पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता थाय करी आणि दोन इतर डिशेसचा मी एकदा क्लास केला होता (२०१४ मध्ये) कारण मलाच थाय फूड आवडतं. त्या क्लास मधल्या रेसिपीज आहेत. मी शेअर करू शकेन. पण इथे नाही. मीपैसे भरून केले म्हणून नाही आयअ‍ॅम ओके पण मी तिला विचारलं तर ती पब्लिक शेअरला नाही म्हणेल हे माहित आहे. आताच्या परिस्थितीत तर तिचा क्लास बंद पण असेल. मला माहित नाही.

तुला हवं तर मेलमध्ये पाठवेन. फक्त तू शाकाहारी की मांसाहरी करणार माहित नाही. तिची रेसिपी चिकन ची आहे तू दुसरं काही घालून कर. किंवा ही झंझट नको असेल तर तिचे साहित्य पहा उरलेलं तू स्वतःच नेटवर पाहून करू शकशील. (तो क्लास फार वर्थ नव्हता आय मीन तिने पण पेस्टच वापरली मला वाटलं काही ऑथेंटिक मसाले वाटायला शिकवेल की काय? मी फीडबॅक लिहिला होता. असो. मोठंच रामायण लिहिलं का काय म्या Uhoh )

14-ounce can of coconut milk
 4 oz can yellow curry paste
 1 chicken breast
 2 cups water
 ¼ pound potatoes
 1/2 of a large onion
 1-2 carrots
 ¼ pound of squash
 1 tablespoon of fish sauce

धन्यवाद राजसी आणी वेका!
वेका नो वरिज! तश्या युट्युब रेसिपी आहेत बर्‍याच त्या रेफर केल्या काल , काही ना काही मीळेलच!
राजसी, पेस्ट मिळतात बहुतेक ट्रेडरजोजमधे बघितल्याच आठवतय, खरतर आम्हाला सगळ्यानाच थाई फुड आवडत पण ते कधी घरी ट्राय कराव अस वाटल नाही.

प्राज क्ता हे बघुन घ्या.

https://www.maayboli.com/node/66956

https://www.maayboli.com/node/66957

चिकन इन ग्रीन करी
ही एक मेन कोर्स डिश आहे. बरोबरीने भाताचा कोन हवा.

साहित्यः चिकन ब्रेस्ट चे बारके तुकडे. अगदी बारके नव्हे एक इंच बाय एक इंच चालतील. मुंबईत असे कापलेले पाकीट मिळते फ्रोझन सेक्षन मध्ये किंवा झोराबिअन चे चिकन ब्रेस्ट तीन तुकडे असलेले पाकीट मिळते. हे १४० ग्राम. थाई ग्रीन करी पेस्ट. नार ळाचे दूध. मी डाबरचे रेडीमेड वापरते. एका पाकिटात एक नारळाचे घट्ट दूध अस्ते हवे तसे पातळ करून घ्यायचे. टेट्रा पॅक बिग बास्केट वर उपलब्ध आहे. एक छोटे वांगे . मी लाइफ मध्ये कधी वांगे खाल्लेले नाही. पण रेसीपीत आहे. पी एगप्लांट १०० ग्राम हे पण रेसीपीत आहे मिळाल्यास घाला नाहीत्र सोडून द्या चवीत फरक पडत नाही. काफीर लाइमची पाने, फ्रेश लाल मिरची, स्वीट बेसिलची पाने. फिश सॉस एक टेबल स्पून, पाम शुगर एक टेबल स्पून ही न मिळाल्यास आपली साखर एक चमचा घालता येइल. व तेल.

कृती: दोन चमचे तेल पॅन मध्ये घेउन मध्यम टू मंद आचेवर ग्रीन करी पेस्ट फ्राय करून घ्या. वास सुटला की हळू हलू नारळाचे दूध घाला. व मंद आचेवर मिक्स करा नारळाच्या दुधाचा कच्चे पणा जाउन तेल सुटू लागले की चिकन व वांग्याचे तुकडे घाला. पाच दहा मिनिटे शिजू द्या. मग फिश सॉस व पाम शुगर, मीठ इत्यादि घालून चवी प्रमाणे अ‍ॅडजस्ट करून घ्या. काफीर लाईमची पाने तीन मोजून घाला. शिजल्या नंतर स्वीट बॅसीलची पाने व फ्रेश रेड चिलीचे लांबट कापलेले तुकडे घालून सर्व्ह करा. हिरव्या करीवर लाल मिरची शोभून दिसते.

पाड थाई आणी yellow करि किवा एखादी छान्शी थाई करीची हमखास रेसिपी सान्गु शकाल का?किवा लिन्क द्या!>>>
मी trial म्हणून पड थाय किट (Whole Foods मधून)आणला होता. चांगले लागते.

Kroger Sauce Included Stir Fry Kit Pad Thai आणि पड थाई नूडल, डार्क सोया सॉस, हवे असेल तर अंडे आणि भरडलेले दाणे इत्यादि सामान लागेल.

तुमच्या कडे जर दीर्घकाळ पॉवर कट होत नसेल तर वर म्हटल्यानुसार आंब्यांचा रस काहीही प्रक्रिया न करता फ्रीज करून ठेवता येईल. वर्षभरही टिकेल. लहान बॅचेस मध्ये केला तर एकावेळी एक पाकीट उघडून संपवून टाकता येइल.

