचं भाड्याचं किंवा हॉटेलची रूम नाही की त्रास होतोय तर सोडून दुसरी बघायला,
जर त्यांनी सांगितलं आहे लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं शक्य नाहीये(जे जनरली कुणालाच शक्य नसेल) तर जिथे राहावं लागणार आहे तिथे राहण्यास मनाची तयारी हवीच,मग भले आधी आधार मंत्र नि फोटो यांचा घ्यावा लागो.

Pages