पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पंचफोरण वापरून टमाटोची भाजी करतो.
सोबत बेदाणे, तिखट आणि साखर.
टमाटो उभा चिरून दोन फोडी , मग त्याच्या आडव्या चकत्या.

परवराची भाजी काचर्या किंवा रस्सा भाजी करते आणि आसामातली डेलिगसी म्हणजे वरची सालं हलक्या हाताने खरवडयाची सुरीने त्याला हळद मीठ लावून तळायचे. रस्सा व काचर्यासाठीपण अशीच खरवडून घ्यायची.
काचर्या: लांब पातळ काप करायचे व तसेच बटाट्याचे पण काप करायचे नुस्त्या तेलावर परतीयचे हळद तिखट मीठ घालून.
रस्सा: कांद्याचे पण पातळ काप, बटाटा व परवराचे काप, आलं लसूण पेस्ट, धनाजिरापूड, गरम मसाला, टोमॅटो, हळद तिखट मीठ व फोडणीचं साहित्य, रस्सा आहेतर आॅफकोर्स पाणी

मंजुताई मस्त आहेत वरचे प्रकार.

मी परवराची तोंडल्याची ज्या ज्या प्रकारे भाजी करतो आपण तशीच करते. खरपूस काचऱ्या फक्त परवर किंवा परवर बटाटा. परवर बटाटा रस्सा पण करते. सगळ्या फोडणीत चार दाणे मेथीचे घालते. परतलेल्या भाजीत थोडी मिरपूड ओवा पण घालते, तिखट मिठाबरोबर. तसं तिखट मी फोडणीत थोडं तरी घालतेच पण वरूनही घालते.

वरच्या पंचफोरनमधली बडीशोप मला नुसती खायला खूप आवडते, गरम मसाल्यात घालतात ती आवडते पण भाज्यांत नाही आवडत. कलौंजी वापरून बघायला हवी.

बंगाली पद्धतीने, बारीक चिरलेले टॉमॅटो, खिसलेलं आलं, आंबा साठाचे तुकडे, काजु, बेदाणे , गुळ , जरासा चिंचेचा कोळ घालून मस्त चटणी बनवा. साबांची पद्धत आहे. भोग खिचडी करतात तेव्हा बनवतात. अप्रतिम लागते.

भाजा मुगेर दाल पण मस्त बनते पाच्फोरन फोडणी देसी तुपाची.

रश्मे, माझ्यासारख्याला लिहायचा कंटाळा येतो.
कृती काय नाय. तुप तापले की पाचफोरन टाकायचे. सुवास सुटला की, दोन वाट्या बारीक चिरलेले टोमॅटो मग परतायचे. त्याचे पाणी सुटले की, त्यातच पेरभर किसलेलं आलं, काजु, भिजवलेले बेदाणे, खडे मीठ,आवडीप्रमाणे गुळ घालून शिजवायचे. किंचितसा चिंचेचा कोळ घालून उतरवायची.
ह्याच्यात खासियत हिच की, खजूर गुळ , बेंगाली खडे मीठ आणि आमसात्तो( आंब्याच साठ बेंगाली पद्धत्तेचे ) चव आणते.

पंचफोरण वापरून रिसेंटली रणवीर ब्रार ने एक बाठीचे लोणचे / मुरब्बा केले होते. आम्ही पण करून पाहिले. एकदम झकास आली होती चव.

https://www.youtube.com/watch?v=q8hL3-DD1_8

ऑनलाईन शॉपिन्ग मध्ये चुकुन सोयाबीनचे दाणे मागवले , सोयाबीन चन्क्स च्या ऐवजी
नक्की काय करतात त्यांच ???

उसळ करतात, आमटी करतात

पीठ करून चपाती , भाकरि करताना त्या पीठात थोड़ी थोड़ी वापरतात,

रोस्ट करून फुटाणे सारखे करतात

पंचफोरण वापरून भेंडीची भाजी अतिशय छान लागते. भेंडीचे मोठे तुकडे करायचे आणि पंचफोरणची फोडणी. वरून थोड तिखट आणि मोठ्या गॅसवर शक्यतो कास्ट आयर्नच्या पॅन मध्ये परतायची. सुरेख लागते.
मुळ्याचं लोणच पण पंच फोरण वापरून थोडे दिवसापुर्वी केलेलं. छान झालय.

वेका, आम्ही इथे मिळतात ते थोडे ढब्बे रेड मँगोज. त्यांच्यातली एक दडस कैरी आणली होती - थोडी हिरवी बघून. थोडी आंबट - गोड होती त्यामुळे चांगले जमले.

>>ढब्बे रेड मँगोज

कॉस्ट्को मध्ये पाहिलेत पण ते इतक्या प्रमाणावर घ्यायला जमायचे नाहीत कारण नेहमी वेगळे पिवळसर वाले असतात ते घेतो. पोरे लोकांना तेच आवडतात. मी तर इथल्या मक्कु आंब्यांना काय आंबे म्हणणार म्हणणारी. इस्ट कोस्टला असताना तिथली एक मैत्रीण दर गणपतीला मेथांबा करायची म्हणजे हा प्रकारच तिच्याकडे खाल्ला आहे सो आता हे आंबे शोधणे आले. धन्यवाद.

घरी पनीर करावयाचे असल्यास म्हशीच्या दुधाचे करावे की गायीच्या? काय फरक जाणवतो?>> म्हशीच्या दुधाचं पनीर जास्त चांगलं होतं. Full fat milk is better for paneer.

@स्वस्ति
ऑनलाईन शॉपिन्ग मध्ये चुकुन सोयाबीनचे दाणे मागवले , सोयाबीन चन्क्स च्या ऐवजी
नक्की काय करतात त्यांच ???...बर्गर करू शकता.
Soyabean burger search करा खूप पर्याय आहेत.

