पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारल्याचे लोणचे करताना यु ट्यूब वर सर्वत्र मीठ , हळद घालून 2-5 तास ठेवा व पाणी काढून टाका असे दिले आहे

पाणी न काढता लोणचे होत नाही का ? पाणी तसेच ठेवले तर त्याच्या शेल्फ लाईफ वर परिणाम होईल , लवकर खराब होईल , म्हणून तसे करतात का ?

खारे शेंगदाणे करताना वाळू नसेल तर वाळू ऐवजी मीठ वापरा. मस्त भाजले जातात दाणे. तसच ते मीठ पुन्हा पुन्हा ही वापरता येते दाणे भाजण्यासाठी.

>> कारल्याचे लोणचे करताना यु ट्यूब वर सर्वत्र मीठ , हळद घालून 2-5 तास ठेवा व पाणी काढून टाका
आईचं भाजी करतानाचं लाॅजिक त्यातला कडूपणा काढून टाकणे हा आहे. आता हेच लोणच्यासाठी आहे का माहित नाही.

कुठल्याही लोणच्यामध्ये पाण्याचा अंश कमी असेल तर लोणचे जास्त टिकते हे सर्वमान्य आहे. अ‍ॅडिशनली बाहेर्च्या वातावरणाचा संपर्क तोडाण्याचं काम तेल करतं. कैरी/लिंबू तत्सम आंबट फळं याला अपवाद कारण त्यांत नैसर्गिक आम्ल असल्यानी बाय डिफॉल्ट काम होतं; आणि तरीही त्यात मीठ/ साखर या गोष्टी घालून लोणची घातली जातात कारण चव + शेल्फ लाईफ दोन्हीही वाढतं. तसेच कैरी लोण्च्यात ऑन सेफर साईड कैर्‍या धूवून सुकवून आणि बाकी मसालेही किंचीत भाजून लोणचं करतात ते टिकण्याच्या क्रियेस हातभार व्हावा म्हणूनच.

आता कारल्यात कडूपणा + पाणी कमी करणं हा उद्देश मीठ + हळद लावून काही वेळ ठेवून साध्य होतो म्हणून तसं करतात; हेतू हा की लोणचं जास्त काळ टिकावं.
बहुधा बरोबर लिहिलं आहे मी. काही चुका असतील तर त्या दुरुस्त करेन.

हेल्प प्लिज

अर्धा किलो साबुदाणा भिजत घातलाय साबुदाणा वड्यासाठी . त्या प्रमाणात इतर घटक किती लागतील ?

भरत थँक्स

डार्क चॉकलेट ची आयडिया चांगली आहे

मखाणे थोड्या तुपावर भाजून बारीक करून घ्यायचे. आटवलेल्या दूधात घालून आपल्याला हवे तो सुकामेवा, वेलदोडा,केशर/जायफळ घालून एक उकळी काढायची.. थंड गरम हवी तशी खा.
तुपावर भाजलेल्या मखाण्यावर तिखट, मीठ, मिरेपूड भाजलेले शेंगदाणे घालून चिवडा पण छान लागतो

जाई,
मी १ कप साबुदाणा भिजत घातला असेल तर दोन मोठे बटाटे उकडून आणि १/३ कप दाण्याचे कूट असे प्रमाण घेते. तिखट( हिरव्या मिरच्या) , मीठ चवीनुसार. मी १/४ चमचा जीरेपूडही घालते. काही वेळा गोळा मिळून यायला अजून अर्धा बटाटा घालावा लागतो. साबुदाणा आणि बटाटा कसा आहे त्यावर थोडे अ‍ॅडजस्ट करायचे.

कॅरेमल मखाणे, पुदिना मखाणे, इटालियन मिक्स हर्ब्ज मखाणे, घरी केलेले गार्लिक बटर वापरून गार्लिक -हर्ब्ज मखाणे, चीझ पावडर वापरून चीझ मखाणे, जीरे-मीरे पुड घातलेले मखाणकेहे प्रकार आमच्या घरी केले जातात.

गवारीची नो मसाला , नो खोबर , नो बटाटा भाजीची पाकृ कोणी दीएल का ?
मला गवारीची मूळ चव आवडते . पण नेहमी भाजी बनवताना त्यात खोबरं , बटाटा , थोडं पाणी वगैरे घलून , चांगली शिजवून केली जाते .
त्यात फक्त मसाल्याची चव लागते .

