पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळीची कणीक मळताना, भात शिजवताना वापरू शकता. भात किंचीतच पिवळसर होतो पण मऊ मोकळा आणि बाय डिफॉल्ट स्निग्ध होतो.

https://www.maayboli.com/node/36009

माझी रसमलाई रेसिपी या लिंकवर आहे. प्रतिसादांतून पण मदत होऊ शकेल. तुम्हाला शुभेच्छा.

Kandyachi paat ghari bharpur aahe .bhaji karun kantaka aalaay.pasta wagaire chi recipe milel ka? Kandyachi paat takun

Fried rice with manchurian kara.कांद्याची पात संपेल.

मधुराचा बुलानी पराठा आहे youtube वर त्यातही खपेल कांदा पात. मी करते, टेस्टी होतो.

खरंतर पुलाव, बिर्याणी, पुलाव टाईप नुडल्स, पास्ता सगळ्यात छान लागते कांद्याची पात.

हौसेने कमी पॉलीशचा कोलम तांदूळ घेतलाय. चव छान आहे, पण भात मोकळा हवाय तो चिकट होतोय. भात नेहेमीच्या कोलमसारखा मोकळा व्हायला काय करावं लागेल?

पाउंड केक रेसिपी हवी आहे. अंडं खात नाही आणि एक एगलेस मिळाली तर त्यात टोफू आहे ते आवडतच नाही. एरवी वेगन डाएट म्हणून पनीरला टोफू रिप्लेसमेंट आहे. मला वेगन नकोय तर टोफूला रिप्लेसमेंट पनीर चालेल का?
मला हा केक लयीच्च आवडतो त्यामुळे करून बघायची इच्छा आहे.

पाऊंड केकसाठी रणवीर ब्रार ची रेसिपी आहे. त्यात त्याने प्रत्येक अंड्याऐवजी पर्याय सांगितला आहे. त्यात flax seed powder म्हणजे जवसाची पूड व अजून काही तरी सांगितले आहे.

ओके. मी गूगल सर्च केलाय, पण बेकिंग स्किल्समुळे कमी कटकटीची वगैरे रेसिपी हवी होती.

आता वरच्या लिंकमधून आणि रणवीर ब्रार रेसिपी मधून काय जमेल ते बघते.

अनु, पूर्वी त्यात लागणारे सगळे घटक एक पौंड मापात असायचे म्हणून पौंड केक असं मला मूळ रेसिपीमध्ये वाचून समजलं. आजकाल बरीच व्हर्जन्स असतात, वेगन, एगलेस पण मिल्कक्रीमचा, ब्राऊन, शुगरफ्री वगैरे...

पण बेकिंग स्किल्समुळे कमी कटकटीची वगैरे रेसिपी हवी होती.>> अन्ड्याला पर्याय म्हणुन जे पण घालशिल, बेपा, बेसोडा, मेक शुअर अगदी ताजे आहेत नाहितर गच्च केक होतो (स्वानुभव)

पौंड केक म्हणजे 1 पौंड वजनाचा केक का?>> नाही ग , साधा प्लेन केक फक्त मैदा,अंड ,साखर,बटर घालून केलेला .आणि हा गोल नसतो तर लोफ(ब्रेड च्या ) सारखा असतो . अयंगार कडे मिळतो बघ , स्लाइस करून देतात ,इतका हलका असतो कि बस !!

पूर्वी त्यात लागणारे सगळे घटक एक पौंड मापात असायचे म्हणून पौंड केक असं मला मूळ रेसिपीमध्ये वाचून समजलं>> म्हणजे सत्यनारायणाच्या शिऱ्यासारखं Happy सव्वा पटीच्या मापात.

ओह अच्छा.हो तो ब्रेड सारखा केक आठवला बेकरीत पाहिलेला.
मला एकदा लहानपणी सारखा टायर साच्यातला बाजूला फिका सोनेरी तपकिरी क्रनच(शब्द लिहिता येत नाहीये) वाला केक पण करायचाय.
टोफू अत्यंत वाईट लागतो(मला).
साधी बेकिंग पावडर, सोडा घालूनही केक फुगतो.फक्त अगदी मऊ हलका नाही.

टायर साच्याला Bundt mold म्हणतात , मला ते अजून कळलेलं नाहीये असा का असतो तो साचा !?
इतर साच्यांपेक्षा "मी वेगळा" असं तो बंड (Bundt) पुकारतो Proud
आणि त्यातून केक सुटला कि त्याच्या पाठीवर आपोआप नक्षी येते

रावण पिठले

ह्यात सगळे समप्रमाणात असते म्हणे , एक वाटी

https://www.youtube.com/watch?v=l-hxBww28Tw
या रेसेपीनं उत्कृष्ट केक होतो. सर्व सामान तयार असेल तर तयारीचा वेळ धरून ४० ते ५० मिनीटांमधे केक तयार होतो.

पंचफोरण वापरुन काय बनवता येईल? मी सर्च केल पण जास्त काही मिळाल नाही.>>>> परवरची भाजी ( परवर हे दिसायला तोंडल्यारखे पण आकाराने लांबट मोठे असतात.)paravar.jpg, बटाट्याची भाजी करता येईल. पंचफोरन दाल पण करतात.

पंचफोरणाची ( मोहोरी, जीरे, बडीशेप, मेथीदाणे, कलौंजी) फोडणी करुन दुधी भोपळ्याची हरभरा डाळ घालून भाजी, बटाटा भाजी, मिक्स डाळ पण चांगली लागते.

Pages