पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका कैरीचा किसाचा मोरंबा आणि दुसऱ्याची चटणी. आता प्रत्येक साप्ताहिक ग्रोसरी ट्रिप ला कैरी आणून एकेक पदार्थ तरी करणार आहे. मुलीला कैरी घातलेली भेळ पण खायची आहे. बंगलोर आणि चेन्नईमधुन कार्गो फ्लाईट्स सुरु झाल्यानी बहुतेक आंबे पण लवकर मिळतील असा वाटतंय.

कधी सोलापुरला गेलात तर ‘सुप्रजा’ ची पावभाजी खायला अजिबात विसरु नका... अप्रतिम असते. ‘जास्त तिखट‘ घेऊ नका. नेहमीची घ्या. पुन्हापुन्हा सोलापुरला जाल. >>>>फेब्रुवारी एंडला तुळजापुरला गेलेलो तेव्हा खास सोलापूर ला जाऊन सुप्रजाची पाभा खाल्ली पण अजिबातचं आवडली नाही. त्यापेक्षा पाणीपुरी बरी होती.

मला दोन मिळालेल्या मागच्या आठवड्यात त्याचं एकाचं पन्हं, एकाची आंब्याची डाळ केली. तिसरी असती तर आम केलं असते.

कैरी शिजवून गर काढून जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात सुक्या लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या घालायच्या , थोडेसे मेथीदाणे घालायचे, तिखट मी फोडणीतच घालते. त्यात गर टाकून मीठ आणि गुळ घालायचा, थोडं पाणी घालून आटवत ठेवायचं. त्याला आम्ही आम म्हणतो, वेगवेगळी नावं असतील अजुनही काही खास.

तर परत एकदा चिकपुराण...

गुरुवारी सकाळी 1 पेला गहू भिजत घालायचा विचार करत होते पण 1 पेला खूपच कमी होईल असे इथे वाचून त्या 1 पेल्याचे 4 पेले केले. शुक्रवार शनिवार सक्काळी उठल्यावर पहिले काम म्हणजे वास मारणारे गहू स्वच्छ धुवून परत पाण्यात घालून ठेवले.

3 दिवस गहू ठेवा म्हणजे गुरुवारी सकाळी ठेवलेले गहू रविवारी सकाळी वाटायचे की शनिवारी रात्री याबद्दल नक्की माहिती माबो व तुनळीवरच्या सगळ्या रेसिप्या चाळूनही मिळाली नाही. ह्या सुगरण बायकांचं असंच असतं. त्यांना ज्या गोष्टी सामान्य वाटतात आणि म्हणून अनुल्लेखाने मारतात नेमकी तिथेच आमच्या सारख्यांची गाडी येऊन अडते.

तर असो. तुनळीवर दिसत होते तसे माझे गहूही टच्च गोरेपान, दाबले तर चीक बाहेर असे शनिवारी संध्याकाळी दिसायला लागल्याने मी तेव्हाच चीक काढायचा निर्णय घेतला. तसेही सोमवारी ऑफिस असल्यामुळे रविवारी चीक काढून सोमवारी तो हाटने जमले नसतेच. Wfh असले तरी आम्ही अगदी मानेवर काटा ठेऊन काम करतो.

शनीवारी संध्याकाळी गहू माझ्या वेट ग्राइंडरवर वाटले. हे गहू प्रकरण भयंकर चिकट आहे हे तेव्हा कळले. मिक्सर साफ करायला खूप त्रास झाला असता.

वाटताना एकूण प्रकरण वाढता वाढता वाढे, भेदीले सुर्यमंडल व्हायला लागल्यावर पोटात गोळा यायला लागला. इतका चीक भरून ठेवण्याइतके मोठे भांडेच माझ्याकडे नाही Happy शेवटी तीन भांड्यात चीक भरून ठेवला. उरलेल्या भूस्याच्या वड्या वगैरे करायचे बेत आधी केलेले पण चिकाकडे बघून ते बेत कचऱ्याच्या टोपल्यात ढकलले.

एका चॅनेलवरच्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे पाणी दोनदा बदलले, त्यासाठी रात्री 12 पर्यंत जागत बसले.