ब्राऊन राईस पासून काय बनू शकते?
मुलांसाठी हेल्दी मिक्स पावडर साठी आणते मी. नेहमी उरतो.
मग मी तो डोशासाठी थोडा थोडा वापरून संपवते.

पायसम बनवता येईल. यूट्यूबवर Brown Rice Payasam असा सर्च देउन बघा, भरपूर पाकृ सापडतील.

कंडेन्स्ड मिल्क वापरुन बासुंदीची कृती माहित आहे का कोणाला? नेटवर खूप वेगवेगळ्या कृती आहेत.

तुम्ही पास्ता कसा बनवता?
मी मैत्रीणींनी बनवलेला खाल्ला आहे. आवडला. पण घरी कधी नाही बनवला.
आता आणला आहे व्हिट पेन्ने पास्ता.सोप्या पद्धतीने कसा बनवायचा?

पास्ता पाणी,एक चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तेलात 8-10 मिनिटं शिजवा.शिजला की(चमच्याने सहज तुटला पाहिजे) मग चाळणीत काढून निथळा. एकमेकांना चिकटला नाहै पाहिजे पण सहज खाता येईल असा शिजलेला पाहिजे.
आता तो भांड्यात घेऊन त्यात पाण्यात कालवलेले पार्मीजान चीज पावडर, ओरिगानो घालून नीट मिक्स करा आणि थोडा वेळ उकळू द्या.पास्ता आणि ते द्रावण एकमेकांशी एकजीव झाले पाहिजे.पास्ता च्या पुंगळीत पण ते द्रावण असले पाहिजे
असा पास्ता गरम खायला मस्त.आवडत असल्यास चिली फ्लेक्स आणि थाईम रोजमेरी वगैरे घालता येईल.
मोठ्या दुकानात एक वेगळे पिवळे पाकीट मिळते पार्मीजान चीज पावडर चे.ते वापरता येईल किंवा त्याहीपेक्षा कमी श्रम हवे असेल तर वेकफिल्ड किंवा डॉक्टर ओटेकर चे व्हाइट पास्ता सॉस मिळतात(पण एकंदर प्रकरण पिवळ्या पाकीट च्या तुलनेत किंमतीला महाग पडते.घरात ओरिगानो न आवडणारे मेम्बर असल्यास ते सॉस सर्व मिक्स मिळत असल्याने पंचाईत होते.)
चिकाटी आणि वेळ असल्यास व्हाइट पास्ता सॉस घरी बनवू शकाल.
इन्स्टंट पास्ता सनफिस्ट निळे पाकीट मस्त होते.सनफिस्ट ने यिपी नूडल्स बनवू नये आणि मॅगी ने पास्ता प्रांतात घुसू नये.मॅगी पास्ता मला विशेष आवडत नाही त्या निळ्या सनफिस्ट इतका.
तसेच पार्ले ने मारी किंवा ब्रिटानिया ने ग्लुकोज बिस्कीट बनवू नये.चांगले मारी फक्त आणि फक्त ब्रिटानिया बनवते.परफेक्ट, कमी गोड, वास नसलेले.

पार्मीजान चीज पावडर, ओरिगानो , चिली फ्लेक्स आणि थाईम रोजमेरी वेकफिल्ड किंवा डॉक्टर ओटेकर चे व्हाइट पास्ता सॉस .

हे सगळं नाहीए घरात, आणायला जाणं पण शक्य नाही. कधी वापरले नाही.

इंडियन पद्धतीने साधा,सोपा घरातील ईनग्रेडीयंट्स वापरून बनतो का पास्ता??

हो,
आधी पास्ता थोडेसे मीठ घालून शिजवून , निथळून घेणे

मॅगी सारखा पास्ता मसाला मिळतो , बटर मध्ये सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या , मग त्यात पास्ता मसाला व वर सांगितल्याप्रमाणे शिजवलेला पास्ता घालून हलवायचे

थोडा सॉस , शेजवान चटणी मसाल्यात घालायची

पासत्याची भाजी तयार

पास्ता उकळून शिजला की वाहत्या पाण्या खाली धरून त्यातले गरम पाणी जाऊ द्यायचे। आणि 2 थेम्ब तेल सर्व पास्त्याला लावून ठेवायचे. असे केल्याने पास्ता एकमेकाला चीकटत नाही.
बटर मध्ये कांदा आणि इतर भाज्या असतील त्या फ्राय फ्राई करून त्यात 1 लहान चमचा मैदा घालून 2 मीन फ्राय करायचा. ( जास्त हेल्दी पणा चे लाड़ करायचे असतील तर गहु पीठ घाला.)
मग त्यात दूध घलायचे 1 कप , हळूहळू आणि गुठळी न होउ देता. हा व्हाइट सॉस थोड़ा जाड़ होऊन उकळू लागला की त्यात चिमटी भर मीठ घालून पास्ता आणि नॉर्मल चीज स्लाईस add करायची.
आता त्यात चिलिफ्लेक्स आणि ऑरिगेनो मिक्स करायचे.

मी तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण परतून घेते. त्यात आवडतील आणि घरात असलेल्या भाज्या बारीक चिरून परतते(गाजर, भोपळी मिरची, फ्लॉवर, फरसबी, मश्रूम,इ ) मग त्यात चिली  फ्लेक्स आणि टोम्यटो प्युरी घालून थोडे पाणी घालून उकळून घेते. एक उकळी आली कि त्यात उकडलेला पास्ता , मीठ मिरपूड घालते. पाच मिनिटे माध्यम आचेवर शिजवते. चीझ आम्ही वरून आवडीनुसार घेतो. 

Pages