इथे कुणी ठाण्यातील गजानन चा वडापाव खाल्ला असेल तर त्यासोबत मिळणारी बेसन आणि ठेचा चटणीची रेसीपी माहित आहे का? यू ट्यूब वर पाहिले पण सगळेच झुणका रेसीपी दाखवत आहेत

धन्यवाद योकु. लाईट जात नाही फारशी.
रच्याकने मला वाटले की तुम्ही लोखंडी कढई सणसणीत तापवून त्यात गर शिजवण्याचा सल्ला देणार Happy

बेसन आणि ठेचा चटणी>> ते बेसन म्हणजे वडे तळताना भज्यांची पिल्ले होतात तीच वाटून त्यात मिरची जिरे मीठ घालतात. आपले विषाणू मनोहर चे चॅनेल वर मास्टर रेसीपी वर बटाटे वडे रेसी पी बघा त्यात ही चटणी केलेली आहे.

>>> वडे तळताना भज्यांची पिल्ले होतात तीच वाटून त्यात मिरची जिरे मीठ घालतात
+१
त्यांच्याकडे आजची चटणी करायला कालची पिल्लं असतात - आपण घरी बुंदीची करू शकतो. Happy

त्या तळलेल्या पिल्यांत साध्या तिखटाऐवजी कांदा लसूण मसाला (कुठलाही, स्पेसिफिक असा नाही) घालून जरा चाखून मीठ अ‍ॅडजस्ट करावं (कांदा लसूण मसाल्यांत मीठ असतं) आणि नंतर जरा चुरून चटणी करावी.
गरमागरम तळलेले बटाटवडे; हवा असेल तर पाव; तळलेली हिरवी मिरची आणि ही सुकी चटणी हे एक अफलातून काँबो आहे. प्रत्येकी दोन तरी वडे हवेतच आणि वर वाफाळता चहा! अहाहा Happy

:लॉकडाऊन मुळे हे सगळं मिस करत असलेला बाहुला:
:नेहेमीकरता- मुंबई चा वडापाव मिस करत असलेला बाहुला:

प्राजक्ता , ट्रेजो मधल्या ग्रीन आणि येलो करी पेस्ट चांगल्या आहेत तश्या. त्या वापरून चांगल्या होतात करीज. एखादे एशियन दुकान असेल तर त्यांच्याकडे अ‍ॅक्च्युअल थाई पेस्ट मिळतील. पण ट्रेजो असेल तर तो सोपा ऑप्शन आहे.

बेसन आणि ठेचा चटणी>> ते बेसन म्हणजे वडे तळताना भज्यांची पिल्ले होतात तीच वाटून त्यात मिरची जिरे मीठ घालतात. आपले विषाणू मनोहर चे चॅनेल वर मास्टर रेसीपी वर बटाटे वडे रेसी पी बघा त्यात ही चटणी केलेली आहे.
>>https://www.whatshot.in/mumbai/vada-pav-with-yellow-chutney-on-a-leaf-c-...
अशा प्रकारची पातळ झुणक्यासारखीच चटणी असते ती.

राजसी.. थोडे chunky असतात , भाज्या किसलेल्या नसाव्या. बारीक चिरून टाकतात असे वाटते.
बीट आहे नक्की पण अजून काय असावे ?

मी आणि नवरा कॉलेज दिवसांपासून वैशालीचे कटलेट्स खातो आहे. कमी भूक असेल तर फक्त कटलेट्स आणि जास्त भूक असेल तर एकेक डिश खाल्ल्यावर मग एक डिश कटलेट शेअर करतो, पण कटलेट खाणं मस्ट.

यामध्ये, बीटरुट, बटाटा, गाजर, मटार ( मला हे फार आवडतात, कटलेट कट केला की टूपकन बाहेर येतात आणि मस्त लागतात), बहुतेक ब्रेड crumbs घालून शॅलो फ्राय केलेले असतात. तळलेले नाहीत.

ती झुणक्यासारखी पातळ चटणी माझ्या मैत्रीणीची आई करायची. तेव्हा अमुक गोष्ट अमक्याच्या आईच्या हातची एवढेच डोक्यात असे, रेसीपी विचारावी ही समज नव्हतीच.

मायबोलीच्या " शोध " मधे शोधायचा प्रयत्न केला. जमलं नाही. म्हणून इथे विचारतीय.

मला भारतातल्यासारखं लोणी बनवायचं आहे. हेवी क्रीमला विरजण लावून बनवता येतं असं वाचल्याचं आठवतं. गप्पांच्या धाग्यावर का इथेच ते मात्र आठवत नाहीये. प्लीज हेल्प!

शुगोल, इथे प्रतिसादांत आहे
https://www.maayboli.com/node/74484
हेवी विपिंगक्रिमला आयपीत विरजण लावून त्याचे देशी स्टाईल आंबट चवीचे लोणी आणि ते कढवून साजूक तूप. - स्वाती२.

दुसर्‍या पानावर प्रतिसादात त्यांनी सविस्तर लिहिलं आहे

रणवीर सापडल्यावर मात्र त्याच्या दोन रेसिपीज करूनही पाहिल्या. आणि ते केवळ यासाठी की त्याची सांगायची पद्धत इतकी सुटसुटीत आहे आणि रेसिपी इतकी व्यवस्थित क्रमवार असते की कठीण रेसिपी पण सोप्पी वाटते. >>> अगदी अगदी .
त्याची सोपी चिकन करीची एक रेसिपी आहे . त्यात त्याने प्रत्येक मसाला कधी , कोणत्या क्रमाने आणि का घालावे हे मस्त एक्स्प्लेन केलं आहे .
एकदा करून बघायाची आहे . >>>

फार फार सुरेख होतं ते चिकन !

. पाणी निथळून मावेत/कढईत भाजायचे.>> हे शेगडीवर मंद आचेवर, लोखंडी घमेल्यात आणि वाळू घालून त्यात भाजायचे एकदम मस्त कोरडे होतात व खारावलेले. गुजरातेत फार मोठे टपोरे शेंगादाण्याची पाकीटे मिळतात खारवलेली. पण जपून खा. उत्तम चकणा मटेरल.

Pages