सकाळी मात्र सगळे झटपट झाले. पाणी ओतून टाकल्यावर चीक थोडा कमी झाला. हाटायला मात्र भक्कम माणूस हवा. हात भरून येतात. चिकाची स्थिती अतिशय वेगाने बदलत असताना हातही तितक्या वेगाने हलणे आवश्यक आहे.

थोड्या कुरडया केल्या, थोडासा चीक खाल्ला. नोस्टॉजिया नसल्यामुळे ठीकठाक लागला. माझा सोऱ्या पितळी असल्यामुळे गरम चीक भरल्यावर हाताला चटके बसणे वगैरे प्रॉडक्शन इसयुज आले थोडेफार पण ते तेवढेच. बाकी फारसा त्रास काही झाला नाही.

परत हा प्रकार नक्की करेन. चिकाची पावडर करून ठेवलेली बरी असे वाटले.

साधना, सही ! चिकाटीने चिक केलास! मला विचारायचे ना शाॅर्टकट ....
आताच्या तापमानात दोन दिवस भीजवले तरी चालले असते....
मी दुसर्या धाग्यावर रव्याच्या कुरडयांचे फोटो टाकलेत. कुरडयांच्या चवीत का ही ही फरक पडत नाही. आज परत २ ग्लास रवा भिजत घातलाय पाणी बदलणार नाही पुण्यात घर गार असल्याने आनि नागपूरमध्ये एकच दिवस भिजवला असता. सकाळी परवा त्याच्या कुरडया करीन.

त्यांना ज्या गोष्टी सामान्य वाटतात आणि म्हणून अनुल्लेखाने मारतात नेमकी तिथेच आमच्या सारख्यांची गाडी येऊन अडते.तुनळीवर दिसत होते तसे माझे गहूही टच्च गोरेपान, दाबले तर चीक बाहेर असे>>>>> सेम पिंच! मीही तेच केले.
आधी मलाही आठवत नव्हते केव्हा गहू भिजत घातले ते.

तसेच चिक करताना चिक मोजून घेऊन तेवढेच पाणी सांगायच्या सुगरणी,पण दीडपट प्रमाणात पाणी तापवायला ठेवायच्या. नाक पीसीला लावून व्हिडियो पाहिले,एकीने सांगितले कि जेवढ्यास तेवढे पाणी घालायचे.पण चीक घट्ट झालाच तर हातासरशी गरम पाणी घालावे.मी तोपर्यंत हैराण! एकपट की दीडपट करून.

काल परत गहू भिजत घातले आहेत.यावेळी कॅलेंडरवर खूण करून ठेवली आहे.आधीचा भुसा फ्रीझर्मधे ठेवला आहे तोही निस्तरायच मनात आहे.
भरीत भर म्हणून तांदळाच्या सालपापड्या करायच्या म्हणून २ वाट्या तांदूळही भिजत घातले आहेत.ते ३ दिवस भिजवायचे आहेत.जिथे ऊन येते तिथल्या एसीच्या बॉक्सवर कायकाय वाळत घालणार?

जन्मात कधी वाटले नव्हते मी असले काही करेन म्हणून! कारण स्वयंपाकाची(सगळ्याच कामाची) शून्य आवड आहे.

सालपापड्या मलाही करायच्या आहेत. गुरवारी भिजत घालेन.

मंजुताई, रवा नाहीये घरात इतका. थोडा आहे पण उपमा वगैरे साठी ठेवलाय. आता पुढच्या वेळेस इतके दिवस नाही घालणार भिजत. मुंबईत दुसऱ्या दिवशी दुपारीच कुरडया केल्या तरी चालतील इतकी गर्मी आहे.

इकडे चीक अन कुरडया वाचून वाचून शेवटी मी मम्मी ला तांदूळ भिजत घालायला लावले, उद्या त्याचे फरफरे करणार☺️

आदू, बारीक असेल तर होईल
देवकी, गव्हाच्या जातीवर अवलंबून अस्त पाण्याचं प्रमाण
मुलींनो कमी प्रमाणात करावं गं .... आई करायची किलोभराच्या कशी करायची देव जाणे.
इतकं कमी करून हात भरून आले. थंड होत जातं तसं पिळायलाही त्रास होतो.

