पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, मीही हल्ली यु ट्यूबवर लिविंग फूडचे काही भाग बघितले. काल रणवीरची राजस्थानी मिठाई बघितली. घेवर करून बघायचा मोह झाला पण आवरला.

त्याने व कुणाल कपूरने मिळून केलेले मुर्ग मुसल्लम बघितले आणि धक्काच बसला. आजवर ग्रेव्हीत बुडालेले मुर्ग मुसल्लम बघितले होते. पण साधारण तशीच रेसिपी कुणाल कपूरला कोलकात्याला राहात असलेल्या नवाबाच्या खापर खापर की कायसेश्या पणतीने पण सांगितल्यावर हीच आद्य रेसिपी असणार याची खात्री पटली. बाकी कुणाल कपूरही आवडत्या लिस्टित आहे. Happy

पनीर च्या पुस्तकात मालवणी पनीरची रेसीपी पण मला एकदम अचाट वाटलेली.>>>

मालवणी लोक मुंबईत आले तेव्हा त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा पनीर बघितले. Happy Happy तोपर्यंत दूध फाटले ( जे त्यांच्याकडे सहसा फाटत नाहीच) की त्यात साखर घालून खायचे हेच माहीत होते Happy Happy

आता हा रणवीर ब्रार कोण प्राणी आहे बघायला पाहिजे.
मला रेसिपी चॅनल बघण्या पेक्षा रेसिपी वाचणं आवडतं.पण जिथे एकदम किचकट प्रोसेस असेल तेथे समजावून घ्यायला व्हिडीओ लागतात.

बघ बघ... आणि प्रेमात पड त्याच्या, रेसिपीच्या..... मात्र नंतर म्हणू नकोस मी सांगितले नाही म्हणून .. मी सांगितले होते Happy Happy

खोया पाया हिमालया ...

जिओ टीव्हीवर लिविंग फुडझ नाही. Sad Sad

निदान असल्या चॅनेल्ससाठी तरी का होईना, घरात टीव्ही हवा असे वाटायला लागते कधी कधी...

अनु आप रणवीर को नही जानती, अरेरे Wink .

मला तसे बरेच शेफ आवडतात कुणाल कपूर पण छान करतो, आवडतो. त्याच्या कार्यक्रमात तो मुंबईतल्या भेटीत पाठारे प्रभू , पारशी लोकांना भेटला आणि स्मिता देवला भेटला जिने कारवर टू कोल्हापूर via मुंबई हे रेसिपीज वर पुस्तकं लिहिलंय, ती अभिनय देवची बायको आणि रमेश सीमाची सून आहे. पाठारे प्रभू रेसिपीज बघायला, स्मिता जयकरच्या जाऊबाईंकडे गेलेला.

...

मागे एपिक चॅनेकवर एक लॉस्ट रेसिपीज कार्यक्रम दाखवायचे तो खूप आवडलेला. होस्ट कोण होता आठवत नाही पण त्यातल्या रेसिपीज एकदम सॉलिड हटके होत्या. पारशी लोक अंड्याला येडा म्हणतात हे तेव्हा कळले. Happy

रणवीर सापडल्यावर मात्र त्याच्या दोन रेसिपीज करूनही पाहिल्या. आणि ते केवळ यासाठी की त्याची सांगायची पद्धत इतकी सुटसुटीत आहे आणि रेसिपी इतकी व्यवस्थित क्रमवार असते की कठीण रेसिपी पण सोप्पी वाटते. >>> अगदी अगदी .
त्याची सोपी चिकन करीची एक रेसिपी आहे . त्यात त्याने प्रत्येक मसाला कधी , कोणत्या क्रमाने आणि का घालावे हे मस्त एक्स्प्लेन केलं आहे .
एकदा करून बघायाची आहे .

मला त्याच्या सगळ्या रेसिपीज करून बघायच्या आहेत. त्याची ती सोपी चिकन करी मी केली रविवारी. कोथिंबिरीच्या दांड्याही ठेवल्या होत्या वेगळ्या, कोथिंबीर साफ करताना. त्याही वापरल्या, सुरेख स्वाद येतो त्यांच्यामुळे. अतिशय सुंदर, दाट करी तयार झाली, फारशी खटपट न करता, उस्तवारी न काढता.

आणि अमुक मसाला का घालावा, कधी घालावा हेही तो सांगतो हे आवडते, इतर रेसिपीत फायदा होतो त्या टिप्सचा.

आता बघतेच
अंड्याला येडा म्हणतात?
डेंजर आहे.
मला एकदा घरी (अगदी सूक्ष्म, इतकुसा, कॅलरीज ना कळणार पण नाही इतका)कृष्णा स्वीट मैसूरपा करून बघायचाय.