गवार शिजवून घेऊन फोडणीस घालून मग किंचित तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर, धनेजिरे पूड घालून चांगली होते. साधी सोपी सात्विक चविष्ट.

भरपूर कांदा अन हिरव्या मिरच्या ची फोडणी करून त्यात गवार घालायची, पाणी थोडेसे जास्त घालायचे, अन गवार मऊ होईपर्यंत शिजवायची. खूप छान चव येते.

अन हो, तेलही सढळ हाताने घालायचे, चव अजून छान येते

कोवळी देशी गवार असेल तर ,
मोहरीची फोडणी न देता फक्त तेलावर गवारीची भाजी परतुन घ्यायची. मग त्यात ओवा घालायचा आणि झणझणित हिरवी मिरची + लसून वाटण घालून परतायचे. मीठ घालून एक वाफ काढायची. पाणि घालायचे नाही. लिंबू पिळले कि आणखी छान चव लागते.

गवारी कोवळी असली कि नेहमी ही भाजी किंवा गवारीचे लोणचे (तेल न घालता ) केले जाते.

पाणी न काढता लोणचे होत नाही का ? पाणी तसेच ठेवले तर त्याच्या शेल्फ लाईफ वर परिणाम होईल , लवकर खराब होईल , म्हणून तसे करतात का ?>>
शेल्फ लाईफ साठी पाणी काढून कोरडे केले जाते. लोणचे होते पाणी न काढता सुद्धा. फ्रीजमध्ये ठेवा आणि लगेच आठवड्यात संपवा. कारल्याचे लोणचे ताजे आनि करकरितच चांगले लागते तसेही.

गवार उकडून,, नंतर साधी हिंग मोहरी हळद फोडणी आणि तिखट मसाला आणि शिजायला आल्यावर दाण्याचा कूट घालून भाजी मस्त लागते.
मखाणे नुसते छान लागतात.किंवा तूप हळद मेतकूट मीठ यात परतून.

मी गवार १-२ चमचे तेल टाकून परतून घेते. जीरे, मोहरी, हिंग, हळद, लसूण, कांदा(हवा असेल तर), तिखट मसाला, मीठ मधे गवार अगदी कमी पाणी घालून शिजवते. नंतर वरून दाण्याचा कूट घालते.

गवारीत पाणी घातले की चव जाते. गावार वाफेवरही छान शिजते. आणि तिची मुळ चवही रहाते.
तेलावर कांदा कडीपत्ता घालुन थोडीशी हळद लाल तिखट घालुन गवार घालुन वाफेवर होउ द्यायची. साधी कमी मसाल्याची गवार.
मी लाल तिखटाऐवजी थोडं तिळकुट घालते.

गवार नुसती लसणाची फोडणी देवून वाफेवर शिजवून घेते आणो कारळं, लाल मिरची व भाजलेलं सुखं खोबरं घालते थोडंस घालते.
कधी कधी , वेगळे जीरा-धणा पूड भुरभुरले बटाटे तळून घालते

पनीर तयार करतो तेव्हा जे पाणी उरते, त्याचं काय करता येईल? आज 1 लिटर दुधाचे पनीर करायचे आहे, बरेच पाणी उरेल, टाकून देण्यापेक्षा काही उपयोग करता येईल का त्याचा?

व्हे प्रोटीन खूप चांगले.कोणत्याही ग्रेव्ही भाजीत पाण्याऐवजी वापरता येईल. गवार सुक्या भाजीत बरेच जण लुसलुशीत पणासाठी दूध टाकतात.त्या ऐवजी हे पाणी टाकता येईल.पोळ्या पराठे कणिक मळताना हे पाणी वापरता येईल.(काहीच करायचे असेल तर मग कढीपत्त्याला टाकता येईल.)

आमटी करताना, पोळ्यांची कणीक भिजवताना वापरता येईल. वारंवार पनीर करत असू तर पुढच्या वेळी लिंबाऐवजी हे पाणी वापरून दूध फाडता येतं बहुधा.

धन्यवाद सर्वांना :), पोळी साठी वापरून बघेन,
इतक्यात पुन्हा काही पनीर होणार नाही .

Pages