चिकपुराण:
ये फेविकोल का जोड है, इतने आसानी से नही निकलेगा. Biggrin

बापरे
डेंजर चिकाटी आहे. >>> अगदी अगदी.

सही साधना, कौतुक.

साधना, सहीच!
देवकी, तुम्हाला शुभेच्छा! छान होवोत तुमच्या कुरडया आणि सालपापड्या.

अहो साधनाताई तुमचा उरक फार आहे, आधीच तो चिकट चीक, त्यात वर्क फ्रॉम होम , मी तर स्वप्नात सुद्धाअसे चिवट काम करणार नाही, खरेच तुम्हाला सलाम

सगळ्यांचे आभार. माझा उरक फार आहे अशातली बाब नाही, चिकाबद्दल इतके वाचून 'आता करून बघायला हवेच' हे डोक्यात घेतले, बस्स इतकेच.

पण खूप चिकट प्रकरण आहे. नव्या मंडळींनी मिक्सर वापरू नका असे सुचवेन, वापरलाच तर भांडे लगेच धुवायची घाई करू नका. पाण्यात घालून ठेवा व दुसऱ्या दिवशी धुवा. कमी कष्ट पडतात. यु ट्युब बघून मी गरम पाणी वापरून गहू वाटले होते, त्यामुळे चिकटपणा थोडा कमी होतो. नंतर गव्हाची साले पिळून चीक काढताना बोटे चिकट होतात.. त्या एका गाण्यात संध्या चेहऱ्यासमोर बोटे उघडमिट करते तशी मी करत बसले थोडा वेळ, मजा आली :).

चीक प्रकरण म्हणजे सगळा चिकचिकाट आहे... Happy Happy

जन्मात कधी वाटले नव्हते मी असले काही करेन म्हणून! कारण स्वयंपाकाची(सगळ्याच कामाची) शून्य आवड आहे.>>> देवकी , तरीसुद्धा इतका घाट घालून तडीला नेलात तुम्ही!
... तुम्हाला आणि साधना यांनासुद्धा आदर आणि कौतुकमिश्रित दंडवत! मी तर रेसिपी वाचूनच दमले!

हे सगळं वाचून आता आईला विचारावेसे वाटतेय, आई तु कसे करायचीस?
माझी आई , रविवारच्या एका दिवसाच्या सुट्टीत सकाळी आमचे नाश्ते, जेवण आवरून गच्चीत आडोशाला बसून हे करायची एकटीच. पाटा-वरवंटा, स्टोव वगैरे गच्चीत घेवून एकाच दिवशी , एकावेळी ३ किलोच्या कुरडया, मग लगेच साबुदाण्याच्या फेण्या पटकन होतात म्हणून ... वगैरे त्याच दिवशी....
मी कधीच विचारच केला नाही की कौतुक केले.
आई,अक्खा उन्हाळा रविवारी काही ना काही करायची आणि इतर दिवशी पुर्णवेळ नोकरी करून. बाबा फक्त, पाटा-वरवंटा नेवून दे, पाण्याची कळशी इतपतच मदत. मी तर ढुंकुनसुद्धा पहायची नाही.
आता, तिला सांगतेच, कौतुक करते.
माझी तर पेलाभर करायची सुद्धा हिंमत नाही कुरडया.
घरात अक्खा गहू नसतोच कारण विकतचे पीठ आणतो चपातीला.
तर परवा ग्रोसरीला गेले तर घेतलेले होते गहू पाव किलो , तर नवरा कुजकट हसला जेव्हा म्हणाले की, गेहू की वो मेरे मम्मी जैसी चिप्स बनाउंगी.
गहू परत ठेवले काँउटर वर आला पैसे द्यायला तर...
टिपः आई, चिकाच्या टोपाखाली गरम तवा ठेवायची आणि गरम पाण्यात हात घालून चिक सोर्‍यात भरायची हे पाहिलेय मात्र. त्यामुळे ती एकटीच भरभर करायची.
इकडचे वाचून करून गहू आणून,आईला सरप्राईज देवू काय ह्या विचारात..

Pages