पारशी लोक इडा / इडू म्हणतात अंड्याला. इंग्रजीत रेसिपी लिहिताना 'eda' किंवा eeda लिहितात. ते परत वाचताना हिंदी/ मराठी भाषिक एडा वाचतात Happy

मेधा Lol

पण इडापाक हा प्रकार भन्नाट आहे.

Ranveer Brar yes top favourite. I have tried chicken ghee roast asmper his recipe along with neer dosa. Too good.

मालवणी लोक मुंबईत आले तेव्हा त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा पनीर बघितले. Happy Happy तोपर्यंत दूध फाटले ( जे त्यांच्याकडे सहसा फाटत नाहीच) की त्यात साखर घालून खायचे हेच माहीत होते Happy Happy>>>>
तेचं ग साधना. Lol म्हणुनच मला ते एकदम अचाट वाटल. पनीर चा प्रांत कुठला. मालवण कुठे. घाटी पनीर पण आहेत त्यात. Lol

'मला एकदा घरी (अगदी सूक्ष्म, इतकुसा, कॅलरीज ना कळणार पण नाही इतका)कृष्णा स्वीट मैसूरपा करून बघायचाय.'>>>> तुला नुसता बघायचाच आहे ना? मग इतकुसा कशाला भरपूर कर की आणि खायला आम्हाला बोलव.

मला पोह्यांचे मिरगुंड करायचे आहेत. कुणाला रेसिपी माहीत आहे का?जालावर पाहून खूप confusion होतंय. मला ते लाल रंगाचे चौकोनी आकाराचे कोकणी पद्धतीचे मिरगुंड हवेत.

सान्वी,
आम्ही पोह्याच्या पापडासाठी जे पीठ भिजवतो त्याचेच मिरगुंड करतो. पोहे भाजून त्याचे पीठ करुन घ्या. १ कप पिठाला तितकेच पाणी गरम करुन त्यात १/४ टीस्पून पापडखार आणि चवीनुसार मीठ. पिठात थोडा हिंग आणि आवडी प्रमाणे तिखट. पापडखारवाले पाणी गार झाले की ते वापरुन पीठ भिजवा. पीठ जेवढे कुटून घ्याल तितके मिरगुंड/पापड हलके होतील. लाटायला पोह्याचेच पीठ घ्यायचे.

धन्यवाद साधना आणि स्वाती. दोन्ही रेसिपीज चांगल्या आहेत, पण मला साबुदाणा घालायचा नाहीये त्यामुळे स्वाती यांच्या रेसिपी प्रमाणे करून पाहते.

आंब्याचा गर दीर्घकाळ कसा टिकवावा? शक्यतो प्रीझर्वेटीव्ह नकोत अशी पद्धत आहे का? नेट वर शोधले तर एकीने नुसताच गर डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवला. एकीने गर खूप शिजवून आटवून फ्रीजरमध्ये ठेवला.
तुम्ही कसा टिकवता?

एकीने गर खूप शिजवून आटवून फ्रीजरमध्ये ठेवला.>> बहुधा ही मेथड योग्य ठरेल, माबोवर मनिमोहोर जास्त छान सान्गु शकतिल त्याना विपु करा.

पाड थाई आणी yellow करि किवा एखादी छान्शी थाई करीची हमखास रेसिपी सान्गु शकाल का?किवा लिन्क द्या! लेकिला थाई फुड आवडत तर तिच्या वाढदिवसापर्यत एखाद दुसरी ट्रायल घेता येइल म्हणजे लास्ट मिनिट पोपट होणार नाही, एरवी तिच्या फेवरेट थाई रेस्टारन्ट मधे जातो पण यन्दा ते शक्य नाही.

मी थाई करी नेहमी आमच्याकडे real thai / pantai ह्या ब्रॅंडचे curry paste मिळतात त्या वापरुन करते. नो कटकट आहे, भाज्या पाण्यात शिजवायच्या आणि शिजवताना मसाला पेस्ट घालायची. भाज्या शिजल्या की नारळाचं दूध आणि 2 एक मिनिटे उकळी. Done. तुमच्याकडे बघा हे किंवा असे कोणत्या paste मिळतात का. पाड थाई कधी घरी करून पाहिले नाही. Pantai brand चा pad thai sauce पण दिसतोय.

आंब्याचा रस घरी गॅस वर आटवणे फार कटकटीचे आणि वेळखाऊ प्रकरण आहे. हात दुखून येतात.मेहनतीच्या तुलनेत तयार माव्याचे प्रमाण कमी असते. रस काढून काचेच्या बरणीत भरून फ्रिजर मध्ये ठेवला तर सहा सात महिने तरी नक्कीच टिकतो.
घराजवळ कुठे कॅनिंग सेंटर असेल तर रस कॅनमध्ये सील करून ठेवता येईल.

Pages