पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिश्का,तुमच्यासारखाच मीही व्हाईट पास्ता करते.पण थोडेसेच बदल..थेंबभर तेलात लसणीच्या 2 काड्या ,भाज्या परतून नंतर त्यावर मिरपूड,चीलिफ्लेक्स, ऑरिगेनो घालते.नंतर वरील प्रमाणेच.

साधा,सोपा घरातील ईनग्रेडीयंट्स वापरून बनतो का पास्ता?? >>>> ही कुणाल कपुरची रेसीपी पहा. अगदीच सोपा, लवकर आणि टेस्टी पास्ता बनतो. आमच्याकडे एकदम हिट आहे. https://youtu.be/YVo-o7dygFU

आणि हो डॉक्टरांनी सांगितलं तसं शेझुआन सॉस अजिबात नको. बिचाऱ्या पास्त्याला आपण इंडियन चव आणून खातोच, अजून त्याच्यावर चायनीज अत्याचार नको. Wink

आणि हो अजून एक, पुण्यात असाल तर ड्राईड herbs नकोतच. ग्रीन टोकरीचे फ्रेश रोजमेरी, थाईम आणि बेझील/बेसिल चे पॅकेट्स मिळतात. स्वस्त आहेत (rs29 / पॅकेट). पार्सले आवडत असेल तर ते एक पॅकेट घ्यायचं, वरून बारीक चिरून घातली की अजून मस्त फ्लेवर Happy

कुणाल कपूर की कोणाची receipe होती , त्यात त्याने तमालपत्र आणि एक छोटा कांदा चार तुकडे करून दुधात टाकून उकळवले आणि ते दूध गाळून white sauce वापरल. We tried it . It tasted nice

वा मस्त मस्त रेसिपीज आणि टिप्स.
जास्त हेल्दी पणा चे लाड़ करायचे असतील तर गहु पीठ घाला.
नको, मैदाच घालेन Happy

मैत्रीणीने पास्ता बनवला कि बोलवायची घरी, गप्पा विथ पास्ता.
कोरोनामुळे 6 महिन्यापासून कुणाच्या ही घरी नाही गेलो आम्ही. म्हणून आपणच बनवूया म्हटलं पास्ता घरी.

अनिश्का, पल्वली,देवकी, मीरा, स्वस्ति धन्यवाद, युजफुल टिप्स दिल्याबद्दल.

आम्हाला झणझणीत खायची सवय असल्याने पांढरा पास्ता इतका नाही आवडत. कधी कधी मॅग्गी ला पर्याय म्हणून मस्त फोडणी करून , मॅग्गी पास्ता मसाला घालून, पाणी घालून त्यात पास्ता टाकून दोन शिट्ट्या काढल्या कुकरमध्ये तर मस्त होतो पास्ता, कुकरमध्ये शिजवल्याने शिजतो चांगला अन चिकट पण होत नाही.

भाज्या हव्या असतील तर त्याही घ्यायच्या फोडणीत

VB यांनी लिहिल्याप्रमाणे मीही कबिता स किचन च्या रेसिपी नी पास्ता बनवते . One pot (cooker) recipe. थोडे पाणी उरल्यास त्यात cheese mix होऊन sauce सारखे बनते.
Indian heal thy recipes नावाच्या blog वर दिलेल्या पद्धति ने चांगला पास्ता इन रेड सोस बनतो.

नाही गार नाही होत, पाच मिनिटांत शिट्टी वर करून वाफ बाहेर काढायची. नसेल तर शिट्टी न लावता पण शिजवता येतो.

म्हैसूरला एका हॉटेलात प्रॉन्स गार्लिक कि काहीतरी नावाची डिश खाल्ली होती. गोडसर चव, साधारण व्हाईट पास्ता सॉस सारखं त्यात भरपूर गार्लिक बटर.. बिनवासाचं. अप्रतिम प्रकार होता. आता नेमकं नाव आठवत नाहीये

<<<कुकरमधे शिजवलेला पास्ता पार मरून जात नाही का?>>> नाही, फक्त दोन शिट्ट्या काढायच्या , नाहीतर शिट्टी न लावता, मध्यम आचेवर शिजवायचे.
तेल असते ना फोडणीचे तर चिकट पण होत नाही

व्हिट पेन्ने पास्ता.सोप्या पद्धतीने कसा बनवायचा?
Submitted by mrunali.samad on 23 August, 2020 - 22:46
इंडियन पद्धतीने साधा,सोपा घरातील ईनग्रेडीयंट्स वापरून बनतो का पास्ता??
Submitted by mrunali.samad on 24 August, 2020 - 06:45 >>>>>>
आपल्या परदेशस्थ मायबोलीकरांनी विविध पास्ता सॉस, भारतीय / विदेशी चवीचे पास्त्याचे प्रकार याचे संकलन केलेले आहे. मायबोली शोध सुविधेच्या मदतीने एकदा जरूर पाहून घ्या. खूप वैविध्य मिळेल -- मूळ धागा + प्रतिसादात.

घरात मायक्रोवेव्ह 3 वर्षापासुन वापरात आहे. वापर तसा मर्यादितच आहे. पिझ्झा, बिस्कीट बनवणं होत. पण केक काही अजून मनाला हवा तसा झाला नाही. Convention मोड मधे केक करण्याची खात्रीशीर रेसिपी माहीत असल्यास किंवा लिंक असल्यास प्लीज कोणी सांगेल का. पुढच्या महिन्यात मुलाचा वाढदिवसाला स्वतः केक करण्याचा बेत आहे.

https://www.youtube.com/watch?v=vjticnBhDN8

शुभा, नेटवर आहेत अशा रेसेपीज. पण मला वाटत की तू आधी ट्रायल म्हणून एक दोनदा आधी करुन बघ. मायबोलीवर रवा केकची रेसेपी आहे प्रज्ञाची. ( अजून आहेत, नाव लक्षात नाहीत प्लीज ) हा केक पण कन्व्हेक्शनला छान होतो. १८० डिग्रीवर साधारण ३५ ते ४० मिनीटे तरी ठेवावा लागतो.

मनापासुन धन्यवाद. मला अजुन convection preheating बद्दल नीट माहिती मिळत नाही. माझा microwave bpl चा आहे. त्याच युजर manual हरवलं. साधारण मायक्रोवेव्ह preheat व्हायला किती वेळ लागतो. वर दिलेली रेसिपी नक्कीच ट्राय करेन.

microwave bpl चा आहे. त्याच युजर manual हरवलं. >>> bpl च्या संकेतस्थळावर किंवा गूगलवर मॅाडेल नंबर टाकून शोधा. तिथे मिळेल.

मी फोडणीला वापरते .. कढईतले तेल एका भांड्यात काढून ठेवते आणि त्याच कढईत भाजी फोडणीला टाकते.. भाड्यात काढून ठेवलेलं तेल डोसे, थालीपीठ करायला वापरते..

कराडमध्ये शंकरपाळी कशाला म्हणतात?
nativespecial.com वरून Karad Sugar coated Shankarpali मागवली. (का ते विचारू नये) तो मालवणी खाजाचा बेसनाऐवजी मैद्याचे शेवखंड , गुळाच्या पाकाऐवजी पिठीसाखरेत घोळवलेले. असा प्रकार निघाला.

शंकरपाळी म्हणजे मूळ शब्द शक्करपाळी

साखर आहे म्हणजे झाले ,

पण तुम्हाला मिळालेत ते निवडुंग तुकडे , त्यांना सगळीकडे मालवणी खाँज़ा असेच म्हणतात , त्यातही पिवळा , भगवा , लाल , पांढरा असे प्रकार दिसतात

काहीतरी नेट चा इश्यू असेल , नेटवरील लिंक चुकीची असल्याने आज एकाच कस्टमरला 42 पिझ्झा पोचले

नेटवर चेक केले

https://nativespecial.com/eu/product/karad-sugar-coated-shankarpali/

ते जास्त लेअर असल्याने जास्त फुगलेत

Pages